Skip to main content

आंबेजोगाई देवळा शेजारील लेण्या

Published on मंगळवार, 08/02/2011
खूप दिवस माहूर च्या देवीच्या दर्शनासाठी जायचे ठरवले होते, मी मित्राला विचारले आणि २७ जानेवारीला सकाळी निघायचे ठरवले. जाता जाता आंबेजोगाईला दर्शनासाठी थांबलो होतो, तेव्हां मित्र म्हणाला देवाशेजारी चांगल्या लेण्या आहेत त्या बघायच्या असतील तर जाऊयात फ़क़्त तिथे जायचा रस्ता थोडा घाणीतून पार करावा लागतो. आम्ही हो म्हणाल्यावर त्यांनी वाट दाखवली मग आम्ही अडथळ्यांची शर्यत पार करून लेण्यांपाशी पोहचलो. तिथे लेण्यांम्ध्ये स्वछ्ता तर अप्रतिमच होती. त्यातीलच काही काढलेली छायाचित्रे सर्व मिपा परिवारातील मित्रांकारिता. एक छोटी लेणी रस्त्याच्या बाजुलाच आहे त्यातला हत्तीचे छायाचित्र नंतर एक ओढा आणि नाल्याच मिश्रण आसलेला पाण्याचे व गावातले पोट साफ करायचे ठिकाण पार करुन दुसरया लेणीपाशी पोहचलो एकुण चार हत्ती या लेणीमध्ये आहेत, पहीले दोन हत्ती पुर्वेकडे तोंड करुन उभे आहेत. बाकिच्या दोन हत्तींपैकी एक हत्ती दक्षिणे कडे तोंड करून तर एक उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. खालील छायाचित्रातील हत्तीचे बाकीच्या हत्तींच्या मानाने कमी नुकसान झालेले आहे. सुरेख नक्षीकाम आहे हत्तीवर वरुन काढलेले छायाचित्र त्याच लेणी मधील भग्न अवस्थेतला नंदी या नंदीवरुन तरी असे वाटते आहे की हे शंकराचे मंदिर असावे आजुन छायाचित्रे या दुव्यावर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 6924
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

सुरेख! अवांतर - लेणी ह्या शब्दाचे अनेकवचन लेणी असेच होते, असे वाटते.

In reply to by सुनील

ह्या लेण्यां मागची आख्यायिका अशी काहिशी आहे: शकंर रुसलेल्या पार्वती ला घेउन जायला वरात घेवुन आले. पण ती ( योगेश्वरी) लग्न करायला काहि तयार होइना आणि रागावुन तिने शाप दिला व सर्व वरात हि दगडात रुपांतरीत झाली. ती योगेश्वरी म्हणजे अंबाजोगाई.

In reply to by वडिल

छान आख्यायिका सांगीतलीत वडिल. या धाग्यावर म्हटले आहे की पार्वतीला पहाटेपूर्वी विवाह करावयाचा होता अन्यथा सर्व वर्‍हाडी (वराकडचे बर का ;) ) पाषाण होतील असा तिने शाप दिला. आणि तसेच झाले

In reply to by शुचि

फुलटाइम सिनीयर मिपा अ‍ॅनलिस्ट अ‍ॅन्ड सुपर गुगलर ... माझी विकेट घेतली शुन्यावर. हि माहिती खात्रीलायक नसली तर आमचे "स्पेशल" अ‍ॅनालिस्ट पुराणातुन काहितरी नक्की शोधुन काढतील. तात्पुरता पॅवेलीयन मधे.

In reply to by वडिल

नाही मी का ही माहीती शोधून काढली कारण॑ पार्वतीला , शंकरांशी विवाह करायचा नाही ऐकल्यावर लै ब्येक्कार खेद मनात दाटून र्‍यायला ना भाऊ!! मग काय गरज ही शोधाची जननी!!! ;)

फोटोंबद्दल धन्यवाद. फोटोतील पाय कोणाचे आहेत, काही कळले का? दगड फार मजबूत नसावा.

सुंदर चित्रे दिल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही पुढे एक-दीड किमीवरच्या मुकुंदराज समाधीला जाऊन आलात का? तो परिसर सुंदर आहे. काही चित्रे असल्यास चिटकवा इथे. औरंग्याने इतर अनेक सांस्कृतीक ठेव्यांबरोबरच सुंदर लेण्यांची सुद्धा भरपूर तोडफोड केली. काही तळमळीच्या लोकांमुळे हा ठेवा अजूनपर्यंत तग धरुन आहे. पण सरकारी हेळसांड... काय बोलावे. हा ठेवा पुढील पिढीपर्यंत टिकून रहावा ही सदिच्छा.

In reply to by भास्कर केन्डे

केन्डे साहेब धडाडिचे तरुण नेते व भाजप-मनसे आघाडि चे प्रणेते.. श्री गोपिनाथराव जी मुंडे हे अंबेजोगाइचेच आहेत ना ?

चित्रांकरिता धन्यवाद.

लेण्यांच्या शैलीवरून ती ८ व्या/ ९व्या शतकातील राष्ट्रकूटकालीन हिंदू लेणी असावीत असे वाटते. पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांशी या लेण्यांचे बरेच साम्य आहे असेही दिसतेय. त्यामुळे कदाचित एकाच राजवटीत ह्या लेण्या खोदल्या गेल्या असतील.

वा लेण्या बघुन खूपच छान वाटले !

मुंडे रेणापुर चे माजी आमदार होते...रेणापुर 'लातुर 'जिल्ह्यात आहे...परळी चा बराच भाग 'रेणापुर' मतदार सन्घात होता...आता परळी नवीन विधान्सभा मतदारसन्घ आहे....'पन्कजा पालवे' सध्या आमदार आहे....मुंडे यान्चे गाव 'नाथ्रा' आहे ( परळी - तेलगाव मार्गावर आहे) ............मुकुन्दराज मराठी चे आद्यकवी होते....'विवेकसिन्धु' हा त्यान्चा ग्रन्थ आहे

In reply to by टारझन

हातातील कामे सोडुन मदतीला धावुन आल्याबद्दल धन्यवाद आनि त्याना अनुमोदन दिल्याबद्दल स्पायोजीचे पन आभार

लेण्यांचे फोटो आवडले. मात्र त्या हत्तीवर AH सारखी आपली नावे कोरुन / लिहुन स्वतःच्या अक्कलेचे प्रदर्शन करणार्‍यांचा संताप आला.