Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नरेशकुमार on गुरुवार, 02/03/2011 - 18:24
तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सुखी संसाराचे एक रहस्य सांगनार आहे. निट ऐका. कोनताही एक विकएण्ड निवडा. शनिवार चालेल. सकाळि लवकर ऊठा. बायको उठन्याच्या निदान एक तास तरी अगोदर. दोन बटाटे घ्या, पान्यात टाकुन उकडायला ठेवा. Picture 185" alt="" /> कणिक मळा. कणकेचे गोळे करुन घ्या. Picture 187" alt="" /> चित्रात दाखविल्याप्रमाने कणिक थोडी जाड गोलाकार करुन घ्या. एकुन ४ करा, २ बायकोसाठी, २ तुमच्यासाठी. Picture 189" alt="" /> बारीक कांदे चिरुन घ्या. Picture 190" alt="" /> बटाटा स्मॅश करुन घ्या, त्यात मिठ, हळद, चटनी, कांदा टाकुन त्यांचे मिश्रण करुन घ्या. Picture 191" alt="" /> कणके मध्ये हे मिश्रन भरुन घ्या, आनि ते गोळे लाटा. Picture 186" alt="" /> तव्यावर मस्त पैकी दोन्हि बाजुने शेकुन घ्या. शेकताना देसी घी वापरा. Picture 192" alt="" /> बायको उठल्याउठल्या तिच्या पुढे गरम गरम पराठ्यांचे ताट, त्यासोबत लोणचे, केचअप, आनी फक्कड चहा धरा. तुमचा विकएण्ड एकदम मस्त जाईल. आनि असेच प्रेमाने राहिले तर अवघे जिवन नाही सुखाचे झाले तर नाव बदलुन घेईन
  • Log in or register to post comments
  • 6532 views

प्रतिक्रिया

Submitted by चिरोटा on गुरुवार, 02/03/2011 - 18:30

Permalink

हम्म

फोटू दिसत नाही आहेत. पण चांगले असणार.वीक एन्ड चांगला जाईल ठीक पण प्रत्येक आठवड्यात हेच काम लागायचे.हापिसातून येताना बटाटे घेवून यावे लागतील दर शुक्रवारी.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/03/2011 - 18:32

Permalink

ओ नरेशजी पाककृती जनातलं

ओ नरेशजी पाककृती जनातलं मनातलं मधे का टाकली? गंडलो ना !
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on गुरुवार, 02/03/2011 - 18:40

In reply to ओ नरेशजी पाककृती जनातलं by अवलिया

Permalink

अनुमोदन...... हे शब्दशः

अनुमोदन...... हे शब्दशः जनातलं मनातलं अजिबात नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/03/2011 - 18:35

Permalink

माझं लिखाण चोरायची काय हिम्मत

बायको उठल्याउठल्या तिच्या पुढे गरम गरम पराठ्यांचे ताट, त्यासोबत लोणचे, केचअप, आनी फक्कड चहा धरा. .
आहो तुमच्यात काही दात बीत घासायची , अंघोळ बिंघोळ करायची रितभात आहे की नाही नरेंद्रकुमार ... शी बै .. अवांतर : पराठे खायला डेरिंग लागेल हे :) - टारु कराटे
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on गुरुवार, 02/03/2011 - 18:36

Permalink

मित्रा नरेश, तू का येउ

मित्रा नरेश, तू का येउ घातलेल्या विकएन्डची वाट लावण्यासाठी एवढा उतावळा झाला आहेस.... तुझे असले उपाय घरातली शांती भंग करण्यास करणी भूत ठरू शकतात.......... बाकी आलू पराठे पाहून झक्कास वाटलं, येत्या शनिवारी तेच करायला सांगतो........ :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on गुरुवार, 02/03/2011 - 18:43

Permalink

हरहुन्नरी, गुणी , आदर्श,

हरहुन्नरी, गुणी , आदर्श, विनम्र, १ निष्ठ, घनिश्ठ सगळे आहात गेल्या जन्मी तुमच्या बायकोने कोनते व्रत केले होते हो जे कि तिला तुम्ही मिळालात विचारुन सांगा. . बाकि कनकित भाजी घातल्यानंतर लाटने आनि ती न फाटने , फुटने ही खरी कला हो
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/03/2011 - 19:22

Permalink

?

