✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झेंडा मराठीचा

ग
गणेशा यांनी
Wed, 02/02/2011 - 20:53  ·  लेख
लेख
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा . . . . . . . . . . .
गणपा यांच्या विशेष सहाय्याने आणि माझ्या या कवितेमुळे हा झेंडा हाती धरता आला, कविता शब्द तेच ठेवुन झेंडा छान केला आहे, पुन्हा तेच शब्द देत असल्या बद्दल क्षमस्व, आणि चित्र म्हणुन कलादालन की कविता म्हणुन जे न देखे रवी या मध्ये टाकु की त्याच कवितेला रिप्लाय देवु या घालमेल मध्ये सरळ येथे दिली आहे .. गोड माणुन झेंडा पाहुन घ्यावा . जय महाराष्ट्र ..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6150 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

झेंडा छान दीसतोय

आत्मशून्य
Wed, 02/02/2011 - 22:19 नवीन
पण काव्यरस पाहीजे तसा झीरपला नाहीय असे वाटते. बाकी जाणकार स्तूती करतीलच.
  • Log in or register to post comments

मनापासुन खरा रिप्लाय असेन तर

गणेशा
Wed, 02/02/2011 - 22:54 नवीन
मनापासुन खरा रिप्लाय असेन तर स्तुतीपेक्षा ही तो जास्त सरस असतो .. पुढील कवितेत/चित्रकवितेत काव्यरस नक्कीच झिरपवेल ही खात्री देतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

होय.

आत्मशून्य
गुरुवार, 02/03/2011 - 00:14 नवीन
मला कवीतेचा आशय व भगवा झेंड्याचे बनलेले चित्र मनापासून आवडले. माझ्या वैयक्तीक वाचनात हा प्रकार पहील्यांदाच आला म्हणून खूप कल्पक वाटला. पण कवीता थोडी अजून मोठी असावी असे वाटत होते, चटकन संपली म्हणून... तहान नाय भागली. गणेशा, सकारात्मक प्रतीसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आत्मशुन्य शी काहि प्रमाणात

वडिल
Sun, 02/06/2011 - 10:26 नवीन
आत्मशुन्य शी काहि प्रमाणात सहमत. गणेशा अजुन कविता येउ देत. टॅलेन्ट आहे तुझ्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

आवडला हा झेंडा !

मस्तानी
Wed, 02/02/2011 - 23:47 नवीन
आवडला हा झेंडा !
  • Log in or register to post comments

छान आहे झेंडा आनि कविता

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/03/2011 - 10:24 नवीन
छान आहे झेंडा आनि कविता
  • Log in or register to post comments

संकल्पना आणि कविता छान

नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 10:48 नवीन
संकल्पना आणि कविता छान आहे. एक चौकशी, आमच्या सार्वजनीक मंडळात हा झेंडा/कविता प्रिंट/फ्लेक्स करुन लावली तर चालेल का गणेशा भाउ ? (खाली तुझे नाव टाकायला विसरनार नाहि)
  • Log in or register to post comments

बिंधास्त तुम्ही कविता वापरु

गणेशा
गुरुवार, 02/03/2011 - 13:46 नवीन
बिंधास्त तुम्ही कविता वापरु शकता .. काही हरकत नाही. आणि कोणास तेथे नाव लिहायला हरकत असेल तर नाव न लिहिता ही तेथे लिहिली तरी माझी काही हरकत नाहिये. ही कविता येथील शब्द बरेच घाईत आले आहेत, थोडे बदल किंवा जे पटत नाहिये निटशे ते नको असेल तर शब्द बदलुन पण देवु शकतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

धन्यवाद. ही कविता येथील शब्द

नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 13:57 नवीन
धन्यवाद.
ही कविता येथील शब्द बरेच घाईत आले आहेत,
हे हि नसे थोडके.
थोडे बदल किंवा जे पटत नाहिये निटशे ते नको असेल तर शब्द बदलुन पण देवु शकतो ...
तुर्तास हा बोर्ड करुन लावु, पुढे मागे आपन नविन कविता केलि कि ति लावु. हर हर महादेव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

काही शंका...!!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 02/03/2011 - 11:46 नवीन
झेंडा तर कल्पक आहेच आहे, पण त्यातील काव्यमयता [जी वीररसाचे प्रबोधन करते] मराठी मनाला चटकन भावणारी आहे. कवितेतील "एकतेची साद घेवूनी...." हा पुकार केवळ वाच्यार्थाने नव्हे तर लौकिकार्थाने प्रत्यक्षात साकार झाला तर ज्या शिवबांचा कविने अखेरीस उल्लेख केला आहे त्यांचे खर्‍या अर्थाने पुण्यस्मरण केल्यासारखे होईल. थोडेसे अवांतर ~~ १. "कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये".... इथल्या 'कण्हत्या' संबोधनाचे प्रयोजन काय? सह्याद्री तर कणखर आहे...आणि तुम्हीच म्हणता की, "कितीही डोंगर पोखरले..." तरी तो डगमगलेला नाही...मग कोणत्या कारणामुळे तो 'कण्हत' आहे? २. "रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा..." .... या ओळीतील 'यलगार' ही संज्ञा 'यल्गार' अशी जोडून घ्यावी. यल्गार = हल्लाबोल....पण 'यलगार' ही कोल्हापूर-बेळगांव सीमाभागात आढळणारी एक भटकी जमात आहे, जी नंदीवाले, कुडमुडे जोशी किंवा यल्लमाची कथा सांगत गावोगावी हिंडणारे चित्ररथी यांच्या उपगटात नोंद झालेली आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

इंद्रा जी प्रथमता मनापासुन

गणेशा
गुरुवार, 02/03/2011 - 14:13 नवीन
इंद्रा जी प्रथमता मनापासुन धन्यवाद.. आपले रिप्लाय .. आपल्या अभ्यासपुर्ण विचारांचा मी फॅन आहे .. ----------- मुळ मुद्दा : १. "सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा".... -> प्रथमता कवितेत ह्या दोन ओळी येतात
कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
जे परके आहेत त्यांनी कीती ही डोंगर पोखरत आणले .. कीती ही आमची माणसे तोडत आणली फितुर करत आणली .. तरीही मराठी माणसाने आपल्या मना मनात सह्याद्री सांधला आहे ('मना मनात' याचा अर्थ सह्याद्री जो विशाल आहे मग तो कोल्हापुर - पन्हाळ्याचा टोकदार असु द्या, पुरंधर चा विशाल छातीसम असलेला असु द्या नाही तर जुन्नर चा दिमाखदार असुद्या .. ही सगळी ठिकाणे आम्ही सांधली आहेत येथले सर्व माणसे त्यांचे मन एकच आहे).. सह्याद्रीच्या वेगवेगळ्या शिखरांना सेतु ने जोडले आहे .. आणि ह्या सेतु चे नाव आहे 'मराठी' ... म्हणुन सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा. २. कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
तुम्हीच म्हणता की, "कितीही डोंगर पोखरले..." तरी तो डगमगलेला नाही
असे नाहिये. सह्याद्री आता घायाळ झाला आहे, या सह्याद्रीला ज्यांनी वैभव प्राप्त करुन दिले .. या सह्याद्रीचे लाडके सुपुत्र कधीच अनंतात विलीन झाले आहेत ... अआणि त्या नंतर येथे अनेक स्थितंतरे आली त्यामुळे हा सह्याद्री कण्हत आहे .. अजुनही त्या आठवणींमुळे सह्याद्री भावविव्हळ होतो आहे.. . तरीही त्या लाडक्या सुपत्रांनी रोवलेल्या स्वराज्याचे बीज आम्ही संभाळत आहोत, सह्याद्री डगमगलेला आहे असे बोलायचे नाहिये येथे, सह्याद्री येथे पिता आहे आणि तो सज्ज आहे सर्व गोष्टींसाठी म्हणुनच कण्हत्या सह्याद्रीचय पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा तो त्या आठवणी मध्ये कीतीही भावनावश झालेला असला तरी त्यामध्ये आवाज जो घुमतो आहे तो मराठीचा आहे स्वराज्याचा आहे ३. "रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा. खरे तर हा शब्द यल्गार असाच लिहायचा होता, चुक झालेली मान्य आहे, पण तरीही त्यामुळे 'यलगार ' ही जमात आहे हे माहिती झाल्याने छान वाटले, चुक दुरुस्त केली जाईन. --- आपल्याला मुद्दे पटले नसले तरी असेच योग्य मत -मार्गदर्शन होत राहो ही इच्छा .. - गणेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सहमत

कच्ची कैरी
गुरुवार, 02/03/2011 - 11:29 नवीन
मी पवार यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे .झेंड्याची संकल्पना खूपच छान आहे ,कविता मनापासुन आवडली .
  • Log in or register to post comments

असा प्रकार पहिल्यांदा पाहिला.

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 02/03/2011 - 11:49 नवीन
असा प्रकार पहिल्यांदा पाहिला. चमत्कृतीपूर्ण रचना आणि तरीही मनाला भावणारे शब्द. कविता खूप आवडली. फ्लेक्स वर टाकली तर त्याचे छायाचित्र पाहायला नक्की आवडेल :-)
  • Log in or register to post comments

सर्व प्रथम सर्व

गणेशा
गुरुवार, 02/03/2011 - 13:42 नवीन
सर्व प्रथम सर्व मित्र-मैत्रीणींचे मनापासुन आभार ... काही प्रश्नांची उत्तरे त्या त्या प्रश्नांखाली देत आहे.. --- आणखिन एक हेल्प हवी आहे ... समजा मला ....... टेक्स्ट लिहायचे आहे तर पहिले ...... न लिहिता हे टेक्स्ट लेफ्ट साईड पासुन तितक्याच अंतरात आणता येते का ? मी प्रयत्न केला असता ते लेफ्ट साईड लाच राहते. असे होत असतील तर नक्कीच आवडेल कविता लिहायला.. - गणेशा
  • Log in or register to post comments

प्रतिसादाच्या/लेखनाच्या

गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 13:51 नवीन
प्रतिसादाच्या/लेखनाच्या खिडकीत डावी कडुन सहावा चौकोन निवडलात, तर गणेशा तुझ लेखन उजवी कडे सरकेल. हे अस .:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

का अस हवय?

गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 13:55 नवीन
की तुला ______अश्या प्रकारे _______________लिहायचय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मला असे हवे आहे मित्रा. हेच

गणेशा
गुरुवार, 02/03/2011 - 14:21 नवीन
मला असे हवे आहे मित्रा. हेच मला काल विचारायचे होते.. नेमके खुप काम आले आणि राहुन गेले होते. तुझे मनापासुन आभार .. हे असे करता येते हे पाहुन मला खुपच आनंद झाला आहे ... आताच काही तरी चित्र काडावे असे झाले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

कविता आवडली

वाहीदा
गुरुवार, 02/03/2011 - 14:35 नवीन
पण , कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा यात कण्हत्या हा शब्द काढून दुसरा छान सह्याद्री ला साजेसा शब्द घातलात तर उत्तम !! यल्गार ऐवजी एखादा मराठी रांगडा हल्लाबोल शब्द घालावा . इन्द्राच्या प्रतिसादास सहमत .
  • Log in or register to post comments

वाहिदा जी आभार . आपला मुलगा

गणेशा
गुरुवार, 02/03/2011 - 14:44 नवीन
वाहिदा जी आभार . आपला मुलगा आपल्या जवळ नाहिये या अर्थाने बापाचे मन धुमसत आहे, त्याची ती अवस्था दाखवण्याचा एक प्रयत्न येथे 'कण्हत्या' ह्या शब्दातुन व्यक्त केला होता . शब्द छान वाटत नसल्यास बदलतो , बदलण्या पेक्शा कोणी सुचवला तरी जास्त आनंद वाटेन परंतु तरीही तो शब्दच जास्त न्याय देतो आहे असे मला राहुन राहुन वाटत आहे. अवांतर : 'कण्हता' ही कल्पना आपल्या लाडक्या सह्याद्रीला कदाचीत योग्य वाटत नाहिये असे वाटते आहे ना सर्वांना ?.. त्याचा बाणेदार पणा .. कणखर पणा आपण पाहिलेला आहे मान्य .. पण या शब्दामुळे त्याचे शौर्य नक्कीच धोक्यात नाही आले पाहिजे. या शब्दामुळे ते झाकोळले जाते आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

खुप छान्न्न...

डावखुरा
गुरुवार, 02/03/2011 - 17:28 नवीन
खुप छान्न्न...
  • Log in or register to post comments

सहज बघितलं तर 'झेंडा मराठीचा'

मराठे
Fri, 02/04/2011 - 06:52 नवीन
सहज बघितलं तर 'झेंडा मराठीचा' ही कविता त्याच्या खालच्या कॉमेंट सकट (गणपांचा उल्लेख सुद्धा) जशीच्या तशी छापली आहे. http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:338494 गणेशा, वरिल दुव्यातला ब्लॉग तुमचा आहे का?
  • Log in or register to post comments

नाहि वरील ब्लॉग माझा

गणेशा
Fri, 02/04/2011 - 11:04 नवीन
नाहि वरील ब्लॉग माझा नाहिये. .. बाकी येथे तरी कवी चे नाव लिहिले नाहिये .. बर्‍याच ठिकाणी दुसर्‍या नावानेच असतात कविता आणि लेख . चालायचेच .. आपण लिहिण्याचा आनंद घ्यायचा .. वाचायचा आनंद घेत रहायचा.. बस्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

अरेच्चा, गप्प का बरे बसता तुम्ही ??

वाहीदा
Sat, 02/05/2011 - 00:53 नवीन
तुम्ही मुग गिळून गप्प बसलात तर हे प्रितम सारखे लोक आणखिन बोकाळतिल प्रितम प्रभाकर थाळे आहे त्या माणसाचे नाव शोधून काढा आधी त्याला अन सणसणित उत्तर द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

कवितेतून केलेली झेंड्याची

अमोल केळकर
Fri, 02/04/2011 - 09:28 नवीन
कवितेतून केलेली झेंड्याची रचना आवडली अमोल केळकर
  • Log in or register to post comments

असेच म्हणते.

यशोधरा
Fri, 02/04/2011 - 09:36 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

हो फार छान रचना .. कवितेची

ज्ञानराम
Sat, 02/05/2011 - 17:10 नवीन
हो फार छान रचना .. कवितेची आणी झेंड्याचीही...
  • Log in or register to post comments

नमस्कार गणेशा, कविता व कला या

५० फक्त
Sat, 02/05/2011 - 18:05 नवीन
नमस्कार गणेशा, कविता व कला या दोन्ही तु उत्तम सांभाळल्या आहेत. कुणा संगणक हस्ताक्षर तज्ञाकडुन अक्षरे थोडी तिरपी करुन घेता येतील का पाहा. आणि तुमचं लिखाण चोरीला जात असेल तर गप्प बसु नका, इथे http://www.valuemyweb.com/ तुमच्या ब्लॉगची व लिखाणाची किंमत किती आहे ते पहा आणि मग बोला लिखाणाच्या आनंदाबद्दल वगैरे. माझ्या फेसबुकच्या ग्रुप मध्ये असे चोरलेले लिखाण मी सरळ सरळ उडवतो मग भांडणं झाली तरी चालतील. ४ महिन्यांत माझा ब्लॉग $ ४३७ एवढा झाला आहे, ही कींमत मला आज कुणी देणार नसेल, पण इतर देशांत व भाषांत असे ब्लॉग खरेदी विक्रीचे पण व्यवहार चालतात, पण तुमचं स्वःताच्या लिखाणाची किंमत एवढी उतरवु नकोस की त्याचा कचरा होईल. तुझा ब्लॉग कॉपिराईट प्रोटेक्ट करुन घे तसेच राईट क्लिक डिसेबल करुन घे. हर्षद.
  • Log in or register to post comments

झेंड्याची संकल्पना मस्त!

पैसा
Sat, 02/05/2011 - 23:02 नवीन
खूप आवडली. बहुमताप्रमाणे "कण्हत्या" ऐवजी "धुमसत्या" "उसासत्या" "घायाळ" असा एखादा शब्द बसेल का?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा