मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पाईसी चिकन फिंगर्स

स्वाती२ · · पाककृती
साहित्य २ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट १/२ चमचा हळद १/२ चमचा तिखट १ चमचा गरम मसाला ३-४ लसूण पाकळ्या बारीक किसुन २ टीस्पून तेल १/२ कप ब्रेडक्रंब्ज १/४ कप परमेजान चिज किंवा मोनॅकोटाईप बिस्किटांचा चुरा कृती चिकनच्या उभ्या पट्ट्या कापून घ्या. हळद, तिखट, गरम मसाला, लसूण पेस्ट, तेल एकत्र करुन चिकनला चोळून लावावे. एका झिपलॉक बॅगमधे ब्रेडक्रंब्ज आणि चिज एकत्र करावे. ओवन ३५० फॅ ला गरम करत लावा. बेकिंग ट्रेला फॉईल लावुन त्याला तेलाचा हात लावुन घ्या. आता चिकनचे २-३ तुकडे झिपलॉक बॅगमधे घालून बॅग बंद करुन हलवा. चिजच्या मिश्रणात घोळवलेले चिकन ट्रे वर ठेवा. असे सगळे चिकनचे तुकडे घोळवून घ्या. ओवन मधे २० मिनिटे बेक करा. टोमॅटो सॉस किंवा हनिमस्टर्ड सॉस बरोबर सर्व करा.

वाचने 5322 वाचनखूण प्रतिक्रिया 14

रेवती गुरुवार, 02/10/2011 - 22:36
प्रकार सोपा वाट्टोय. आम्ही शाकाहारी असलो तरी आमचा मुलगा मात्र पक्का चिकनखाऊ आहे. मी फारतर चिकन नगेट्स् आणून फ्रिजरमध्ये ठेवते आणि तो गरम करून घेतो. हळूहळू त्याच्यासाठी का होइना सोपे प्रकार शिकायला हवेत.

स्वाती२ गुरुवार, 02/10/2011 - 22:51
धन्यवाद मृणालिनी, निशांत, रेवती. :) अग रेवती, हे चिकन फिंगर्स छान फ्रीज होतात. माझा लेक पण चिकनखाऊ आहे. म्हणून मी हे असे करुन ठेवते. घाईगडबडीत टॉर्टिया किंवा पिटा मधे लेट्युस्,टोमॅटो बरोबर घालूनही खाता येते.

दैत्य गुरुवार, 02/10/2011 - 23:42
चांगली पाक्रु आहे!.. ..ब्रेडक्रम्स वापरतात हे माहित नव्हतं...

स्वाती२ Fri, 02/11/2011 - 03:56
दैत्य, प्राजू, शिल्पा धन्स! शिल्पा, विंग्ज केल्यास वेळ अ‍ॅडजस्ट करावा लागेल. चवीत फरक नाही पडणार पण स्किन मुळे फॅट वाढणार. स्किनलेस ड्रम्सस्टिकही वापरता येइल.