Skip to main content

गंध मायेचे..

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 10/02/2011 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी! गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने आणखी नुकत्याच पाहिलेल्या ’गंध’ या मराठी चित्रपटाने हे लिहिण्याची प्रेरणा दिली. छंदबद्ध काव्य लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. हे लिहिण्यास मला सारखं प्रोत्साहित करणार्‍या आणि योग्य सूचना देऊन अनमोल सहकार्य करणार्‍या यशोधरा आणि नंदन यांचे खूप धन्यवाद. :)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5421
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

मेव्या!!! वेड्या, काय लिहीलं आहेस रे! मायेचा श्लेष आवडलाच एकदम!!! फार्फार सुंदर!!!! गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे मला सर्वाधिक आवडलेल्या ओळी! आणि तो 'गोमय' शब्द, खूप दिवसांनी वाचला! आणि गंध रिप्रेझेंट करणारा याहून छान आणि नादमय शब्द नाही आठवला मग!! आणि मायेबद्दल काय बोलू?? उगाच फार आठवणी जाग्या करु नकोस रे, जीव जायचा अशाने एक दिवस!! --असुर

गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे प्रचंड मस्त लिहिलेस मित्रा

शिंच्या , फार सुरेख लिहिलेंस हो एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती शेवट पण फार सुरेख . :)

एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती हे फार आवडलं.. कविता सुंदर ! (अशाच कविता ) लिहित रहा !

सुरेख आणि चित्रदर्शी कविता. असुर्‍या म्हणतो त्याप्रमाणे गोमय, श्लेष हे सारंच आवडलं. शेवटचं कडवंही खासच. अवांतर: मदत - किंवा खरं तर सूचनाच - एक दोन शब्दांपुरतीच. बाकी सर्व श्रेय कवी मेघवेडा यांचेच :)

In reply to by नंदन

मदत - किंवा खरं तर सूचनाच - एक दोन शब्दांपुरतीच. बाकी सर्व श्रेय कवी मेघवेडा यांचेच अगदी.

मेव्या मस्त कविता! :)

वाह सुरेख !!!
छंदबद्ध काव्य लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.
काव्य वाचुन अस वाटल नाही. जियो मेरे मेवे. :)

छान लिहलं आहेस . कविता आवडली.

माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला मस्तच रे.......असच लिहित रहा

शब्द न शब्द आवडला .. मस्त कविता विशेष करुन खालील दोन कडवी जास्त आवडली. परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती --------- अवांतर : बांव या शब्दाचा अर्थ मला माहित नाही . प्लीज सांगता का ?

ओळ न् ओळ आवडली.. असाच लिहित रहा...

मेव्या लेका झक्कास जमलीये बर्का. मझा आला.

सुंदर, माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला ह्या पंक्ती विशेष आवडल्या