गंध मायेचे..
रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी
मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी!
गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे
वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे
गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे
स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे
देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता
वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता
माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला
गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला
परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें
थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें
एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती
बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने आणखी नुकत्याच पाहिलेल्या ’गंध’ या मराठी चित्रपटाने हे लिहिण्याची प्रेरणा दिली. छंदबद्ध काव्य लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. हे लिहिण्यास मला सारखं प्रोत्साहित करणार्या आणि योग्य सूचना देऊन अनमोल सहकार्य करणार्या यशोधरा आणि नंदन यांचे खूप धन्यवाद. :)
खल्लास!!
गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर
सुरेख!! पहाटेच वातावरण!! अगदी
अतिशय सुंदर मित्रा !!
सुंदर...
वा, वा मेव्या, सुंदर!
मेव्या मस्तं कविता रे.. फारच
शिंच्या , फार सुरेख लिहिलेंस
एक क्षणही माय नसता, पोरक्या
मस्त रे !!!
आमोद सुनासि आले
हेच म्हणते.
मस्त
वाह सुरेख !!! छंदबद्ध काव्य
मस्त लिहिलयंस रे.
सुरेख !
माय घाली नित्य फ़ेरे अंगणी
शब्द न शब्द आवडला .. मस्त
माझ्या
धन्यवाद मित्रा
छान कविता. धागा उघडण्याआधी
सुंदर ! मेव्या, फार फार
मस्तच..
अप्रतिम
झकास रे
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
मस्त रे!
छान लिहिले आहेस रे.. येऊ देत
सुंदर, माय घाली नित्य फ़ेरे