Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टारझन on Tue, 02/22/2011 - 15:13
णमस्कार्स , http://www.esakal.com/esakal/20100804/4795822777043890252.htm आज ऑनलाईन बातम्या वाचताना ह्या बातमीवर नजर पडली .. ब्लॅकबेरी नामक कंपनी ने ब्लॅकबेरी थ्रु जाणार्‍या एसेमेस आणि इमेल्स वर पाळत ठेवण्याची गृहखात्याची मागणी धुडकावुन लावली आहे , ह्याचे आश्चर्य वाटले . ह्यात नक्की काय खाचाखोचा आहेत , झोल आहेत हे जाणुन घेण्यासाठी हा काथ्याकुट आहे. ब्लॅकबेरी म्हणते आमच्या कडुन ह्या प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही त्याला तांत्रिक अडचणी आहेत ( आणि हेच सर्वांत हस्यास्पद विधान आहे ) जर मेसेज इन्क्रिप्ट करता येतो तर तो डिक्रिप्ट करता येतोच येतो . त्याशिवाय समोरचा त्याला वाचुच शकणार नाही. इनक्रिप्षन च्या फँड्या नुसार , जर ब्लॅकबेरी ग्राहकाकडे प्रायव्हेट की असेल तर त्याची पब्लिक की ब्लॅकबेरी कडे आहे ह्यात तिळमात्र शंका घेण्यास जागा नाही. एखादी परराष्ट्रीय कंपनी आपल्या सरकार ला असं शेंबड्या पोराला झटकावं तसं उत्तर कसं देऊ शकते ? राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाला एवढ्या सहजतेने घेता येऊ शकते काय ? न्युज चॅनल्स वर तरी ह्या बातमीचा अजुन गाजावाजा दिसत नाही. जाणकार काही प्रकाश टाकु शकतील काय
  • Log in or register to post comments
  • 13650 views

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on Tue, 02/22/2011 - 15:21

Permalink

टारझनकडून असा काथ्याकुट पाहून

टारझनकडून असा काथ्याकुट पाहून आश्चर्य वाटले. :) जाणकार आणि विचारवंतांची मते वाचण्यास उत्सुक !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/22/2011 - 15:27

In reply to टारझनकडून असा काथ्याकुट पाहून by अवलिया

Permalink

नाना , धिस इज सिरियस इश्यु ऑफ

नाना , धिस इज सिरियस इश्यु ऑफ णॅशणल षिक्युरिटी , अँड वी काण्ट अफॉर्ड टु टेक एणि चाण्स , डु वी ? तेंव्हा ह्यावर काथ्याकुट करा , धागा कुणी काढला ह्याला काय अर्थ आहे ? आजकाल सुका पण पाकिस्तान-अमेरिका न अनुबॉम्ब सोडुन क्रिकेट बिकेट वर लिहीतात , त्याचं तुला बरं नाही वाटलं हे आश्चर्य ?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 02/22/2011 - 15:29

In reply to नाना , धिस इज सिरियस इश्यु ऑफ by टारझन

Permalink

अरे बाबा ! मी केवळ नाव पाहून

अरे बाबा ! मी केवळ नाव पाहून धागा क्लिक करतो... तुझे नाव वाचले, केला क्लिक. बाकीच्यांशी कशाला तुझी तुलना करतोस? ऑ !! आणि ते सिक्युरीटी काय असेल तर बिहारमधुन घे की मागवुन दोन चार सुभेदार गार्ड!! १२ तास ड्युटी करतात बोल !
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 02/22/2011 - 15:24

Permalink

मागे कधीतरी अ‍ॅक्सेस द्या

मागे कधीतरी अ‍ॅक्सेस द्या नाहीतर चालू लागा असे गृहखात्याने बजावले होते. नंतर मुदतवाढ दिली होती. तांत्रिक अडचण असू शकेल हे पटत नाही. अ‍ॅक्सेस न देण्यामागे कॉर्पोरेट ग्राहकांचा (ज्यांना हल्ली India Inc. म्हटले जाते) दबाब असावा. सरकारने ब्लॅकबेरीची सेवा बंद करायला हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/22/2011 - 15:30

In reply to मागे कधीतरी अ‍ॅक्सेस द्या by नितिन थत्ते

Permalink

सहमत !

