Skip to main content

आजकाल कावळ्याचे खिडकीवर बसून ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 03/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काऊ तोगे कोकताहे शकुणतोगे मागताहे आजकाल कावळ्याचे खिडकीवर बसून शकून देणे खोटे ठरू लागलेय काल कावळा ओरडत होता माझ्या माहेरच्या घराच्या खिडकीवर बसून मान तिरपी करून वाटले येतात की काय हे ..? मन कसे उधाणले ह्यांची आठवण येऊन कशी उठली शिरीशिरी नि मन गेले हरवून घराच्या बाजूची पाउल वाट सापासारखी वळत गेलेली नागमोडी टोकाला गुलमोहराचे झाड गाडी तेथेच उभी राहते लाल रंगाची हे उतरले की दिसतील मला खिडकीतून किती आसासून गेलेय मन ह्यांच्या आठवणीने सेल दिलाय सोबत पण रेंज येतेय कोठे ...? म्हणून कावळ्याने दिलाय शकून काऊ तोगे कोकताहे शकुणतोगे मागताहे मी वाट बघतेय सकाळची गाडी गेलीय निघून हिरमुसले मन संध्याकाळच्या गाडीची बघतेय वाट ..!! आभाळातील पाखरांची भिरी थंड हवा पसरवित निसटून गेलीय डोक्यावरून आणि ही गाडी पण निघून गेलीय जीवाची काहिली उठवून ही संध्याकाळ काळोख कालवीत बसलीय तुळशीजवळ लावलेली पणती मलूल मलूल नि मन उदास करून जातेय कावळ्याचा शकून खोटा ठरून जातोय नि मन उदास उदास नि हरवून गेले आहे .......!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1874
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

एक लग्न झालेली स्त्री ह्या कवितेतील भाव जास्त चांगले समजु शकते ,खरच खूपच छान!