फक्त हा भाग वाचताना रॉबर्ट ग्रीन यांच्या "४८ लॉज ऑफ पॉवरची" (मराठी अनूवाद 'सत्ता') प्रकर्शाने आठवण झाली. बघूया कीती मि.पा. जाणकार या लेखावर सहमत होण्याचे धैर्य दाखवतील ते.
पू.ले.शू.
प्रतिसाद आले म्हणजे आतल्या आत सुखावायला होते हे तर खरेच, पण जास्तीत जास्त 'मिपा'कर या लेखमालिकेतील लेख वाचतील आणि ते वाचून त्यांना मूळ पुस्तक (ज्यात श्री वर्मांनी अनेक संदर्भ परिशिष्टात दिलेले आहेत) वाचायची उर्मी येईल अशी आशा आहे.
हा लेख म्हणजे भारतीयांचा हमामखाना !! सगळेच नैसर्गीक अवस्थेत... अगदी "जसे आहे तसे"
वास्तवीक इतकं झणझणीत अंजन डोळ्यात घातल्यावर आग आग व्हायला हवी... पण मला फार मोकळं मोकळं, प्रसन्न वाटतय. कळायला लागल्या पासुन (आता कधी ते विचारु नका... हा वादग्रस्त मुद्दा आहे ) सामाजीक, राजकीय प्रश्न मनाला छळायचे. हे असं का? लोकांना समाजहीत, देशहीत कळत कसं नाहि? वगैरे प्रश्न भांडावून सोडायचे. या सर्व प्रश्नांमागची भारतीय (त्यात मी स्वतःची सुद्धा आलोच) मानसीकता बर्यापैकी उलगडायला लागलीय.
शतशः धन्यवाद काळे काका. पुढील भागाची वाट पाहतोय.
(भारतीय) अर्धवटराव
वा, अर्धवटराव!
तुझा असा परिपूर्ण (अजीबात 'अर्धवट' नसलला!) एक प्रतिसाद शंभर प्रतिसादांच्या बरोबरचा आहे व तो वाचून अनुवाद करण्यातील प्रयत्न सार्थकी लागले असे वाटले.
प्रत्येक भारतीयाने (यात मीही आलो) या लेखमालेच्या वाचनाने 'दर्पणदर्शन' करावे 'याचसाठी करत आहे हा अट्टाहास'!
पुन्हा आभार!
काका
खरंच राग येतो. पण भारतातील नोकरशाही व खासगी क्षेत्रातील नोकरी बरीच जवळून पाहिली आहे. श्री वर्मांनी इथे जे लिहिले आहे ते, माननीय अपवाद सोडल्यास, बरेचसे बरोबर आहे.
त्यांच्या मातोश्री असलेल्या इंदिराजींनी (त्यांच्याच वधामुळे राजीव अचानक पंतप्रधानपदी आरुढ झाले होते
हे वाक्य त्यातल्या 'वधामुळे' या शब्दाने खटकले. हत्या हा शब्द योग्य ठरला असता.
आरेसेस वाले पण गांधीजींच्या हत्येला 'वध' असे म्हणतात, तेही तेवढेच खटकते.
बाकी लेख चांगला आहे.
लेखातील विचारांशी बर्याच अंशी सहमत.. पण व्यक्त केलेले विचार प्रत्येक भारतीयाला लागू होत नाहीत हे इथे विचारात घ्यायला हवे.
बाकी काळेकाकांनी केलेला अनुवाद म्हणजे पर्वणी.. आणि तो तुम्ही पुढेही चालू ठेवावा ही नम्र विनंती..
- पिंगू
काळे साहेब, तुम्ही अनुवादित केलेल्या या लेखकाच्या मतांवरची तुमची प्रतिक्रिया काय आहे?
