Skip to main content

हस्तमुद्रा (तळहाताच्या रंगवलेल्या मुद्रा)

लेखक शुचि
Published on मंगळवार, 08/02/2011
From Mario
कलादालनामध्ये फक्त आपण निर्माण केलेल्या कलाकृती टाकण्याची परवनगी आहे म्हणून येथे या कलेचा उल्लेख करत आहे. जालावर फिरता फिरता काही हस्तमुद्रा (तळहाताच्या रंगवलेल्या मुद्रा) नजरेस पडल्या. या मारीओ मारिओटी या कल्पक कलाकाराने रंगविलेल्या असून , अक्षरक्षः खिळवून ठेवणार्‍या आहेत.
सर्वात प्रथम श्रेयनोंद - दुवा १ दुवा २ मानवी आकृतीं तसेच पशू पक्ष्यांचा अंतर्भाव या मुद्रांमध्ये केलेला आढळतो. फारच मोहक आणि एकमेवाद्वितीय अशी ही कला सादर करणार्‍या या कलाकाराचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. खाली ४ चित्रे दिली आहेत. बाकीची दुव्यावर पहावीत. चित्र १
चित्र २
चित्र ३
चित्र ४
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6277
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

वाह.छान. मुठीचा असाही एक उपयोग असू शकतो असे वाटले नव्हते. शेवटचे माऊ तर खूप छान.

मस्त आहेत हस्तमुद्रा! शेवटची माऊ मस्तच! :)

फारच सुंदर आहेत, चित्र ३ आणि चित्र ४ फार आवडले.

याआधी हातांची करामत शॅडो च्या स्वरुपात पाहिली होती ही पण मस्तच आहे .

मस्त - unbelievable फूटबॉल पेन्टींग सुंदर आहे. शेवटची मांजर अप्रतिम चेतन

चित्र ३ आणि ४ अप्रतिम! याआधी देखील ढकलपत्रांतुन अशी चित्रे पहिली होती. ती देखील अशीच सुंदर आणि कलात्मक होती!

रंगकामातून साकारलेल्या करमुद्रा छानच ! (वर म्हंटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रतिमा आधी पाहिल्या होत्या) अवांतरः १) थोडा(सा) भ्रमनिरास झाला. भरतनाट्यम् कत्थक वगैरे भारतीय शास्त्रीय नृत्याशैलीत वापरल्या जाणा-या पताक, त्रिपताक, हंसास्य वगैरे करमुद्रांची अधिक व सविस्तर ओळख वाचायला / पहायला मिळेल असे धागा उघडताना आधी वाटले होते ! २) शुचीतै (किंवा आणखी कोणी जाणकार) या विषयावर लिहु शकाल काय? केवळ अलता लावलेल्या हातांनी कितीतरी भाव व्यक्त होतात ! येथे या विषयावर (कोणी लिहिलेले) वाचल्याचे आठवत नाही.

मस्त मुद्रा. हे वाचल्या वाचल्या आधी सहजमामांप्रमाणेच मध्यप्रदेश पर्यटनच्या जाहिरातीचीच आठवण झाली.

सुंदर अमोल

छान आहेत हस्तमुद्रा .

हे ही छानच! आधी पाहिली होती ती वेगळी होती. धन्स शुची. सहज तुमचे अन स्पावड्याचे ही कौतुक करावे तेव्हढे थोडेच.