बायको उठल्याउठल्या तिच्या पुढे गरम गरम पराठ्यांचे ताट, त्यासोबत लोणचे, केचअप, आनी फक्कड चहा धरा.
त्या पेक्षा सरळ सकाळचे वीधी आटोपून मस्तपैकी चैतन्यला जा मग, चांगाला पेश्वाई पराठा ओरपा आन एक पटीयाला ग्लास लस्सी प्या आनी ऊरलेला दीवस एकदम मस्त आळसात लोळत घालवा. संध्याकाळी बायकोला जेवण घरीच बनवायला सांगा. सहकूटूंम्ब सहपरीवार (वढील्धारे व लहान्गे पकडून) जेवण करा बाय्कोचे सूगरण म्हणून कौतीक करा.... मग बोला संसार कसा नाय सूखाचा व्हत ते. दूसर्या दीवशी दूसरा पराठा ट्राय करा व रीयल ओरेंज ज्यूस प्या (टेट्रा पॅक मधले) आणी रात्री कूटूंम्बाला बाहेर जेवायला न्या (वढील्धारे व लहान्गे सोडून) ... मग बोला संसार कसा नाय सूखाचा व्हत ते. सोमवार ते शूक्रवार सकाळी , दूपार व रात्री बायकोने प्रेमाने स्वतःच्या हाताने तयार केलेला नाष्टा व कोणतीही भाजी भाकरगोड मानून खा.... मंगळवारी आन गूरूवारी आपल्या फर्माइशी बनवायला लावा..... तीच्या सूगरण पणाचे, गृहक्रूत्यदक्षतेचे गूण गावा, त्याला प्रोत्साहन द्या कश्टाचे कौतीक करा ...आन मग बोला संसार कसा नाय सूखाचा व्हत ते... अधून मधून बायकोला माहेरी पाठवा आणी स्वतः मीत्रांसोबत ओल्या पार्ट्या झोडा आन मग बोला संसार कसा नाय सूखाचा व्हत ते... आणी हे जर शक्य येत नसेल तर जसे वाटेल तसे करा पण प्लीज असले दीशाभूल करणारे लेखन करून इतरांच्या सूखी संसाराची वाट लावू नका.... (क्रूपया हा प्रतीसाद हलके घ्यावा हे सूज्ञास सांगणे न लगे.) - (परोठाप्रेमी) संसारशून्य
  • Log in or register to post comments

Submitted by खादाड अमिता on Fri, 02/04/2011 - 12:39

In reply to ? by आत्मशून्य

Permalink

आत्मशून्य ह्यांच्या प्रतिसादाला

टाळ्या टाळ्या असं लिहिण्याची हिम्मत आमचे आहो मिपा बघत नसल्या कारणाने करतीये. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/03/2011 - 19:18

Permalink

.

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 02/03/2011 - 23:11

Permalink

आत्मशुन्य यांच्या अनुभवी

आत्मशुन्य यांच्या अनुभवी प्रतिसादाला साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 02/04/2011 - 09:11

In reply to आत्मशुन्य यांच्या अनुभवी by ५० फक्त

Permalink

.

हे काय ? आमच्या सूखी संसाराचा कूणालाच हेवा वाटला नाही ? :( कोणीच आम्हाला लकी मानत नाही? :( छ्या छ्या छ्या काळ बाकी भलताच बदलला आहे आता. म्हणतात ना ..... रामचंद्र कह गये सीयासे ऐसा कलीयूग आयेगा .......
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/03/2011 - 23:48

Permalink

साला हा नरेशकुमार बरा होता.

साला हा नरेशकुमार बरा होता. त्याच्या लग्नाचा वाढदिवस काय झाला एकदम बिघडलाच. अवांतरः गणपाच्या पावलावर पाऊल टाकतोय बहुतेक. त्याची वाट अवघड आहे. लक्षात घे रे
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on गुरुवार, 02/03/2011 - 23:48

Permalink

सुखी संसाराचा मंत्र

हा खरच सुखी संसाराचा मंत्र आहे .तुमची बायकोही माझ्याइतकीच लकी आहे ह! मला आत्तापर्यंत उगाच मीच या जगातील लकी मुलगी आहे असे वाटत होते पण माझ्यासारख्या अजुनही आहेत म्हणुन आंनंद वाटला .कीप इट ऑन !बाकी तुम्हाला या गोष्टीपासुन परावृत्त करणार्या लोकांच एका कानाने एका आणि दुसर्या कानाने सोडुन द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 02/04/2011 - 10:33

Permalink

मैं तो जोरु का गुलाम, बनके रहूंगा (इति - नरेश)

मेरेदिलमें है जोरु, दिल की धडकन में जोरु, मेरी आंखोंमें जोरु, मेरे सांसोंमें जोरु ... (इति - नरेश ;-) हं घे रे बाबा ) बहिणींसाठी लवकर उठून कधी पराठे केलेले आठवतात का ?? बहिणींसाठी असे गुलाम नवरे शोधले का ? व्वा ! व्वा ! असेच नेहमी जोरु का गुलाम बनून रहा ...(जशी मी माझ्या मावस भावाला चिढवते तशी तुला ही हेच चिढवेन ) तु तो जोरुका गुलाम बनके रहेगा !! बाकी पराठ्याची पाकृ मस्तच हां ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 02/04/2011 - 08:07

Permalink

हे देसी घी काय अस्तंय?

हे देसी घी काय अस्तंय?
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on Fri, 02/04/2011 - 09:59

In reply to हे देसी घी काय अस्तंय? by llपुण्याचे पेशवेll

Permalink

नरु भाऊ कडचा पेशल पदार्थ

नरु भाऊ कडचा पेशल पदार्थ असेल........
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 02/04/2011 - 10:09

In reply to नरु भाऊ कडचा पेशल पदार्थ by मनराव

Permalink

खी: खी: खी:

खी: खी: खी:
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/04/2011 - 10:17

In reply to खी: खी: खी: by llपुण्याचे पेशवेll

Permalink

पण "देसी" हा शब्द तर

पण "देसी" हा शब्द तर हिणवण्याच्या दृष्टीणे वापरतात असे गुल्टीमहाचर्चेत वाचलं होतं. .. णकु आपल्या पत्निस हिणवतात ? हाय अल्ला :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 02/04/2011 - 10:56

In reply to पण "देसी" हा शब्द तर by टारझन

Permalink

लाहौलविलाकुवत.... आमा मियाँ

लाहौलविलाकुवत.... आमा मियाँ कैसी बाता कर्ते । सूरज अपनी रोशनी भूले, हवाँ बहना , णकु अपनी पत्नी को हिणवें...??? नामुमकिन।
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 02/04/2011 - 19:19

In reply to हे देसी घी काय अस्तंय? by llपुण्याचे पेशवेll

Permalink

हे देसी घी काय अस्तंय? हो

हे देसी घी काय अस्तंय? हो ना. बरोबर आहे.... नुसते "देशी " असते तर चट्टकन कळाले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 02/04/2011 - 12:43

Permalink

हो

आणि सक्काळी सक्काळी येवढ्या धडपडीनंतर 'मीठ जास्त झालेय', 'किती तिखट केलेत', 'कांदा नीट चिरला नव्हतास', 'कित्ती जाड केलेस पराठे, मधे नीट शिजले सुद्धा नाहीयेत', 'तुला स्वैपाकघरात कडमडायला कोणी सांगितलं होतं',. 'आता हा सगळा राडा कोण आवरणार' वगैरे उत्साहवर्धक प्रशस्तीपत्रके संपादन करावीत. (अननुभवी, तटस्थ निरीक्षक) रमताराम
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com