बाकी,
मला असे वाटते कि हे एक सर्वसाधारण मत सर्वच प्रकारच्या समाजाला लागु होत असेल. भारतीय समाजच असा ( जो काही असेल तसा) आहे असे वाटायचे कारण नाही..इथे परदेशात तर वारंवार असे विचित्र अनुभव येतात की आपले जुने अनुभव परत तपासावे लागतात. असो..
अनुवाद उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
बद्दू-जी
इथे व्यक्त झालेली मतें संपूर्णपणे मूळ लेखकाची आहेत. भाषांतर करताना झालेल्या चुका अलाहिदा. त्या कमीत कमी ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण 'वध'ऐवजी 'हत्त्या' (किंवा आता इंद्रा-जींच्या प्रतिसादात आलेल्या सनदी नोकरांबद्दलच्या मी केलेल्या उल्लेखातील कदाचित होऊ घातलेली सुधारणा) अशा सुधारणांचे मी स्वागतच करतो.
सुरुवातीला माझे मराठी फारच 'इंग्रजी छापा'तले होते पण ते सुधारत गेले आहे ते वाचकांच्या सकारात्मक सूचनांमुळेच!
माझी सर्वात प्रथम टीकाकार असते माझी सौ.! ती मला असे खूप मुद्दे सांगत असते व मी ते साभार लक्षात घेऊन त्यानुसार सुधारणाही करत असतो.
मला वर्मांचे पुस्तक आवडले व बरेचसे पटले म्हणूनच मी ते इथे मालिकेच्या रूपात share करण्यासाठी पोस्ट करत आहे. नाहीं तर केलेच नसते. पण इथली मतें श्री. वर्मांचीच आहेत. (भाषांतरातील 'चूक-भूल द्यावी घ्यावी'!)
माझे वैयक्तिक मत सांगतो कीं हा मनुष्यस्वभाव आहे व तो सार्या देशांतील लोकांना लागू आहे. कुठे कमी तर कुठे जास्त.
प्रत्येक भारतीयसुद्धा असा 'एका छापा'तला नसतो. कांही 'भाट' असतात तर कांही आपण-बरे-आपले-काम-बरे अशा स्वभावाचे असतात तर कांहीं परखडही असतात!
माझ्या नोकरीनिमित्त्य माझा खूप देशांच्या लोकांशी संबंध आला असला तरी माझा तिथल्या मनुष्यस्वभावांचा सखोल अभ्यास नाहीं म्हणून एवढेच नमूद करत आहे!
थोडेसे अवांतरः 'न्यूक्लियर डिसेप्शन'पासून मी अनुवाद करायचे मनावर घेतले ते अमेरिकन सरकारने केलेल्या स्वतःच्या आणि सार्या जगाच्या फसवणुकीने मला संताप आला म्हणून! ती माहिती सर्व मराठी लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी त्या पुस्तकाचे रूपांतर केले. तेथेही मते मूळ लेखकांचीच आहेत पण मला त्यांचे म्हणणे पटले म्हणूनच मी ते 'मिपा'वर व इतरत्र सादर केले.
"....एका मंत्र्यांच्या सौभाग्यवती तिथे उतरल्या आणि त्या मंत्र्यांच्या स्वीय सचीवांना तिला उतरवून घेण्यासाठी येताना केवळ पाच मिनिटे उशीर झाला. झाले! बाई संतापल्या आणि भडकल्या आणि तो सचीव समोर येताच, "उल्लूके पठ्ठे, ये टाईम आनेका?" या शब्दांत किंचाळल्या. स्वतः एक ज्येष्ठ सनदी नोकर असलेल्या त्या स्वीय सचीवाने हा अपमान मुकाट्याने गिळला आणि 'मंत्र्यांचा स्वीय सचीव' या पदावर चिकटून राहिला!...."
~ या प्रसंगावर भाष्य करणे फार गरजेचे आहे. कारण एकतर श्री.वर्मा यांचे निरिक्षण चुकीचे असेल किंवा श्री.सुधीर काळे यांच्या एरव्ही अतिशय डौलदार असणार्या अनुवाद शैलीतील 'ज्येष्ठ सनदी नोकर वा स्वीय सहाय्यक' ची जागा चुकली असे.
