✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विनील, नक्षलवादा विषयी महत्त्वाचे

आ
आळश्यांचा राजा यांनी
Mon, 02/21/2011 - 00:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27594 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

आधार....!!

इन्द्र्राज पवार
Wed, 02/23/2011 - 10:56 नवीन
"....पण प्रतीसादाची पध्दत आणि त्याला काहीही आधार त्यात दिसला नाही ...." ~ श्री.चिंतामणी.... पॉईन्ट नोटेड. पण हेही सांगणे अत्यंत गरजेचे आहे की, 'आधार' हा जो मुद्दा इथे आला आहे, तो सांगोवांगी माहितीचा वा निव्वळ वाचन तसेच 'फिल्मी नॉलेज' मधून आलेला नसून माझ्या मित्रांसमवेत झालेल्या भटकंतीतील टीपणावर (जरी "नक्षलवाद" या विषयावरील ते भटकणे नसले तरी.....एक बंगाल वगळता देशाच्या नक्षलप्रभावीत जवळपास आठ राज्यात आम्ही भटकलो आहोत) आधारीत आहे. ओरिसा आणि छ्त्तीसगड या दोन्ही 'नक्षल अफेक्टेड' राज्यांच्या सीमेवर आंध्र प्रदेशातील 'राजमुन्द्री' नावाचा (शैक्षणिकदृष्ट्या) एक प्रगत जिल्हा आहे. कॉलेजच्या काळात त्या जिल्ह्यातील एका गावात दोन दिवस, (तेथील मित्रामुळे जो सध्या ईस्ट गोदावरी येथील आंध्र प्रदेश पेपर मिल्समध्ये अधिकारी आहे), मुक्कामास राहण्याची संधी मिळाली होती. त्याच्या नातेवाईकांचा 'तसला' रूबाब मी दुसर्‍या दिवशी पाहिला होता. म्हणजे अगदी वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे परिस्थिती नसली तरी वाड्यासमोर बैठक आहे, जमीनदार "निशांत" स्टाईलमध्ये लोडाला टेकून आहेत, दिवाणजी काहीतरी अगम्य अशा तुळू भाषेत बोलत आहेत, आणि केवळ कमरेला लुंगी लावलेली रयत - किमान डझनभर तरी होतेच - दीनवाण्या चेहर्‍याने बाजूला उभी आह. [लक्षात घ्या, राजमुन्द्री आणि मेहबूबनगर हे दोन्ही जिल्ह्ये नक्षलवाद्यांच्या कारवाईने गाजत असूनदेखील तिथली जमीनदारी अजुनही संपुष्टात आलेली नाही.] तिथे विषय काय चालला आहे हे समजले जरी नसले तरी आम्हा मित्रांना 'अमरीश पुरी' सम सीनची आठवण झाली हे तितकेच खरे. त्यामुळे बिमल किशनच्या काळात प.बंगालमध्ये काय परिस्थिती असेल याची झलक दाखविण्यासाठी ते उदाहरण घेतले होते. राहता राहिला मुद्दा....नक्षलवाद्यांना विरोध....तो तर केलाच पाहिजे, चिंतामणी. भारतीय घटना आणि येथील कायदेकानू मानणार्‍या प्रत्येक नागरिकाने असे शस्त्र घेऊन समाजस्वास्थ्याला नख लावणार्‍यांच्या (आणि ती कीड वाढविण्यास छुपी मदत करणारे सर्व) कारवायांना विरोध हा केलाच पाहिजे. प्रत्यक्ष 'ऑपरेशन' मध्ये भाग घेऊनच हे केले पाहिजे असे नव्हे तर श्री.विनील कृष्णा सारखे जे कर्तबगार अधिकारी हे आपल्या मगदुरीप्रमाणे कार्य करीत आहेत त्याना वेळोवेळी पाठिंबा तर दिला पाहिजे, मग तो एका प्रोत्साहनपर ई-मेलनेदेखील देता येतो. असो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

@ काळे काका

आळश्यांचा राजा
Tue, 02/22/2011 - 21:26 नवीन
हे 'सपशेल पडेल' तत्वज्ञान लोकांना इतके कसे पटते?
हे तत्वज्ञान सपशेल पडेल आहे की नाही हे माहीत नाही. हिंसक आहे हे माहीत आहे. लोकांना पटते की नाही हेदेखील माहीत नाही. हिंसक असल्यामुळे मला तरी संदर्भाशिवाय पटत नाही. हिंसा मी सरसकट नाकारत नाही. शिवाजीचा पॉलिटिकल स्ट्रगल हिंसक होता. गॅरिबाल्डीचा हिंसक होता. चे चा हिंसक होता. नेताजींचा (काही अंशी) हिंसक होता. प्रस्तुत संदर्भात, नक्षली हिंसा मला पटत नाही. कारण इथे पर्याय आहेत. अधिक चांगले पर्याय आहेत. या तत्त्वज्ञानाचे निमित्त करुन एक नवीन शोषण पद्धती उभी राहिली आहे हे दिसत आहे. अ‍ॅकॅडेमिशियन्सना हे तत्त्वज्ञान पटत असेल, तर मला त्यांची आश्चर्ययुक्त कीव वाटते. किमान भारतीय संदर्भात तरी. आदिवासींना हे पटत असेल असे वाटत असेल, तर त्याची चार कारणे मला दिसतात. (पटणे म्हणजे साथ देणे अशा अर्थी) - साम - खरेच पटणे दाम - पैशाच्या मोहापायी. नक्षल आदिवासींना पैसे देत असतील असे वाटत नाही. दंड - भय. भीतीपोटी आदिवासी पॅसिव्ह कोऑपरेशन करत असावेत. भेद - आदिवासींमधील अँटीसोशल इलेमेंट्स टॅप करणे.
  • Log in or register to post comments

उदात्तीकरण

विकास
Tue, 02/22/2011 - 22:14 नवीन
ह्या तसेच या संदर्भातील इतर चर्चेतून खूप माहिती मिळाली. त्याबद्दल सर्वांचाच आभारी आहे! वर श्री. प्रसन्न केसकर यांनी विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात बराच उहापोह झाला आहेच. त्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा वाटतो तो उदात्तीकरणाचा. ज्याचा प्रत्यक्षापेक्षा अप्रत्यक्ष संबंध हा कधी कधी फंडींगशी लागतो. या संदर्भात एक आठवणारे उदाहरण हे श्री. संदीप पांडे यांचे आहे. यांनी अमेरिकेत असताना "आशा" नामक संस्था स्थापली आणि त्याच्या आधारे भारतात शिक्षणासाठी पैसे गोळा करून चांगल्या प्रकल्पांना मदत केली. आता हा प्रकल्प वाईट आहे का तर नाही/नसावा. यात काम करणारे इथले स्वयंसेवक काही माओवादी आहेत का? तर नाही/नसावेत. पण स्वतः पांडे मात्र तसे आहेत का नाहीत या बद्दल साशंकता वाटते. २००२ साली बिहार मध्ये नक्षलवाद्यांच्या स्मारकाच्या समारोहासाठी ते प्रफुल्ल बिडवाई, अरुंधती रॉय आदींबरोबर हजेरी लावून होते. मॅगेसॅसे मिळाल्यावर, त्याला मिळाणारी मदत फोर्ड फाउंडेशन म्हणजे अमेरिकन फाउंडेशनची म्हणत त्यावर टिका करत स्वतःची भांडवलशाही विरोधी प्रतिमा तयार केली. या सर्वांचा त्यांच्या आदर्श कामामधे सहकारी असलेल्या स्वयंसेवकांवर देखील परीणाम होतोच. त्यांना देखील मग नक्षल चळवळ उदात्त वाटू शकते. त्याचे परीणाम मग हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फंडींगवर होऊ शकतात. संदीप पांडे हे केवळ एक उदाहरण आहे. असे उदात्तीकरण करणार्‍यात, अरुंधती रॉय, मेधा पाटकर, प्रफुल्ल बिडवाई, माहेश्वरी देवी आदी आहेत. (बिडवाईंचे माहीत नाही पण) ज्यांचे इतर कार्य प्रशंसनीय असेलही पण असल्या समर्थनांमुळे त्या कार्याला देखील उपहास सहन करावा लागू शकतो.
  • Log in or register to post comments

सुटका...!!

इन्द्र्राज पवार
Tue, 02/22/2011 - 23:04 नवीन
एक चांगली बातमी ~ आत्ताच जाहीर झाले की, श्री.विनील कृष्णा आणि श्री.पबित्र माज्झी यांची, माओवाद्यांनी त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे, सुखरूप मुक्तता केली आहे....[मिडियाची खबर] (पण आकाशवाणीवरील वृत्तात - ११.०० च्या बातम्या - म्हटले आहे की येत्या ४८ तासात त्यांची सुटका होईल) असो...पण सदस्यांना विनंती की, इथे असलेली चर्चा पुढे चालू ठेऊ या....या निमित्ताने बर्‍याच गोष्टी चर्चेला येतील असा विश्वास वाटतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments

आनंद झाला

विकास
Wed, 02/23/2011 - 01:06 नवीन
श्री.विनील कृष्णा आणि श्री.पबित्र माज्झी यांच्या सुटकेची वार्ता ऐकून आणि पाहून आनंद झाला. जनतेचा दबाव आणि तो देखील एका सरकारी अधिकार्‍यासंदर्भात, यशस्वी झाला. केवळ आदीवासीच नाहीत, तेथील स्थानिक जनताच नाही, तर त्याहूनही अधिक संख्येने विविध संस्थळांवर चर्चा झाल्या, फेसबूकसारख्या ठिकाणी ७०००च्या वर सभासद गोळा झाले... तुर्तास त्याच्यामुळे अतिरेकी नक्षलवाद्यांच्या ज्या काही मागण्या मान्य केल्या गेल्या त्यांचा परीणाम कमी वाटतो आहे. कधी बघण्याचाच काय, ज्याचे नाव पण आठवड्यापूर्वी ऐकलेले नव्हते अशा या श्री.विनील आणि पवित्र साठी जनता एक येऊ शकते, यातून सर्वांनाच संदेश मिळाला आहे - तथाकथीत सेक्युलर्सना, राजकारण्यांना, माध्यमांना आणि अतिरेकी नक्षलवाद्यांना. तसाच चांगल्या अर्थाने सरकारी अधिकारी, पोलीस आणि तत्सम इतर सुरक्षा दलांना देखील वाटले असेल की आपले काम अगदीच दुर्लक्षित झालेले नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

