"अखिल अंतरजालिय महिला मुक्ती मोर्चा " च्या सदस्यांचे प्रतिसाद वाचण्यास उस्तुक :)
गेला बाजार युयुस्तुंचा पण प्रतिसाव वाचण्यास थोडा उत्सुक :)
ऑनेस्टली पहायला गेलं तर लेखातले बरेच मुद्दे खरेही आहेत :) पण आता महिला मुक्ती मोर्चा कसे उत्तर देतो ते पहाणे रोचक ठरेल . . :) चला .. आज च्या टाइमपासाची सोय झाली ; )
जाता जाता : तुमच्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली हो :)
- संबंध तोडक
पाशवी शक्तीला आव्हान देणारे मुद्दे मांडल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा :-)
आजकाल माजलेल्या विवाहसंस्थेबद्दल बरेच नासूर निघू लागलेले आहेत असे समाजजीवनाचा आरसा असलेल्या मिपावरच्या काही लेखांवरून दिसून येते. स्त्री स्वतंत्र झाल्यामुळे पुरुषांच्या पोटात दुखतंय की स्त्रीमुक्तीची भाषणं ऐकून खरे गुलाम आपणच हे पुरुषांच्या लक्षात आलंय यावर छान वाद झडावा अशी अपेक्षा. :-)
‘हे नाही, ते नाही, हे संपलं आहे, ते संपलं आहे, घरात हेच हवे , तेच हवे’, असे भांडून त्या नराला वेळोवेळी बाहेर पिटाळले जाते का?
‘पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’, अशा अटी घालून त्याचा ‘मूड’ घालवला जातो का?
ज्याना नुसती मज्जाच हवीये त्यानी लग्न न करता लिव्ह इन रिलेशन हा ओप्शन निवडला पाहिजे
हे प्रश्न तुमचेच का तुमच्या मागच्या लेखातील मित्राचे?
- कंपाउंडर आराम पावटे
अय्य्या! तुम्ही डिस्कव्हरी बघता? तुमच्या कडे केबल टीव्ही आहे? मग त्या डिस्कव्हरी वा अॅनिमल प्लानेट मध्ये तुम्ही 'सी-हॉर्स ' ची मादी त्याच्या झोळीत अंडी टाकुन निघुन जाते हे नाही बघीतल?
मी तर बाबा आम्च्या 'नरावर??????'(काय भयानक शब्द आहे हा! घाम आला मला लिहिताना) खुप खुप ... करते. आणी अम्ही चिमणा चिमणीच्या धर्तीवर दोघे मिळुन घर चालवतो.
मला तुमच फार वाईट वाटत हो 'दिवटे' तुम्ही तर एक सोडुन बर्याच जणींना तारखे सकट सर्व करता ना? अर्थात हे तुम्च्या मागिल लेखावरुन.
बाकि बर्याच प्रतिसादांच्या अपेक्षेत असाल नाही तुम्ही?
लेख आवडला ....
मस्त लिहिले आहे.
१-२ मुद्दे सोडले तर सगळे पटते आहे.
मला तर कधी कधी वाटते
स्त्री -मुक्ती मोर्चा म्हणजे मुक्त असलेल्या स्त्रीयांनी त्या कश्या मुक्त नाहिये हे ठासुन सांगणे ...
जोक अपार्ट ..
स्त्री आता मुक्त आहे, तीच्या विचारांना स्वतंत्रता मिळाली आहे..
मी माझ्या अनुभवावरुन लिहितो आहे, माझय घरात .. मित्र मैत्रीणीमध्ये पाहुन मला जाणवते की आम्ही सर्वानुमते मते घेत आहे, सर्वांच्या स्वतंत्रेला स्विकार करतो आहे..
परंतु अशी गोष्ट असली तरी स्त्रीकदुन उत्तरे येतात गावाकडे बघा.. तिकडे काय चालु आहे..
