✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गड्डा यात्रा - काठ्यांचे फोटो

५
५० फक्त यांनी
Tue, 02/01/2011 - 22:43  ·  लेख
लेख

Book traversal links for गड्डा यात्रा - काठ्यांचे फोटो

  • ‹ गड्डा यात्रा सोलापुर
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13831 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

सुंदर फोटो.. रांगोळीतील मोर

यकु
Tue, 02/01/2011 - 23:25 नवीन
सुंदर फोटो.. रांगोळीतील मोर फार आवडले. :)
  • Log in or register to post comments

सुरेख हर्षद. पहिल्यांदाच

गणपा
Wed, 02/02/2011 - 02:08 नवीन
सुरेख हर्षद. पहिल्यांदाच अश्या यात्रेचे फोटोरुपी का होईना दर्शन झालं.
  • Log in or register to post comments

मजा आली

शुचि
Wed, 02/02/2011 - 02:20 नवीन
हार- मोराच्या रांगोळ्या - विड्याची पाने - फेटेवाले गावकरी काय मजा वाटते पहायला. (अर्थात मी पहील्यांदाच पहाते आहे) खरच शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments

सुरेख

उल्हास
Wed, 02/02/2011 - 03:01 नवीन
सुरेख फोटो आणी वर्णन देखील
  • Log in or register to post comments

छान

सहज
Wed, 02/02/2011 - 07:14 नवीन
छान फोटो! >सोलापुर शहरात एकुन ६८ ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे, त्या सर्व ठिकाणी या काठ्या नेउन आणण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी या काठ्यांचे व श्रीसिद्धेश्वराचे लग्न लावले जाते एकंदर किती काठ्या असल्या पाहीजेत व त्या कशाचे प्रतिक आहे? श्री. सिद्धेरामेश्वरांबद्दल, बाराबंदी अजुन काही प्रथा व अजुन माहीती जमल्यास द्या.
  • Log in or register to post comments

सुंदर. बर्‍याच दिवसांनी रूमाल

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/02/2011 - 08:11 नवीन
सुंदर. बर्‍याच दिवसांनी रूमाल बांधलेले लोक पाहीले. पारंपारीक बाराबंदी तर खासच. :) धन्यवाद हर्षद. (वैशिष्ठ्य हा शब्दातला "वै" V+a+i या क्रमाने टाईप करून आणता येईल. तुम्ही तो "वॅ" असा टाईपला आहे चुकून)
  • Log in or register to post comments

खूपच छान

प्रचेतस
Wed, 02/02/2011 - 08:38 नवीन
ही यात्रा प्रत्यक्ष तिथे जाउनच बघायला पाहीजे.
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर फोटो

स्पा
Wed, 02/02/2011 - 08:47 नवीन
खूपच सुंदर फोटो
  • Log in or register to post comments

खुप छान फोटो अनि वर्णन

मुलूखावेगळी
Wed, 02/02/2011 - 10:17 नवीन
खुप छान फोटो अनि वर्णन पन इथे टाकलयाब्द्दल धन्यवाद गड्ड्याची यात्रा पाहिली होती पन हे काठ्यान्चे आज पहिल्यान्दाच पाह्ते आवडली काठीची वरात, रान्गोळ्या,फेटेवाले सर्व
  • Log in or register to post comments

उत्तम फोटो

मैत्र
Wed, 02/02/2011 - 10:20 नवीन
वेगळाच प्रकार आहे. फोटो मुळे कल्पना आली आकाराची, पोशाखाची आणि एकंदरीत वातावरणाची... गड्डा यात्रा आणि काठ्यांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... एकदा आवर्जून भेट द्यायला हवी सोलापूरला यात्रेच्या वेळी..
  • Log in or register to post comments

धन्य धन्य

कच्ची कैरी
Wed, 02/02/2011 - 11:00 नवीन
फोटो बघुन धन्यता लाभली ,सोलापुरला जवळच अस कोणी नाही नाहीतर प्रत्यक्ष बघायला मिळाले असते पण तुमच्यामुळे अप्रत्यक्षरित्या का होइना गड्डा यात्रा पहण्यास मिळाली ,पुन्हा एकदा धन्यवाद!
  • Log in or register to post comments