वाचतो आहे

श्रावण मोडक
Wed, 02/23/2011 - 11:22 नवीन
चर्चा वाचतो आहे. काही नवे दृष्टिकोन दिसतात. काही जुने घीसेपीटे; पण म्हणून चर्चा घसरत नाहीये. पुढे काही लिहायला वेळ मिळाला तर भाग घेईन.
  • Log in or register to post comments

नक्षलवाद फोफावतो तो

विजुभाऊ
Wed, 02/23/2011 - 11:44 नवीन
नक्षलवाद फोफावतो तो आदिवासींच्या शोषणातून. याला बर्‍याचदा स्थानीक लोकांवर बाहेरून आलेले लोक राज्य करण्याचा प्रयत्न करतात यामुळे होतो. आरापल्लीत तेंदू पत्त्यांचे ठेके सरकार देते. आदिवासींच्या मुळ व्यवसायावर हा घाला होतो. आदिवासी व्यवसायासाठी जंगलतोड करीत नाहीत पण सरकार जंगलतोडीचे ठेके देते. आदिवासीला घरातल्या चुलीसाठी साधी मोळी डोक्यावरुन नेउ दिली जात नाही. आदिवासी हे नागरी लोकांसारखे पैसे साठव त्यातून काही भविष्याची तजवीज कर असल्या विचारांचे नसतात. नागरी करण हा संस्कृतीवरच वार असतो. त्यामुळे शरातून आलेला तो आपले शोषण करणाराच हे त्यांच्या मनात ठसलेले असते. सरकारचे कायदे आदिवासीना उमगत नाहीत. त्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवला जातो. पोलीस देखील त्यांच्यावर जबरदस्ती करत असतात . या सर्वात भरडला जातो तो स्थानीक आदिवासी. त्याच्या व्यवस्थेविरुद्धा काही आवाज उठवावा असे काहीच नसते. मिडीया वगैरे शहरी मध्यमवर्गीयांकडे ज्या सहजपणे उपलब्ध असतो तितका आदिवासींकडे नसतो. यातूनच शोषणाचे एक चक्र सुरू होते. यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणून चळवळींकडे पाहिले जाते. शिक्षण वगैरे देखील नागरी पद्धतीनेच आदिवासींच्या माथ्यावर मारले जाते. आदिवासी संस्कृतीचा र्‍हास होत रहातो. त्यांची जगण्याची पद्धत बदलली जाते. त्यांची भाषा नष्ट होते. गुजरात मध्ये तेजगडच्या आदिवासी भागा डॉ गणेश देवी गेले वीस वर्षे आदिवासी साठी त्यांची भाषा जगावे .संस्कृती जगावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. तेथे असल्या चळवळी उभ्या राहिल्या नाहीत. आदिवासीना त्यांच्या पद्धतीने शिक्षण ,काम मिळाले तर बर्‍याचशा नक्षली चळवळी उभ्याच रहाणार नाहीत
  • Log in or register to post comments

तेजगड

श्रावण मोडक
Wed, 02/23/2011 - 12:20 नवीन
तेजगडच्या त्या अहिंसात्मक प्रक्रियेला पाठबळ द्यावे लागेलच. अन्यथा तेथील असे काही हक्कसंबंधित मुद्दे अहिंसात्मक चळवळीतून सुटत नाहीत अशी स्थिती झाली तर ती माओवाद्यांसाठीची सुपीक भूमी ठरेल. आधीच मुंबईच्या उत्तरेला गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशात एक लाल वर्तुळ निर्माण झाले आहे. यासंदर्भात समाज-सरकार कोठे आहे हे पाहणे महत्त्वाचे. विजूभाऊ लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वर्तुळ

नितिन थत्ते
Wed, 02/23/2011 - 12:45 नवीन
>>मुंबईच्या उत्तरेला गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशात एक लाल वर्तुळ निर्माण झाले आहे. हे वर्तुळ बहुधा गोदावरी परुळेकरांच्या काळापासून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

माझे मत

श्रावण मोडक
Wed, 02/23/2011 - 13:28 नवीन
माझ्या मते, त्या काळचा लाल रंग केवळ कम्युनिस्ट म्हणून असावा. त्यामागे उगाचच कांगावा असाही भाग होताच. पुढे तो लाल रंग फिक्कट होत गेला. नंतर आत्ता जे लाल वर्तुळ दिसते आहे ते मात्र भडक लाल आहे. ते नव्याने दाखवले जात आहे. आणि त्यात काही अर्थी आत्ताचा नको असलेला खराखुरा लाल रंग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

नकाशा बनवला कुणी?

प्रसन्न केसकर
Wed, 02/23/2011 - 13:43 नवीन
हा महत्वाचा भाग आहे. मुळात नक्षलवादी म्हणजे नक्की कोण याची व्याख्या काय आहे यावर ही रंगरंगोटी अवलंबुन असते. आणि जर सगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स वगैरेचा प्रेझेन्स नक्षलवादाच्या लाल रंगात दर्शवायच्या झाल्या तर अगदी पुणे मुंबई पण लाल होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मी व्याख्येत जातच नाही. कारण

श्रावण मोडक
Wed, 02/23/2011 - 14:14 नवीन
मी व्याख्येत जातच नाही. कारण लोकशाही व्यवस्थेत हिंसेचे कोणतेही तत्वज्ञान निषेधार्ह आणि त्याज्य. मग ते चारू-कनूंचे असो वा आजचे. अर्थात, काही सुरक्षीत अंतरावरून मी हिंसा नाकारतो आहे, असेही म्हटले जाऊ शकते याची मला कल्पना आहे. नकाशासंदर्भात मी जो लाल रंग म्हणतो आहे, तो माओवाद प्रभावीत क्षेत्रासंदर्भातच. त्या माओवादाविषयी तुम्ही खाली दिलेली माहिती वाचली आहे. त्यातील काही माहितीशी मी सहमत असलो तरी, त्याच्या तुम्ही मांडलेल्या इण्टरप्रिटेशनशी मात्र मी पूर्ण सहमत नाही. लेट्स ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन ऑन अ बिट डिफरण्ट ट्रॅक्स!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

व्याख्या न करता निषेध कश्याचा करणार?

प्रसन्न केसकर
Wed, 02/23/2011 - 14:27 नवीन
टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन्स आर डिफरंट दॅन ऑदर ऑर्गनायझेशन्स. लाल ठिपका दिसतो याचा अर्थ नक्षल प्रेझेन्स हे मान्य केले तर तो कुठल्या स्वरुपात हे स्पष्ट हवेच. नाहीतर सगळाच गोंधळ होईल. दहशतवादी संघटना रजिस्टर्ड ऑफिसेस उघडत नसतात मोजुन प्रेझेन्स दाखवायला त्यामुळे तो अ‍ॅक्टीव्हिटीज मधुनच दिसतो. त्या अ‍ॅक्टीव्हिटीज कोण करते, कोणत्या स्वरुपाच्या आहेत हे लक्षात घेणे अत्यावश्यक असतेच अश्या अभ्यासांमधे. नाहीतर तो अभ्यास नाही. ते म्हणजे नेहमी आम्ही पत्रकार मंडळी उडवतो तसे पतंग उडवणे झाले. झाला स्फोट जर्मन बेकरीत आणि नाही काही नविन मिळाले की घ्या एखादे नाव इंडियन मुजाहिदीन, सिमी, अभिनव भारत वगैरेसारखे. अन मग संबंधीत मंडळी अजुन गोंधळ करतात. ते देतात एखादे पत्र पाठवुन डेक्कन मुजाहिदीन नावाने. झालं आली नवी संघटना अस्तित्वात. अन सहमतीबद्दल धन्यवाद. ते इंटरप्रिटेशन वगैरे काही मला कळत नाही. मी फक्त फॅक्टस मांडतो. माझ्या प्रतिसादात ज्या फॅक्टस आहेत त्या बाबतच महत्वाचे. इंटरप्रिटेशन वगैरे वाटल्यास इतरांनी करावे या फॅक्टसचे अन वेगळे तार्किक निष्कर्ष काढावेत. आय टोटली अ‍ॅग्री इफ समवन अ‍ॅग्रीज टु डिसअ‍ॅग्री अ‍ॅज लाँग अ‍ॅज ही इज नॉट डिस्प्युटिंग फॅक्टस विथ सबटरफज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वेल,

श्रावण मोडक
Wed, 02/23/2011 - 16:53 नवीन
वेल, इन दॅट सेन्स - मी तर हिंसेवर आधारलेल्या तत्वज्ञानाचाच किंवा त्या आधारे चालणाऱ्या कारवायांचा निषेध करतोय. मग ते दहशतवादी असतील, माओवादी असतील, चारू-कनूचे अनुयायी असतील वा उद्या, तुमच्या येथील व्यापक मांडणीनुसार, गँगस्टर्स असतील. पण या चारही गटांत मी फरक करतो. निषेध केला. पुढे काय, असा प्रश्न मी मलाच विचारतो तेव्हा मी भिन्न मार्ग सांगेन. त्याविषयी इथे लिहित नाही. स्वतंत्र बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

अजुनही...