पण ब्लॅकबेरी वाल्यांनी गृहखात्यात थोडेफार पैसे फेकले की गृहखातं मवाळ होणार नाही कशावरुन ? देशाच्या सुरक्षेचा असा बाजार बसलेला पाहु शकत नाही ! कल्पनाच करवत नाहीये ! असा जर टोटल सेक्युअर्ड चॅनल चुकीच्या लोकांनी वापरला तर .. ते पकडले जाणे तर सोडाच .. अजुन हिम्मत येऊन कारवाया वाढणार नाहीत का ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 02/23/2011 - 09:23

In reply to मागे कधीतरी अ‍ॅक्सेस द्या by नितिन थत्ते

Permalink

थत्ते काकांनी वाचलेलीच बातमी

थत्ते काकांनी वाचलेलीच बातमी मीही वाचली होती. खर तर त्यावेळी तर न्युज चा सुर असा होता की आता इथुन पुढे बी बी चा वापर बंद करावा लागणार. अजुनही जर ते लोक अ‍ॅक्सेस देत नसतील तर खरच चायनान जे गुगल च केल ते आपणही करायला हरकत नसावी. भारत अश्या कंपन्यान साठी 'सोन्याची खाण' समजली जाते , जरा कमरेत लाथ बसली तर लगेच येतील वठणीवर. खरच इतक्या इनसेक्युअर वातावरणात हे लोक सेक्युरिटी साठी केलेल्या 'डिमांड' ला नाही कसे म्हणु शकतात. निव्वळ माज म्हणावा लागेल याला.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 02/23/2011 - 10:01

In reply to थत्ते काकांनी वाचलेलीच बातमी by स्पंदना

Permalink

+१

>>निव्वळ माज म्हणावा लागेल याला. हो. आणि India Inc. ची फूस.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 02/22/2011 - 15:27

Permalink

असो.

>> न्युज चॅनल्स वर तरी ह्या बातमीचा अजुन गाजावाजा दिसत नाही. ऑ ? ओ ओ ओ, कुठे घुसताय ? काय पाहिजे ? काय म्हणता ? देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची बातमी आहे ? व्हा बाहेर, दिसत नाही का इथे लोक 'क्रिकेट मॅच' कव्हर करत आहेत, लै शाणे आले देशाची काळजी करणारे. अरे, ह्याला आत कोणी सोडला रे ? ( हे क्रिकेट वर्ल्डकप है मेरी जान....) अवांतर : बहुतेक डेटा डिक्रिप्ट करण्याची सुविधा खरोखर 'सध्या' अस्तित्वात नाही. ब्लॅकबेरीने मध्यंतरी ही सुविधा आणण्यासाठी २ वर्षे ची मुदत मागितल्याचे व ( बहुतेक ) भारतीय सरकारने ती दिल्याचे वाचले होते असे आठवते. असो, जाणकारांच्या भाष्याच्या प्रतिक्षेत :) - ( न्युज चॅनेलवाला) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/22/2011 - 15:33

In reply to असो. by छोटा डॉन

Permalink

बहुतेक डेटा डिक्रिप्ट

बहुतेक डेटा डिक्रिप्ट करण्याची सुविधा खरोखर 'सध्या' अस्तित्वात नाही.
बातमीतंच वाचल्या नुसार बाकी देशांत ती उपलब्ध आहे . आणि मला सांगा .. मी तुम्हाला मेल इन्क्रिप्ट करुन पाठवली .. आणि तुमच्या वरिल वाक्यात तथ्य आहे असे गृहीत धरले , तर तुम्ही ती मेल वाचणार कशी ? का ऑटोमॅटिक समजुन घेणार ? मुळात २ वर्षे मुदत दिलीच कशी ? जेंव्हा मार्केट मधे कंपनी एंटर करते तेंव्हा तिला ह्या नियमांची माहिती दिली जात नाही काय? काँट्रॅक्ट कसे साईन होतात ? ! कनफ्युजन वाढले !
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 02/22/2011 - 15:58

In reply to बहुतेक डेटा डिक्रिप्ट by टारझन

Permalink

अशी ...

>> मला सांगा .. मी तुम्हाला मेल इन्क्रिप्ट करुन पाठवली .. आणि तुमच्या वरिल वाक्यात तथ्य आहे असे गृहीत धरले , तर तुम्ही ती मेल वाचणार कशी ? सांगतो. जेव्हा तुमची ई-मेल मला येईल तेव्हा ब्लॅकबेरी त्यासोबत एक 'डिक्रिप्शन की' पण पाठवेल, ती की वापरुन माझा ब्लॅकबेरी फोन तो ई-मेल मला वाचण्यायोग्य बनवेल व मी तो वाचेन. अर्थात ही 'की' फक्त माझ्या मोबाईलसाठी बनवलेली असल्याने त्याचा वापर फक्त माझ्या एंडलाच होऊ शकतो व केवळ 'की'चा वापर झाला तरच ई-मेल वाचता येऊ शकतो. आता समजा कुणी मध्येच ही ई-मेल इंटरसेप्ट केली तरी त्याच्याकडे येणारी 'की' ही त्याच्या डिवाईससाठी नसल्याने ती युसलेस ठरेल व त्या 'की' चा वापर न झाल्याने तो ई-मेल उघडता येणार नाही. मेन मुद्दा असा आहे की संदेशाबरोबर येणारी 'डिक्रिप्शन की' ही त्या त्या संचासाठी बनवलेली असते व त्याचा वापर दुसरीकडे होऊ शकत नाही, मग कसे काय तुम्ही आम्हाला इंटरसेप्ट करणार बॉ ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/22/2011 - 16:07