याबाबतीत काही मुद्दे माझ्या नजरेसमोर येत आहेत (मला दिल्लीतील हे सेक्रेटरी Cadre चांगलेच माहीत आहे; त्याच्या अनुषंगाने हा प्रतिसाद....)
१. सर्वप्रथम श्री.वर्मा यानी वर्णन केलेला हा प्रसंग कोणत्या काळातील आहे? हे विचारण्याचे कारण असे की, श्री.मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यापासून प्रशासनाला व त्यातही उच्च पदस्थ अधिकार्यांना [जे आय.ए.एस. वा तत्सम दर्जाचेच असतात] खूप महत्व आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खाजगी उद्योगधंद्यामध्ये अशा 'क्रीमी ब्रेन' ला जी डोळे दीपविणारी मागणी आहे हे पाहता सरकार आयएएस पातळीचे अधिकारी सरकारी नोकरीतून जातील असे कधीही इच्छित नाही. त्याला कारण लोकशाही ढाच्यात मंत्रीमंडळाला कितीही अधिकार असले तरी प्रत्यक्षात राज्यशासनाचे शकट ही तैलबुद्धीचे सनदी नोकरच चालवित असतात...याबद्दल खुद्द श्री.सुधीर जी देखील वेगळे मत मांडू इच्छिणार नाहीत.
२. घटनेचा 'काळ' यासाठी विचारत आहे की, १९७५ ते १९९० या कालावधीत असे हांजीहांजी करणारे संख्येने बर्यापैकी होते आणि त्या पंधरा वर्षात 'मंत्री' नावाच्या प्राण्याची भीती वाटावी असा दराराही असे. साहजिकच या प्राण्याच्या मादीलाही (पक्षी पत्नीला) 'साहेबा'च्या हाताखाली असलेल्या स्टाफवर वेळोवेळा अकारण तोंडसुख घ्यायची सवय लागली होते....(सर्वच मंत्र्यांच्याबाबतीत असे होत असेल असेही नाही...पण होत होते ही बाब नजरेआड करून चालणार नाही.)
३. पण आत्ता ती स्थिती नाही. कोणताही मंत्री आपल्या पत्नीला केनेडी विमानतळावरील प्रसंगासदृश्य वर्तणुक करण्याची अनुमती देणार नाही. त्यातही श्री.काळे लिहितात (जरी अनुवादित असले तरी...) तसा तो स्वीय सहाय्य्क 'ज्येष्ठ सनदी नोकर' असेल तर.....इथे नोकरशाहीप्रणालीनुसार 'गॅझेटेड ऑफिसर' ला 'सनदी नोकर' म्हटले जाते....क्लास-१.
४. केन्द्र सरकारमधील 'सचिव' पातळीची रचना खालीलप्रमाणे असते : {यांची कार्यप्रणाली आणि अधिकाराची व्याप्ती इथे सांगत नाही, कारण मग मूळ उद्देश भरकटत जाईल.}
(अ) कॅबिनेट सेक्रेटरी ~ सनदी पातळीवरील सर्वोच्च स्थान
(ब) को-ऑर्डिनेशन अॅण्ड पब्लिक ग्रिव्हन्सेस सेक्रेटरी ~ प्रत्येक खात्यासाठी असतात.
(क) सेक्रेटरी ~ सिक्युरीटी : स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप
(ड) अॅडिशनल सेक्रेटरी ~ विविध खात्याचे प्रतिनिधित्व करत कॅबिनेट सेक्रेटरी याना मदत करतात.
(इ) जॉईन्ट सेक्रेटरी ~ कायद्याच्या बाबी अभ्यासून त्या मंत्र्यांच्या खात्याना पुरविणे.