प्रसन्न केसकर
Wed, 02/23/2011 - 13:37 नवीन
नक्षलवाद हे तत्वप्रेरित चळवळ आहे असा बर्‍याच जणांचा समज दिसतो. बहुतांश हा समज सेकंड हँड माहितीवर किंवा पॉप्युलरिस्ट लिखाणावर आधारित आहे. सध्या भारतात नक्षलवाद या नावाखाली जे विकले जाते तो नक्षलवाद नाही, कधीच नव्हता. तो स्युडो नक्षलवाद किंवा प्रोफेशनल टेरेरिझम आहे, गँगस्टरीझम बळावुन त्याचे दहशतवाद, क्रांतीवाद असे ग्लोरिफिकेशन झालेले आहे. नक्षलवाद ७० च्या दशकात बंगालमधेच संपला. हे समजुन घेतले नाही तर त्याच्या कुठल्याच अ‍ॅनॅलिसिसला मग ते नक्षलवादाचे ग्लोरिफिकेशन असो किंवा निषेध असो. सर्वप्रथम एक मिथ मनातुन काढणे आवश्यक आहे. ती म्हणजे नक्षलवाद शोषितांना न्याय देतो किंवा ती शोषितांची क्रांती आहे. नक्षलवाद्यांच्या विविध गटांच्या फ्रंट ऑर्गनायझेशन्सनी हेतुपुरस्सर पसरवलेली ही भाकडकथा आहे. नक्षलवाद आदिवासी, शोषित यापैकी कुणालाच न्याय देण्यासाठी नाही. तो प्रस्थापितांनी शोषितांचे पिळवणुक करुन, त्यांना दहशतीखाली ठेऊन स्वतःच्या फायद्यासाठी चालवलेला धंदा आहे. त्यातुन अब्जावधी रुपयांची उलाढाल होते आणि त्यातील कोणताही पैसा शोषितांसाठी वापरला जात नाही. दंड व भेद या दोन मार्गांचा वापर कसुन नक्षलवादी स्थानिकांना सहकार्य करण्यास भाग पाडतात. विनिल, माझी यांच्यासारख्या अधिकार्‍यांच्या अपहरणानंतर ज्या प्रकारे स्थानिक जनता व शोषित लोक नक्षलवादाविरोधात उभे राहिले यातुन हे सिद्ध झाले आहेच. विनिल प्रकरणामुळे हे स्पष्ट झाल्याने गेल्या काही दिवसात भारतभरचे स्ट्रॅटेजी अ‍ॅनॅलिस्ट सध्या सर्वच गृहितके तपासुन पाहत आहेत. (यात मीडीयातील अत्यल्प संख्येने असलेले प्रगल्भ पत्रकार आणि थोडेफार प्रामाणिक अशासकीय कार्यकर्ते देखील आलेच. पण त्यांची संख्या अगदीच कमी आहे.) नक्षलवादाच्या इतिहासावर एक दृष्टीकोण टाकल्यास सध्या सात, आठ राज्यात जे सुरु आहे ते नक्षलिझम नसुन प्रोफेशनल टेरेरिझम कसा आहे हे स्पष्ट होते. बंगाल, नक्षलबारी, नक्षलवादाची मुलतत्वे, चारु-कनु, ७० च्या दशकाच्या शेवटी त्यांना आलेले फ्रस्ट्रेशन वगैरे इतिहास वर इंद्रराज पवार यांनी लिहिलाच आहे. हा इतिहास सर्वज्ञात आहे, कोणत्याही पुस्तक-लेखात तो आढळतोच त्यामुळे त्यावर परत लिहित नाही. चारु-कनु च्या बहराच्या काळात नक्षलवादाला बिहारबाहेर फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. तो मिळायला सुरुवात झाली ती चारु कनु फ्रस्ट्रेट व्हायला सुरुवात झाली तेव्हा. सर्वप्रथम हा प्रतिसाद मिळाला बिहार, ओरिसा, आंध्रप्रदेशात. बिहारमधे नक्षलवाद फोफावला तो आर्थिक, सामाजिक विषमतेचा फायदा घेऊन. नक्षलवाद ज्या काळात तेथे रुजला त्याच काळात बिहारमधे वेगवेगळ्या सेना उदयाला येत होत्या. या सेनांमधील लोक आपापसात भांडत आणि त्यातील अनेक उपेक्षित सेना नक्षलवादाच्या निमित्ताने एकत्र आल्या. बिहार व नॉर्थ ईस्टमधील नक्षलवादाला आसाम, नागालँड, मिझोराम, चिन, भुतान, नेपाळ येथील शक्तींशी संबंधित आयाम देखील होते. ओरिसा, आंध्र प्रदेश मधील नक्षलवादाच्या फोफावण्याचे मुळ वेगळेच होते. ते होते आंध्रप्रदेशात कित्येक वर्षे सुरु असलेल्या रवि-सुरी गँगवॉर मधे. या गँग्जनी स्वतःची शक्ती वाढविण्यासाठी नक्षलवादाची कातडी पांघरली. तेथुनच पसरत हे लोण महाराष्ट्र, मध्यप्रदेशमधे पसरले. रेड कॉरिडॉर समजल्या जाणार्‍या या संवेदनशील पट्ट्याची वाढ ही कोणत्याच एका तत्वज्ञानाने प्रेरित झालेल्या चळवळीचे बाळसे नव्हते तर ती केवळ स्थानिक पातळीवरील गुंडांची, असामाजिक क्षेत्राची सुज होती. या सुजेला नक्षलवादाचे बाळसे समजुन काही कट्टर डावे त्यात सामील झाले पण ९० च्या सुमारास त्यांचा बराचसा भ्रमनिरास झाला होता आणि त्यातील बरेचसे लोक परत लोकशाही मार्गाकडे वळले होते. परंतु त्यांची राजकीय, आर्थिक ताकद खुपच कमी पडली. दरम्यान नक्षलवाद्यांनी बळाने जमवलेल्या अमाप संपत्तीचा वापर करुन अनेक फ्रंट ऑर्गनायझेशन्स निर्माण केल्या होत्या व त्यांच्या प्रचाराला अनेक राज्यातले अनेक नवविचारवंत, कार्यकर्ते बळी पडत होतेच. परिणामी नक्षलवादाची ताकद वाढणे अपरिहार्य होतेच. ८० व ९० ची दशके नक्षलवादाच्या प्रसारासाठी अत्यंत महत्वाची ठरली. याकाळात विखुरलेल्या नक्षलवादी गटांनी आपापसात व अन्य शक्तींशी अनेक संपर्क प्रस्थापित केले व त्यायोगे स्वतःची शक्ती वाढवली. यामधे एल्.टी.टी.ई, लष्कर्-ए-तोयबा, आय एस आय इ. संपर्क महत्वाचे होते. याच काळात विविध ठिकाणचे नक्षलवादी गट एकत्र येण्याची सुरुवात झाली व २००१-२००२ मधे त्याची परिणिती दक्षिण अशियातील १२ माओईस्ट व नक्षल गट एकत्र येऊन Coordination Committee of Maoist Parties and Organisations of South Asia (CCOMPOSA) स्थापन होण्यात झाली. लष्कर व नक्षल यांच्यातील संपर्क त्याआधीच, ८० च्या दशकातच, सुरु झाला होता. १९८५ मधे अहल्-ए-हादिसच्या नेत्यांनी एकत्र येऊन विविध अतिरेकी गटांचे एकीकरण करुन समन्वय साधण्यासाठी तंझील इशाहुल मुसलमीन स्थापन केली तेव्हा त्या बैठकीत पीपल्स वॉर ग्रुपचा अझम घोरी उपस्थित होता. या संबंधांमुळे नक्षलवाद्यांना अब्दुल करीम तुंडा, अब्दुल जलीस अन्सारी यांनी रिसर्च केलेले आयईडी असेंब्ली टेक्निक मिळाले व विविध अत्याधुनिक शस्त्रे व स्फोटके उपलब्ध झाली. यानंतर फंडिंगबाबतही अनेक मार्ग उपलब्ध झाले. नक्षलवाद्यांसाठी अंमली पदार्थ हा फंडिंगचा सर्वात मोठा मार्ग उपलब्ध झाला तो यानंतरच्या काळात आणि त्यानंतर नक्षलवादाची वाटचाल नार्को टेरेरिझमच्या दिशेने झपाट्याने सुरु झाली. ९० च्या दशकापर्यंत अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर हे नार्को टेरेरिझमचे मॅन्युफॅक्चरिंग फील्ड होते व त्यात अफगाणिस्तानचे महत्व सर्वाधिक होते. परंतु शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर युरोप-अमेरिकेचे लक्ष अफगाणिस्तानकडे वळले आणि तो मार्ग धोक्यात आला. अश्यावेळेस नक्षलवाद्यांनी अंमली पदार्थांची शेती व निर्मिती सुरु करणे सर्वच दहशतवादी गटांना फायदेशीर होते. आज अंमली पदार्थांचे उत्पादन व निर्मिती हे नक्षलवादच नव्हे तर अन्य दहशतवादी संघटनांसाठीही मेजर फंडिंग सोर्स ठरत आहे. हा सर्व इतिहास लक्षात घेता नक्षलवाद शोषितांचे प्रश्न हाताळतो, ती शोषितांची क्रांती आहे ही केवळ फँटसी आहे. नक्षलवादाला कोणतेही तत्वज्ञान नाही हे देखील सिद्ध होते. दुर्गम भागात सुशासनाचा अभाव आहे, तेथील जनता शोषित पीडीत आहे. त्यांचे प्रश्न हाताळणे अत्यावश्यक आहे. याबाबत कोणतेच दुमत असण्याचे कारण नाही. परंतु हे नक्षलवाद करत नाही. फुटिरतावाद्यांना जेव्हढे तात्विक अनुष्ठान असु शकते तेव्हढेही नक्षलवादाला नाही हे सत्य देखील नजरेआड करता येत नाही. नक्षलवाद हे शोषित जनता वगळता सर्वांनाच हवेहवेसे दुखणे आहे. अश्या परिस्थितीत विनिल आणि त्यांच्या चमुसारखे अधिकारी हेच नक्षलवादी व अन्य गटांना असलेले एकमेव आव्हान आहे. नक्षलवादी त्यांना टार्गेट करणारच हे अपेक्षित धरायलाच हवे. आणि अश्या अधिकार्‍यांना शासन यंत्रणा, राजकारणी, भ्रष्ट एनजीओज या घटकांकडुन कोणतेच सहकार्य मिळणार नाही हे देखील गृहित धरावेच लागेल. शोषित जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व आदरभाव हे त्यांचे एकमेव संरक्षक कवच असेल. या सर्व घडामोडींपासुन दुर अंतरावर सुरक्षित असलेल्या आपण आपला वैचारिक पाठिंबा अश्या लोकांना देणे हे देखील त्यामुळेच महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments

ग्रेट! अभ्यासपूर्ण आणि नेमके

अवलिया
Wed, 02/23/2011 - 13:51 नवीन
ग्रेट! अभ्यासपूर्ण आणि नेमके विश्लेषण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

+१

नितिन थत्ते
Wed, 02/23/2011 - 14:35 नवीन
असेच म्हणतो. सदर गटांचे विरोधकही त्यांना माओवादी आणि नक्षलवादी म्हणत असतात त्यामुळे सर्वांना तसे वाटत असावे. त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे. या सगळ्याबरोबर "पडेल तत्त्वज्ञानाच्या" मागे लोक का जातात वगैरे प्रश्न पडणे पण बंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+ १

प्रसन्न केसकर
Wed, 02/23/2011 - 14:54 नवीन
या गटांना नक्षलवादी म्हणणे म्हणजे त्या प्रवृत्तींना तात्विक मुलामा देऊन ग्लोरिफाय करणे आहे. तो नक्षलवादाचाही अपमान आहे. नक्षलवादाला जे व्यापक तात्विक अधिष्ठान होते ते या गटांना नाही. नक्षलवादी विचारसरणीत प्रादेशीक, जातीय, धार्मिक, वांशीक, लैंगिक भेदांना जागा नाही. नक्षलवादामध्ये अर्थव्यवस्था संपुर्णतः वेगळी असते. इथे ते मुलभुत फरक आहेत. शिवाय नक्षलवाद्यांकडुनच होणार्‍या शोषितांच्या शोषणाचेही मुद्दे आहेतच. नक्षलवादी जसे तेंदुपत्ता कंत्राटदारांकडुन खंडणी वसुल करतात तसेच आदिवासींकडुनही पैसे उकळतातच. त्या बदल्यात ते आदिवासींना काहीच देत नाहीत. हे शोषणच आहे. दुसरे म्हणजे नक्षलवादाचे असे सबगोलंकार व्यापक चित्र उभे केले की त्याविरुद्धची लढाई अधिक अवघड होऊ शकते. मुळात आदिवासी, शोषितांना त्यांचे हक्क मिळवुन देण्यावर भर देण्याऐवजी, विकास करण्याऐवजी विकासाला विरोध करणार्‍या त्यांच्या शोषकांना पाठिंबा व्यक्त करण्याकडे समाजमनाचा कल होऊ शकतो. अवांतरः नक्षलवाद व लष्कर-ए-तोयबा संबंध हा तसा बर्‍याच जणांना नवीन असु शकतो. या विषयावर यापुर्वी देखील उहापोह झालेला आहे. प्रसिद्ध पत्रकार, अ‍ॅनॅलिस्ट प्रविण स्वामी यांचा या संदर्भातला एक लेख जालावर http://www.countercurrents.org/comm-swami250803.htm येथे उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अस्तित्वाचा प्रश्न....!!

इन्द्र्राज पवार
Wed, 02/23/2011 - 15:19 नवीन
"....नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे. ..." ~ नाही. असे म्हटल्याने गोंधळ होऊ शकतो. डाकू काय दरोडेखोर काय ते अगदी राष्ट्रीय महामार्गावरदेखील आपल्या कारवाया करीत असल्याचे दिसते आणि त्यांचे उद्देश हे उघडउघड आर्थिक 'लूटमारी' हेच असतात. पण विनील यांचे अपहरण तर धडधडीत माओवाद्यांनी त्यांच्या साथीदारांच्या सुटकेसाठी केले आहे हे तर उघडच आहे....आणि त्याला ओरिसा+आंध्र सरकार यानी सुटकेचे हिरवे कंदील दाखविले असल्याने आता 'डाकूं'नी विनीलचे अपहरण केले असे म्हणण्यात काय हंशील? श्री.केसकर यांच्या प्रदीर्घ प्रतिसादातील भूमिकेबाबत इतकेच म्हणू शकतो की, सर्वसाधारणपणे आदिवासी लढ्यातील (सशस्त्र लढ्यावर विश्वास ठेवणार्‍या) सर्वच आदिवासींना 'नक्षलवादी' म्हणण्याची एक प्रथाच पडली असून ती बरोबर किंवा चूक याच्या खोलात 'आमआदमी' जात नाही. वास्तविक भारतीय घटनेला मानणार्‍या कम्युनिस्टांच्या (कॉ.ज्योती बसूंच्या छायेखाली वाढलेल्या) कित्येक फळ्यांना माओवादीप्रणित नक्षलींचा हिंसाचार मान्य नाही. सीपीआयच्या राजकारणाला आपण जर Soft Ideology म्हणत असू तर माओवाद्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसला जात असलेला नक्षलवाद (जरी श्री.केसकरांच्या मते तो आजच्या घडीला अस्तित्वात नसला तरी....) हा Raw Ideology चे द्योतक आहे असे मानले पाहिजे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+ १/ - १

प्रसन्न केसकर
Wed, 02/23/2011 - 15:39 नवीन
काही मुद्यांशी सहमत आणि काहिंशी असहमत. नक्षलवाद या नावाने ओळखल्या जाणार्‍यांना काय म्हणावे याला बरेच पर्याय उपलब्ध असु शकतात. डाकु किंवा दरोडेखोर हे शब्द त्यांच्यासाठी नक्कीच योग्य ठरणार नाहीत. (चंबलघाटीत दरोडेखोर `बागी' होतातच की.) सर्वसाधारणपणे आदिवासी लढ्यातील (सशस्त्र लढ्यावर विश्वास ठेवणार्‍या) सर्वच आदिवासींना 'नक्षलवादी' म्हणण्याची एक प्रथाच पडली असून ती बरोबर किंवा चूक याच्या खोलात 'आमआदमी' जात नाही. आम आदमी कसल्याच भानगडीत पडत नाही. तो बिचारा रोजच्या जगण्याच्या मारामारीतच अडकलाय. तो फारतर चार दोन पुस्तकं वर्तमानपत्रं वाचतो अन एकुणच परिस्थितीबाबत हळहळतो. हे नावं ठेवणारे, प्रथा पाडणारे लोक आम नसतात. म्हणुनच त्यांनी सत्य समोर आणलं पाहिजे. सीपीआयच्या राजकारणाला आपण जर Soft Ideology म्हणत असू तर माओवाद्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसला जात असलेला नक्षलवाद (जरी श्री.केसकरांच्या मते तो आजच्या घडीला अस्तित्वात नसला तरी....) हा Raw Ideology चे द्योतक आहे असे मानले पाहिजे. इथेच तर ग्यानबाची मेख आहे. माओवाद्यांचे मार्गदर्शन वगैरे काहीच नाहिये. इथे उघडा नागडा स्वार्थ आहे, आयडिऑलॉजी वगैरे काही नाही. ती होती तोवर नक्षलवादी कोणत्याच फॅनॅटिक रिलिजस किंवा रीजनल ग्रुपबरोबर नव्हते. ती आयडिऑलॉजी असलेले लोक नक्षलवादातुन बाहेर गेले आणि मग उरले ते केवळ प्रोफेशनल टेरेरिस्ट, धंदेवाईक. त्यांनी स्वार्थासाठी माओवादी ज्यांना शत्रु समजत त्यांच्याशीच हातमिळवणी केली अन त्यांच्याच तालावर नाचायला सुरुवात केली. (याच कंपल्शन्समधुन अंमली पदार्थ वगैरे भाग नक्षलवाद्यांसाठी महत्वाचा ठरत गेला.) यात कसली आलीये आयडिऑलॉजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

भुरटे चोर

विकास
Wed, 02/23/2011 - 20:13 नवीन
त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे. भुरटे चोर म्हणले तर जास्त योग्य ठरेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद

आळश्यांचा राजा
Fri, 02/25/2011 - 23:32 नवीन
त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे. या सगळ्याबरोबर "पडेल तत्त्वज्ञानाच्या" मागे लोक का जातात वगैरे प्रश्न पडणे पण बंद होईल.
श्री थत्ते यांनी हे उपरोधाने म्हटले असावे असा दाट संशय आहे. खुलासा केल्यास बरे होईल. चर्चेसाठी. (उपरोधाची नोंद घेतली जात नसेल तर मजा नाही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शोषित जनतेच्या मनात

आळश्यांचा राजा
Wed, 02/23/2011 - 16:02 नवीन
शोषित जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व आदरभाव हे त्यांचे एकमेव संरक्षक कवच असेल. या सर्व घडामोडींपासुन दुर अंतरावर सुरक्षित असलेल्या आपण आपला वैचारिक पाठिंबा अश्या लोकांना देणे हे देखील त्यामुळेच महत्वाचे आहे.
हे नेमके आहे. बाकी भागाबद्दल किंचित असहमती आहे. म्हणजे, नक्षलवाद नावाचे तत्त्वज्ञान नाहीच हे पटत नाही. अजून लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

धन्यवाद आ.रा. साहेब...