In reply to अशी ... by छोटा डॉन

Permalink

ड्युड ... तुम्ही जीमेल वर

ड्युड ... तुम्ही जीमेल वर सुद्धा हा मेल वाचु शकता .. ई मेल आहे ती :) कुठे ही कुठुनही वाचु शकता .. फक्त सेंडर ब्लॅकबेरी आहे .. :) बघा आता ..
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 02/22/2011 - 16:13

In reply to अशी ... by छोटा डॉन

Permalink

?

आम्ही मेकॅणिकल असल्याने नक्की सांगता येत नाही. पण तुमचा हॅण्डसेट वारला तर नवीन सेटसाठी तुम्हाला परत की देणार ना? म्हणजे तुमची की ब्लॅकबेरीकडे कुठेतरी साठेवली आहे ना? ज्याच्या सेटची की पोलीस मागतील ती पोलिसांना देणे एवढेच ब्लॅकबेरीला करायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 02/22/2011 - 16:22

In reply to ? by नितिन थत्ते

Permalink

अजुन ...

अजुन सांगतो थोडेसे .. नुस्ती 'की' अशीही हॅक करुन मिळवता येऊ शकते ( किंवा गुप्तचर संस्था ती इंटरसेप्ट करु शकतात ) अशी माहिती आहे, पण जोवर तिच्यासाठी करेक्ट डिवाईस मिळत नाही तोवर त्या 'की' चा काय उपयोग ? ती तुम्ही डिक्रिप्ट करुन तो संदेश वाचु शकणार नाहीच. १. बहुतेक सगळ्या हाय-एन्ड ( किंवा सगळ्याच ) ब्लॅकबेरी हँडसेटमध्ये ही 'डिक्रिप्शन टुल्स' बसवलेली असतात. शिवाय ही 'की' ही एन्ड युजर नंबर स्पेसिफिक असते, म्हणजे तो विशिष्ठ नंबर चालु असणार्‍या हँडसेटमध्येच ही 'की' चालत असावी असे वाटते, अधिक माहिती गोळा करतो. त्यामुळे जरी हँडसेट वारला तरी फरक पडणार नाही असे वाटते ( सीम फिशिंग वगैरे तत्वज्ञान ब्लॅकबेरीच्या सर्व्हरवर डोके आपटुन डोके चोळत परत निघुन जाते, म्हणुन तर ते मोस्ट सिक्युर्ड आहेत ) @ टारु : अहो मालक, ते 'जी-मेल' साठी न्हाई. खास ब्लॅकबेरी सिक्युर्ड सर्व्हिसेस आहेत त्यांचे चालु आहे. तुम्हाला काय वाटते की आपल्या कंपन्यांचे सीईओ, अजुन कोण अधिकारी, उद्योगपती वगैरे ब्लॅकबेरी वापरुन 'जी-मेल' वर मेलामेली करतात. आपल्या कंपन्या त्यासाठी खास ब्लॅकबेरीकडुन 'सर्व्हिस विकत घेते' ह्या ई-मेल आणि डेटा ट्रान्सफरसाठी,कारण हे 'ई-मेल कम्युनिकेशन' अजिबात तिसर्‍या पार्टीला कळत नाही. ई-मेल बरोबर ब्लॅकबरी इतर शेअर्ड डेटाबेस पण पुरवते. बाकी मला इतर जास्त माहिती नाही, जे शक्य आहे ते सांगेन - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/22/2011 - 16:34

In reply to अजुन ... by छोटा डॉन

Permalink

सॉरी .. चहापानासाठी मित्र

सॉरी .. चहापानासाठी मित्र मला ओढुन नेत होता त्यामुळे घाई घाईत प्रतिसाद दिला. ही माहिती नविन आहे माझ्या साठी.. मग जर हे फक्त ब्लॅकबेरी टु ब्लॅकबेरी असेल तर मग किती लोकं अ‍ॅबयुज करु शकतात ? बहुतेक हे लिमिटेड होईल. ब्लॅकबेरी वरुन दुसरीकडे मेल्स पाठवता येत नाहीत काय ? आणि मेन म्हणजे हे सॉफ्टवेयर टोटली ब्लॅकबेरी नेच डेव्हलप केलेलं आहे तेंव्हा फक्त हँडसेट स्पेसिफीक बनवले असल्यास मधेच क्रॅक करता येणार नाही काय ? त्यांनाच ? चाह है तो राह है असे म्हणतात. बाकी आपल्या प्रतिसादांमुळे खुप चांगली आणि नविन माहिती मीळाली , धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 02/22/2011 - 16:54

In reply to सॉरी .. चहापानासाठी मित्र by टारझन

Permalink

मग जर हे फक्त ब्लॅकबेरी टु

मग जर हे फक्त ब्लॅकबेरी टु ब्लॅकबेरी असेल तर मग किती लोकं अ‍ॅबयुज करु शकतात ?
मिसयुज करणारे जरी दोनच असले आणि ते आतंकवादी (भगवे/पांढरे/हिरवे कसेही) असले तर? त्यामुळे किती हा मुद्दा उरतच नाही. चीने नी जसा गुगलला, बुकलला होता तासचा BBलाही दणका देणेत यावा. पण लाचार्/लाचखोर सरकार पुढे म्हणा की गाढवापुढे म्हणा गीता वाचुन काय उपेग?
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Tue, 02/22/2011 - 17:01

In reply to मग जर हे फक्त ब्लॅकबेरी टु by गणपा

Permalink

त्यांना

ब्लॅकबेरीवाल्यांना सरकारने ऑगस्टमध्ये "३/४ महिन्यांत सोल्युशन घेवून या' असे सांगितले होते. नंतर त्याचे काय झाले कळत नाही. अमेरिकावाले ब्लॅकबेरी मिसयुज करणार्‍यांवर नजर कशी ठेवतात?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 02/22/2011 - 18:33

In reply to त्यांना by चिरोटा

Permalink

हॅ हॅ हॅ

अमेरिकावाले ब्लॅकबेरी मिसयुज करणार्‍यांवर नजर कशी ठेवतात? कित्ती भाबडे हो तुम्ही. ते काय डिक्रिप्टर मागत बसणार होय. अवांतर: एका कथेत कम्युनिस्टांबद्दल गंमतीशीर वाक्य वाचले होते. 'द कम्युनिस्ट पार्टी विल इम्पोज इट्स व्यूज इन डेमोक्रेटिक वे'. काळ बदलतो... इजम बदलतात... माणसे तीच असतात ना! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Tue, 02/22/2011 - 18:57

In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम

Permalink

अहो

डिक्रिप्टर मागणार नाहीत ते माहित आहे पण मग अमेरिकेत लोक ब्लॅकबेरी लोक वापरतात ना? त्यांच्या डेटावर पोलिस यंत्रणा नजर कशी ठेवतात?NSA चा हे सगळे 'किडे' करण्यासाठी पूर्णवेळ स्टाफ आहे असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 02/22/2011 - 19:35

In reply to अहो by चिरोटा

Permalink

करेक्ट

आम्ही हेच सुचवत होतो. वाटाघाटींच्या घोळात दुसर्‍याच कोणी फायदा उठवण्यापेक्षा स्वावलंबन हाच सुरक्षित मार्ग. डिक्रिप्टर मागण्यात वेळ घालवत नाहीत थेट क्रॅक मारतात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Tue, 02/22/2011 - 16:47

Permalink

गोंधळ

ही माहिती ब्लॅकबेरीच्या साईटवर सापडली- The BlackBerry Enterprise Solution uses a symmetric key encryption algorithm to protect all data that the BlackBerry smartphone sends or receives, while the data is in transit between the BlackBerry smartphone and the BlackBerry Enterprise Server. This standard BlackBerry encryption, which is designed to provide strong security, verifies that a BlackBerry message remains protected in transit to the BlackBerry Enterprise Server while the message data is outside your organization's firewall http://www.blackberry.com/btsc/search.do?cmd=displayKC&docType=kc&externalId=KB00589&sliceId=SAL_Public&dialogID=5966643&stateId=0%200%203574896 सरकार ब्लॅकबेरीकडून हे मेसेजेस decrypt कसे करायचे ते विचारतेय? पाठवलेला ईमेल हा encrypted असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 02/22/2011 - 16:59

In reply to गोंधळ by चिरोटा

Permalink

ह्म्म हे म्हणजे स्विस बँके

ह्म्म हे म्हणजे स्विस बँके सारख झाल की. ते सिक्युरिटीच्या नावा खाली इतर देशातला काळा पैसा साठवतात. आणि हे काळी(गुप्त) माहीती साठवतील, ज्याचा दुरुपयोग करणारी मंडळी लाभ उठवुशकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 02/22/2011 - 19:36

Permalink

अरेरे

टारझनचे काय झाले हे.... अरे ही वेळ तुझ्यावर का आली रे? आणि इतरांच्या राखीव कुरणात घुसलास तर तुझे काम कोण करणार रे. ते काही नाही आमचा ष्ट्रांग णिषेद. आमचे मतः ब्लॅकबेरीवर बंदी घातली तर आपल्या म्यानेजर लोकांचे - जे काही थोडेफार असेल ते - काम ठप्प होईल ना. मग देशाची प्रगती कशी होणार. तस्मात असले प्रश्न उपस्थित करणार टारझन प्रतिगामी आहे असे आमचे -नेहमीप्रमाणे -स्पष्ट मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/22/2011 - 20:16

In reply to अरेरे by रमताराम

Permalink

ह्हा ह्हा ह्हा ... कधी कधी

ह्हा ह्हा ह्हा ... कधी कधी वाटतं .. एखादा आयडी आणिक असावा :(
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Wed, 02/23/2011 - 10:39

In reply to ह्हा ह्हा ह्हा ... कधी कधी by टारझन

Permalink

मला दोनेक वर्शापुर्वि असंच

मला दोनेक वर्शापुर्वि असंच वाटायचं पन......................
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 02/23/2011 - 08:46

Permalink

बिबि वरुन मिसळ्पावला डुआयडिने

बिबि वरुन मिसळ्पावला डुआयडिने आल्यास कोणाला कळेल काय, ही फक्त एक शंका आहे, माझ्याकडे नाही बिबि आणि डुआय्डि.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 02/23/2011 - 10:40

Permalink

हर्षद " व्ही बी " की बीबी

हर्षद " व्ही बी " की बीबी नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 02/23/2011 - 10:59

In reply to हर्षद " व्ही बी " की बीबी by विजुभाऊ

Permalink

विजुभाउ, व्हिबि नाही ओ बिबि

विजुभाउ, व्हिबि नाही ओ बिबि ब्लॅकबेरी, आयला ते सगळं टायपायचा कंटाळा केला सकाळी सकाळी.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 02/23/2011 - 10:51

Permalink

टारझनजी आगे बढो हम तुम्हारे साथ है!

चीनी बनावटची वस्तु जसे आपण सर्व भारतीय विकत घेत नाही. भले त्या गेल्या कित्येक वर्ष दुकानात महीनोमहीने आयात होउन पडून आहेत. तसेच पाकीस्तानी बनावटीच्या साखर, कांदा इ. पदार्थांचा धिक्कार करतो, गोदामात सडू देतो. त्याचप्रमाणे आपल्या देशप्रेमाचा पुरावा द्यायची संधी ब्लॅकबेरीने आपल्याला दिली आहे. टिळक्-सावरकर यांचे स्मरण करुन लडकीपूलावर टारझन यांच्या नेतृत्वाखाली तमाम पुणेकरांनी आपापल्या ब्लॅकबेरींची होळी करायचे ठरवले आहे. आधीक माहीती लवकरच. महत्वाची सुचना:- ज्यांच्याकडे खरा ब्लॅकबेरी आहे केवळ त्यांनीच सामील व्हावे. तुमच्याकडचा ब्लॅकबेरी प्लॅस्टीक खेळण्यातला फोन आणू नये. धूर जास्त झाल्यास ५००/- रु दंड आकारला जाईल. हुकूमावरुण
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 02/23/2011 - 11:02

In reply to टारझनजी आगे बढो हम तुम्हारे साथ है! by सहज

Permalink

प्लास्टिक्स चे ब्लॅकबेरी =))

आरारारा =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 02/23/2011 - 13:22

In reply to टारझनजी आगे बढो हम तुम्हारे साथ है! by सहज

Permalink

च्च् च्च्

लकडीपुलावर नको सहजराव. जवळच विदेशी कपड्यांची होळी केली होती सावरकरांनी, तिथेच या नव्या मन्वंतराची सुरवात करू या. कसं म्हन्ता? अवांतरः फक्त पुणेकरांणी (इथे आलेला 'ण' हा केवळ या लढ्यासाठी टारझन यांचे नेतृत्व मान्य केल्याचा पुरावा आहे, रमताराम हा टारझन यांचा डुआयडी असल्याचा शोध लावून नाचत येऊ नये) आपल्या ब्लॅकबेरीची होळी करायचे ठरवले आहे हे अंमळ संकुचित प्रादेशिकतावादी वाटत नाही का? अजून तुम्ही पुरेसे कम्युनिस्ट झालेले दिसत नाही. जरा व्यापक विचार करा हो सहजराव.
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on गुरुवार, 02/24/2011 - 01:22