गावाकडची परिस्थीती बदलते आहे, नवरा शेतात --कारुकुनी मधेय राबतो आहे, महिलांना ही त्यांच्या पेक्शा जास्त जोखमीची कामे .. स्वयपाक मुले सुद्धा पहावे लागत आहे..
पण म्हणुन स्त्री ला हलकी कामे देने बंद झाले आहे,
अबला म्हणुन तीच्यावर अत्याचार बंद झाला आहे.
आणि जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे.
परंतु पुरुषांचे म्हणने ही ऐकुन घेतले पाहिजे .. उद्या राणीने राजाला दास केले नाही म्हणजे मिळवले अशीही परिस्थीती निर्मान होत आहे...
कोणी पुरुषाने मुद्दे मांडले की .. तुमची बायको त्रास देत असेल .. तुमच्या घरात प्रॉब्लेम असेल अशी जर उत्तरे येत असतील तर अवघड आहे.. मग अशी उत्तरे येत असतना तो पुरुषच बिच्चारा अबला टाईप वाटु लागत नाहिये का ?
स्त्रीयांनी ज्या जखडलेल्या स्त्रीया आहेत त्यांच्या साठी मुक्तीमोर्चा जरुर काढावा .. पण म्हणुन समस्त पुरुष जातच अशी आहे असे नाही.
या उलट पुरुषांनी ही समस्त स्त्री विषयी जाहिर बोलु नये ... नाहितर पुरुष मोर्चा तर त्याला त्याच्या प्रतिष्ठे खातर काढता येत नाहिच .. पण बंधनात जखडलेल्याला आनखिनच टोच दिले जातात.
हे माझे प्रामाणिक मत
आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.
+ १ बरोबर आहे,
म्हणुनच मग अत्याचार पिडीत पुरुष पुढे येतच नाहि .. एकत्र तर डोंबल्याचा होतोय मग तो.
आणि मग अत्याचार करणार्या पुरुषांची उदाहरणे घेवुन अत्याचार पिडीत स्त्रीयांसाठी स्त्री मुक्ती मोर्चा धावुन येतो..
बिच्चारे अत्याचार पिडीत पुरुष तसेच गप्प गार असतात आपल्या घरात ..
आणि जो अत्याचार करतो त्याला काही होत नाही पण जो पुरुष सहन करतो त्यालाच ह्या मुक्ती मोर्चाचा जास्त धसका लागुन राहतो ना भाउ..
आमच्या बाबतीत पण असेच होणार आहे असे वाटुन राहिले ना आता.
जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे.
आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.
हे पटले
पण हे महिलाना पण लागु
मेल्या नंतर मिळते तीच - मुक्ती असे मानणारी.
हा शब्दच सर्व वादाचे कारण आहे .
मुळात घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणुन ठेवल्या तर त्यचे असेच भजे होनार
पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते
हे काय घेऊन बसला,विंचवाची मादी तर काम झाल्यावर नर विंचवालाच खाऊन टाकते म्हणे!
पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते
मादीने त्याला शिकार मिळते की नाही याची काळजी का करावी? "काम" करण्याएवढा मोठा टोणगा झालाय ना? मग शिकार पण स्वतःची स्वतः कर..पण नाही....आयते गिळायची सवय लागली की असे होते!
पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’
अरे देवा! यात जाच काय वाटायचा? उलट चांगली संधी आली की शहाण्या माणसाने ती सोडू नये. अशी कामे आपुलकीने करत जावीत. सब्र का फल ऑलवेज मीठा होता है. त्यातून या सेवेचा वैताग येत असेल तरीही चेहर्यावरचा आनंद आणि उत्साह मावळू देऊ नये. लक्षात ठेवा. प्रतिपक्ष तुम्हाला जोखत असतो. काम तुम्हाला आवडंतय असं दिसलं की बॉस काही दिवसांनी आपणहून ते सांगायचे बंद करतो.
तीच गोष्ट बाहेर पिटाळले जाण्याची. सारखे काय घरात बसून राह्यचे? बाहेर जावे. हिरवळ - फुलांचे ताटवे बघावेत. निसर्गाच्या समृद्धीचे कौतुक करावे. साधी कोपर्यावरुन कोथिंबीर आणायला सांगितली तरी चांगले अर्ध्या-पाऊण तासाने घरी परत जावे. उशिराचे कारण विचारले तर शाळा-कॉलेजमधील मैत्रिण भेटली होती, असे बिनधास्त सांगून टाकावे. प्रतिपक्षाला टेन्शन द्यायचे असल्यास काही वाक्ये मधून-अधून सहजपणे फेकावीत. जसे.
१) मला मुलांची खूप आवड आहे. मुले म्हणजे देवाची फुले.
२) तुझी मैत्रिण शर्वरी दिसली नाही गं बरेच दिवसात?
३) मित्रांना पार्टी द्यायचीय घरी. कधी जमवावं बरं
४) पेरेंट्स मीटिंगमध्ये प्राजक्ताची मम्मी खूप छान बोलली.
५) सोने म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आहे. हिर्याला तर रीसेल व्हॅल्यूच नाही.
६) पेट्रोल, टोल या खर्चाचा विचार करता घरच्या गाडीपेक्षा एस. टी. परवडतेय. (सासुरवाडीला जाताना हे वाक्य हमखास म्हणावे)
वा! जाणकार लेखक व जाणकारांच्या प्रतिक्रिया वाचून असे वाटू लागले आहे की माझा लग्नं न करण्याचा निर्णय योग्य आहे. अगदीच वाटलं एखाद्या वेळेला तर एखाद्या मुक्त स्त्री शी मैत्री करायची.
(ब्रम्हचारी) पेशवे
'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकालची माता असते' असे कुठेतरी वाचले होते मी.
( अवांतरःकृपया क्षण कोण आणि अनंतकाल कोण असे कुजके प्रश्न इथे गंभीर चर्चेत विचारु नयेत.)
ह्म्म... वर काही प्राण्यांची उदाहरणे दिली आहेत्,त्यामुळेच टंकण्याचे कष्ट घ्यावेसे वाटले... ;)
१) सिंह - सिंहीण == सुंदर कोण ? === सिंह !!! ( आयाळ ही त्याची शान, आता सिंहीण टकली असते असे म्हणायचे काय ? ;) असो... )
२) मोर - लांडोर == सुंदर कोण ? === मोर ( पिसारा फुलवुन्... नाचुन दाखवणारा तोच. ;) )
३) कुठलाही इतर पक्षी घ्या... त्यात नर आणि मादा यांची तुलना करा... त्यात बहुधा नरच सुंदर सापडेल. (मादीच काम नराने बनवलेल्या घराचे सर्व्हे इं करणे असे असते... ;) )
आता मला काय वाटतं बरं....
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
इतर सर्व प्राण्यांमधे मादी इतकी सुंदर नसताना... मायला मनुष्य प्राण्याच्या निर्मीतीतच झोल कसा बरं झाला ? ;)
मोठे मोठ्या ॠषी मुनींची विकेट सुद्धा रंभा-उर्वशीच्या काही ठुमक्यातच उडाली होती म्हणे !!!
असो... तुम्हाला माझा मुद्दा समजलाच असेल... ;)
नारायण !!! नारायण !!! ;)
बाकी चालु द्या...