प्रसन्न केसकर
Wed, 02/23/2011 - 16:48 नवीन
या विषयावर फॅक्टस मिळवणे दुरापास्त कारण तिथे परिस्थिती रोज बदलते. मी वीस वर्षे अभ्यास करुन मिळवलेल्या फॅक्ट्स फक्त मांडतो. ते माझे मुळ काम. इंटरप्रिटेशन करणे सब्जेक्टिव्ह. माझे मत ज्या फॅक्टसच्या आधारे आले त्या मी मांडल्या. त्या सिद्ध करणे सहज शक्य आहे कारण ही डॉक्युमेंटेड हिस्ट्री आहे. ते कुणाला पटो अथवा न पटो. शेवटी ज्याचा त्याचा अभ्यास, ज्याच्या त्याच्या फॅक्ट्स आणि ज्याचे त्याचे इंटरप्रिटेशन. प्रत्येकाला स्वतःचे मत बनविण्याचा अधिकार आहेच. पण तत्वज्ञान नाही असे म्हणताना सपोर्टिंग फॅक्टस मी दिल्या. तत्वज्ञान आहे असा दावा कुणाचा असेल तर त्याच्या सपोर्टिंग फॅक्ट्स त्याने द्याव्यात. माझी अजिबात हरकत नाही. फक्त किमान इतिहासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास असावा, दहशतवाद म्हणजे नक्की काय ही किमान पुसटशी तरी कल्पना असावी ही अपेक्षा. अर्थातच ही अपेक्षाच आहे. पुर्ण व्हावीच असा आग्रह धरताच येत नाही. पण नक्षलबारी ते रेड कॉरिडॉर हा एका तत्वज्ञानाचा अखंड प्रवास कसा आहे हे कुणी फॅक्ट्स देऊन पटवु शकत असेल तर स्वागतच आहे. अन्यथा मी आधीच (अगदी पहिल्या प्रतिसादात म्हणले तसे) शंका उपस्थित होणे यात कुणालाच काहीच गैर वाटु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

एक प्रश्न

विकास
Wed, 02/23/2011 - 20:03 नवीन
आपल्या वरील (अनेक) प्रतिसादांमधून बरीच नवीन माहिती मिळाली आणि नवा दृष्टीकोनही कळला. एकूण आपले म्हणणे असे दिसते की, "सध्या जे नक्षलवादाच्या नावाखाली घडत आहे त्याचा आणि नक्षलवादी तत्वज्ञान अथवा कम्युनिस्टांशी संबंध नाही." तसे जर असेल तर ज्यांना डावे विचारवंत/डाव्या विचारांशी जवळीक असलेल्या चळवळीत सहभागी आहेत असे म्हणता येईल असे अनेक दिग्गज हे नक्षलवाद्यांना पाठींबा देताना कसे दिसतात? त्यात मग अरुंधती रॉय, मेधा पाटकर, प्रफुल्ल बिडवाई, सारखे अनेक जण येतात. त्यातील एकानेही विनील-माझींच्या बाबतीत तोंड देखील उघडलेले दिसले नाही आणि त्यांच्या एकंदरीत भुमिकांमधे नक्षलवाद्यांचे समर्थनच असते. असे का असावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

या फेनॉमेनामागे अनेक कारणे असु शकतात...

प्रसन्न केसकर
गुरुवार, 02/24/2011 - 14:51 नवीन
असे माझा वीस वर्षातला फील्ड एक्स्पिरियन्स सांगतो. सर्वप्रथम अश्या गँग आणि गटांना प्रचंड मोठे फंडिंग उपलब्ध होते. त्याचे अंतर्गत सोर्सेस इंद्रराज पवार यांनी स्पष्ट केलेले आहेतच पण त्यातीलही सर्वात महत्वाचे सोर्सेस म्हणजे अंमली पदार्थ व अन्य प्रतिबंधीत गोष्टींची तस्करी (यात दरवर्षी अब्जावधींची उलाढाल होते.), ह्युमन ट्रॅफिकिंग आणि इम्मॉरल ट्रॅफिकिंग (यातही बहुसंख्य गँग्ज व गट, त्यात नक्षलवादी व एलटीटीई यांचीही गणना होऊ शकेल, प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे सामील असतात.) व कॉन्ट्रॅक्ट किलिंग. त्याखेरीज परकीय शक्तींकडुनही अश्या गटांना मोठ्या प्रमाणात फंडिंग होते. या फंडसचा वापर करुन अश्या गँग्ज व गट हजारो फ्रंट ऑर्गनायझेशन्स उघडतात. या फ्रंट ऑर्गनायझेशन्स बहुतेकदा प्रत्यक्षपणे अतिरेकी कायवायात किंवा गुन्ह्यांमधे सामील होत नाहीत परंतु त्यांच्यामार्फत अश्या संघटनांचा उघड अथवा छुपा प्रचार्-प्रसार केला जातो, त्यांच्याबाबत सकारात्मक जनमत तयार केले जाते, सहानुभुतीदार व समर्थक निर्माण केले जातात, मनुष्यबळाची भरती केली जाते, वेळप्रसंगी कारवाईच्या पुर्वतयारीमधे टेहेळणी करणे, लॉजिस्टिक्स पुरवणे अश्या मार्गांनी सहभागही घेतला जातो, फरारी असलेल्या गुन्हेगार व अतिरेक्यांना आश्रय दिला जातो, खटल्यांदरम्यान कायदेशीर मदत उपलब्ध करुन दिली जाते, शासन यंत्रणेविरुद्ध प्रचार केला जातो. या फ्रंट ऑर्गनायझेशन्स जसजश्या प्रस्थापित होतात तसतसे त्यांना स्वतःचे स्टेटस येते, त्यांचे स्वतःचे आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय फंडिंग सोर्सेस निर्माण होतात. या फंडसमधला काही भाग सायफन ऑफ करुन गँग व गटाकडे देखील जातो. अश्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स ओळखणे अत्यंत अवघड असल्याने त्यांच्याबरोबर काम करताना त्यांची लाईन टो करणे अपरिहार्य होते व त्यातुन अनेकदा दहशतवादाचे समर्थन होऊ शकते. दुसरे म्हणजे दुर्गम भागात काम करताना तेथे सुशासन उपलब्ध नसल्याने तेथील सर्व अ‍ॅक्सेस अश्या गटांच्या ताब्यात असु शकतो व त्यामुळे त्यांच्या कारवायांबाबत मौन पाळणे आवश्यक बनते. जर ते केले नाही तर त्या भागात काम करणे शक्य होत नाही. तिसरे कारण म्हणजे बहुतेक सर्व प्रतिष्टित नेते, कार्यकर्ते व बहुतेकदा पत्रकार देखील या गट व गँग्ज, त्यांची कार्यक्षेत्रे व त्यांचे टार्गेट ऑडियन्स यापासुन दुर असतात. त्यांचा ग्रास रुटला संपर्क येतो तो मध्यस्थांमार्फतच. त्यामुळे फील्ड वर्क करताना देखील वस्तुस्थिती लपवुन ठेवुन देखावा उभा करणे शक्य होते व वरवर पाहणार्‍याला तो देखावाच खरा वाटु शकतो. चौथे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अश्या गँग्ज व गट स्वतःची प्रतिमा जुलुमी शासन यंत्रणेचे विरोधक, शोषितांचे कैवारी, महान ध्येयवादी, तत्वनिष्ठ अश्या प्रकारे निर्माण करत असल्याने त्यांना समर्थन देणे हे फॅशनेबल व प्रतिष्ठेचे ठरते. कोणत्याही प्रस्थापित यंत्रणेत कोणी ना कोणी शोषित, पीडीत असतेच. अश्या गटांची बाजु घेणे म्हणजे शोषितांचा कैवार घेणे असे सर्वच पातळ्यांवर समजले जाते. असे करण्याने एका बाजुला प्रतिष्ठा मिळते आणि त्याचवेळी स्वतःला फंडिंग मिळवणे सुकर जाते. हा मोठाच दबाव असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

>>सर्वात महत्वाचे कारण म्हणजे

नितिन थत्ते
गुरुवार, 02/24/2011 - 15:04 नवीन
>>सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अश्या गँग्ज व गट स्वतःची प्रतिमा जुलुमी शासन यंत्रणेचे विरोधक, शोषितांचे कैवारी, महान ध्येयवादी, तत्वनिष्ठ अश्या प्रकारे निर्माण करत असल्याने त्यांना समर्थन देणे हे फॅशनेबल व प्रतिष्ठेचे ठरते. येथेच मला प्रश्न पडतो आहे. त्या गटांची प्रतिमा तशी आहे म्हणून मेधा पाटकर वगैरे समर्थन देतात की उलट आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

कदाचित...

प्रसन्न केसकर
गुरुवार, 02/24/2011 - 15:14 नवीन
दुर्गम भागात काम करताना येणार्‍या अनेक कंपल्शन्सपैकी एक असावे ते असे मला वाटते. मेधा पाटकर फॅशनेबल म्हणुन काही करण्याएव्हढ्या उथळ मला वाटत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

वाह वा. पुन्हा एकदा छान पोस्ट.

