नमस्कार! मिपा वर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तरी इथल्या रथी-महारथींना नमस्कार करून सुरुवात करतो.
दिग्दर्शक मणीरत्नम सर्वाना एक सामाजिक आणि वेगळे विषय असणारे चित्रपट काढणारा म्हणून सुपरिचित आहेच. त्याच्या दहशदवादाच्या विषयावरील त्रिमूर्ती तर बहुतेकांनी पाहिली असेल ती म्हणजे रोजा, बॉम्बे (आता चित्रपटाचे नाव हेच होते) आणि दिल से . पण हाच दिग्दर्शक खूप अप्रतिम गाण्यांचे सादरीकरण आपल्या चित्रपटांमध्ये करतो. त्या गाण्यांची अजून एकदा आठवण करून देतो आणि जर कुठली गाणी माहिती नसतील तर अशा आहे की ती आवडतील (नाही आवडली तर सोडून द्या).
सुरवात करू त्याच्या जुन्या चित्रपटांपासून ज्यावेळेस तो हिंदी चित्रपटसृष्टीला माहिती नव्हता. चित्रपट आहे अग्नी नच्चतीरम (१९८८). रेल्वे फलाट आणि प्रत्यक्ष रेल्वेचा सुंदर वापर केलेला आहे या गाण्यामध्ये. अंधार आणि दिवे की जे काही भागच प्रकाशित करत आहेत ते एक वेगळाच अनुभव देऊन जातात. रात्रीची शेवटची लोकल गेली किवा तुम्ही कधी पहिल्या लोकल ची वाट पाहत बसलेले असता तेव्हा जसा दिसेल फलाट तसाच बरोबर चित्रित केलेला आहे. उगीच त्याला भडक करायचा प्रयत्न नाही.
पुढील चित्रपट बहुतेक अनेकांनी त्यांच्या बालपणी पहिला असेल. माझी तरी आठवण आहे. तो आहे अंजली (१९९०). या चित्रपटामध्ये त्यांनी इतक्या लहान मुलांकडून मोठे काम करून घेतले आहे. या एका गाण्यामाध्येच त्याची झलक आपल्याला दिसून येते. एका संकुलामध्ये राहणारी खोड्या करणारी मुले आणि ती काही नादान नाहीत - त्यांना सगळे माहिती आहे काय चालू आहे ते.
आता पर्यंत तो इलैराजा बरोबर काम करत होता. पण १९९२ मध्ये त्यांनी ठरवले एका नवीन संगीतकाराला संधी देऊ. आणि त्यांनी जगापुढे आणला ऑस्कर विजेता ए. आर. रहमान. चित्रपट होता रोजा. काश्मीर च्या बर्फाळ पर्वतांमध्ये नुकतेच लग्न झालेले जोडपे दहशदवादाला न घाबरता प्रेमात दंग आहेत याचे सुरेख चित्रीकरण ये हसीन वादीया या गाण्यात येते. तशी या चित्रपटातील सगळीच गाणी एका पेक्षा एक आहेत.
बॉम्बे (१९९५) त्याकाळी अत्यंत वादग्रस्त ठरलेला चित्रपट. मला आठवतंय चित्रपटगृहाबाहेर पोलिसांचा पहारा आणि रात्री गेलो म्हणून बरोबर घेतलेली विजेरी सुद्धा उघडून पाहिली होती. तर या चित्रपटामाधीलाही गाणी आठवणीत रहावीत अशी आहेत. केहेनही क्या ! मध्ये त्याला पहिल्यांदाच पाहून काळजीत पडलेली मनीषा की हा आपल्याला का आवडला तिला कळत नाहीये की काय करू आणि काय बोलू. पण चित्रीकरणासाठी उत्कृष्ट गाणे म्हणजे तुही रे. ती पावसाळी हवा - वादळाला सुरुवात होणार आहे अश्या वाटणाऱ्या समुद्रातल्या लाटा - मनीषाची तगमग आणि अरविंद स्वामी चे वाट पाहणे. अप्रतिम !
लोकांना फार न आवडलेला चित्रपट म्हणजे दिल से (१९९८). बहुतेक लोकांना तो झेपला नाही किवा शेवटी शहरूक आणि मनीषा दोघेही मारतात हे त्यांना आवडले नाही. त्यातील छैया छैया वर तर सगळेच जण नाचले पण धगधगत्या गावाच्या पार्श्वभूमीवर फुलणारे प्रेम दाखवणारे दिल से रे म्हणजे कळस. आता शहरूकनी त्याची स्टाइल मारली आहे असे म्हणून नका. पण पुन्हा एकदा दडपण धूडकावाणारी लहान मुले मणीरत्नमची समज दाखवून जातात. हा आता माझे आवडते गाणे मात्र जिया जले आहे. केरळची पार्श्वभूमी आणि हत्तींबरोबर नाच.
साथिया नावाचा चित्रपट बर्याच लोकांना आठवत असेल. तो बनवला होता मणीरत्नमच्या सहायकांनी. मणी नी तो आधीच २००० मध्ये दक्षिणेत अलाई पयुथे म्हणून बनवला होता. माधवन जो आता हिंदी मधेही खूप दिसतो, तो त्यावेळेस तिकडचा हीट तारा होता. तर साथिया साथिया गाणे बरेच प्रसिद्ध झाले होते आणि बर्याच नोकिया ची ती रिंग टोन (मराठी शब्द काय ?) होती. ते आपल्या रहमान नी पचाई निरमे म्हणून बनवले होते. रंगांचा वापर पहायचा तर तो इथे. हिरवा, लाल, पिवळा, निळा आणि पांढरा अप्रतिम रंगसंगती साधली आहे. त्याच्या निम्मी ही शाद अली ला साधता आली नाही. या गाण्यात २:५२ ला माझा आवडता कॅमेरा चा उपयोग आहे.
अजून एका गाण्याची ओळख करून देतो शेवटी. चित्रपट आहे युवा (२००४). यात तरुणाई चा जोश दाखवणारे धका लागे बुक्का हे मस्त गाणे आहे. पण आजकालच्या तरुणाई ची क्लब मध्ये जाऊन नाचण्याची आवड आणि व्यक्तिरेखांची ओळख दाखवणारे फन्ना.
सध्या तरी इतकेच. अता वाट पहायची नविन चित्रपटाची.
मिसळपाव
छान!
मणीरत्नमची गाणे चित्रीत
मस्तच.......
दिल से चित्रपटाची विषेषता
सपने...
In reply to सपने... by प्रशु
सपने
पचाई निरमे
छान आठवण करुन दिली .. रोझा ने
धन्यवाद
थोडे विषयांतर
In reply to थोडे विषयांतर by अन्या दातार
नक्की राजीव मेनन का ?
In reply to नक्की राजीव मेनन का ? by खडूस
खडूस साहेब
दिलसे माझा आवडता सिनेमा अभिनय
In reply to दिलसे माझा आवडता सिनेमा अभिनय by निनाद मुक्काम …
ए अजनबी
नक्की राजीव मेनन का ?
थीरूडा थीरूडा (चोर चोर)मधील चंद्रलेखा लय झ्याक वाटायचे
In reply to थीरूडा थीरूडा (चोर चोर)मधील चंद्रलेखा लय झ्याक वाटायचे by आत्मशून्य
ए.टी.एन. आपलं लय फेवरीट
In reply to थीरूडा थीरूडा (चोर चोर)मधील चंद्रलेखा लय झ्याक वाटायचे by आत्मशून्य
चंद्रलेखा
दिल ही दिलमे ह्या
In reply to दिल ही दिलमे ह्या by निवांत पोपट
दिल ही दिल मे
In reply to दिल ही दिल मे by निमिष ध.
होय. दिग्दर्शक मणीरत्नम