(फ) डेप्युटी सेक्रेटरी ~ मंत्री पातळीवरील मीटिंग्ज आयोजित करून प्रशासनपूरक नोंदी करणे.
(ग) अंडर सेक्रेटरी ~ मिनिस्ट्री आणि कॅबिनेट सेक्रेटरी यांच्या दरम्यान होत असलेल्या शासन निर्णयांची माहिती लिखित स्वरूपात देशातील सर्व खात्यांना कळविणे. (यालाच G.R. असे म्हणतात, ज्यावर अंडर सेक्रेटरी यांची स्वाक्षरी असते.)
वरील 'अ' ते 'ग' ही मंडळी 'आय.ए.एस.' दर्जाचीच असतात....याचाच अर्थ यांचे नोकरशाहीतील यांचे स्थान क्लास-१ चे असते....हेच ते 'सनदी अधिकारी'
आता मुद्दा येतो तो मंत्र्याच्या 'पर्सनल सेक्रेटरी'चा....वा मराठीत "स्वीय सहाय्यक" यांचा. मंत्रीमंडळाच्या प्रथेनुसार प्रत्येक मंत्र्याला (मग तो राज्य वा उप मंत्री असला तरी) एक स्वीय सहाय्यक असतो जो केन्द्र/राज्य शासनाच्या सेवेत असलाच पाहिजे अशी अट असते....आणि त्याचे पद असते 'स्टेनोग्राफर'.
हा स्टेनोग्राफर मंत्र्यासमवेत अगदी २४ तास असतो असे म्हटले तरी अतिशयोक्ती नसते....कारण 'स्वीय' ची कल्पना तशीच असते. बहुतेक मंत्री आपल्या मतदार संघातीलच एखाद्या स्टेनोची सरकारी खात्यातून वर्ग करून या पदासाठी निवड करतो....जो पर्यंत संबंधित मंत्री त्या पदावर (वा सत्तेत) आहे, तो पर्यंतच्या काळात या स्टेनोचे अगदी राज्य असते....म्हणजे याला ओलांडल्याशिवाय मंत्री भेटूच शकत नाही अशीच परिस्थिती असते. पुढे मंत्री महोदयांची खुर्ची जरी गेली तरी हा 'स्वीय सहाय्यक' परत पूर्वीच्याच संबंधित खात्यात परत येतो....'स्टेनोग्राफर' याच पदावर.
हा स्टेनो - अथवा स्वीय सहाय्यक - अगदी अरेतुरेच्या नात्यातील असल्यामुळे साहेबांच्या बंगल्यावर अगदी थेट स्वयंपाकघरात जावून बाईसाहेबांच्या आगेमागे करीत असल्याने साहजिकच याच्याबरोबर संबंध ठेवताना घरातील अन्य नोकरांच्या लायकीप्रमाणेच मंत्रीणबाई याच्याशी वर्तन करीत असतात, त्यानी केलेल्या अपमानाबद्दल या शिंगरूलाही काही वावगे वाटत नाही.....कारण बाहेर याचा रूबाब "हिंदकेसरी' सारखाच फाकडू असतो.
त्यामुळे केनेडी विमानतळावर झालेला 'तो' प्रसंग अशा स्टेनोच्या बाबतीत घडला असण्याची दाट शक्यता आहे. मंत्री अगोदरच भारत सरकारच्या एखाद्या खात्याच्या मीटिंगसाठी न्यू यॉर्कला आले आहेत आणि त्यांच्यासमवेत (By Default) जो लवाजमा असतो त्यात 'स्वीय सहाय्यक' म्हणून हा स्टेनोग्राफर दर्जाचा सरकारी नोकर असणार....आणि दुसर्यातिसर्या दिवशी बाईसाहेबानीही आली आहे अमेरिका सफरीची संधी म्हणून घेतली...व आल्या केनेडी एअरपोर्टवर....नियमानुसार (आणि प्रोटोकॉलनुसारही) तिथे त्याना न्यायला "ज्येष्ठ सनदी सचिव" येत नाही...येऊही शकत नाही, त्यामुळे जी व्यक्ती आली ती म्हणजे हा 'स्टेनो'च असणार....आणि शेवटी घरकी मुर्गी दाल बराबर...या तत्वानुसार पाच मिनिटे वेळ झाला म्हणून मग तो 'उल्लू के पठ्ठे...' हा पदवीदान समारंभ..!
आय.ए.एस. अधिकारी मंत्र्याच्या बायकोच्या शिव्या खाण्याइतके स्वस्त नाहीत.
इन्द्रा
इन्द्रा तुझ्या ज्ञानाला त्रिवार सलाम.
मी तुला एन्सायक्लोपिडिया म्हणतो ती काहि अतिशयोक्ती नाहि.
येवढी माहिती असुन तु इतका विनयशील आहेस. खरच गर्वा चा ग सुध्दा तु तुझ्या पाशी पोहचु दिला नाहिस हे कौतुकास्पद आहे. मिपा वर येउन तु इतकी माहिती देतोस म्हणुन सारख सारख यावेसे वाटते.
अभिनंदन
इंद्रा-जी,
मूळ पुस्तकातले 'ते' वाक्य खाली कॉपी-पेस्ट केले आहे.
I recall an incident in New York some year ago, when the wife of a minister had arrived at JFK. airport, and the private secretary to the minister, a senior civil servant very conscious of his own esteem, was five minutes late in receiving her. When he met her, she exploded: 'Ullu ke patthe, ye time aane ka!
पुस्तकाचे कॉपीराईट हक्क २००४ सालचे असून प्रकाशनही २००४ सालचे आहे.
इथे a senior civil servant हे शब्द वापरले आहेत. त्याचा अर्थ स्टेनोग्राफर होतो कीं क्लास-१ ऑफीसर होतो याची कल्पना नाहीं. स्टेनोग्राफरचा पदक्रमात काय दर्जा असतो हेही माहीत नाहीं (म्हणजे class-1 or lower).
दुरुस्तीची जरूरी असेल तर जरूर सुचवावी म्हणजे मूळ टंकलेखनात ती बदलेन. जर इथे 'सनदी नोकर' हा शब्दप्रयोग बरोबर असेल तर तसेही कळविणे.
हा प्रसंग २००४ सालचा आहे की त्यापेक्षा खूप आधीचा याचा मूळ लेखनात उल्लेख नाहीं.
धन्यवाद
१. श्री.वडील....परत एकदा थॅन्क्स म्हणतोच.....जरी तुम्ही त्या औपचारिकतेबद्दल नाखुशी व्यक्त केली तरी !!
२. श्री.गोगोल...वेल, तुमच्या आपुलकीच्या कॉमेन्टवर काय बोलू? विषय चांगला असला [जसा वरील] की अभ्यासालाही वाव असतो आणि तसा तो करणे मला खूप आवडते शिवाय दिल्ली कारभार पध्दतीची मला बर्यापैकी माहिती असल्याने त्या निमित्ताने ती ताडताही येते. दीर्घ प्रतिसाद जर दिले नाहीत तर माझेच इथले काही मित्र "हा इन्द्राचा प्रतिसाद नव्हेच..." अशा खेळकर टपल्या मारतात....हीदेखील एक गंमतच.
३. श्री.सुधीर जी...
मूळ इंग्रजीतील संबंधित उतारा वाचला. मी वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे 'प्रायव्हेट सेक्रेटरी' असाच त्या पदाचा उल्लेख आहे [श्री.वर्मा यांचे फक्त निरिक्षण असे आहे की....A senior civil servant...]. याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की तो प्रायव्हेट सेक्रेटरी 'ज्येष्ठ सनदी सेवक' असेल. 'सनद' ही संज्ञा Gazette संबंधित असून ती क्लास-१ स्तरावरील अधिकार्याना लागू होते.
'स्वीय सहाय्यक' हे पद स्टेनोग्राफर कॅटेगरीतील (क्लास-३....सी.एस.एस. = सेन्ट्रल सेक्रेटेरियट सर्व्हिसेस) असून अगोदर सांगितल्यानुसार मंत्री या पदासाठी 'आपला' माणूस कुठल्या खात्यात आहे तिथून मागवून घेऊ शकतो. या उलट मी असेही म्हणेन की दिल्ली सेन्ट्रल सेक्रेटेरियेटमधील काही धोरणी स्टेनोग्राफर्स मंत्रीमंडळ स्थापन होण्याच्या काळात पाण्यात गळ टाकून बसलेले असतातच.
(एखादा स्टेनो. मंत्र्याला कसा 'ड्राईव्ह' करतो हे जर जाणून घ्यायचे असेल तर अरूण साधू यांची राजकीय महत्वाकांक्षा या विषयावर गाजलेली 'सिंहासन' ही कादंबरी वाचावी. फार झकास वर्णन आहे अशा स्वीय सहाय्यकाचे.)
तुमच्या लेखातील मजकुरात आता दुरुस्तीची तशी आवश्यकता नाही....पण करण्याची तरतूद असेलच तर 'ज्येष्ठ सनदी नोकर' हे संबोधन काढून टाकून फक्त 'स्वीय सहाय्यक' इतकाच उल्लेख ठेवल्यास प्रसंग खटकणार नाही.
धन्यवाद.
इन्द्रा
श्री वर्मांनी "senior civil servant" हे शब्द कां वापरले आहेत त्याची कल्पना नाहीं, पण संपादकांना त्रास देऊन दोन्ही सुधारणा ('हत्त्या' आणि 'स्वीय सहाय्यक') करत आहे.
दरम्यान श्री. वर्मांनाही विचारत आहे कीं त्यांना काय अभिप्रेत होते. त्यांच्याकडुन उत्तर आल्यास मी तुम्हाला कळवेनच.
पुनश्च मनापासून आभार!
अनुवाद कसा करावा?
हॅट्स ऑफ.
काळे साहेब विषय थोडा जनरल आहे आणि अवघडसुद्धा. भारतीय मानस चांगल्याप्रमाणे वर्णन केला आहे. पण जनरायलायझेशनमुळे खुपमर्यादा येत असाव्यात. शिवाय केवळ भांषांतर नाही तर अनुवाद करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला
बौद्धिक सर्कस करावी लागत असावी. मुळ लेखकाच्या विचाराशी फारकत घेता येत नाहीच पण स्वतःचे विचार पण चार हात दूर ठेवावे लागत असतील.
असो.
पु ले शु
तुमच्या चिकाटीला सलाम.
काहीही म्हणा राग मानू नका पण फसवणुकिची मजा या लेखमालेला येत नाहीये.
काळेसाहेब,
फार छान !
भारतीय समाज असा का यावर मी एक लेख लिहीला होता. त्याची आठवण झाली. त्यात मी जे मत मांडले होते त्यावरून माझ्यावर जबरी टीका झाली होती. ते मत थोडक्यात असे होते -
माणुस जसा एकांतात वागू शकतो तसे दुसर्याच्या संगतीत वागू शकत नाही हे सत्य आहे. हेच आपण दुसर्या पध्दतीत मांडू शकतो " आपल्याला हवे तसे माणूस फक्त एकांतातच वागू शकतो". म्हणजे दुसर्या कोणाच्याही संपर्कात आल्यावर माणसाच्या वागण्यात फरक पडतो. अगदी एखाद्या प्राण्याच्याही. हा जो फरक पडतो त्यालाच व्यवहार म्हणतात. हे एकदा मान्य केले की त्या व्यवहाराचे नियम तयार होतात. हे तयार होताना जी रस्सीखेच व्हायची ती झाल्यावर या नियमांना समाज मान्यता देतो व त्यालाच आपण एक जगण्याची पध्दत किंवा धर्म समजतो. हे नियम या समाजामधील सुज्ञ किंवा ताकदवान लोक तयार करत असतात. असो मुद्दा हा नाही. मी त्या लेखात असे मांडले होते की त्या मुळे आपला समाज जो काही आत्ता आहे त्याचे उत्तरदायीत्व त्या नियमांकडे/धर्माकडेच जाते.
ऐकायला कटू असेल पण हे सत्य आहे. कदाचित माणसातल्या जनावराला काबूत आणण्यासाठी या नियमांमधे ताकद नसावी. ( अर्थात माणसाची जंगली माणसापासून ते आत्तापर्यंत झालेली वाटचाल ही चांगल्यासाठी झालेली आहे असे यात गृहीत धरले आहे.
काळेसाहेब चांगले भाषंतर चालले आहे. मस्त. आता खूपच सफाईदारपणा आला आहे.
Great !
जयंतराव,
आपला तो पूर्ण लेख वाचायला आवडेल. पण आपण म्हणता त्यात सत्याचा भाग खूपच आहे. पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे 'स्वयंकेंद्रित' मूळ मनुष्यस्वभाव!
आज-काल एक मोटरसायकलची जाहिरात पाहून मला या 'स्वयंकेंद्रित मूळ मनुष्यस्वभावा'ची खूप जाणीव होते. दोन शाळकरी मुले दोन मोटरसायकलवर बसून त्या खोटी-खोटी चालवत असतात. एक मोठया पॉवरची आहे ती एक मुलगा किक-स्टार्ट करतो तर दुसरा १५० सीसीची 'सेल्फ मारून' स्टार्ट करतो. एक जण पाच गियर टाकतो तर दुसरा म्हणतो कीं यात तर चारच गियर आहेत! शेवटी एक चिमुरडी पोरगी येते आणि त्या सेल्फवाल्या मोटारसायकलवर जाऊन बसते. त्यावर तो चिमुरडा रागावून आपल्या बापाला सांगतो, "मुझे नहीं चाहिये ये मोटरसायकल"
या छोट्याशा जाहिरातीत मूळ मनुष्य स्वभावाचे (bruised ego) जे दर्शन होते त्याला कुठेलाही धर्म, कुठलाही नियम बदलू शकत नाहीं असे मला वाटते.
प्रतिक्रिया
नेहेमी प्रमाणेच मस्त. भारतीयांच्या वर्मावर बोट ठेवणारा लेख.
जास्तीत जास्त 'मिपा'कर या लेखमालिकेतील लेख वाचतील अशी आशा आहे
हमाम !!
+१
'दर्पणदर्शन'
ह्म्म हे आसूड सहन होत नाहीत
प्र.का.टा.आ.
श्री वर्मांनी लिहिलेले कांहीं माननीय अपवाद सोडल्यास बरेचसे बरोबर
हे वाक्य
मूळ टंकलिखितात तसा बदल केला आहे.
लेखातील विचारांशी बर्याच
तुमची प्रतिक्रिया काय?
हा मनुष्यस्वभाव आहे व तो सार्या देशांतील लोकांना लागू आहे
स्वीय साहाय्यक....!!
इन्द्रा तुझ्या ज्ञानाला
या जगात असे
मूळ पुस्तकातले 'ते' वाक्य खाली कॉपी-पेस्ट केले आहे
खुलासा...!!
धन्यवाद
अनुवाद कसा करावा?
मस्त जोरदार
असे का ?
मूळ मनुष्य स्वभावाला कुठेलाही धर्म, कुठलाही नियम बदलू शकत नाहीं!
पुर्वी च्या लिन्क......
आतापर्यंतच्या सर्व लेखांचे दुवे खाली दिले आहेत