चिंतामणी
गुरुवार, 02/24/2011 - 15:15 नवीन
प्रसन्न केसकर, हे पोस्टस वाचल्यावर मला असे वाटते की "नक्षलवादाचा उहापोह" अश्या किंवा तत्सम नावाखाली ही माहिती एकत्रीत पोस्ट कर. आत्ता एक पोस्ट, त्याच्यावर मग ब-याच प्रतिक्रीया, मग एक पोस्ट असे स्वरूप आले आहे. ते सलग आल्यास वाचण्या-या जास्त बरे वाटेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

+१

श्रावण मोडक
गुरुवार, 02/24/2011 - 15:34 नवीन
+१. लवकर कर एकत्र. एक नवा लेख होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

फॅक्ट्स

आळश्यांचा राजा
Fri, 02/25/2011 - 23:35 नवीन
आपल्या अनुभवाविषयी आणि व्यासंगाविषयी आदर आहे. पण आपण "फॅक्ट्स मांडतो फक्त" असे म्हणत इंटरप्रिटेशन मांडत आहात. आपल्या इंटरप्रिटेशनवर विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

फारच छान

चिंतामणी
Wed, 02/23/2011 - 21:41 नवीन
इंद्राच्या "फंडीग"बद्दलच्या पोस्ट नंतर अजून एक छान पोस्ट आहे हा. सर्वप्रथम एक मिथ मनातुन काढणे आवश्यक आहे. ती म्हणजे नक्षलवाद शोषितांना न्याय देतो किंवा ती शोषितांची क्रांती आहे. नक्षलवाद्यांच्या विविध गटांच्या फ्रंट ऑर्गनायझेशन्सनी हेतुपुरस्सर पसरवलेली ही भाकडकथा आहे. नक्षलवाद आदिवासी, शोषित यापैकी कुणालाच न्याय देण्यासाठी नाही. तो प्रस्थापितांनी शोषितांचे पिळवणुक करुन, त्यांना दहशतीखाली ठेऊन स्वतःच्या फायद्यासाठी चालवलेला धंदा आहे. मी सुध्दा हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न केला होता. http://www.misalpav.com/node/16012#comment-271561 पण तुझ्या इतका प्रभावीपणे मांडु शकलो नसणार म्हणून त्याची दखल घेतली गेली नसणार. बाकी "तथाकथी नक्षलवाद्यांची दहशवाद्यांबरोबरची युती" हा महत्वाचा मुद्दा तु मांडलास त्याबद्दल आभार. हा मुद्दा महत्वाचा असून देखील सगळ्यांच्या लिखाणातून सुटला होता. आता याबद्दलसुध्दा चर्चेत भाग घेणा-या सर्व सभासदांची प्रतिक्रीया वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

सलाम प्रसनदा !

सुहास..
Wed, 02/23/2011 - 13:49 नवीन
हेयर कम्स द ट्रुथ !! बराच वेळ चर्चा वाचुन लोक्स जुने संदर्भ का देत आहेत तेच कळत नव्हत !! धन्स..
  • Log in or register to post comments

उत्तम चर्चा!

धमाल मुलगा
Wed, 02/23/2011 - 16:48 नवीन
एकुणच चर्चा (हीच नव्हे, विनील अपहरण संदर्भातील इतरही धागे) वाचत आहे. नक्षलवाद (खरा/खोटा), माओवाद, रेड कॉरिडोर ह्यासंदर्भातील अत्यल्प आणि बहुतांश ऐकिव माहिती ह्यामुळं चर्चेत भाग घेण्याची लायकी नसल्याने शांतच बसुन होतो. आज वर्तमानपत्रातील 'विनील कृष्णा आणि पवित्र मांझी ह्यांची येत्या ४८ तासात सुटका' ही बातमी वाचून मात्र हायसं वाटलं. आजही 'अपवादांनीच नियम सिध्द होतात' असं ठळकपणे जाणवून देणारे विनील कृष्णा ह्यांच्यासारखे सरकारी अधिकारी आहेत आणि ते खरोखरच मनापासून कामे करण्यासाठी झगडत आहेत ह्याचीही सखोल माहिती ह्या विषयीच्या धाग्यांमुळे कळत गेली. आ.रा., मोडक, आणि माहितगार मंडळींचा अत्यंत आभारी आहे. (मला ठाऊक आहे, सरकारी अधिकार्‍यांबद्दल माझे हे विधान पुर्वग्रहदुषित म्हणा किंवा झोंबणारे म्हणा वाटू शकते. पण माझा नाईलाज आहे. आणि हा ग्रह जरुर बदलला जावा अशी मनोमन प्रार्थना आहेच.) IAS अधिकारी श्री. सचिन जाधव ह्यांच्या पत्रातील
पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला?
ह्या अनुशंगाने मलाही प्रश्न पडलाच की आता अशा सुटका झालेल्या गुन्हेगारांबद्दल सरकार काय करणार? कंदहार अपहरणाच्या बदल्यात सुटलेल्या अजहर मसूद आणि कंपनीने अधिक प्रबळ होऊन देशाला आणखी त्रास दिला. तसं न होण्याची खबरदारी कायदा आणि सुव्यवस्था हयंची जबाबदारी असलेल्यांकडून कशी घेतली जाणार? असे सर्वसामान्य पातळीवरच्या 'layman'ला पडणारे प्रश्न मलाही पडलेच. अर्थात, विनील ह्यांचे कार्य, त्यांना आदिवासींकडून मिळणारे प्रेम व पाठिंबा ह्याबद्दल दुमत नाहीच..आदरच आहे. सुटका झाल्यावर श्री. विनील ह्यांनी ह्या अनुभवांचा वापर करुन अधिकाधिक अधिकार्‍यांना आपल्या मार्गावर चालत हे कार्य सर्वदूर पसरण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करुन हा त्यांचा एकाकी लढा प्रबळ करावा अशी सदिच्छा!
  • Log in or register to post comments

छान चर्चा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/23/2011 - 19:38 नवीन
छान चर्चा. 'अक्षर' च्या दिवाळी अंकात विशेष लेखमाला आहे. ''नक्षलवादी : देशद्रोही की गरिबांचे कैवारी'' मेधा पाटकर, जयंत उमराणीकर अरुंधती रॉय, प्रकाश बाळ, एकनाथ साळवे, मीना मेनन, बंधुराज लोणे यांनी वरील विषयासंबधी आपापल्या भुमिका मांडल्या आहेत. जरासा वेळ मिळाला की काही मुद्दे इथे डकवेन म्हणतो. जसे- नक्षलवाद म्हणजे काय ? त्याची व्याख्या करण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. ७० च्या दशकात नक्षल चळवळ सुरु झाली, चारु मुझुमदारांनी सुरु केली तेव्हा त्याला आदर्शवादाचा पाया होता. त्यांना गरिबांसाठी आंदोलन करायचं होतं, क्रांतीकरायची होती. अनेक हुशार मुलं क्रांतिकारी विचारसणीने प्रेरित होऊन त्यात सामील झाली होती. पण हळूहळू ही चळवळ तशी राहिली नाही. तिचा वैचारिक पाया ठिसूळ झाला आणि तेही वेगळ्या प्रकारचं असेल पण शोषणच करु लागले मुख्य म्हणजे ही मंडळी बुद्धिभेद करण्यात अतिशय हुशार आहेत. आपली चळवळ ही गरिबांसाठीच आहे, अदिवासींची आहे असं ते भासवतात. या चळवळीला ते क्रांती म्हणतात हे थोतांड आहे, नक्षलवादी हे माझ्या दृष्टीने निव्वळ ठग आहेत. [माओवादी सर्वात मोठे शोषक : जयंत उमराणीकर, निवृत्त पोलीस महासंचालक(विशेष अभियान) ] आणि पुढे माओवाद्यांनी अदिवासी लोकांचा विकास केला आहे काय ? असे प्रश्न विचारतात. शाळा सुरु केल्यात का. रस्ते बांधलेत का. रस्ता केला की तो पोलिसांसाठी आहे असा अप्रप्रचार करायचा..! माओवाद्यांनी कोणते विकासाचे मॉडेल अदिवासींना दिलं आहे. अदिवासींना मूळ प्रवाहात यायची इच्छाच नाही हे नक्षलवाद्यांनी बळजबरीच लादलं आहे. पोलीस भरती असेल आणि जागा शंभर असतील तर दहा हजार मूले तिथे भरतीसाठी येतात. मुलं भरतीसाठी का येतात तर त्यांना त्यातून बाहेर पडायचं आहे. सरकारी नोकरी करु इच्छिना-या तरुणांना माओवादी धमकवतात. तेव्हा ही कोणती विचारसरणी असते वगैरे आशय या अधिका-याच्या लेखनातून उतरतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

धमाल मुलगा
Wed, 02/23/2011 - 22:05 नवीन
ह्यासंदर्भात श्री. जयंत उमराणीकरांचं एक वाक्य आहे, "अशी कोणती क्रांती असते की जी ४० वर्षं चालू आहे?" (शब्द जसेच्या तसे नसतील, चु.भू.दे.घे.) ह्यातच बरंच काही यावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१११११

चिंतामणी
गुरुवार, 02/24/2011 - 01:27 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कृपया

चित्रा
गुरुवार, 02/24/2011 - 07:10 नवीन
वरील विषयासंबधी आपापल्या भुमिका मांडल्या आहेत. जरासा वेळ मिळाला की काही मुद्दे इथे डकवेन म्हणतो. जरूर करा. हा अंक वाचला होता, मेनन यांचे रूपांतर रोचक होते. उमराणीकर यांचाही लेख दुसरी बाजू सांगणारा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेधा पाटकर म्हणतात...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/26/2011 - 22:09 नवीन
''मला आणखी एका मुद्याचं स्पष्टीकरण इथं द्यायचं आहे. नक्षलवादाच्या सशस्त्र लढ्याचं समर्थन आम्ही करतोय, जे जो आरोप केले जातायत ते खोटे आहेत. फार मोठं लक्षं या नक्षलवादी लढ्यावर सध्या केंद्रित झालं आहे. ही सशस्त्र संघर्षाची सफलता म्हणता येणार नाही, पण एवढंच लढ्याने साधलंय निश्चित. यामधे अदिवासींचं शोषण, सांस्कृतिक आघात, विस्थापन,जागतिक व राष्ट्रीय कंपन्यांची तूट, विषमता हे मुद्दे काहीशा अस्पष्टपणे पुढे आले आहेत'' [हिंसा हा मार्ग नाही : मेधा पाटकर] नक्षलवादाच्या संदर्भात मेधा पाटकरांच्या लेखातून जाणवते की नक्षलवाद्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. मागण्या मान्य होत नाही म्हणून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा त्यांना तो एक मार्ग आहे असे त्यांना वाटते. असे जरी त्या म्हणत असल्या तरी त्या कुठेतरी नक्षलींच्या समस्यांचे समर्थन करतांना दिसतात. ते समर्थन पाहा- ''कुठेतरी घरातलं पोर जर बंडखोर झालं तर त्याला नुसतं उत्तर देता येत नाही, त्याचा मागचा पुढचा विचार करावा लागतोच. त्या भूमिकेतून नक्षलवादाचं विश्लेषण करावं लागतंय. आणि ते जर करायला गेलो तर लगेच आम्ही नक्षवाद्यांच्या सगळ्याच गोष्टींचे समर्थन करतो असंही म्हटल्या जातं म्हणजे हाही पुन्हा या संघर्षाचा परिपाक आहे'' मेधा पाटकर लेखातून काहीप्रश्न विचारतात जसे की, या माओवाद्यांना सत्ता काबीज करायची आहे का ? सत्तेत आल्यावर राज्य चालवणार काय ? असे काहीही नक्षलींना करायचे नसावे. कारण नक्षलींच्या अत्याचाराच्या कहाण्याही पुढे येताहेत. सत्तेत आले तर व्यवस्था बदलवणार आहेत काय ? असे अनेक प्रश्न त्या विचारतात. उदा. म्हणून माओवादी सत्तेत आल्यावर कसे जागतिकीकरणवादी झाले असे दाखलेही देतात. त्यामुळे नक्षलींच्या संघर्षाचे पुढे काय ? तर त्याला काही दिशा नाही. या सर्व गोष्टींना एकच उपाय तो म्हणजे 'संवाद'. दोन्हीही बाजूने संवाद झाला पाहिजे. अदिवासींचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सुटले पाहिजे..इत्यादि..इत्यादि. बाकी, मीना मेनन [माजी नक्षलवादी] ती काय लिहिते ते मात्र लवकरच डकवतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अजून सुटका नाही

विकास
गुरुवार, 02/24/2011 - 02:37 नवीन
कालचा दिवस विनीलच्या हितचिंतकांसाठी मृगजळासारखाच ठरला... तरी देखील माझींची सुटका झाली ही त्यातला त्यात आशादायी बातमी. आता माओवाद्यांनी सुटका केलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्या भागात जनतेसमोर द्यावे वगैरे मागण्या असलेले तेलगू भाषेतील पत्र माझींबरोबर पाठवले आहे. Image removed. Junior engineer Pabitra Mohan Majhi (sporting a red helmet) being taken to the Malkangiri district headquarters after he was released by Maoists at Chitrakonda on Wednesday. (PTI)
  • Log in or register to post comments

मेधा पाटकर

श्रावण मोडक
Sat, 02/26/2011 - 17:01 नवीन
विनील अपहरण प्रकरणात मेधा पाटकर यांनी काय भूमिका घेतली अशा स्वरूपाची विचारणा वर काही पोस्टमध्ये झाली आहे. पाटकर यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या 'आंदोलन शाश्वत विकासासाठी'च्या ताज्या अंकात विनील अपहरणासंबंधात करण्यात आलेली संपादकीय टिप्पणी खाली देतो आहे. (या अंकासाठी संपादन सहाय्य मी करतो - हा माझा हितसंबंध.) -------------------------------------- अपहरणाचे अंजन! विषमता, विकासापासूनची वंचना आणि जीवनस्रोतांवरचे अतिक्रमण ही माओवादी - किंवा हिंसेचं तत्वज्ञान मानणाऱ्या - संघटनांच्या प्रसाराची किंवा त्याच्या जनाधाराची कारणे असतील तर हीच कारणे लोकशाही व्यवस्थेच्या आतूनच बदल घडवत दूर करण्यासाठी जे काही मोजके लोक काम करतात, त्यांच्यापैकी एक असणारे मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा (आणि त्यांच्याबरोबर असणारे अभियंता पवित्र माझी) यांचे माओवाद्यांनी केलेले अपहरण केवळ निषेधार्हच नव्हे तर हिंसेचे तत्वज्ञान सांगणाऱ्यांचा भ्याडपणा उघडा पाडणारेही आहे. सव्वा वर्षापूर्वी विनील मलकनगिरीत आले. या सव्वा वर्षात ते मलकनगिरीच्या मोठया भागात लोकप्रियही झाले. एरवी शासकीय अधिकारी ज्याशिवाय दिसत नसतात, तो फौजफाटा गुंडाळून थेट लोकांमध्ये ते जात. त्यांच्यासमवेत एकत्र बसून प्रश्न जाणून घ्यायचे, ते सोडवायचे; जिथं प्रश्नच अनुचित असेल तिथं तेही स्पष्ट सांगायचे ही त्यांची कार्यपध्दती. आपल्या कामाच्या जोरावर, लोकांचा विश्वास संपादन करून नि:शस्त्र फिरणाऱ्या विनील यांच्या सुटकेसाठी काही हजार आदिवासी मलकनगिरीत जंगलात गेले आणि माओवाद्यांना विनील यांना दुसरीकडे हलवावे लागले. विनील यांच्या सुटकेच्या मागणीसाठी ओरिसात इतरत्रही लोक रस्त्यावर आले, हा त्यांच्या लोकप्रियतेचाच पुरावा आहे. विनील यांच्या अपहरणानंतर माओवाद्यांनी काही मागण्या केल्या. हा मजकूर लिहीतो त्यापैकी आठ मागण्या सरकारने मंजूर केल्या आहेत. विनील यांच्या सुटकेची आशा प्रज्वलित करणारी ही स्थिती. या मागण्यांपैकी तुरुंगात असलेल्या काही माओवाद्यांची सुटका याच्याशी संबंधित मागण्या वगळता इतर मागण्या काय आहेत? माओवादी म्हणून तुरुंगात टाकलेल्या 700 वर आदिवासींची मुक्तता, कोंडा रेड्डी आणि नुकाद्रा या जातींना इतर मागासवर्गीय दर्जा देणे, आंध्रातील पोलावरम हा बहुद्देशीय प्रकल्प थांबवणे, मलकनगिरी आणि कोरापुट जिल्ह्यात विस्थापित झालेल्या आदिवासींना भूमीहक्काचे उतारे देणे, मलकनगिरीतील गावांमध्ये सिंचनाची सोय करणे, तुरुंगात मरण पावलेल्या दोन आदिवासींच्या (त्यांना माओवादी म्हटले गेले आहे) कुटुंबांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वाढीव भरपाई देणे, माली आणि देवमाली बॉक्साईट खाणींचे नियमन करणे, विकास प्रकल्पांमध्ये आदिवासींचे कमीतकमी विस्थापन आणि विस्थापितांना पुरेशी व न्याय्य भरपाई देणे. माओवाद्यांची सुटका ही यातील मागणी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पण इतर मागण्यांचे काय? त्या तर सरकारचे मूलभूत कर्तव्य असणाऱ्या आणि सकृतदर्शनी तरी न्याय्य मागण्याच आहेत. त्या मागण्यांसाठी हाती हत्यार घेतले पाहिजे अशी स्थिती का आली असावी? विनील यांचे वेगळेपण हेच की अशी स्थिती येऊ नये यासाठी ते त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांसारखे झटत होते. या आणि अशा मागण्यांसाठी अहिंसक आंदोलने, संघर्षही होत असतातच. तसे ते जागोजागी सुरू आहेत. अनेकदा त्या संघर्षांना समाजाचे पाठबळ मिळत नसते, ना त्यांच्या गाऱ्हाण्यांचे निराकरण होते. पण हाती हत्यार घेऊन विनील किंवा तत्सम कोणाचे तरी अपहरण केल्यानंतर या मागण्या आठवडयाच्या आत मंजूर होतात. कोणता संदेश यातून जातो आहे? या अपहरणाचा निषेध करतानाच अपहरणापायी माओवाद्यांपुढे गुडघे टेकण्याची वेळ स्वत:वर आणून घेणाऱ्या सरकारचाही निषेधच झाला पाहिजे. कारण ज्या काही मागण्या एरवीही मान्य करून लोकसमुहाला बरोबर घेऊन जाता आले असते तिथे भलत्याच हितसंबंधांच्या रक्षणासाठी सरकारे अडून बसतात, आणि नंतर अशा कोंडीच्या स्थितीत शरणागती पत्करत त्या मागण्या मान्य करून 'हिंसेच्या आधारे प्रश्न सुटतात' या भावनेलाच बळ देतात. अहिंसक मार्गाने चालणाऱ्या संघर्षांना, सरकारमध्ये राहून खऱ्या लोकशाहीचे सरकार आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विनील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी एक पाऊल उचलण्याची ही सरकारला मिळालेली एक संधी आहे. माओवाद्यांच्या वाजवी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक प्रफुल्ल सामंतरा व कामगार नेते संतोष महापात्रा यांनी ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. माओवाद्यांशी थेट राजकीय चर्चेसाठी पुढाकार घेऊन ओरिसा सरकारने देशापुढे एक उदाहरण घालून द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तसेच माओवाद्यांनी आपला हिंसेचा मार्ग त्यागून लोकशाही मार्गांचा अवलंब करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. एन्काऊंटरच्या नावाखाली माओवादी ठरवून पोलिसांकडून मारल्या गेलेल्या आदिवासींच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन चौकशीची व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलेल्या जनआंदोलनांच्या कार्यकर्त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे; त्याचबरोबर त्यांनी भू-आयोगाचीही मागणी केलेली आहे, ज्याद्वारे दोन वर्षांच्या कालावधीत सर्व दलित व आदिवासींना जमिनीचे पट्टे दिले जावेत; शेतीखालील जमीन उद्योगांकडे वळवण्यास पूर्ण मनाई करावी; व नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत पध्दतीने वापर करून विस्थापनविरहित उद्योगांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन मिळेल. विनीलसारख्यांच्या अपहरणाचे हे अंजन डोळयांत जाऊन सरकारला जाग येईल काय? या प्रश्नाच्या उत्तरावरच देशाचे भविष्य अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

