हॉट विंग्स्

गणपा's picture
गणपा in पाककृती
18 Dec 2010 - 2:02 pm

नमस्कार मंडळी,
आज बर्‍याच दिवसांनी तुमच्या सेवेसी परत हजर होतोय. :)

नाताळ तोंडावर आलाय. अमेरिका युरोप सारख दणक्यात नसल तरी इथेही नाताळाची हवा जोर धरु लागलीये.
नविन वर्षाच्या पार्ट्यांचे आत्तापासुनच मनसुबे रचले जाताय. नाच गाणी खाणं आणि पिणं नुसता जल्लोश असणारे एका आठवड्या नंतर.
टारुने एका धाग्यात बार्बेक्युसाठी काय पदार्थ करता येतील अस विचारल होत. तेव्हा पासुन डोक्यात चिकन विंग्स् फडफडत होते.
अनायसे काही मित्र जमायचेहोते काल, तर म्हटल करुन पाहु. जमलेच बरे तर तुम्हाला नव वर्षाच्या स्वागतासाठी अजुन एका पदार्थाची सोबत.

तसे हे विंग्स् वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. काहींना डीप-फ्राय केलेले आवडतात, तर काहींना कोळश्याच्या शेगडीवर खरपुस भाजुन. वेग वेगळ्या सॉसच्या सोबतीने चवीत थोडाफार बदलही करता येतो. सगळ्यात सोप्पे आणि झटपट होणारे विंग्स् म्हणजे डीप-फ्राय केलेले. पण सेंचुरीकडे झेपावणार्‍या वजनाच्या काट्याच्या धाकाने मी हल्ली त्या दिशेला पहायच पण टाळतो.
आणि एका डिशसाठी आख्खी कोळश्याची शेगडी, ते कोळसे घ्यायचे म्हणजे चारानेकी मुर्गी नी बाराणेका मसाला अशी गत व्हायची. तसाही मागे एकदा या कोळश्याच्या शेगडीने दणका दिला होता. दुबईला असताना एकादा बीच आम्ही सहलीसाठी गेलो होतो. तिथे दुपारी मस्त समुद्रात पोहुन आल्यावर बार्बेक्युचा बेत केला होता. पण त्या हट्टी शेगडीने अंत पाहिला आमचा. दुपारी १ वाजता पेटवायला घेतलेली शेगडी दोन वाजुन गेले तरी पेटेच ना. पाउण डबा रॉकेल पीउन गेली. शेवटी शेजारच्या एका कुटुंबाला आमची दया आली आणि (त्यांच काम आटोपल्यावर) त्यांचे निखारे आम्हाला सप्रेम भेट दिले. तेव्हा पासुन आपण तर बाबा त्या कोळश्याच्या शेगडीचा धसकाच घेतलाय.

उरता उरला तिसरा मार्ग. थोडा वेळखाउ पण फारसा त्रास नाही. आणि म्हणुन मग ओव्हन मध्ये बेक करायच ठरवल.
पुर्व तयारी आणि सॉस बनवल्या नंतरच्या स्टेप्स सारख्याच आहेत त्यामुळे तुम्हाला जे माध्यम योग्य/सोईस्कर असेल ते वापरा.
बेकींगची साहित्य आणि कृती पुढे देत आहे.

साहित्य:
सगळ साहित्य अंदाज-पंचे घेतलय.

चिकन विंग्स् .
एका विंगचे सांध्यात कापल्यावर तीन तुकडे होतात. त्यातला सगळ्यात बाहेरचा (छोटा) भाग ज्यात मांस जवळ जवळ नसते तो घेउ नये. म्हणजे एका विंगचे २ तुकडे उरतील. आता माणशी किमान ३-४ या हिशोबाने किती मंडळी आहेत हे पाहुन विंग्स् घ्यावे.

पाव ते आर्धी वाटी मैदा.
थोड लाल तिखट.
मीठ चवी नुसार.

बाजारात वेग-वेगळे बार्बेक्यु सॉस मिळतात. (मी घरात असलेलेच सॉस वापरले.)
५०-७५ ग्रॅम बटर/लोणी.

कृती:

तुकडे स्वच्छ धूउन पेपर नॅपकिनने एकदम कोरडे करुन घावे. हलकस मीठ भुरभुराव.

एका प्लॅस्टीकच्या पिशवीत (झिप लॉक असेल तर उत्तम) मैदा, मीठ आणि तिखट एकत्र कराव. त्यात हे तुकडे टाकुन व्यवस्थित हलवुन घ्यावे.
पिशवी नसेल तरी हरकत नाही एका ताटात हे मिश्रण घेउन तुकड्यांना नीट लावुन घ्यावं. (थोडा पसारा होईल. पण मग जोडीदार कधी कामी येणार ;) )

मैद्याचा एकदम हलकासा कोट/थर बसला पाहिजे. आता हे तुकडे फ्रिजमध्ये (खालच्या भागात) किमान अर्धा एक तास ठेउन द्यावे.

