मी लहान म्हणजे अगदीच शिशुमंदीरात शिकत असताना जुन्याश्या कॅसेट प्लेयरवर (टेप रेकॉर्डर) बाल गीते ऐकत असे.
उत्तरा केळकर यांच्या स्वरधारा ह्या अल्बममधील गाणी होती ती.
शाळेतुन घरी आलो की उचकपाचक करायला सुरुवात व्हायची. आईला ही घरघर पसंत नसे. ती मग टेप रेकॉर्डर चालु करुन देई. मग पुढचा अर्धा-एक तास हा बाल गीते ऐकण्याचा कार्यक्रम चालायचा. मी ही गाणी तब्बल तीन-चार वर्षे तरी ऐकली असावीत . त्यानंतर माझ्या लहान बहिणीने सुद्धा ऐकली. पण काळाच्या ओघात जसं CDचं चलन वाढलं, हे कुठेतरी मागे पडलं.
माझ्या संग्रही ती कॅसेट आता नाहीये. मी जालावर शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही मिळाली.
त्यातील काही गाण्यांची यादी, जी मला आठवतात अशी, खाली नमुद करत आहे.
१. फुगेभाउ, फुगेभाउ ढमढेरे, फुगु नका आणखीन, आता पुरे.
२. चांदोबा रे चांदोबा तु येतोस कुठुन, मउ मउ ढगांच्या रथात बसुन.
३. दख्खनच्या राणी तु नेतेस का मला, पेशवाई पुणे पाहायचंय मला.
४. परीताई ए ए परीताई, खाउ मी देइन तुला, पर्यांच्या देशात नेशिल मला?
हे लिहिताना केळकरांचा आवाज माझ्या कानात गुंजरव करत आहे.
मिपाकरांना या अल्बम मधील आणखी काही गाणे आणी त्यांच्या MP3 प्रती, किंवा दुवे माहीती असल्यास प्रतिसादात लिहावे.
आपला आभारी
-वपाडाव
वाचने
4633
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्याकडेदख्खनच्या राणि आहे,
जुनी गाणी परत ऐकणे हा एक
शी...बालगीते काय? चांगले
नुकतच गेलय
ही गाणी आम्हाला पण द्या
तूनळी वर
आपले खरंच खूप खूप
In reply to तूनळी वर by खडूस
व्हर्जिनल नाहीत.
In reply to आपले खरंच खूप खूप by वपाडाव
@ गणेशा, तु म्हणतो आहेस ते
काही बालगीते इथे वाचा अमोल
कोणाकडे ही गाणी आहेत