येक नंबर .. मज्जा आलि

टारझन
Wed, 02/02/2011 - 11:09 नवीन
येक नंबर .. मज्जा आलि
  • Log in or register to post comments

उत्सुकता आहे... पुढच्या वेळी

डावखुरा
Wed, 02/02/2011 - 14:06 नवीन
उत्सुकता आहे... पुढच्या वेळी जमले तर पाहु...
  • Log in or register to post comments

आवर्जुन फोटो टाकल्याबदल

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/02/2011 - 14:16 नवीन
आवर्जुन फोटो टाकल्याबदल मनःपुर्वक धन्यवाद. सुरेख आले आहेत फोटो, तसेत त्याखालील माहिती देखील उत्तम.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Wed, 02/02/2011 - 14:30 नवीन
मस्त फोटो!मस्त माहिती!!
  • Log in or register to post comments

काटी न घाँगडं घिऊन्द्या की

प्यारे१
Wed, 02/02/2011 - 14:48 नवीन
काटी न घाँगडं घिऊन्द्या की रं, मला बी जत्रंला यिऊन्द्या की.......
  • Log in or register to post comments

दिवसाची सुरवात देव दर्शनाने

निनाद मुक्काम …
Wed, 02/02/2011 - 15:24 नवीन
दिवसाची सुरवात देव दर्शनाने झाली . रंगीबेरंगी प्रफुल्लीत करणारे फोटो पाहून मन टवटवीत झाले . प्रत्यक्ष जत्रेचा मौहोल अजूनच न्यारा असेल .
  • Log in or register to post comments

मस्त फोटो अन माहिती....

प्रसन्न केसकर
Wed, 02/02/2011 - 16:17 नवीन
बरीच वर्षे झाली गड्ड्याची यात्रा बघुन. आज या धाग्याच्या निमित्तानं जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त! पहिल्यांदाच

यशोधरा
Wed, 02/02/2011 - 17:12 नवीन
मस्त! पहिल्यांदाच पाहिले. कोकणातील तरंगाची यात्रा असते, तसे काहीसे काठ्या हा प्रकार असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

फार सुरेख!

क्रान्ति
गुरुवार, 02/03/2011 - 21:25 नवीन
हर्षू, खासच आहेत रे फोटो! अगदी दक्षिण कसब्यातून काठया पहातोय असं वाटलं! गणपा, या एकूण सात काठ्या असतात. पहिली लिंगायत समाजाची हिरेहब्बू यांची मानाची काठी. मग सोनार, कुंभार अशा इतर सगळ्यांच्या मिळून एकूण सात. श्री सिद्धरामेश्वर हे योगी, तपस्वी होते. ते अतिशय रूपवान, तेजस्वी दिसत. त्यांच्या एका कुंभार भक्ताची कन्या त्यांच्यावर भाळली आणि त्यांच्याशी विवाह करण्याची तिनं इच्छा व्यक्त केली. पण सिद्धरामेश्वरांनी आपण योगी असल्यानं गृहस्थाश्रम आपल्याला वर्ज्य आहे असं तिला समजावलं. पण तीही निश्चयाची पक्की होती, तिनं मनोमन सिद्धरामेश्वरांना आपला पती मानून इतर कुणाशीही विवाह करणार नाही, असं आपल्या पित्याला सांगितलं. यावर उपाय म्हणून सिद्धरामेश्वरांनी आपला नंदीध्वज तिला दिला व याच्याशी तू विवाह कर असं सांगितलं. तिनं त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजाशी विवाह केला आणि त्यानंतर होमकुंडात स्वत:ची आहुती दिली. या विवाहाचं प्रतिक म्हणून आजही संक्रांतीच्या दिवशी सिद्धेश्वर मंदिरात या काठ्या आणि नंदीध्वज यांचा विवाह अगदी थाटामाटात, विधिपूर्वक संपन्न होतो आणि निम्म्याहून अधिक सोलापूरकर अगदी घरचं लग्न असल्यासारखे नटूनथटून या लग्नाला उपस्थित रहातात. भोगीदिवशी ६८ ज्योतिर्लिंगांना तेल लावण्याचा कार्यक्रम होतो, संक्रांतीदिवशी लग्न आणि किंक्रांतीला होम. होमादिवशी साडीचोळी अर्पण केली जाते भक्तांकडून कुंभारकन्येला. काठ्या या त्या कन्येचं प्रतिक. त्यांचा विवाह नंदीध्वजाशी होतो. या काठ्या इतक्या जड आणि उंच असतात, की त्या चालवायची प्रॆक्टीस केली जाते जवळजवळ महिनाभर आधीपासून, जशी गणपतीत लेझिमची करतो तशी. कारण ती काठी झुकून चालत नाही! उंची पण एवढी असते, की एक आठवडाभर रोडक्रॊस केबल काढून ठेवाव्या लागतात वीज आणि फोनवाल्यांना. त्यामुळे त्या मार्गावरचे फोन बंद रहातात, पण तेव्हा कुणी कुरकुर नाही करत! [अर्थात, आता तर मोबाइल आले, पण आम्ही जेव्हा तिथे होतो, तेव्हा एरवी फोन बंद झाला अर्ध्या तासासाठी, तरी ओरडणारे लोक तब्बल आठवडाभर काहीही तक्रार करायचे नाहीत!] बरं, ती मिरवणूक काही तास-दोन तासांची नसते, जवळजवळ अर्धा दिवस जातो त्यात, कारण घरोघरी दारात थांबवून त्या काठ्यांची पूजा केली जाते, नवसाचे खोबरं-लिंबू यांचे हार घातले जातात. आणि विशेष म्हणजे सोलापुरातील सगळ्या जातिधर्माचे लोक या सोहळ्यात सामील असतात! पारंपारिक बाराबंदी, फेटे घालून अनवाणी पायांनी सगळ्या वयातली मुलं-माणसं लगबगीनं काठी धरण्यासाठी धावत असतात! तोही मोठा मान असतो! आणि मग या विवाहानिमित्त यात्रा भरते मस्तपैकी भली मोठी. माझ्या बंधुराजानं फोटो दिलेच आहेत दोन दुव्यांमधे. मी मला आठवली तेवढी माहिती दिली.
  • Log in or register to post comments

तायडे, मला जास्त टायपायचा

५० फक्त
गुरुवार, 02/03/2011 - 22:43 नवीन
तायडे, मला जास्त टायपायचा कंटाळा येतो म्हणुन मी फोटो जास्त टाकतो. सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार, आमच्या गावच्या पुढच्या वर्षीचं सर्वांना पुन्हा एकदा जाहीर आमंत्रण. जानेवारीत संक्रांतीच्या एक दिवस आधी ते एक दिवस नंतर ही काठ्यांची मिरवणुक असते, यात्रा म्हणजे गड्डा पुढं जानेवारी महिनाभर चालु असतो. तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा बोलावतो आहे - भाग्यश्रीचे वडे, रेवड्या , उसाचा रस आणि पोटाच्या पचनाबरोबरच आयुष्यांचा हिशोब सांगणारी पाणिपुरी खायला हो आणि बरोबर एक पिसाची टोपि आणि चंद्रावर कटरिना बरोबर फोटो पण. पुन्हा योग्य वेळी आठवणं करेनच. हर्षद.
  • Log in or register to post comments

खुपच छान ! एक अतिशय सुंदर

नरेशकुमार
Fri, 02/04/2011 - 08:31 नवीन
खुपच छान ! एक अतिशय सुंदर यात्रेचे सुख पदरी पाडले बघा तुम्ही आमच्या. सर्व फोटो आनि लेख मनापासुन आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

चिंतामणी
Fri, 02/04/2011 - 09:03 नवीन
एकदा अनुभव घेतला पाहीजे. वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमीत्ताने सोलापुरला जाणे व्हायचे. आता या निमीत्ताने जायला पाहीजे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद हर्षद, फोटो

नि३सोलपुरकर
Wed, 02/09/2011 - 17:13 नवीन
धन्यवाद हर्षद, फोटो टाकल्याबदल मनःपुर्वक धन्यवाद एक सोलापुरकर म्हनुन खुप अभिमान आहे या परपरेचा. सर्व मिपा कराना पुढच्या वर्षीचं जत्रंच जाहीर आमंत्रण.....
  • Log in or register to post comments

सुरेख आले आहेत फोटो . मस्तं

प्राजक्ता पवार
Wed, 02/09/2011 - 17:23 नवीन
सुरेख आले आहेत फोटो . मस्तं माहिती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा