आठवतात दिवस ..काही दिवसांपुर्वीचे.. नाही काही वर्षांपुर्वीचे
कीती प्रफ़ूल्लीत होते ना मी ?
अमेरीकेला जायच म्हणून..
उधान आल होत .. आनंदाला
लग्न ठरल होत ना माझ , सगळीकडे आनंद उत्सव चालू होता
मी हे बघणार, मी येथे जाणार
मी हे करणार, मी थोडीशी अजून शिकणार..
सगळी स्वप्न पदराला बांधून निघाले होते मी
जाताना मावेल तेव्हडा माझा 'भारत'
साठ्वून घेऊन चालले होते मी .. मनात.. ह्रदयात..
पाउल ठेवले ना मी त्या स्वप्नमय दूनियेत
सगळे वेगळेच दिसले मला
माणसे .. (हसून) छे मशीन म्हणायच त्यांना
भ्रमनिरास.. फ़क्त भ्रमनिरास..
मग साठवलेला 'भारत' आठवत होते मी .. हळू हळू
काही दिवसांनी ..
माझ्या लेकीला माझ्याच संस्कृतीचे पाठ पढवायचे .. ठरवले मी
पण
भारत, इंडिया, हिंदुस्थान यातल्या नक्की कुठल्या देशात तू रहायची मॉम ?
घ्या संस्कृती शिकवायला चाललेली मी
भ्रमनिरास फ़क्त भ्रमनिरास
जाउद्या नावात काय आहे म्हंटल
शिकवावे तीला जन गण मन, वंदे मातरम
सांगावेत सुभाष चंद्र भोस .. गांधी .. शिवाजी महाराज
पण मी माता होते..
कदाचीत.. शिक्षिका नाही होउ शकले
माझी मुलगी येईल कदाचीत ईतक्यात
कदाचीत .. डिस्कोबार मधील पार्टीत उशीर झाला असेन
कदाचीत ...? आश्चर्य वाटल ना..?
अहो नाही शिकवू शकले मी..माझी संस्कृती
पण सवय लाउन घेतली आहे मी
ईथल्याच वळणाची ...
-- शब्दमेघ ( स्त्री .. भावनांचा प्रवास मधुन)
काव्यरस
वाचने
3598
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणेशा एकदम झकास. छान अनुभव
Submitted by गणेशा on Thu, 17/02/2011 - 13:39 * हे ठिकाण
हे आजकाल इंडीयात्/भारतातही
सहमत
दीर्घोत्तरी प्रश्न
अहो मास्तर
In reply to दीर्घोत्तरी प्रश्न by भडकमकर मास्तर
ए नायल्या नीट वाच की
In reply to अहो मास्तर by Nile
नीट वाचलं की राव, पण कायच
In reply to ए नायल्या नीट वाच की by गणपा
ए बाबा मी काय कविते बद्दल
In reply to नीट वाचलं की राव, पण कायच by Nile
बाप रे ! शाळेत असतांना सुद्धा
In reply to ए बाबा मी काय कविते बद्दल by गणपा
का? मग काय झालं संबंध ठेवले
In reply to बाप रे ! शाळेत असतांना सुद्धा by अवलिया
अरेरे!
X=X+1
In reply to अरेरे! by पिवळा डांबिस
पिवळा डांबीस, अजानुकर्ण,
ने मजसी ने परत आंग्ल
गणेशाराव , कवितेतल्या ब्लॅक
सर्वांचे धन्यवाद .. मी भारतीय
In reply to गणेशाराव , कवितेतल्या ब्लॅक by ५० फक्त
गणेशा, तू चुकून हिरव्या नसा
हे म्हणजे चोराच्या उलट्या