ओव्हन २०० ते २५० °C वर १५ मिनिटे तापत ठेवावा.
जाळीवर चिकनचे तुकडे ठेवताना ते शक्यतो एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्या.
जर जाळी नसेल तर ट्रेला बटरचा ब्रश फिरवुन मग त्यावर ठेवलेत तरी चालेल.
(ट्रे धुवायला हक्काच कुणी नसेल तर मात्र आधी ट्रेवर एक अ‍ॅल्युमिनियमची फॉईल टाकायला विसरु नका.)

१५-२० मिनिटां नंतर सगळ्या तुकड्या उलथवुन परत १५ मिनिटं बेक करा. (जमल्यास वरुन एकदा बटरचा ब्रश फिरवा.)

एकीकडे चिकन बेक होत असतानाच, एका भांड्यात सगळे सॉस एकत्र करा, तुम्हाला आवडणार्‍या तिखटाच्या प्रमाणात तिखट सॉस वापरा. अन्यथा अफसॉस करायची पाळी यायची. ;)
त्यातच बटर/लोणी विरघळुन टाका.

शिजलेले चिकनचे विंग्स् या सॉस मध्ये यथेच्छ घोळवुन ते परत बेकींग ट्रेमध्ये ठेवुन अजुन १० मिनिटे बेक करावे.

जो काही सॉस उरलेला असेल तो वाढताना परत थोडा थोडा वरुन ओतावा.

याच्या जोडीला जर गार्लीक सॉस वा ब्ल्यु चीज डीप असेल तर लज्जत नक्कीच दुप्पट होईल.
तुर्तास इथेच थांबतो. लोभ आहेच. तो वाढावा हीच इच्छा. :)

प्रतिक्रिया

अवलिया's picture

18 Dec 2010 - 2:04 pm | अवलिया

वेलकम बॅक... :)

sneharani's picture

18 Dec 2010 - 2:14 pm | sneharani

मस्त रेसिपी!
चला गणपाभाऊ एकदा उपवास सोडला लेखनाचा!
येऊ द्यात अशा पाककृती!
:)

भन्नाट रेसिपी. मार्गशिर्ष सुटला अस वाटायला लागलय.

वेताळ's picture

18 Dec 2010 - 2:17 pm | वेताळ

आपल्याला हा प्रकार खुपच आवडतो.

आजंच ३१ डिषेंबर साजरी करणार !!! तोंड पाणावले !!

(सर्वचिकनचापी) टार्जु

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

18 Dec 2010 - 2:18 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

आह्हा.......!
येवढंच म्हणते..
चहा + श्रुजबेरीज चा बद्ला घेतलास finally...! :)
इटीचा जवाब पत्थाराने!..
मस्त रे/..!

नाटक्या's picture

18 Dec 2010 - 2:18 pm | नाटक्या

मी शक्यतो फ्रँक्स हॉट विंग्स सॉस वापरतो. काही फोटो इथे आहेतः

आणि हा सॉसः

घरी केलेले फोटो पुन्हा कधीतरी... पण गणपाशेठ जिवाला फार त्रास देता ब्वॉ तुम्ही!!!

+१
सहमत! फ्रॅन्क्स च्या सॉसची लज्जत खासच!

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2010 - 4:50 pm | परिकथेतील राजकुमार

मिपाचे नाताळबाबा गणपा शेठ भेलकम ब्याक :)

आम्ही आपली शाकाहरी माणसे, पण गणपाशेठच्या मांसाहारी पाकृ वाचतो ते त्यातल्या वर्णनासाठी, डोळ्यांना सुखावणार्‍या टापटिपीत फोटोंसाठी.

मालक शाकाहारी लोकांसाठी एखादी फर्मास डिश (चकण्यायोग्य असेल तर सोने पे सुहागा) द्याच आता.

टारझन's picture

18 Dec 2010 - 5:05 pm | टारझन

पर्‍यासाठी खास "पनिर क्रिस्पी" सुचवु इच्छितो :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2010 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

पर्‍यासाठी खास "पनिर क्रिस्पी" सुचवु इच्छितो

मी पनिर उर्फ थर्माकोल खात नाही हे माहिती असताना असा हलकट प्रतिसाद का?

टार्‍या,आपलं काय ठरलंय? तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या! ठरलंय की नाही?

कुंदन's picture

20 Dec 2010 - 9:56 am | कुंदन

चिकन खात नाही ...
अंडी खात नाही .....
पनीर खात नाही ....

जगता तरी कशावर हल्ली? ईनो वर? ;-)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Dec 2010 - 10:31 am | घाशीराम कोतवाल १.२

चिकन खात नाही ...
अंडी खात नाही .....
पनीर खात नाही ....

जगता तरी कशावर हल्ली? ईनो वर?

पराशेट दारु वर जगतात काय पर्‍या तु आणि धम्यानी म्हणे ह्या विकेंडला अख्खा बार पिवुन संपवलात म्हणे

विजुभाऊ's picture

20 Dec 2010 - 6:29 pm | विजुभाऊ

मी पनिर उर्फ थर्माकोल खात नाही हे माहिती असताना असा हलकट प्रतिसाद का?

त्याला "प्रतिसाद क्रीस्पी" आणि "खवट खरड" द्या रे कोणीतरी सोबत प्रभु मिर्ची अवलीया सॉस आणि रामदास चटणी देखील द्या

कुंदन's picture

20 Dec 2010 - 10:50 pm | कुंदन

विजुभाऊ श्रीखंड इसरले काय तुम्ही?

मेघवेडा's picture

20 Dec 2010 - 2:37 am | मेघवेडा

तंतोतंत असेच म्हणतो.

स्वाती२'s picture

18 Dec 2010 - 6:00 pm | स्वाती२

मस्त!

खत्तरनाक!!
मस्त होईल आता ३१ डिसेंबर!! सह्हीच एकदम सोपी आहे पाकृ. नक्की करेन मी.

या आभासी जगात इतका छ्ळ मांडला आहे या गणप्याने ... काही सांगायाची सोय नाही
तोंडाला पाणी सुटणार्‍या रेसीपी फोटो सकट टाकणारा एकमेव छ्ळणारा दुष्ट - गणपा महान
अन त्याला आता जोडीदार नाटक्या .
अरे बाबांनो ते हॉट विंग्स सॉस येथे मिळत नाही आता लवकर त्याचा पर्यायी उपाय सांगावा ही विनंती

क्लास रेसिपी !! :-)

आशिष सुर्वे's picture

19 Dec 2010 - 2:00 am | आशिष सुर्वे

गणपा येई मिपा..
तोची नाताळ, दसरा!

ओगा, नेहमीप्रमाणेच झ्याक रेशिपी रे लेका!
एशे..

पियुशा's picture

19 Dec 2010 - 2:20 pm | पियुशा

झक्कास्,बोले तो सॉलिड

इंटरनेटस्नेही's picture

19 Dec 2010 - 4:10 pm | इंटरनेटस्नेही

मस्त! बीअर बरोबर चिकन म्हणजे स्वर्गसुखच जणु!

सन्जोप राव's picture

19 Dec 2010 - 4:34 pm | सन्जोप राव

पुन्हा एकदा बांगलदेशी गोलंदाजांविरुद्ध गणपा तेंडुलकरांची फटकेबाजी सुरु!
पाककृती लाजवाब. फोटो तर.....

पुन्हा एकदा बांगलदेशी गोलंदाजांविरुद्ध गणपा तेंडुलकरांची फटकेबाजी सुरु!

वा रावसाहेब याला शालजोडीतला म्हणाव काय ;)

शिल्पा ब's picture

20 Dec 2010 - 2:27 am | शिल्पा ब

मग गणपाराव कधी येताय घरी?

खादाड's picture

20 Dec 2010 - 11:01 am | खादाड

व्वा क्या बात है!!

सगळ्या वाचकांचे-प्रतिसादकांचे आभार. :)

धमाल मुलगा's picture

20 Dec 2010 - 7:43 pm | धमाल मुलगा

आभार घेऊन काय चाटायचेत का?
हादडायला कधी बोलावणारेस ते सांग. मग प्रतिसाद देतो. ;)

कुंदन's picture

20 Dec 2010 - 8:15 pm | कुंदन

पारपत्र काढलेय का मालक तुम्ही?

धमाल मुलगा's picture

20 Dec 2010 - 8:17 pm | धमाल मुलगा

तू नान्याला भांडवल देऊन भागिदारीत बॉडी शॉपिंगची कुंपणी काढलीये ना?
तुमच्या भरवश्यावर गणपाला विचारतोय मी तर माझीच खेचा तुमी. काय हे डायरेक्टर( फायनान्स)साहेब. :(

शेखर's picture

20 Dec 2010 - 9:56 pm | शेखर

>> तुमच्या भरवश्यावर

कुंद्याचा कुठलाही धंदा बुडीत होतो असे ऐकुन आहे.. त्यामुळे ......? ;)

सहमत...
तुमच्या सारखे मित्र असल्यावर एकच धंदा चांगला चालु शकतो....
.....................
....................
...................
..................
.................
................
...............
..............
.............
............
...........
..........
.........
........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ईनो चा.

सुनील's picture

20 Dec 2010 - 9:51 pm | सुनील

फोटो आणि पाकृ जबरा. नाटक्या यांचा फोटोदेखिल छान.

परंतु, विन्ग्सना चामडी चिकटलेली असल्याने मी शक्यतो ड्रम्स स्टीक्स घेतो. कृती वरील प्रमाणेच!

प्रभो's picture

20 Dec 2010 - 9:57 pm | प्रभो

हुच्च!!!!!!

स्वाती दिनेश's picture

21 Dec 2010 - 12:58 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसत आहेत रे ...क्लास!
स्वाती

यशोधरा's picture

23 Dec 2010 - 5:36 pm | यशोधरा

गणप्या, गणप्या, कुफेहेपा? रेशिप्यावर रेशिप्या!

आजानुकर्ण's picture

23 Dec 2010 - 5:43 pm | आजानुकर्ण

विंग्ज जबर्‍याच आहेत. जोरदार पाककृती.

खादाड अमिता's picture

3 Jan 2011 - 10:43 am | खादाड अमिता

एकदम आवड्या!