Skip to main content

शोलेच्या ठाकूरच्या हातांचा शोध

बुधवार, 23/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३५ वर्ष लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधून सापडायची नाही. ह्या चित्रपटातील सर्व पात्रे लक्षात राहिली, पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो हात नसलेला ठाकूर. "तेरे लिये मेरे पैर हि काफी है", अस म्हणत गब्बर वर तुटून पडणारा ठाकूर पहिला कि नुसता चेव चढायचा अंगात. हात कापलेल्या ठाकूरला लढताना बघताना मला लहानपणी जाम कौतुक वाटायचे. मग शाळेत खेळताना हात मागे बांधून मित्रांशी मारामाऱ्या देखील केल्या आहेत (आणि तोंडावर पडून नाक फोडून घेतली ते सांगायला नकोच,,). जाऊ देत, नमनालाच घडाभर तेल झाल. तर आता हे सर्व आठवायचे कारण म्हणजे आज तूनळीवर उगाचच भटकत असताना अचानक हा विडीयो सापडला. अर्थातच शोध ऑफ सेन्चुरी असल्याकारणाने तुम्हा सर्वांशी शेयर केल्यशिवाय राहावल नाही.. इथे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2699
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हातोहात फसलो होतो. पण ही फोटोशॉप ची हातचलाखी तर नव्हे? बाहीत हात आणि गब्बरला लाथ! हात तेरेकी.

>>हात मागे बांधून मित्रांशी मारामाऱ्या देखील केल्या आहेत (आणि तोंडावर पडून नाक फोडून घेतली ते सांगायला नकोच,,).>> नमनाच तेलच फार आवडल भाउ. बाकि विडिओ झकास!

नमनाचे तेल आवडले.... माझ्याकडे शोले आहे... हा धागा बघितल्यावर तो सीन परत निट बघितला असता खरच ठाकुरचे हात दिसतायत.... ज्याने हे पहिल्यान्दा शोधले त्याला दंडवत... आणि तुम्हाला ही...... ----कवटी

In reply to by नरेशकुमार

इथले सर्व प्रस्थापित त्या बिचार्‍या शोषित रामलालला मदत करणार नाहीत हे आम्हास ठाऊक आहे. शेवटी काहीही झालं तरी ठाकूर ठाकूरच.