In reply to च्च् च्च् by रमताराम

Permalink

अवांतर

(इथे आलेला 'ण' हा केवळ या लढ्यासाठी टारझन यांचे नेतृत्व मान्य केल्याचा पुरावा आहे, रमताराम हा टारझन यांचा डुआयडी असल्याचा शोध लावून नाचत येऊ नये)
हे विशेष आवडले! (योग्य डिक्रिप्शनअभावी काय होऊ शकते याची अंधुकशी कल्पना या उदाहरणातून येऊ लागते. थोडक्यात, हॅकिंग किंवा क्रॅकिंग हे वाटेल त्याने केल्यास निष्कर्षांच्या अचूकतेची हमी नसावी. (तेवढा या दोन संज्ञांमधील फरक कोणी समजावून सांगू शकेल काय?)) (अतिअवांतर: वरील प्रकार हा काहीसा वन वे एन्क्रिप्शनसदृश होत आहे काय?)
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Wed, 02/23/2011 - 10:54

Permalink

गंभीर

गंभीर क्रिप्टीक प्रश्न दिसतो आहे. आम्हाला काही त्यातले समजले नाही. टाझनशेटनीच अजून तांत्रिक माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on Wed, 02/23/2011 - 11:27

Permalink

प्रत्येक ब्लॅकबेरी ला एक PIN

प्रत्येक ब्लॅकबेरी ला एक PIN (PRIVATE IDENTIFICATION NUMBER) असतो. हा पिन वापरून आपण B.B. TO B.B. फ्री मेसेज पाठवू शकतो. आणि हे मेसेज कोणताही सर्विस प्रोव्हायडर रेकॉर्ड करू शकत नाही (त्यांच्या सर्वर ला नोंद होत नाही.) म्हणून सरकार चिडले आहे....दहशत्वादी असे sms पाठवून काहीही करू शकतात. आणी ब्लॅकबेरी ने चिन सरकार ला वेगळा server टाकून ही सोय करून दिली आहे...म्हणून आपली अजून जळते आहे.....
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Wed, 02/23/2011 - 11:38

Permalink

पण....

समजा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे याबद्दल पुरेशी माहिती आधी मिळाली , तर आपण कशाच्या जोरावर तयारी करणार आहोत ? कालबाह्य झालेल्या जुनाट रायफलींच्या जोरावर ?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 02/23/2011 - 13:05

In reply to पण.... by कुंदन

Permalink

कुंदन्शेट भापो. पण आगावु

कुंदन्शेट भापो. पण आगावु मिळालेल्या माहितिच्या आधारे अश्या अनेक दुर्घटना टाळता आल्या आहेत, दुर्दैवाने अशी प्रकरण मिडिया हँडल करत नाही आणि त्या बद्दल सर्वसामान्यांना माहिती कळत नाही. जर चीनच्या मागणी नुसार त्यांना वेगळा सर्व्हर देउन ही सोय उपलब्ध होत असेल तर आपणही त्याचा पाठपुरावा केलाच पाहीजे. भारतासारखी मोठी बाजरपेठ गमवण BBच्या हिताच नाही. नाक दाबल की आपसुक तोंड उघडतय पाहा. (जरी वरील बातमी खरी असो वा नसो)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 02/23/2011 - 11:43

Permalink

भक्कम स्टँड घ्यायचा आणि

भक्कम स्टँड घ्यायचा आणि त्यांना हाकलून लावले कि गपगुमान ताळ्यावर येतील....पण आपलं सरकार अन नोकरशहा पुळचट तिच्यायला!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 02/23/2011 - 12:32

In reply to भक्कम स्टँड घ्यायचा आणि by शिल्पा ब

Permalink

कै तरीच तै तुमचं. राष्ट्रीय

कै तरीच तै तुमचं. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे कोट्यवधी गरीब, मध्यमवर्गीय बाजारबुणग्यांची सुरक्षा थोडीच असते वो? राष्ट्रीय सुरक्षा म्हनजे मोठमोठे उद्योगपती, नेते, राजे, संस्थानिक आणि त्यांचे हितसंबंध यांची सुरक्षा असते. कै बी जालं तरी बिझ्नेस गेला नै पायजे. मंग कुटून भक्कम स्टँड घेनार? तसंबी भक्कम स्टँड आजकाल सगले चायनामेड असत्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 02/23/2011 - 13:35

In reply to कै तरीच तै तुमचं. राष्ट्रीय by नगरीनिरंजन

Permalink

आठवण

काही महिन्यापूर्वी आम्ही आमच्या गरीबबापडया देशातील आम्हा गरीबांची गरीबबापडी दुचाकी घेऊन चाललो होतो. मुख्य रस्त्यावरून एका गल्लीत वळण घेतले तर अचानक समोर एखादा पाण्याच्या टँकर गेल्यासारखी पाण्याची धार रस्त्याच्या मधून गेलेली दिसली. आम्ही अंमळ बेफिकीरीने त्यावरून गाडी नेली नि काय देवा रे... आमची गाडी मस्तपैकी घसरत गेली नि धराशायी झाली. जे पाणी वाटले होते ते ऑईल होते. आम्ही घसरलेले पाहून बाजूच्या वस्तीतील पोरे खदाखदा हसली. उठून गाडीचे नि आमचे काय काय बिनसले आहे ते बघत होतो तर अजून दोघे तिघे घसरले. आमच्या आधी घसरलेले एव्हाना चालते झाले होते. ती पोरेच काय पण जे घसरले होते त्यांनीही ऑईलवर माती टाकून वा काही एखादा अडथळा लावून इतरांना सूचना देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. हे बघून आम्ही गाडी बाजूला लावून प्रथम रस्त्याच्या कडेला असलेली माती आणून तो ऑइलचा ओहोळ पूर्ण बुजवला. आम्ही हे करत असताना त्या पोरांनी आमच्यावर शिव्यांचा भडिमार केला. त्यांची करमणूक आम्ही बंद केली म्हणून. येताजाता आपल्या देशातील व्यवस्थेवर टीका करणार्‍या वा तिची टवाळी करणार्‍यांना पाहिले की आम्हाला उगाचच त्या खदाखदा हसणार्‍या पोरांची आठवण होते.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 02/23/2011 - 13:56

In reply to आठवण by रमताराम

Permalink

धन्यवाद! आम्ही तुम्हाला

धन्यवाद! आम्ही तुम्हाला पडताना पाहिलं नाही तरी तुम्ही तपशीलवार वर्णन करून आमची करमणूक केलीत याबद्दल. असे माती टाकणारे लोक असल्याने हे ब्लॅकबेरी पासून बेरीबेरी पर्यंतचे सगळे प्रॉब्लेम्स सुटणार याची खात्री असल्यानेच आम्ही निवांतपणे टवाळी करून स्वतःचे मनोरंजन करून घेतो. तुमचं चालू द्या. आमच्याकडे लक्ष देऊ नका. महासत्ता झाल्यावर आमच्यासारख्यांचा मुखभंग होणारचे. तोवर तरी हसून घेतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 02/23/2011 - 13:37

In reply to कै तरीच तै तुमचं. राष्ट्रीय by नगरीनिरंजन

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Wed, 02/23/2011 - 13:57

Permalink

उगीचच

पराचा कावळा करण्यात काय अर्थ आहे? एन्क्रिपशन डिक्रिपशन नक्की कस करतात आणि त्याचे अल्गोरिदम्स काय असतात आणि मूळ तत्वे काय आहेत ते समजल तर कुठ्ल्याही अतिरेक्यांना अशी प्रणाली प्रस्थपित करणे किती सोपे आहे ते सहज समजेल. एक ब्लॅक्बेरी ला बंदी घातली तरी अ‍ॅन्ड्रॉईड चे काय? फुकट प्रणाली डाऊनलोड करून अशा प्रणाली सहज प्रस्थापित करता येतात. बर तर बर मग सेक्युर मेल च काय? उगाचच खाबुगिरिसाठी बाबु लोकांनी काढलेली टूम आहे. सर्व सामान्य लोकांचा गोंधळ होणं साहजिक आहे पण जे लोक आयटी मध्ये काम करतात त्यांना सहज यातील फोलपणा कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Wed, 02/23/2011 - 14:03

In reply to उगीचच by गोगोल

Permalink

ईसकाळ मधील काही प्रतिक्रिया वाचत होतो

ही एक प्रतिक्रिया वाचून हसावे का रडावे ते कळेना: "मी स्वत: एक Computer Engineer असून Blackberry च्या म्हणण्याशी सहमत नाही... Blackberry च्या म्हणण्यानुसार जरी त्यांचे ग्राहक स्वत: encryption key तयार करीत असतील तरी ती कार्यप्रणाली तसेच त्याची आज्ञाप्रणाली (software) Blackberry ने स्वत: विकसित केले आहे. म्हणूनच encryption चा source code त्यांच्या कडेच असल्यामुळे ग्राहकांचा data decrypt करणे Blackberry ला अशक्य नक्कीच नाही " हरे राम...
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 02/23/2011 - 15:34

In reply to ईसकाळ मधील काही प्रतिक्रिया वाचत होतो by गोगोल

Permalink

मेलो

मेलो.cryptography मलाही कळत नाही पण प्रतिसाद वाचून उडालो आणि दुपारची झोप गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 02/23/2011 - 15:46

In reply to ईसकाळ मधील काही प्रतिक्रिया वाचत होतो by गोगोल

Permalink

मेलो

..
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 02/23/2011 - 15:48

In reply to ईसकाळ मधील काही प्रतिक्रिया वाचत होतो by गोगोल

Permalink

मेलो

..
  • Log in or register to post comments

Submitted by नि३ on Wed, 02/23/2011 - 18:35

Permalink

बस , आता कितीक वेळा मराल

बस , आता कितीक वेळा मराल चिरोटा
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 02/23/2011 - 19:22

Permalink

मलाही हे पटले नाही. तांत्रिक

मलाही हे पटले नाही. तांत्रिक अडचण नसावी. उगीच काहीतरी... त्यांना भारतात बिझनेस करू देवू नये........म्हणजे तशी अट ठेवावी.
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Wed, 02/23/2011 - 23:36

Permalink

>>जर मेसेज इन्क्रिप्ट करता

>>जर मेसेज इन्क्रिप्ट करता येतो तर तो डिक्रिप्ट करता येतोच येतो वन-वे-इन्क्रिप्शन असते हो मालक.साधारणपणे पासवर्ड या पद्धतीने डेटाबेसमधे साठवले जातात..शाळेत शिकलो होतो, विसरलो आता ! विकीवर असेल बघा. ब्लॅकबेरी वापरत नाही...सदर विषयात फारसे लक्ष घातले नाही :D
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on गुरुवार, 02/24/2011 - 00:02

In reply to >>जर मेसेज इन्क्रिप्ट करता by शाहरुख

Permalink

शंका

एन्क्रिप्शनबद्दल जवळपास काहीच कळत नाही, पण... पासवर्ड डेटाबेसमध्ये साठवण्यासाठी वन-वे एन्क्रिप्शन वापरता येते, हे ठीक. कारण तेथे तो पुन्हा डीक्रिप्ट करण्याची गरज नसते. फ्रंटेण्डला यूज़रने टंकलेल्या पासवर्डला एन्क्रिप्ट करून या दोन्ही (यूज़रने टंकलेल्या आणि डेटाबेसातल्या) एन्क्रिप्टेड पासवर्डांची तुलना करून काम भागते. (बहुतेक असे वन-वे एन्क्रिप्टेड पासवर्ड रिवर्स इंजिनियर करून डिक्रिप्ट करणेही शक्य नसावे. कारण अनेक वेगवेगळ्या पासवर्डांची एन्क्रिप्टेड व्हॅल्यू सारखी असणे तत्त्वतः शक्य असावे असे वाटते. खात्री नाही.) पण मेसेज पाठवण्याच्या बाबतीत वन-वे एन्क्रिप्शनचा काय उपयोग?
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 02/24/2011 - 00:08

In reply to शंका by पंगा

Permalink

गल्लत

एन्क्रिप्शन आणि हॅशिंग मध्ये शाहरूख साहेबांची गल्लत होते आहे असे वाटते :) डेटाबेस वगैरे मध्ये पासवर्ड साठवण्यासाठी जी 'वन-वे' पद्धत वापरली जाते, ते हॅशिंग्/सॉल्ट होय. एक प्रकारचे एन्क्रिप्शन असले, तरी एन्क्रिप्शनच नव्हे! असो. पंगांनी म्हटल्याप्रमाणे हॅशिंग रिवर्सिबल नसणे हेच अपेक्षित असते. तसेच अगदी मामुली फरक असलेल्या दोन भिन्न पासवर्ड्स चे हॅश खूपच वेगळे असणे अपेक्षित आहे. असा हॅशिंग कृतीक्रम उत्तम, विश्वासार्ह समजला जातो. मेसेजच्या बाबतीत एन्क्रिप्शन असेल, तर डिक्रिप्शनही हवेच; तरच मेसेज 'वाचता' येईल. वन वे पद्धत उपयोगी नाही. (जाणकार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com