विकास
Sat, 02/26/2011 - 19:26 नवीन
"आंदोलन शाश्वत विकासासाठी" या मेधा पाटकरांच्या पत्रकातील लेख/मजकूर येथे दिल्याबद्दल धन्यवाद! त्यांचे नाव मी घेतले होते आणि नंतर प्रसन्न केसकरांना प्रतिसाद देताना मिपा गंडले आणि नंतर वाटले की आता तो विषय मागे राहीला म्हणून परत टाकला नाही. सर्वप्रथम मला त्यांच्या या पत्रकातील भुमिकेबद्दल चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले नाही. मेधा पाटकरांची प्रत्येक भुमिका (पटत नाही असे म्हणत नाही पण) जर वाचली, तर कदाचीत मला पटणार नाही. अर्थात भुमिका म्हणताना मला त्यांचे, भुमिकेसंदर्भात/सामाजीक प्रश्नाला उत्तर, असे जास्त म्हणायचे आहे. तरी देखील त्यांच्या हेतूबद्दल कधी शंका येणार नाही. पण त्यांचे नाव मी इतरांबरोबर (अरूंधती रॉय, प्रफुल्ल बिडवाई आणि इतर) घातले ज्यांच्या बद्दल असे म्हणणार नाही...मात्र मेधा पाटकरांच्या बाबतीत, या संदर्भात, "गिल्ट बाय असोसिएशन"होऊ शकते, असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

स्वतंत्र लेख

आळश्यांचा राजा
Sat, 02/26/2011 - 23:10 नवीन
अहिंसक मार्गाने चालणाऱ्या संघर्षांना सरकारमध्ये राहून खऱ्या लोकशाहीचे सरकार आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विनील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी
अनेकदा त्या संघर्षांना समाजाचे पाठबळ मिळत नसते, ना त्यांच्या गाऱ्हाण्यांचे निराकरण होते. पण हाती हत्यार घेऊन विनील किंवा तत्सम कोणाचे तरी अपहरण केल्यानंतर या मागण्या आठवडयाच्या आत मंजूर होतात. कोणता संदेश यातून जातो आहे?
स्वतंत्र लेख आहे, तसेच दोन महत्त्वाची आर्ग्युमेंट्स मांडली आहेत. वेगळा धागा काढावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वेगळ्या धाग्याची गरज...!!

इन्द्र्राज पवार
Sat, 02/26/2011 - 23:16 नवीन
"...वेगळा धागा काढावा ही विनंती..." ~ सहमत. आता "विनील" हा विषय जरी "फाईल" झाला असला तरी 'नक्षल' हा राहणारच आहे. त्यामुळे आता त्या अनुषंगाने नूतन धाग्यावर चर्चा करणे संयुक्तिक ठरेल. श्री.विकास यानी 'मागण्या आणि त्यांची पूर्तता' यावर जो प्रतिसाद दिला आहे, तोच नवा आणि स्वतंत्र धागा म्हणून घेतल्यास आता त्या अनुषंगाने ही चर्चा पुढे नेता येईल असे वाटते. सबब त्यानी (श्री.विकास) यानी संपादकांनी विनंती करून 'त्या' प्रतिसादास नव्या धाग्याचे रूप द्यावे असे वाटते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

मागण्या आणि सरकारी प्रतिसाद

विकास
Sat, 02/26/2011 - 19:32 नवीन
एक प्रश्न सतत पडला होता की नक्की काय मागण्या होत्या आणि नक्की काय मान्य केले गेले आहे. मात्र याचे उत्तर कुठेच नीटसे मिळत नव्हते. वास्तवीक सरकारने देखील हे अशा वेळेस जाहीर करायला पाहीजे. त्यामुळे फुकाची गोपनीयता राहील्याने जर काही अफवा पसरणार असतील तर थांबू शकतात. शेवटी तेहलका मधे त्यांनी म्हणल्याप्रमाणे शोधपत्रकारीतेचा वापर करत मिळवलेल्या प्रतीतील मजकूर मिळाला ज्यात हे स्पष्ट दिलेले आहे. ते खाली थोडक्यात देत आहे. कंसामधे सरकारने काय म्हणले हे देखील थोडक्यात लिहीत आहे.
  1. काही घटकांचे इतर मागासवर्गीय म्हणून वर्गीकरण करणे. (ओरीसा सरकारने २००७ सालीच ही मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि पाठपुरावा देखील केला आहे. परत केला जाईल).
  2. गोदावरीवरील ओरीसा-तेलंगणा भागातील पोलावरम प्रकल्प थांबवा. (ह्या प्रकल्पाला ओरीसा सरकारचाच विरोध आहे आणि त्या विरोधात सरकारने आंध्र सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.)
  3. काही आदीवासींच्या जमिनी या बेकायदेशीररीत्या घेतल्या आहेत त्या त्यांना मिळाव्यात. (या संदर्भात काही नक्की करायची गरज आहे कारण आदीवासींसंदर्भात काही कायदे वर्षानुवर्षे धाब्यावर बसवले गेले होते. नंतर झालेल्या विरोधात दोन आदीवासी मारले गेले होते, वगैरे.... सरकारने लक्ष घालायचे मान्य केले आहे)
  4. कोटापडी ते मानेगुडा कालवा (डेव्हलपमेंट?) हवा आहे. (सरकारने मान्य केले आहे आणि रु. ५० लाखांची सर्वेक्षण आणि सुरवातीच्या कामासाठी तजवीज केली आहे.)
  5. तुरूंगात मरण पावलेल्या काही कार्यकर्त्यांच्या कुटूंबाला भरपाई. (सरकारचे म्हणणे आहे की ते इस्पितळात मरण पावले. त्या विरुद्ध खटला आहे. पण सरकार तो त्यांच्या बाजूने पुढे ढकलणार नाही...)
  6. शीला दी या माओ कमिटी सभासदेस तब्येतीच्या कारणानिमित्त सोडावे. (त्यांची तब्येत चांगली नसल्याने त्यांना सरकार सोडणार आहे.)
  7. दोन एकत्रीत मागण्या - खाणकाम थांबवावे आणि आंतर्राष्ट्रीय कंपन्यांशी असलेले त्या संदर्भातील व्यवहार तोडावेत. (सरकारने म्हणले आहे की सर्व कायदे काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही ते बघितले जाईल, पुढे असे करार कसे करायचे ते बघितले जाईल, पुर्नवसन नीट केले जाईल पण असलेले करार राहतील. माओवाद्यांनी असलेले करार ठेवायला मान्यता दिली आहे.) (माझी टिपण्णी: म्हणजे याच कंपन्यांकडून हेच माओवादी परत पैसे घेण्यास मोकळे असे समजायचे का? नक्की काय साध्य झाले?)
  8. सीताण्णा नामक आदीवासीस अटक झाली आहे त्याला सोडावे. (पोलीस रेकॉर्डप्रमाणे झालेली नाही, तरी देखील चौकशी केली जाईल).
  9. बालीमारा धरणासंदर्भात पुर्नवसनासाठी शेतकर्‍यांना भरपाई. (सरकारचे म्हणणे आहे की आजपर्यंत काही तक्रारी आल्या नाहीत की भरपाई मिळाली नाही म्हणून. तरी देखील लक्ष घातले जाईल).
  10. नाल्को प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांना न्याय दिला जावा. (दिला जाईल)
  11. ऑपरेशन ग्रीन हंट थांबवा. (जो पर्यंत तुमच्याकडून बेकायदेशीर कृत्ये होत नाहीत, शस्त्रे घेतली जात नाहीत, तो पर्यंत आमच्याकडूनही घेतली जाणार नाहीत).
  12. तुरूंगात असलेल्या अनेक आदीवासींना सोडावे. (लहान कारणांसाठी पकडल्या गेलेल्यांना तात्काळ सोडले जाईल. माओ चळवळीशी संबंधीतांबद्दल १५ दिवसांत रिव्ह्यू चालू केले जातील.)
  13. सेंट्रल कमिटी मेंबर्सना सोडून द्या. (यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रीया चालू केली गेली आहे.)
अतिरेक्यांशी वाटाघाटी कराव्यात का वेगळा मुद्दा आहे. पण वरील वाटाघाटींतून स्वतःची माणसे सोडवणे आणि ज्या खाणींना विरोध केला त्यांना एका अर्थी तसेच ठेवायची "परवानगी" देऊन स्वतःचे खंडणी उत्पन्न चालू ठेवायची तजवीज सोडल्यास यातून नक्की ठोस असे काय मिळाले? त्याचा तेथील आदीवासींना नक्की काय फायदा मिळाला?
  • Log in or register to post comments

विषय वेगळा आहे...!

इन्द्र्राज पवार
Sat, 02/26/2011 - 23:25 नवीन
श्री.विकास यांनी दिलेली ही माहिती सर्वस्वी नव्या धाग्याचा विषय असल्यामुळे त्याना विनंती करीत आहे की त्यानी संपादकांना विनंती करून या प्रतिसादाचे नूतन धाग्यात रूपांतर करावे....म्हणजे त्या अनुषंगाने हा विषय पुढे नेता येईल. माझ्या अंदाजाप्रमाणे सर्वश्री.आ.रा., श्रामो आणि केसकर हेदेखील या मताला पुष्टी देतील. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

नवीन धागा

विकास
Sun, 02/27/2011 - 01:17 नवीन
श्री. इंद्रराज पवार यांनी सुचवल्याप्रमाणे या संदर्भातील चर्चा आता या नवीन धाग्यात करावी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा