नेवाळी ?
ही वेल गेली अनेक वर्षे आहे. छाटणीमुळे विस्तार मर्यादीत असला तरी खोड बोटभर जाड झालेल. रोप आणल्यावरच काय जी फुले आली असतील ती. त्या नंतर मात्र जवळपास ५ वर्षांत फुले आली नाहीत; किंबहुना या वेलीली फुले येतात याचा विसर पडला. आणि अचानक गेल्या आठवड्यापासुन वेल बहरली. हा वेल कुंदाचा नक्कीच नाही. बहुधा नेवाळीचा असावा. कुठलाका असेना? त्यावर फुललेल्या फुलांनी खुश करुन टाकले. सकाळी जग आल्यावर प्रथम त्या फुलांवरच नजर जाते आणि मग दिवस सुरू होतो. आपल्याला आनंद देणार्या या छोट्या गोष्टी. बहर संपायच्या आत फुले चित्रबद्ध केली. आता चित्ररुपाने कायम डोळ्यासमोर राह्तील.
लेखनविषय:
वाचने
7987
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मला तर मोगर्या सारखी दिसतायत फुलं. (कळ्या थोड्या लांबट आहेत, पण एखदी पोटजात असु शकते मोगर्याची.)
नेवाळी बद्दल पुर्वी कधी ऐकलं नाही. काही दुसरं नाव आहे का याच?
आवांतर : फुल हुंगायची सोय असती तर कित्ती बर झाल असत. :)
मला असलेली तुटपुंजी माहिती...
ही फुलं नेवाळीची असू शकतील. नेवाळी जाईच्या फुलासारखीच दिसते. पण जाईला जो सुगंध असतो तो नेवाळीला नसतो.
वसईकडे नेवाळीची खूप लागवड होते. तेंव्हा तिथल्या एखाद्या माहितगाराला (किंवा खरं तर मुंबईतल्या एखाद्या फुलवाल्याला) जर फुलं दाखवलीत तर तो नक्की सांगू शकेल.
नेवाळी जाईपेक्षा स्वस्त असते तेंव्हा कधीकधी जाईच्या फुलांमध्ये त्यांची भेसळही केली जाते. :(
चूभूद्याघ्या
In reply to सुंदर फोटो! by पिवळा डांबिस
गजरे करण्यासाठी याचा वापर केला जायचा. जायचा असे म्हणण्याचे कारण असे की आता ही लागवड फारशी केली जात नाही. या वेली बरीच वर्षे फुले देतात.खत पाण्यावर फारसा खर्च करावा लागत नाही .गजर्याच्या धंद्यावर धारावीचे आक्रमण झाल्यावर तगरीच्या कळ्याही भेसळ करायला वापरल्या जातात.
बाकी पिडांकाकांसारख्या जाणकारांना नेवाळी आणि जाईतला फरक एका 'निगाहेत' ओळखता येतो.
मला कुंदाचेच फूल वाटते आहे. मी नेवाळी पाहिली नाहिये कधी.
फोटो खूप सुंदर आले आहेत.
In reply to मला कुंदाचेच फूल वाटते आहे. by प्राजु
मला नेवाळी माहिती नाही. पण ही फुले आणि कळ्या कुंदाच्याच वाटत आहेत.
ताजेतवाने, टवटवीत दिसणारे व बघणार्याला करणारे प्रसन्न फोटो!
क्लासीक!!!
सुरेख फुले. चित्रे बघताना सुगंध आल्याचाही भास झाला.
मला ही काकड्याची फुले वाटतायत...गजर्यांत हीच फुले असतात बहूतेक.
काकडा म्हणजेच नेवाळी.
ही नेवाळीच आहे बहुधा. आमच्याकडे होती ही वेल.
शेवटून तिसरा फोटो आवडला.
हि नेवाळीच आहे.....
कोकणात जागोजागी हि वाढलेली दिसते
वा छान आहेत
पन ही कोकनातच फक्त असतात का?
मला तर आमच्यकडे पन दिसली होती बहुतेक
मला तर ही कुंदाची फुले वाटताय .फोटो एकदम जबराट आले आहेत .
नेवाळी आणि काकडा एकच, आमच्याकडे काकड्याचे गजरे वेगळे मिळतात - लग्नाच्या पहिल्या वर्षात बायकोला द्यायचे मोग-याचे आणि वर्षानंतर काकड्याचे असे माझे काका नेहमी सांगायचे.
एकुंण फोटो फार छान आले आहेत.
धन्यवाद.
फोटो फार छान आले आहेत...................मस्त....मस्त.....खुप आवडले.
सर्वासाक्षी ही नेवाळिच आहे.
माझ्याकडेही खुप बहर आला आहे हिचा.मी परवा संध्याकाळी घरी गेले आणि झाड निरखायला गेले माझी. आणि मला इतका आनंद झाला. माझे नेवाळीचे झाड फुलांनी पुर्ण बहरले आहे. जणू काय त्या झाडाने स्वत:ला गजरे घालुन सजवलय असच मला वाटत होत. एक मोह होत होता की ही सगळी फुल काढून घ्यावीत आणि त्याचे हार आणि गजरे बनवावेत पण ही वेल इतकी सुंदर दिसत होती की मला त्यावरुन फुल काढवली नाहीत. मी तशीच ठेवुन दिली झाडावर.
मस्त दिसताहेत गं नेवाळी, जागू!
सुरेख आले आहेत फोटो. मलादेखील आधी कुंदाचीच फुले वाटली होती पण आता नेवाळी ही नविनच माहिती मिळाली. जागुच्या अंगणातील वेलदेखील छान बहरली आहे.
मला तर मोगर्या सारखी दिसतायत