Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by महेश काळे on Fri, 02/11/2011 - 11:50
एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत. हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा
  • Log in or register to post comments
  • 23016 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पंदना on Fri, 02/11/2011 - 11:56

Permalink

जरुर!! खरच आपण रोजच म्हणतो ही

जरुर!! खरच आपण रोजच म्हणतो ही स्तोत्रे, अन ऋचा. अ‍ॅकचुअली भारत सरकारन ही देववाणी जमेल तेव्हढी प्रसारीत केली पाहिजे. मी होते तोवर आकाशवाणीवर संस्कृत मध्ये बातम्या असायच्या. आता या एफ एम च्या गदारोळात काय माहिती नाही. तुमच हे आवाहन मी माझ्या नातेवाईकांना कोपी पेस्ट करुन पाठवु का?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 02/11/2011 - 12:06

In reply to जरुर!! खरच आपण रोजच म्हणतो ही by स्पंदना

Permalink

संस्कृत बातम्या अजूनही

संस्कृत बातम्या अजूनही लागतात. ७ ला ५ कमी असताना. :) त्यातले निवेदक परमानंद झा: , बलदेवानंद सागरः वगैरेंची आनऊन्समेन्ट अजूनही आठवते. सध्या परमानंद झा असतात बहुतेक वेळेला.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/11/2011 - 14:23

In reply to संस्कृत बातम्या अजूनही by llपुण्याचे पेशवेll

Permalink

मी नै लिहीणार ज्जा :)

रट्टा मारलेले स्तोत्र आले म्हणजे संस्कृत भाषा आली काय ? स्वतःची अशी दोन वाक्य बोलायला सांगा बरं संस्कृतात ... शेवटी कुठे विसर्ग लावला म्हणजे संस्कृत होत नाही :) तेंव्हा मला संस्कृत येत नाही , सबब मी खोटी माहिती भरणार नाही ... संस्कृत मेली तरी बाहत्तर त्र्याहत्तर .. पण मी माझ्या तत्वांशी फार प्रामाणिक आहे म्हंटलं :) - ( मराठी, हिंदी,इंग्रजी) तारझन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद्_पुणे on Fri, 02/11/2011 - 16:02

In reply to संस्कृत बातम्या अजूनही by llपुण्याचे पेशवेll

Permalink

हो

सध्या झा असतात बहुदा.. इयं आकाशवाणी संप्रतीवार्ता: श्रुयंताम...भाषा खरेच देवभाषा आहे.नैव क्लिष्टा न च कठिना.. पन याकरनाच लय भ्या वाटतय... संस्कृत संभाषण वर्ग घेणे जरूरी आहे. जे बहुदा पुण्यात होत असतात. छोटी छोटी वाक्ये बोलायला सुरुवात केली की भीती चेपेल. सरकारने सुद्धा संभाषण वर्ग व तत्सम उपक्रमांना आर्थिक मदत द्यायल हवी आणि आपण त्याचा लाभ घ्यायला हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Sat, 02/12/2011 - 00:27

In reply to संस्कृत बातम्या अजूनही by llपुण्याचे पेशवेll

Permalink

इयम आकाशवाण्या:

संप्रती वार्ता श्रुयंताम चु भु द्या घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 02/13/2011 - 00:30

In reply to इयम आकाशवाण्या: by गोगोल

Permalink

आकाशवाण्या: नाही. आकाशवाणी

एकवचनी पाहीजे. द्वि वचनी नको. संप्रती वार्ता श्रुयंताम संप्रती वार्ता: श्रुयंताम प्रवाचकः बलदेवानंद सागरः
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 02/13/2011 - 00:25

In reply to जरुर!! खरच आपण रोजच म्हणतो ही by स्पंदना

Permalink

प्रश्ण का पडला???

मी माझ्या नातेवाईकांना कोपी पेस्ट करुन पाठवु का? प्रश्ण का पडला???
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 02/11/2011 - 11:58

Permalink

उत्तम कल्पना आणि ध्यानात आणून

उत्तम कल्पना आणि ध्यानात आणून दिल्याबद्दल आभार. सगळ्यां मित्र-नातेवाईकांना नक्की सांगणार.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 02/11/2011 - 12:02

Permalink

चांगला विचार आहे. जरुर असे

चांगला विचार आहे. जरुर असे करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/11/2011 - 12:09

Permalink

प्रामाणिक भावनांशी सहमत परंतु

प्रामाणिक भावनांशी सहमत परंतु किंचित असहमती. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. ही अशी घोषणा करणारे टिक्कोजीराव कोण? असो. एक जण जरी ती भाषा स्वगत रुपाने बोलत असेल तरिही ती भाषा जिवंत असे माझे मत आहे, राहता राहिली कमी लोक बोलतात तर ही परिस्थिती गेल्या हजारो वर्षांपासून आहे. संस्कृत कधीही त्या अर्थाने जिवंत नव्हती की जी आता मृत घोषित केली जाईल. परिस्थिती बदलत आहे. उत्तरांचल सरकारने द्वितीय भाषा म्हणुन संस्कृतला मान्यता दिली आहे. मध्यतरी बंगुळूरु येथे झालेल्या संस्कृत पुस्तक प्रदर्शनात शेकडो (धार्मिक संदर्भ नसलेली) पुस्तके वेगवेगळ्या विषयांवरची विकली गेली तसेच संस्कृतमधे लेखन असलेल्या अनेक नव्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. अगदीच अनास्था आहे असे नाही. ज्याला अभ्यास करायचा अहे ते करतात त्यासाठी सरकारी मदतीची पण वाट पहात नाहीत. असो. तरीही भावनांशी सहमती आहे त्यामुळे वाद नसावा.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 02/11/2011 - 12:53

In reply to प्रामाणिक भावनांशी सहमत परंतु by अवलिया

Permalink

राहता राहिली कमी लोक बोलतात

राहता राहिली कमी लोक बोलतात तर ही परिस्थिती गेल्या हजारो वर्षांपासून आहे. संस्कृत कधीही त्या अर्थाने जिवंत नव्हती की जी आता मृत घोषित केली जाईल. +१
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Fri, 02/11/2011 - 14:50

In reply to प्रामाणिक भावनांशी सहमत परंतु by अवलिया

Permalink

माझा संस्क्रुत हा विषय ८ वी

माझा संस्क्रुत हा विषय ८ वी पासुन . (त्यामुळे आमच्या तुकड्या विभागल्या गेल्या :( ). बी.एस्सी. २न्ड पर्यन्त चा स्कोरीन्ग विषय . तेव्हा मला नेहमीच रटृटा मारुन ९० च्या मार्क्स १दा तर ९९ ( ह्या १ च विषयात) पडायचे. बाकि मी टिळक विद्यापीठाच्या परीक्षा पण दिलेल्या . वर्गात मला सगळयाच सुभाषिततांचे अर्थ , प्रश्नांची उत्तरे यायची. पण मला फक्त २ वाक्येच बोलता येतात. मम नाम नमो नमः माझ्या सारखे बरेच लोक असतात मार्क्स साठी हा विषय घेनारे तेव्हा मी मला येते असे म्हनु कसे शकते. आता तुम्हीच सांगा धागाकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Fri, 02/11/2011 - 12:11

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Fri, 02/11/2011 - 12:22

Permalink

सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा

सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिताहृद्या रमणीया । अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा, नच कठीना ! नैव क्लिष्टा, नच कठीना !! अमोल केळकर
  • Log in or register to post comments

Submitted by महेश काळे on Fri, 02/11/2011 - 12:37

In reply to सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा by अमोल केळकर

Permalink

अतीव सुन्दर ..

फारच छान.. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on Fri, 02/11/2011 - 13:57

In reply to सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा by अमोल केळकर

Permalink

आवडती

ही माझी आवडती कविता आहे ,आमच्या संस्कृतच्या टीचर नेहमी मलाच म्हणायला सांगायच्या .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 02/11/2011 - 12:23

Permalink

मी कै नै लिहिणार.

>>>>अवगत असलेल्या भाषा मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा मी काय तसं लिहिणार नाही. कारण मला संस्कृत भाषा अवगत नाही. >>>>संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे आम्ही दिवेलागणीला कोणतीही स्तोत्रे म्हणत नाही. >>>>लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक आमच्याकडे लग्नात कोणतेही संस्कृत श्लोक नसतात. आम्ही अग्नीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतांना शंकराने पार्वतीला आणि पार्वतीने शंकराला जी वचनं दिली होती ती वचनं शुद्ध मराठीत देतो घेतो. असो, बाकी जनगणनेत ही ’अवांतर’ माहिती भरणा-यांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by महेश काळे on Fri, 02/11/2011 - 12:30

In reply to मी कै नै लिहिणार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

पोट धरुन हासलो

:D :D :D :D
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 02/11/2011 - 12:57

In reply to मी कै नै लिहिणार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मी काय तसं लिहिणार नाही. कारण

मी काय तसं लिहिणार नाही. कारण मला संस्कृत भाषा अवगत नाही.
म्हणुन तर देवभाषा म्हणतात तीला प्रा.डॉ. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 02/13/2011 - 00:33

In reply to मी काय तसं लिहिणार नाही. कारण by परिकथेतील राजकुमार

Permalink

ह.ह.पु.वा.

परा, लै भारी. =))
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/11/2011 - 13:33

In reply to मी कै नै लिहिणार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

>>>मी काय तसं लिहिणार नाही.

>>>मी काय तसं लिहिणार नाही. कारण मला संस्कृत भाषा अवगत नाही. >>>आम्ही दिवेलागणीला कोणतीही स्तोत्रे म्हणत नाही. अरेच्या हा प्राध्यापकांचा विनय म्हणावा की नम्रता ? असा प्रश्न पडला आहे. काही नाही गेल्या काही महिन्यात ही खरड वाचण्यात आली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शनी, 06/11/2010 - 10:19 आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करतो. सकाळीच उठण्यापासून [उटणे वगैरेसहीत] ते लक्ष्मीपूजनापर्यंत. फक्त सायंकाळी लक्ष्मीपूजनाला गुरुजी नसतात. आम्हीच श्री सुक्तमचे वाचन करतो. नंतर कुटूंबासह फॆन्सी फटाके उडवतो.
आता पारंपारिक पद्धतीने श्रीसुक्तम संध्याकाळी मराठीत म्हटले असेल काय असा प्रश्न पडला :) >>>शुद्ध मराठीत देतो घेतो. शुद्ध मराठी म्हणजे कोणती भाषा नक्की? आपलाच नाना (हाणतंय आता विद्यावाचस्पती मला ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 02/11/2011 - 13:52

In reply to >>>मी काय तसं लिहिणार नाही. by अवलिया

Permalink

च्यायला या नानाच्या.....!

>>>काही नाही गेल्या काही महिन्यात ही खरड वाचण्यात आली. सर्वप्रथम खासगी खरड संबंधितांची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी त्या खरडींचा वापर करण्याच्या कृतीबद्दल सन्माननीय सदस्य श्री अवलिया यांचा निषेध व्यक्त करतो. ’संस्कृत लेखन वाचणे म्हणजे काही संस्कृत भाषा अवगत आहे असा त्याचा अर्थ होत नाही. संस्कृत भाषेतील शब्दांचा अर्थ ही कळला पाहिजे. मला संस्कृत वाचता येते पण त्याचा अर्थ कळत नाही. त्या अर्थी मी संस्कृत मला ’अवगत नाही’ असे म्हणतो. >>>शुद्ध मराठी म्हणजे कोणती भाषा नक्की? शुद्ध भाषा म्हणजे एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी संवाद करतांना (साधतांना) असा संवाद करणे जो एकमेकांना कळला पाहिजे. मनातील भावभावना आणि सर्व भाषिक व्यवहार करतांना 'संदेशन' व्यवहारात अर्थ समजून घेतांना कोणताही अडथळा न येता शब्दांच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यास शुद्ध भाषा असे म्हणावे. - प्रा.डॉ. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/11/2011 - 14:01

In reply to च्यायला या नानाच्या.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हांग आश्शी !

तुमच्या निषेधाला केराची टोपली दाखवतो.
शुद्ध भाषा म्हणजे एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी संवाद करतांना (साधतांना) असा संवाद करणे जो एकमेकांना कळला पाहिजे. मनातील भावभावना आणि सर्व भाषिक व्यवहार करतांना 'संदेशन' व्यवहारात अर्थ समजून घेतांना कोणताही अडथळा न येता शब्दांच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यास शुद्ध भाषा असे म्हणावे. - प्रा.डॉ.
हे भाषेबद्दल झाले. त्याला शुद्ध असे विशेषण न लावताही व्याख्या होते. भाषा म्हणजे एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी संवाद करतांना (साधतांना) असा संवाद करणे जो एकमेकांना कळला पाहिजे. मनातील भावभावना आणि सर्व भाषिक व्यवहार करतांना 'संदेशन' व्यवहारात अर्थ समजून घेतांना कोणताही अडथळा न येता शब्दांच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यास भाषा असे म्हणावे ही खरी व्याख्या. उगाच शुद्ध शब्दाच्या कुबड्या का? आणखी तुम्ही शुद्ध मराठी भाषा असे विधान केले. म्हणजे परत त्यातही घोळच नाही का? आपलाच नाना
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 02/11/2011 - 13:00

Permalink

अभिमान वेगळा..

ती भाषा का नष्ट होत आहे याचा पूर्वग्रह न ठेवता विचार केला पाहिजे. लवचिक नाही ते टिकत नाही. लवचिक फॉर्ममधे संस्कृत ऑलरेडी इतर भारतीय भाषांच्या रुपात अवतरून जिवंत आहेच आणि चांगली ठणठणीत आहे. पण मूळ रुपात... नाही. हे अ‍ॅक्सेप्ट करण्याचाच प्रश्न आहे फक्त. आपण रोज त्या भाषेत बोललो (असतो) तरच ती जिवंत राहील (राहिली असती). पण त्यातल्या अत्यंत कठीण कडक नियमांमुळे ते शक्य झालं नसावं. माझ्यासहित (दहावी संस्कृत ९६%) जे कोणी अद्याप संस्कृत शिकतात ते केवळ स्कोअरिंग सब्जेक्ट म्हणून. संस्कृतमधे संपूर्ण निबंध लिहा. दहा ओळीत संस्कृतमधे उत्तरे लिहा असे प्रश्न पेपरात यायला लागले तर शिकायलाच काय, शिकवायला सुद्धा तेवढ्या संख्येने संस्कृत येणारे लोक सापडणार नाहीत. स्तोत्रे वगैरे कधीतरी म्हणणे म्हणजे संस्कृत येणे नव्हे. प्रामाणिकपणे मनाशी विचारुन सांगावे की किती श्लोकांचा / स्तोत्रांचा अर्थ समजून आपण म्हणतो ? (नुसते कशाविषयी आहे ते माहीत असणे वेगळे..) जे टिकत नाही ते न टिकण्यामागे कारणेही असतात. फॉर्मॅलिन घालून म्युझियममधे टिकवलेले नमुने आणि जंगलात वावरणारे प्राणी यात खूप फरक आहे. बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे पोपटाने पंख पसरले आहेत, जमिनीवर निपचित पडला आहे, चोच वासली गेली आहे, पाय वर केले आहेत.. पण मेला मात्र नाही..तशी अवस्था.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 02/11/2011 - 13:21

In reply to अभिमान वेगळा.. by गवि

Permalink

+१

असेच म्हणतो. बिरुटेसरांशीही सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 02/11/2011 - 21:28

In reply to अभिमान वेगळा.. by गवि

Permalink

+१

मत जवळपास असेच. ज्यांची प्राथमिक भाषा मराठी असेल (म्हणजे प्रवाही संस्कृतापैकी "मराठी" हा प्रवाह असेल), त्यांनी प्राथमिक भाषेच्या रकान्यात "मराठी" लिहावे.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Fri, 02/11/2011 - 12:50

Permalink

बापरे

मिपावर संस्कृत.. हम्म त्या लावण्यादेवी कुठे आहेत? ढकलपत्रातून ही माहिती मिळाली होती. बघू. बाकी हिंदी गाण्यांमध्ये हल्ली बरेच पंजाबी आणि उर्दू शब्द असतात. आणि ही गाणी आम्ही कधीही म्हणतो. मग या पण भाषा म्हणून लिहाव्यात का? तसेच उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. याबद्दल आणखी माहिती मिळू शकेल का? - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 02/11/2011 - 12:50

Permalink

संस्कृत भाषा शिकण्यास

मदत करणारी पुस्तके सांगा. मला संस्कृत शिकायचे आहे. सुरुवात कशी करावी त्याबद्दल जाणकारानी मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश काळे on Fri, 02/11/2011 - 13:37

In reply to संस्कृत भाषा शिकण्यास by वेताळ

Permalink

माझे आवडते संकेतस्थळ..

http://www.sanskritdeepika.org/
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 02/11/2011 - 14:01

In reply to संस्कृत भाषा शिकण्यास by वेताळ

Permalink

मीम

दुसर्‍या संकेतस्थळावरील नानांची मालिका वाचावी.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/11/2011 - 16:03

In reply to संस्कृत भाषा शिकण्यास by वेताळ

Permalink

http://sanskrit.nic.in/dis.ht

http://sanskrit.nic.in/dis.htm किंवा जवळपास संस्कृतभारतीचे केंद्र शोधा, त्यांच्या तर्फे अधुन मधुन संस्कृत संभाषण वर्ग असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 02/11/2011 - 12:53

Permalink

ती

कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.
ती मृत भाषा आहेच. लॅटिनही मृत भाषा आहे.पण अशा जुन्या भाषांचा अभ्यास करणारे अनेक जण आहेत जगभरात.येथे हल्लीच भरलेल्या संस्कृत मेळाव्यात अनेक संस्कृत पुस्तके खपली.काही वक्ते(एस्. पी. बालसुब्रमण्यम) तर संस्कृतमध्येच बोलले.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 02/11/2011 - 13:45

Permalink

प्रा.डॉ. आणि गवि यांचे विचार

प्रा.डॉ. आणि गवि यांचे विचार व्यावहारिकदृष्ट्या बरोबर असतीलही पण एक रोजच्या वापरातील भाषा म्हणून नाही तरी एक सांस्कृतिक ठेवा म्हणून तरी ती भारतातच जतन व्हावी असे मात्र वाटते. बाकी अभ्यास करणारे करतातच आणि त्यात परदेशी लोकही असतातच. फक्त भविष्यात पैशाअभावी असा अभ्यास करणार्‍या भारतीयांची संख्या शून्यावर येऊ नये एवढ्याचसाठी जे करता येईल ते केले पाहिजे. बाकी, या दोघांनी मांडलेली मते अजून एखाद्या शतकात मराठीबद्दल बोलली गेली नाहीत म्हणजे मिळवली. आजकाल आधुनिकता म्हणजे आपलं सगळं टाकून देणे आणि प्रत्येक गोष्टीचा उपयुक्ततेच्या दृष्टीने विचार करणे असे असल्याने यात आश्चर्य ते काही नाही. सुदैवाने अजूनही संस्कृत बोलणारे अनेक लोक आहेत आणि मोठ्या शहरांत इंग्रजाळलेलं वातावरण असलं तरी छोट्या शहरांमध्ये लोक अजूनही संस्कृत शिकतात. नगरसारख्या ठिकाणीसुद्धा संस्कृतमध्ये मासिक निघते हे भूषणास्पद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश काळे on Fri, 02/11/2011 - 13:52

In reply to प्रा.डॉ. आणि गवि यांचे विचार by नगरीनिरंजन

Permalink

सहमत आहे

सहमत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 02/11/2011 - 14:06

In reply to प्रा.डॉ. आणि गवि यांचे विचार by नगरीनिरंजन

Permalink

लवचिकता

लवचिकता नाही ठेवली तर टिकत नाही. हो. हे मराठी किंवा कोणत्याही इतर भाषेबाबतीत घडू शकतं. मराठीही चारशे वर्षांपूर्वीची पहा, बखरींमधली पहा आणि आजची पहा. ती एकच भाषा आहे किंवा कसे? हा संशोधनाचा विषय ठरेल. भाषा मरत नाही. ती रूप बदलते. डायनॉसोर जातात, मगरी राहतात, डायनॉसॉरच्या आठवणी जतन कराव्यात हे योग्यच.. पण तो तस्साच्या तस्सा जिताजागता शिल्लक राहिला पाहिजे असं कसं म्हणता येईल. (डायनॉसोर हे फक्त उदाहरण आहे. संस्कृत भाषेला डायनॉसॉर म्हणतो असे समजू नये ही विनंती.. :) ) अभ्यासविषय म्हणून एखादी भाषा शिल्लक राहणे / ठेवणे / ठेवण्याची गरज पडणे म्हणजेच फॉर्मॅलिनमधे जतन. जिवंत गोष्टींना याची गरज नसते. हेच एवढेच म्हणत होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by शरभ on Fri, 02/11/2011 - 13:58

Permalink

+१ Agree with Mahesh. भले

+१ Agree with Mahesh. भले भाषा वापरत नसलो तरि पणनोन्द तर झालिच पाहिजे..... बाहेरच्या देशात(Especially European countries) ह्याला फार महत्व आहे... त्याना त्यान्च्या भाषेचा आभिमान असतो...
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 02/11/2011 - 14:02

In reply to +१ Agree with Mahesh. भले by शरभ

Permalink

>>बाहेरच्या देशात(Especially

>>बाहेरच्या देशात(Especially European countries) ह्याला फार महत्व आहे... त्याना त्यान्च्या भाषेचा आभिमान असतो... कळले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 02/11/2011 - 14:09

In reply to +१ Agree with Mahesh. भले by शरभ

Permalink

युरोपियन देश किंवा इतरत्र ते

युरोपियन देश किंवा इतरत्र ते ती भाषा प्रत्यक्ष बोलत असतात. अशी माझी समजूत आहे. बोलता येत नसलेल्या / समजत नसलेल्या मूळ लॅटिन किंवा अन्य भाषेची "आपल्याला अवगत भाषा" म्हणून कुणी नोंद करत असतील असे वाटत नाही. तरीही करत असले तर कल्याण असो. नोंद तर आहेच संस्कृत भाषेची. जुन्या ग्रंथातले ज्ञान मिळवणे, संशोधन यासाठी लागेल तेवढी नक्कीच जतन होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 02/11/2011 - 14:35

Permalink

एक प्रश्न

संस्कृत भाषा मृत म्हणून घोषित होणे हे चांगले की वाईट? कदाचित मृत म्हणून घोषित झाली तर तिच्या संवर्धनासाठी पुरातत्वसंशोधनाच्या धर्तीवर अधिक ठोस उपाय, अनुदान इ. खास उपाययोजनांसाठी ती पात्र होईल. जर जिवंत आहे असे ठरले तर कदाचित चार भाषांप्रमाणेच एक भाषा या न्यायाने अधिक दुर्लक्ष होऊ शकेल. आणि मुळात ती भाषा समजत नसेल तर निव्वळ पोपटपंची केल्याने अवगत असलेले चार श्लोक म्हटल्याने 'अवगत' असे लिहिणे ही शुद्ध फसवणूक नव्हे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Fri, 02/11/2011 - 14:37

Permalink

खरे दुखणे...!

"....डायनॉसॉरच्या आठवणी जतन कराव्यात हे योग्यच.. पण तो तस्साच्या तस्सा जिताजागता शिल्लक राहिला पाहिजे असं कसं म्हणता येईल...." श्री.गगनविहारी यांचे या संदर्भातील दोन्ही विचार मननीय आहेत...व्यावहारिकदृष्ट्या तर जास्तच आहेत. संस्कृतचा विषय 'स्कोरिंग' ला चांगला म्हणून घेणार्‍यांची मानसिकवृत्ती पाहिली तर निखळ दिसून येते की त्याना 'संस्कृत' भाषा मरायला टेकली आहे की पुढील सप्तसहस्त्र वर्षे ती जिवंत राहून प्राचीन परंपरेचा सार्थ साक्षीदार म्हणून काम करणार आहे, याच्याशी किंचितही सोयरसुतक नसते. तसे असते तर पुढे कला शाखेला (शास्त्र शाखेचे नावच नको) कितीजण यातील 'संस्कृत' वैकल्पिक विषय घेत असतील? इथे युक्तीवाद असा केला जातो की, 'आमच्या कॉलेजमध्ये संस्कृत विषय' शिकविला जात नाही. पण विद्येची [इथे त्या भाषेची....] ओढ, अभिमान, आवड असेल तर हाच विषय बाहेरच्या शिकवणीनेही शिकता येतोच. मुंबई, पुणे, शिवाजी या तिन्ही विद्यापीठानी 'दुसरी भाषा जर त्या त्या महाविद्यालयात शिकविण्याची सोय नसेल, तर विद्यार्थ्याने स्वतःच्या जबाबदारीवर त्या भाषेचा विकल्प अर्जात भरावा'. कोल्हापुरातील कित्येक मुलेमुली माहीत आहेत की त्यानी 'स्वत:च्या' जबाबदारीवर सेकंड लॅन्ग्वेज म्हणून "जर्मन"..."फ्रेन्च"..."रशियन" घेतली आहे.....'संस्कृत' घेणारा एकही...अगदी एकही नाही. [हा विदा विद्यापीठात मिळू शकतो...किंवा विद्यापीठाच्याच 'वार्षिक अंकात' प्रसिद्ध होत असतो.] सोलापूरच्या काही महाविद्यालात (संगमेश्वर आणि दयानंद महाविद्यालयात) 'उर्दु' या भाषेची सोय आहे, पण जिथे नसेल तिथले विद्यार्थी या दोन महाविद्यालयातील 'उर्दु' साठी संबंधित शिक्षकांचे मार्गदर्शन घेतात....आजही तिथे Optional Urdu घेणारे विद्यार्थी आहेत. तिच गोष्ट 'अर्धमागधी' ची. हा विषय तर मेलेलाच आहे. पण एकेकाळी कोल्हापुरात या भाषेलाही विद्यार्थी होते. 'पाली' आणि 'लॅटीन' आता फक्त लिहिण्यापुरतेच उरले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमातून कित्येक विद्यापीठानी 'चॉसर' हा लेखक आणि त्याचे साहित्य काढून टाकले आहे...का? तर त्याची भाषा शिकविणार्‍या शिक्षकांची पिढीच संपली आहे. चॉसरच्या 'कॅन्टरबरी टेल्स' मधील केवळ 'Wepyng and waylyng, care and oother sorwe,I knowe ynogh, on even and a-morwe,' ही एकच वेळ पुष्कळ आहे समजण्यास की त्याच्या भाषेपासून 'मॉडर्न इंग्लिश' का दूर गेली ! "संस्कृत" बद्दलही तीच रड आहे. ती शिकविणारे जे काही शिक्षक आहेत ते फक्त प्राथमिक पातळीवर (चू.भू.दे.घे.). माझ्या माहितीप्रमाणे महाविद्यालयीन पातळीवरच 'स्पेशलायझेशन' ला हा विषय उपलब्ध नसेल तर (काही सन्माननीय अपवाद असतीलही...पण माझ्याजवळ त्या कॉलेजीसचा विदा नाही) संस्कृत निव्वळ खानेसुमारीच्या रकान्यात टिकमार्क करून टिकेल या भ्रमात न राहिलेले बरे. श्री.गवि नी 'बिरबल' कथेतील दिलेले पोपटाचे उदाहरण चपखल आहे. त्याच चालीत श्री.महेश काळे यांची या विषयीतील आपुलकी विचारात घेऊनही असे म्हणत आहे की, या दशकातील येऊ घातलेली ही खानेसुमारी संपल्यानंतर निव्वळ फॉर्मवर भरली आहे म्हणून जर 'संस्कृत' जिवंत राहिली अशी समजूत करून घेतली तर ती एकप्रकारे फसगत होईल. "वाडा चिरेबंदी..." होता एकेकाळी पण आता त्याला 'उद्ध्वस्त धर्मशाळे'चे रूप आले आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by महेश काळे on Fri, 02/11/2011 - 14:43

In reply to खरे दुखणे...! by इन्द्र्राज पवार

Permalink

उपमा

भग्न शीवालय.. ही उपमा जास्त योग्य वटते.. नाही का??
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 02/11/2011 - 14:42

Permalink

पण

मुळ धाग्यात संस्कृतमधले पत्र आले असते तर अजुन आवडले असते. पत्रलेखकाला बहुदा त्याच्या प्रकल्पासाठी आर्थीक सहाय्य बंद होण्याची भिती असु शकते असे एका वाक्यावरुन वाटत आहे. असो. तसे नसेलही. माझ्या मोडक्या तोडक्या संस्कृतमधील भावना समजुन घ्या. ही विनंती. एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे एक अतिमहत्वस्य गोष्ट्यार्थं तव लक्षवेधस्य अस्ये भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील भारतदेशस्य जनगणना कार्य अंतीम अवस्था अभ्यु अन अस्य पक्षे स्वयंसेवकाणान पुनरागमस्य तव द्वारे. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. तव अन तव कुटूंबस्य माहीती: पत्रे पुनर्भरीतस्य नोदवंस्य अस्तु. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा माहीती संकल्पेन, तव मातृभाषा जे अस्य ते तस्य लिखस्व परंतु 'अवगत भाषा नामस्य' विषये लिखीत्वांनाम संस्कृत न विसरस्य. आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. यदा अपूर्णस्य नोहे तदानाम अजहू अवश्य तव भाषा वापरानाम संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत. सांय दिपस्यकाले वदतु स्तोत्रं अथवा गणपतये कालस्य सहस्त्र आवर्तने च देवपुजेस्य अथवा विवाहकाले मंगलश्लोकाम सर्व सर्वजनांम मुखोद्गत अस्तु. हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. अस्य भाषा जीवीत ठेवस्य तव हस्तात अस्तु कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. गत सर्वेक्षणानाम संस्कृत जानापी जनसंख्या केवलम सहस्त्राय अस्तु तच कारणे इदं भाषा मृतघोषितम जाहीर कर्तूम. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. विपरीतपक्षे अरबी , फारसी जानस्य जनसंख्या विपूलास्ती. अस्य प्रमुख कारण, काही भारतराज्यम ठरवूरम भाषापत्रक भरवती. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. योयदी भाषा मृतघोषितम अस्तु तदानाम शून्य निधे उपलब्धम करवन्ति जानामहे आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. अस्यकारणे तदनंतरम अपुलस्य पुरातनच पवित्रच भाषा कायमस्वरुपे कालपडदस्य मागेजयतम तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. तव जाणीवपूर्वकम प्रयत्नच इती भाषेम जिवीत रख्यास्तु. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा अज आपुलस्य भाषा अश्य घट-घटीका कारण तव, अव, सव कारणीभूतस्य अस्तु. परंतु घटीका पूर्णस्वरुपम जायंतम नस्तु. यदी तव इती विचार पटस्य अस्तु तदानाम तव मित्रगणंस्य कर्णपटलद्वये अवश्य वदामी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 02/11/2011 - 14:45

In reply to पण by सहज

Permalink

बाप रे..........!!!!!

देवभाषेचे आणि तुमचे सख्य आहे हे कधी बोलला नाहीत. आपल्याला नमस्कार करतो. कृपया, मला तुमचा शिष्य करुन घ्या....! -दिलीप बिरुटे [सहजसरांचा संस्कृतचा विद्यार्थी]
  • Log in or register to post comments

Submitted by महेश काळे on Fri, 02/11/2011 - 14:45

In reply to पण by सहज

Permalink

जींकलेस मीत्रा..

फारच छान.. खुपच आवडले..
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 02/11/2011 - 14:49

In reply to जींकलेस मीत्रा.. by महेश काळे

Permalink

:-)

धन्यवाद. आपणही माझ्या संस्कृत भाषांतरात सुधारणा करुन हे पत्र आपल्या मित्रांना पुढे पाढवू शकता. तेवढेच संस्कृत भाषेची माझ्याकडून काही सेवा घडली तर स्वताला भाग्यवान समजेन. बिरुटे सर, महेशजी तुमच्या सारख्यांच्या प्रोत्साहनाने संस्कृतचे क्लासेस काढायचा मोह होतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 02/11/2011 - 14:50

In reply to जींकलेस मीत्रा.. by महेश काळे

Permalink

:-)

पुनरुक्ती कारणेन प्रकाटकायच |
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 02/11/2011 - 14:52

In reply to :-) by सहज

Permalink

साधु: सहजराव साधु: |

साधु: सहजराव साधु: |
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 02/11/2011 - 15:16

In reply to पण by सहज

Permalink

लई भारी

एकदम झकास लेखन. आवडेश.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 02/11/2011 - 21:31

In reply to लई भारी by प्रचेतस

Permalink

लय भारी

लय भारी! असेच म्हणतो. निशाणा भेदलाय!
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sat, 02/12/2011 - 21:40

In reply to पण by सहज

Permalink

मृत्यूची घोषणा आणि दाखला

संस्कृतच्या या पार्श्वहत्येनंतर१ संस्कृत ही आता अधिकृतरीत्या 'मृत' म्हणून घोषित करायला हरकत नसावी. मृत्यूच्या दाखल्यात 'मृत्यूचे कारण' या रकान्याखाली 'अतिरक्तस्राव'२ अशी नोंद करता यावी. (१, २ 'संस्कृतची लाल होईस्तोवर मारणे' म्हणजे नेमके काय, याची प्रचीती या प्रतिसादातून आली.) (वैद्यकीय शास्त्राच्या आणि कायद्याच्या क्षेत्रांत मृत्यूचा 'ब्रेन डेथ' नावाचा एक प्रकार मानला जातो, असे ऐकलेले आहे. यात, मला जितपत समजले, त्याप्रमाणे मेंदूचे कार्य पूर्णपणे बंद पडलेले असते आणि ते परत सुरू करता येण्याची सुतराम् शक्यता नसते, मात्र इतर इंद्रिये, जसे हृदय वगैरे, कार्यरत असणे शक्य असते. अशा रीतीने मृत घोषित केलेली व्यक्ती ही 'ब्रेन डेड' आहे, असे म्हटले जाते. असो, ही अवांतर माहिती झाली. तर सांगण्याचा उद्देश, 'ब्रेन डेड'च्या धर्तीवर संस्कृतला 'गुदामृत'३ म्हणून घोषित करावे काय?) (३ हा समास सोडवताना त्यातील पदांची फोड 'गुदा' आणि 'मृत' अशी करावी; कृपया 'गुदा' आणि 'अमृत' अशी करू नये, ही कळकळीची विनंती.४) (४ या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फोडींमुळे होणारे भिन्न समास हे समासांचे नेमके कोणते प्रकार आहेत, हे संस्कृत व्याकरण शाळेतच विसरून आल्यामुळे सांगू शकत नाही, तरी क्षमस्व. आपल्या वस्तू शाळेत विसरून येण्याची आमची खोड सनातन आहे. तरी तज्ज्ञांनी जमले तर खुलासा करावाच.)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com