कागद म्हणतो लिहा ,
लेखणी म्हणते लिहा,
दौतीतली शाई म्हणे
लिहा लिहा अन लिहा
काळजातल्या तक्रारी
फुंकर मागतात,
अंधारातले कोपरे
उजेड मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा
अवघडलेले शब्द
वाटा मागतात,
नेहमीच्या वाटा
बदल मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा.
मन म्हणते मला सुचत नाही,
गाणे म्हणते तुला जमत नाही,
कोणी म्हणे ताल नाही,
कोणी म्हणे चाल नाही,
तरीही,
लिहा लिहा अन लिहा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1451
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिजित -[बंड्या ] काळजातल्या
लिहा लिहा अन लिहा. बरं बरं,
तरी लिहा
धन्यवाद प्रकाशजी.. @कैरी :
मस्त एकदम .. कविता आवडली ..
+ १
In reply to मस्त एकदम .. कविता आवडली .. by गणेशा