राम राम गावकरीहों!
काय? कसं काय चाललंय? बैजवार हाय न्हवं? :)
आता तुम्ही म्हणाल, हा धम्या अस एकदम हाळ्या देत का आलाय बा!
तर त्याचं असंय मंडळी, पुढचा आईतवार म्हणजे २७ फेब्रुवारी; म्हणजे आपल्या लाडक्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस 'जागतिक मराठी दिन' म्हणून साजरा केला जातो. तुम्ही-आम्ही मराठीच, आपलं मौजे मिपागाव पक्कं मराठमोळं! म्हणजे जगतिक मराठी दिनाचा सण आपल्या मिपावर साजरा होणारच. :)
आपण मिसळपाव.कॉमवर २७ फेब्रु.२८ फेब्रु.,आणि १ मार्च असे तीन दिवस मराठी भाषा दिन सोहळा साजरा करणार आहोत.
ह्यामध्ये आपण मराठीसंदर्भात निरनिराळे लेख, कविता लिहूया. मग त्यामध्ये तुम्हाला आवडेल ते लिहावं.
जसं ,
तुमचं आवडतं पुस्तक किंवा आवडता लेखक कोणता? मग लिहा ना त्याबद्दल! आम्हालाही आवडेल की वाचायला.
मराठी साहित्यप्रवासाबद्दल लिहा, कवितांबद्दल लिहा,
मिपाकरांमध्ये कित्येक सुंदर रचना करणारे कवि-कवयत्री आहेत. मायमराठीच्या सन्मानार्थ कविता येऊ द्या हो मराठी सारस्वतहो!
तुमचं आवडतं नाटक कोणतं हो? सांगाल काय आम्हा गावकर्यांना त्याबद्दल काही?
मराठी रंगभूमीच्या प्रवासाबद्दल माहितगारांनी इतरांना माहिती दिली तर ह्या उत्तुंग नाट्यपरंपरेची महती सर्वांना कळावी.
तुमची बोलीभाषा - मराठीच्या निरनिराळ्या बोलीभाषांची सुंदर रेलचेल आहे. आपले मिपाकरही महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातले आहेत. कुणी अहिराणी बोलीतलं सौंदर्य दाखवा, कुणाले खान्देशी झटका लिव्हायचा तं लिव्हा ना बाप्पा :)
कुणाक मालवणी येतलो तां भोतुर कित्या ठेवतांन? आमका मालवणीतलो रश्श्याचा खमंगपणा दाखवा, कुणी नटलेली कोकणीबोली दाखवा, कुणी गोयेंकरांनी गोव्यातली लडिवाळ कोकणी-मराठी आम्हा घाटावरच्यांना उलगडुन दाखवा. :)
कुणी आगरीतलं रांगडं पिरेम कशे असतान सांगाचा ना बोल!
पुणेकरांनी पुणेरी मराठीचा प्रेमळ(!) खाक्या दाखवा,
महाराष्ट्राबाहेर असलेल्यांनी त्या त्या ठिकाणच्या मराठी लहेज्यावर बोला,
देशाबाहेरच्या मराठी मंडळींनी आपल्या मराठी भाषेच्या जपणुकीचे अनुभव आमच्यासोबत वाटावे,
ज्यांना ज्यांना, जेथे जेथे शक्य आहे, त्यांनी आपापल्या ठिकाणी रविवार दिनांक २७ फेब्रु.२०११ रोजी कट्टा करावा, मराठी माणूस अन माणूस जोडावा, आणि इथे आपल्या मिपाकरांसोबत कट्ट्याचा आनंद वृत्तांत देऊन वाटावा!
ह्याउप्पर आणखी कोणाच्या काही कल्पना असतील तर त्याही जरुर मांडाव्या ही विनंती.
बहुत काय लिहिणे? मायमराठी माथी धरावी, अवघा कल्लोळ घडवावा! :)
तर बोला मंडळी, कोण कोण कोणत्या विषयावर काय काय देणार? ह्या विषयी अधिक चर्चा करायची असल्यास, काही सुचना असल्यास नि:संकोच इथे मला व्यनि करा.
उधे गं अंबे उधे!!!!
मायमराठीचा हा भुत्या तुमच्यादारी आला आहे. त्याच्या परडीत हे पीठ-मीठ घालावे, आनंदाचे तेल ह्या दिवटीवर घालावे....मायमराठीच्या प्रेमाची कणभराची का होईना परतफेड करुया! अवघे मिपागाव दारी लेख-कवितांची गुढ्या तोरणे बांधून मराठी दिनासाठी सजवुया!
काय मग? करायची ना सुरुवात?
वाचने
6879
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो.... लगेच सुरुवात करू...
आधी माझा नंबर आहे रे! गेले
In reply to हो.... लगेच सुरुवात करू... by सूर्यपुत्र
व्वा..
+१
In reply to व्वा.. by स्वाती दिनेश
मस्त रे...!
आनंद...
छान कल्पना धमालराव.. बघूया या
लिवायचं त हैच, अगदी नक्की,
धमु, लागोपाठ तिन दिवस लिहीले
चांगला लेख आणि चांगली कल्पना
अनूमोदन.
वोक्के...
येस्सार !
थिण्क टँक सुरु केला बघु आता
क्षमा असावी.
खरंतर या दिवशी सर्वांनीच
ओ मग तुम्ही कोनी लिहावे आनि
In reply to खरंतर या दिवशी सर्वांनीच by भडकमकर मास्तर
का?
In reply to ओ मग तुम्ही कोनी लिहावे आनि by मुलूखावेगळी
उत्तम कल्पना!
In reply to का? by सहज
:)
In reply to उत्तम कल्पना! by धमाल मुलगा
:)
दोन प्रश्न
उत्तरे
In reply to दोन प्रश्न by रमताराम
चुचु हे नाव नाही का सुच्ल
In reply to उत्तरे by अवलिया
आँ!
In reply to चुचु हे नाव नाही का सुच्ल by प्रीत-मोहर
बॉस...!
In reply to दोन प्रश्न by रमताराम
व्वा धमाल राव!! आवाहन लिहाव
कल्पना उत्तम आहे
काय राव, राग नका मानू पन सगळा
In reply to कल्पना उत्तम आहे by jaydip.kulkarni
छान कल्पना आहे.
माझ्या साठि प्रत्येक दिवस हा
पून्हा एकदा सर्वांना आठवण !!