बरोबर आहे मदन्याचं ,... कुत्रा आणि कुत्री मधे सुद्धा कुत्रा कसा डौलदार किंवा राजबिंडा वगैरे दिसतो ... याउलट कुत्री म्हणजे पोट बाहेर निघालेली , विचित्र चाल असलेली , अजिबात चमक नसलेली ... पळायला लागली की तिची सडं सुद्धा अशी डावीउजवीकडे हलतात .. इइइइइइइइइइइ ... फार वाईट .. :)
माझं मतः
सध्ध्या मि.पा. वर सारखे हे "स्त्री विरुद्ध पुरूष" अशा चर्चा का चालू आहेत. नीट डोळे उघडून पहा, समाजात अजूनही ७०/८० % कुटूंबात काय चालले आहे, रोज पेपर मध्ये आपण वाचतच असतो, स्त्रियांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी, दारूसाठी किंवा माहेराहून पैसे आणण्यासाठी केला जाणारा छळ/खून, स्त्री भ्रूण हत्या, समाजात वावरताना दिवसेंदिवस वाढत जाणारी स्त्री ला वाटणारी असुरक्षितता असे असंख्य इश्यू आहेत. एकदा खरचं या गोष्टीचे चिंतन-मनन नक्की करा. या अत्याचारग्रस्त, भयग्रस्त महिलांना आपली आई-बहिण समजून त्यांची दु:ख समजून घ्या. आणि आपण सर्व सुशिक्षित/सुविचारी स्त्री-पुरूषांनी एकत्र येउन त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते काही तरी करू या.
सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.
या आपल्या भांडणात ज्या ८०/९० % स्त्रियांना थोडा तरी न्याय मिळण्याची, त्यांच्या समस्यांवर उत्तरं मिळण्याची आवश्यकता आहे त्यांचे प्रश्न दुर्ल़क्षिले जात आहेत. At least त्यांना तरी स्त्री-(छळ)-मुक्ती ची आवश्यकता आहे हे मान्य आहे की नाही. आणि ही मुक्ती त्यांच्यासाठी करणार कोण हा प्रश्न सोडवला पाहिजे.
-----------------------------------------------------------------------------------------
आणि राहिली गोष्ट शिकले सवरलेल्या/ अर्थार्जन करणार्या/ स्त्री-मुक्ती हवी म्हणणार्या स्त्रियांची. त्यांची तरी काय अपेक्षा आहे. खूप साधी अपेक्षा आहे हो. यापैकी कोणत्याही स्त्रीला आता पुरुषांनी गुलामगिरी करावी, आता फक्त स्त्रियांचेच ऐकले जावे / त्यांची हुकूमशाही चालावी असं वाटतं नसावं.
मला असं वाटतं की स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रियांना इतकचं अपेक्षित आहे की एक माणूस म्हणून आशा, आकांक्षा, स्वप्नं बाळगण्याचा, कर्त्रुत्व दाखविण्याचा अधिकार १ व्यक्ति म्हणून त्यांनाही हवा आहे. स्त्री ही पण १ माणूस असल्याने दमून घरी आल्यावर तिलाही विश्रांतीची आवश्यकता असते, दोन गोड प्रेमाचे शब्द तिलाही हवे आहेत, आदर हवा आहे इतकचं. त्यात कोणाला राग यावा, अपमान/अत्याचार वाटावा असं काय आहे.
संसार ही स्त्री-पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे ती दोघांनी मिळून सांभाळावी इतकचं फक्त म्हणणं आहे.
दोघांनी मिळून घरकाम, बालसंगोपन करावं, घरात दोघांच्याही मताला किंमत असावी, दोघांना आदर मिळावा, दोघांच्याही आई-वडिलांना मान/स्थान असावं, दोघांच्याही आई-वडिलांची जबाबदारी/काळजी घेतली जावी असं जर शिकल्या सवरलेल्या आणि म्हणून विचार करू शकणार्या मुलींना/स्त्रियांना वाटलं तर त्यात काय चूक आहे हे कोणी सांगू शकेल का.
-----------------------------------------------------------------------------------------
सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.
सामान्य - व प्रतिसादातून अभिप्रेत असलेली अशिक्षित - स्त्री आणि शिकलेली स्त्री यांचे प्रमाण 8 : 2 किंवा 9 : 1 असे नक्कीच नाही. भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत.
शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.
मी काय म्हणते आहे ते समजून घ्या
मी असामान्य हा शब्द वापरला नव्हता.
सामान्य चा अर्थ अशिक्षित असा घेउ नये.
जाउ दे.
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या महिलांना मदतीची गरज आहे, ज्यांचा शारिरीक /मानसिक छळ होत आहे अशा ९०% महिला. हवं तर आकडेवारीत जाउ नका. तो माझा अंदाज आहे. पण शब्दांचा किस पाडण्याऐवजी मुद्दा लक्षात घ्या. विरोधासाठी विरोध करू नका ही विनंती.
>> भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत.
आणि फक्त साक्षर झालं म्हणजे विचारशक्ती / आत्मविश्वास-आत्मसम्मान लगेच येतोचं असं कुठं आहे.
गुरूजीः मुलांनो , आपल्या वर्गात २५ बाकडी आणि ५७ मुले , तर समोरच्या पेरूच्या झाडाला आंबे किती ?
राजूः १६
गुरूजीः कसे काय?
राजूः कारण मी आज डब्यात पोहे आणले आहेत.
सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.
सामान्य - व प्रतिसादातून अभिप्रेत असलेली अशिक्षित - स्त्री आणि शिकलेली स्त्री यांचे प्रमाण 8 : 2 किंवा 9 : 1 असे नक्कीच नाही. भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत.
सुशिक्षित आनि निरक्षर ह्याचा इथे काही संबंधित नाहीय.
घरी कामवाली नाही आलि तर सुशिक्षित असो निरक्षर असो बाईलाच फरक पडतो.
कोनता शिक्षित, निरक्षर नर घरी लवकर येतो अशा वेळेस?तुम्ही तरी येता का हो?
फक्त जोक्स मधेच नर भांडे घासतो
तुम्ही तरी येता का हो? ते अपेक्षित आहे असेही नाहीये.
पण हा फरक अजुनही आहे हे मान्य करायची पन तयारी नसते हा मुद्दा आहे.
शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.
अशा टवाळक्या आनि हा विषय रवंथ करुन परिस्थितीत कधीच बदल होत नाही.
>>शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.
'मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया' असं मी कधीच म्हणाले नव्हते. ''मिपावर भांडत बसलेले आपण शिकले सवरलेले स्त्रि-पुरूष' असच मला म्हणायचं होतं. तरीही लोकं सोयीनुसार अर्थ काढतात हे पाहून खेद वाटला
स्त्री-पुरूष असा उल्लेख केल्यावर त्यात स्त्रिया येत नाहीत काय? मिपावरील काही पुरूष मला असामान्य वाटतात. धनंजय, रामदास, गणपा ही वानगीदाखल काही उदाहरणे. त्यातुलनेत मिपावरील स्त्रियांचे विशेष कर्तृत्त्व पाहावयास मिळाले नसल्याने मी मिपावरील स्त्रिया असामान्य वाटत नाहीत असे म्हटले.
मला असं वाटतं की स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रियांना इतकचं अपेक्षित आहे की एक माणूस म्हणून आशा, आकांक्षा, स्वप्नं बाळगण्याचा, कर्त्रुत्व दाखविण्याचा अधिकार १ व्यक्ति म्हणून त्यांनाही हवा आहे. स्त्री ही पण १ माणूस असल्याने दमून घरी आल्यावर तिलाही विश्रांतीची आवश्यकता असते, दोन गोड प्रेमाचे शब्द तिलाही हवे आहेत, आदर हवा आहे इतकचं. त्यात कोणाला राग यावा, अपमान/अत्याचार वाटावा असं काय आहे.
संसार ही स्त्री-पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे ती दोघांनी मिळून सांभाळावी इतकचं फक्त म्हणणं आहे.
