मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तरीही लिहा..

फ्रॅक्चर बंड्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कागद म्हणतो लिहा , लेखणी म्हणते लिहा, दौतीतली शाई म्हणे लिहा लिहा अन लिहा काळजातल्या तक्रारी फुंकर मागतात, अंधारातले कोपरे उजेड मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा अवघडलेले शब्द वाटा मागतात, नेहमीच्या वाटा बदल मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा. मन म्हणते मला सुचत नाही, गाणे म्हणते तुला जमत नाही, कोणी म्हणे ताल नाही, कोणी म्हणे चाल नाही, तरीही, लिहा लिहा अन लिहा.

वाचने 1450 वाचनखूण प्रतिक्रिया 6

प्रकाश१११ 18/02/2011 - 16:37
अभिजित -[बंड्या ] काळजातल्या तक्रारी फुंकर मागतात, अंधारातले कोपरे उजेड मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा आवडले. छान मस्त !!

कच्ची कैरी 18/02/2011 - 18:58
बिचारा फ्रॅ़क्चर बंड्या आहे तरी म्हणे लिहा मग शब्द अवघडतीलच ना ?त्याचा फ्रॅ़क्चर ठीक होउ द्या मग त्याला लिह म्हणा .