दोघांनी मिळून घरकाम, बालसंगोपन करावं, घरात दोघांच्याही मताला किंमत असावी, दोघांना आदर मिळावा, दोघांच्याही आई-वडिलांना मान/स्थान असावं, दोघांच्याही आई-वडिलांची जबाबदारी/काळजी घेतली जावी .
हे एकदम बरोबर आहे ...
समस्त समाजातील स्त्रीयांचा नाहि पण निदान स्वताच्या बायकोबद्दल असे विचार प्रत्येकाच्या मनात आले पाहिजे हे मनापासुन वाटते ..
आपोआप समाज सुधारेल.
मला मात्र आनखिन वेगळाच प्रश्न विचारायचा आहे,
पण हा धागा योग्य वाटत नाहि त्यासाठी.
बघु चर्चासत्रात काढावे म्हणतो धागा.. बघु ..
पण तो स्त्री समानतेविषयीच आहे. पण वेगळाच आहे ..
काधतोच शक्यतो..
वाद होनार नाही याची काळजी घेतो
>>ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.
आपल्यातील एनर्जी नीट चॅनेलाईज कशी करायची, हे नीट न उमजल्याने आपल्यातील शक्त्तीचे नक्की काय करावे, हे न कळाल्याने स्त्री-पुरुष आपापसात भांडत असावेत. मग या जास्तीच्या शक्तिला काहीतरी वाट करून द्यावी, या उद्देशाने एकमेकांना डॉमिनेट करणे चालू होते.(?)
आपल्यातील शक्तीचे जर नीटपणे नियमन आपल्याला जमले तर आपण भांडणार नाही का?
आणि हे चॅनेलायजेशन आपण कसे करु शकू?
(किंवा हे चॅनेलायजेशन करण्यासाठीच स्त्री-पुरुष एकत्र येत असावेत का??)
-सूर्यपुत्र.
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ ...
पाशवी शक्तीला आव्हान देणारे
नगराचे निरंजन शेकोटीला
आत्ता गं बया ?? ?
‘हे नाही, ते नाही, हे संपलं
अय्य्या! तुम्ही डिस्कव्हरी
कै च्या कै तुम्हाला सासुरवास
लेख आवडला ....मस्त लिहिले
आणि जो अत्याचार करतो तो नरच
आणि जो अत्याचार सहन करतो तो
जो अत्याचार करतो तो नरच नाही
मस्त
सोयीस्कर मु्द्दे पटले.
हॅ हॅ हॅ
पोरांच्या बापाने खाल्लं आहे
पोरांच्या बापाने खाल्लं आहे
जाच का बरे मानायचा?
वा... सूपर
येक लंबर...
वा! जाणकार लेखक व
श्री पेशवे , तुम्हाला
ब्रम्हचारी हे सध्याचे स्टेटस
क्या बात है ..
आम्हाला जिथे जिथे जिद्दी लोक
हाहाहाहाहा... लय भारी.
हा हा हा हा हा !
सदर वाक्य अत्र्यांच्या एका
उदयाचा संसार किंवा घराबाहेर
ह्म्म... वर प्राण्यांची
मद्दनबाण +१
अरारारा! काय हो हे टारुशेठ?
मदनबाण आणि टारझन आपल्या
चर्चा अपेक्षेप्रमाणे योग्य
मि.पा. बंधु-भगिनींनो, जरा शांतपणे विचार करू या.
न पटणारे
समजून घ्या
अंदाजपंचे दाहोदरसे
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं अशक्य
पण मी तर आज डब्ब्यात
हॅ हॅ हॅ
फ्लॅटचे भाव कैच्या कैच वाढलेत
सामान्य स्त्री (ज्यांचे
सोयीनुसार अर्थ
स्त्री-पुरूषमध्ये
+१
मला मात्र आनखिन वेगळाच प्रश्न
माझं मतः
सद्ध्या दिवटे मामांचा
नस की नाडी?
च्यक्क