हात आखाडता घेउ नका! अजुन भाग येउ द्यात!
रच्याकने, माझ्याकडे एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशनचे चार सीजन्सचे व्हिडिओज आहेत. कोणाला हवे असतील तर घेउन जा! वर्थ वॉचिंग! :)
क्युम्युलोनिम्बस ढग - काळे, विजा आणि वादळी वारे, हवेचे अतिशक्तिमान प्रवाह यांनी युक्त ढग.
आवश्यक ग्लाईडस्लोप - लँडिंगपूर्वी विमान खाली खाली येताना, शेवटी रनवेवर एकदम योग्य त्या बिंदूला जमिनीस्पर्श व्हायचा असेल तर जो काल्पनिक उतारमार्ग हवेत मेंटेन करावा लागेल तो.
फ्लाईट डिस्पॅचर : हवामान, तांत्रिक आणि कायदेशीर असे सर्व प्रकारचे क्लिअरन्सेस मिळवून विमान उड्डाणासाठी तयार करणारा आणि पायलटला प्रीफ्लाईट ब्रिफिंग देणारा एअरलाईनचा अधिकारी.
सोलो क्रॉस कंट्री - एकट्याने केलेले दोन विमानतळांमधील किंवा दोन ठिकाणांमधील उड्डाण. (एअरपोर्टच्या आसपासचे जनरल प्रॅक्टिस फ्लाईंग नव्हे)
कोर्स सेट केला: विमानाचे नाकाड एका दिशेत टिकवून फिक्स केलं.
ट्रॅक - इष्ट ठिकाणी पोचायचे असेल तर ठेवावा लागणारा फ्लाईटचा अपेक्षित मार्ग
व्हिज्युअल फ्लाईट : इन्स्ट्रुमेंटवर अवलंबून नसलेली आणि डोळ्यांनी जमिनीकडे पाहून मार्गाची खात्री करुन घेणारी फ्लाईंगची पद्धत. फक्त ढोबळपणे दिशा कळण्यासाठी कंपास वगैरे.
ऑटोपायलट : टेक ऑफ करून विमान एका पातळीवर लेव्हल झालं की पुढे त्याला ठराविक दिशेत, ठराविक उंचीवर उडत राहण्यासाठी केलेली ऑटोमॅटिक सोय. या मोडमधे टाकल्यावर विमाने बर्याच गोष्टी आपोआप सांभाळतात. बोईंग, एअरबस आणि जनरली कमर्शिअल विमानांत असते.
स्पिन : विमानाला खाली कोसळताना जर अनियंत्रित सर्पिलाकार गती मिळाली (वाळके पान जसे गरगरत खाली कोसळते) तशी अवस्था प्राप्त झाली तर त्यातून रिकव्हर होणे जवळजवळ अशक्य असते. पायलटसनाही अशा वेळी काही उमज पडणे अवघड असते.
सर्किट ब्रेकर्स : इलेक्ट्रिक उपकरणांसाठी असलेली फ्यूजसदृश स्विचेस.
फ्लॅप्स : पंखांवर असलेले एक्स्टेंडेबल भाग. हे खालीवर करून पंखांचा आकार बदलता येतो अतएव पंखांना मिळणारी उचल कमीजास्त करता येते. टेक ऑफ किंवा लँडिंग याचा ग्रेडिएंट (स्लोप) तीव्र किंवा उथळ करण्यासाठी अत्यावश्यक. अन्यथा लँडिंगच्या वेळी अतिरिक्त वेग शिल्लक राहून रनवेवरच विमान अनावर होऊ शकते.
(किंवा उलट केसमधे टेक ऑफनंतर लगेचच एखादी टेकडी असेल तर हे फ्लॅप्स झटपट उंच चढून टेकडी टाळण्यास मदत करतात.)
यात राहून गेलेला कुठला असेल तरी जरुर विचारा.
छान लिहलय!
हवेत किंवा जमिनी वर अचानक काही होत नसत, चुकांची मालीकाच घडत असते हे खर आहे.
(या वरुन मला कुंगफु पांडा मधल " कोइ हादसे नही होते" हे वाक्य आठवल.)
गवि, धन्यवाद, खुप छान लिहिलं आहेत. एक शंका आहे, जेंव्हा विमानाच्या ईंधन टाकितुन ईंधन गळतं ते हवेतच उडुन जातं की पेट घेतं कि काय होतं त्याचं नक्की ? गाडीतुन गळणा-या ऑईल किंवा पेट्रोलचि जशी धार लागते तसं काहि होतं का ?
धन्यवाद.
गाडीतून गळण्यासारखंच.. हवेत उडून जातं. पण तिथे काही हीट सोर्स, ठिणगी असेल तर पेट घेतं.
अर्थातच कुठल्या पार्टमधून आहे लीकेज त्यावरही आहेच अवलंबून..
या केसमधे लिन्केजमधूनच पाईप कट झाला होता त्यामुळे नुसतंच गळून गेलं..
मुद्दामही टाकून द्यावं लागतं. लँडिंग वेट एक्सीड होत असेल तर.
(म्हणजे टेकऑफनंतर इंधन बर्न व्हायच्या आधीच इमर्जन्सी लँडिंगची वेळ आली तर फ्युएलसहित वजन घेऊन लँडिंग शक्य नसतं..तेव्हा..)
फ़्युएलचं वजन फार जास्त असतं.फेकावं लागेल की नाही हे मुळात किती भरलंय त्यावर अवलंबून आहे.
समज फ़्लाईट्मधे 2000 किलो इंधन भरले आहे.विमानाचे with passengers वजन 9000किलो आहे. Total Takeoff weight=11000.
समज max अलाउड लँडिंग वेट 10000 किलो आहे.
फ़्लाईट पूर्ण पार पडली तर समजा 1500 किलो इंधन खर्च होईल आणि लँडिंग वेट 9500 राहील.
पण टेकऑफ़नंतर लगेच emergency landing वेळ आली तर विमान 11000 किलोचे असेल.मग 1000 किलो फ़ेकावे लागेल.असे एकूण गणित.
ओ गवि, तुम्ही हे राम नका म्हणू इतक्यात.
@गणेशा :- तो वेगळा पायलट नाही हो, पायलट प्रकार चार चे नाव आहे. वाचण्याच्या नादात ती संज्ञा विसरलात बहुतेक तुम्ही.
@ रेवती, खरंय अगदी खरंय
हे म्हणजे डायटिंग करणा-याने गणपा / स्वाती / प्राजु आणि इतर सुगरिणि व बल्लवाचार्यांचे लेख पाहण्यासारखं आहे.
पाहुन भिती वाटते आणि पाहिल्याशिवाय राहवत नाही.
हर्षद.
गवि,
तुमचे लेख खरंच फार माहितीपूर्ण असतात. काहिच माहिती नसलेल्या विषयातलं ज्ञान थोडं असलं तरी बरंच काही कळल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुमचे हे विमानसंबंधी लेख आवडतात... मस्त लिहिता तुम्ही.
पण खरंच मनात भिती वाटते हो! आधी वाटायचं आपल्याला पण विमान उडवायाला मिळायला हवं, कसली मज्जा येत असेल... आता विमानात बसले की पूर्ण वेळ मी तुमच्या लेखांची आणि पेपरातल्या काही बातम्यांचीच उजळणी करत असते. हा फोबिया घालवायला हवा!
अफाट लिवलय, गवि...
>>अगदी पायलट नसलेल्या इतर सर्व व्यक्तींमधेही या टेंडन्सीज असतातच. आणि हेच स्वभावविशेष अशा किंवा दुसर्या काही नावांनी इतर क्षेत्रातही चर्चिले जातात..
मान्य.. माझ्यात थोडा "इंपल्सिव्ह"चा अंश आहे, असं वाटतं, बट नॉट अॅट ऑल रेझिग्नेटरी...
>>इतर क्षेत्रात तरी ते परवडतात हो.. पण पायलटच्या आयुष्यात मात्र त्याचे परिणाम भीषण होतात.
हे तर प्रचंड मान्य... मी (पायलट नसलो तरी) दुसर्यांवर परीणाम होऊ शकणार्या गोष्टींमधे माझ्या स्वभावाला मुरड घालण्याचा प्रयत्न करतो...
धन्यवाद गगनविहारी जी...
तुमचे या विषयातील लेख मी घाबरत- घाबरतच वाचतो.. पण वाचतोच.
मी १९९५सालापासून विमान प्रवास करत आहे .. आणि गेल्या दहा वर्षात कामाच्या निमित्तने मी अनेक वेळा भारत भ्रमण केले आहे. सर्वसाधारण पणे मी महिन्यातून ३-४ वेळा अरत -परत विमानप्रवास करतो.
पण माझी भिती अजून गेली नाही. प्रत्येत वेळी उड्डाण भरताना माझ्या पोटात गोळा येतो . मी एकतर तोंडाने स्त्रोत्र पठण करतो किंवा कानात तेच वाजवतो. विमान स्थिर होऊन पट्टे काढण्याची सूचना येईपर्यंत मी अस्वस्थच असतो. तसेच खराब हवामानामुळे पुन्हा पट्ट्यांची सूचना आली की पुन्हा पोटात गोळा! उतरताना इतकी भिती वाट्त नाही, कदाचित आपण आता लवकरच जमिनींवर उतरणार म्हणून असेल.
इतका प्रवास करुन ( काही परदेशी उड्डाणे - ८ /८ तासांची देखील ) माझी भिती कमी का होत नाही? तसेच अनेक जणांची उड्डाण भरताना तंतरलेली मी पहिली आहे .. हे असे घाबरणे सामान्य आहे का? एरव्ही मी उंचीला भीत नाही. महाराष्ट्रातील बहुतेक अवघड गडे- कोटांवर जऊन आलो आहे ..पाण्याला तर अजिबात भित नाही.. समुद्रात अनेक वेळा पोहलोदेखिल आहे !
पण खराब हवामानात जेव्हा दाबाचा पट्टा निर्माण होऊन विमान अचानक खाली जाते ; तेव्हा देखील काही जण त्याची मजा घेऊ शकतात ! असे का होते? याचा मनःस्थितीशी काही संबंध आहे का?
एकदा एक डिल फिस्कट्ल्यावर मला विमानप्रवासची इतकी भिती वाट्ली की मी तिकिट र् द्द करुन रेल्वेनी आलो !
तसेच वजन जास्त असण्याचा आणि विमान प्रवासाच्या भितीचा संबंध आहे असे मला एक पायलट म्हणाला .. हे खरे आहे का? बहुधा नसावे .. इंडियन एअरलान्स च्या हवाई सुंदरी (?) पाहिल्यावर इतके सड्पातळ कारण असावे असे वाट्त नाही?
एक सल्लागार म्हणाले की हा फोबिया नव्हे.. फोबिया झाला तर प्रवास करताच येणार नाही?
काही प्रकाश टाकता येईल का?
या विषयावर वेगळं लिहावं लागेल.
मी ही या बाबतीत बराच फोबिक आहे. आणि एकदा का विमानोड्डाण शिकले की मग स्वत:कडे कंट्रोल नसताना काय अवस्था होते ते मलाच माहीत.
फोबिया हा खूप तीव्र असला तर प्रवास करताच येणार नाही पण सौम्य भीती असू शकते. क्रॅशच्या बाबतीत काही वाचलं पाहिलं असेल तर कायमची मनात बसू शकते.
विमानात आपल्याला दारेबिरे हवाबंद करून आयसोलेट करण्यात येतं आणि जमिनीचा आधार सोडून आपण लिटरली त्रिशंकू अवस्थेत संपूर्ण हेल्पलेस आहोत असा फील येत असल्याने इतर वाहनांपेक्षा त्यात जास्त भीती वाटते.
त्या अपघातांविषयी आणि एकूण विमानांविषयी अधिक माहिती घेतली तर ही भीती खूप कमी होऊ शकते.
आता यापुढे एअर क्रॅश ऐवजी एअर सेफ्टीवर काहीकाळ लिहीन..त्याने विमानप्रवासाच्या भीतीवर काही दिलासा मिळू शकेल.
गगनविहारींच्या हक्काच्या विषयातली आणखी एक झकास भरारी :)
एकडाव गवि विमान उडवताना सोबत जायला पाहिजे! मजा येईल. :)
(नंतर मी सब-किरवंत म्हणून ब्रँच उघडेन. ;) )
लेख मस्तच आहे....मला विमानप्रवास फारसा आवडत नाही, आणि आता परत अशा प्रवासात तुमच्या लेखांची आठवण होऊन तो पायलट काय करत असेल हेच विचार येत राहतील.
असो...लिहित राहा ...माहिती मिळते.
आईच्यान खतरनाक लेख.
धन्य ते पायलटस.
विमानप्रवासात वर विटेकरांनी म्हंटल्याप्रमाणे ब-याच वेळेला टरकते.
झक मारली अन विमानात बसलो असे वाटते. अन हवामान खराब असेल तर विचारायलाच नको.
सुरुवातीला तर पार तंतरायची.आताशा एवढा त्रास होत नाहि.
मागे फयान वादळाच्या आसपास चंडीगढ-मुंबई असा प्रवास केला होता.
पुर्ण प्रवासभर विमान नुसते हिंदकळतच चालले होते. कसाबसा मुंबईला पोहोचलो अन शेवटी सुटकेचा निश्वास टाकला.
परंतु पुर्ण प्रवासभर ट्र्क/एसटी मधे बसून प्रवास करतोय असेच वाटत होते.
विमानात बसल्यावर होणारा अजून एक त्रास म्हणजे,लँडिंगच्या दहा मिनिटे आधीच डोके दुखायला लागते. कान फाटल्यासारखे होतात. जीव नकोसा होतो.
असो,
दोन्ही लेख वाचले. उत्तम.
अभिज्ञ.
गवि,
हतबल न झालेला तो जिगिषुबल वैमानिक कोण होता? रॉबर्ट पिशे तर नव्हे? भर अटलांटिकावर इंधन समाप्त आणि पोर्तुगालमधला नजीकचा विमानतळ १२० किमी दूर, यावरून आठवलं. जबरदस्त प्रसंगावधान राखून होता तो.
आ.न.,
-गा.पै.
हो. तोच तो.
आणखी एक गिमली ग्लायडर या नावाने प्रसिद्ध घटना आहे. समुद्रावर नाही पण जमिनीवर अशक्यप्राय अंतर विनाइंजिन काटणं असलेली. तेही इंधन भरताना युनिट्सच्या गोंधळामुळे. त्यातले पायलट्स तर आणखीच भारी म्हणायचे. त्याविषयी पूर्वी इथे वेगळं लिहीलंय.
हो. तोच तो. >> त्याच्याबद्दल तुम्ही लिहिल्याशिवाय वाचणार नाही. एअरक्रॅशबद्दल तुम्ही लिहिण्याचा एक उंच बेंचमार्क सेट केलाय. विकिपीडियावरील माहिती त्याच्या पासंगासही पुरत नाही. समस्त मिपाकरांतर्फे मी आपल्याला विनंती करतो ह्या रेकॉर्ड ग्लायडींग केस बद्दल लिहा.
थँक्स..
गिमली ग्लायडर ही अनेक बाबतीत तशीच केस आहे. इंधन भरताना चुकीने कमी भरणं व्हर्सेस फ्युएल पाईप लीकेज असे कारणांचे फरक, पण ग्लायडिंग सेम.
साम्य असल्याने वेगळं लिहीलं नाही.
गवि,
मी ऐकलेलं की रॉबर्ट पिशे चालवत असलेल्या ट्रान्सॅट २३६ विमानास घातपात केला गेला होता. प्रमुख यंत्रज्ञाची (मेक्यानिक) एक भाग बदलण्याविषयी चिंता दुर्लक्षण्यात आली, असा विकीवर विदा आहे. खखोदेजा.
आ.न.,
-गा.पै.
प्रतिक्रिया
धन्यवाद
छान लिहीता!
हे गवि सगळ्यांचा विमान प्रवास
माहितीत भर पडतेय गवि. येउद्या
असेच
हेच म्हणतो मी
गवि उत्तम लेखन, वाचतोय. मात्र
देतो..
लगोलग शंकासमाधानाबद्दल धन्स
गवि नेहमीच छान लिहितात. पुढचा
गवि एकदम थरारक अनुभव
छान लिहलय! हवेत किंवा जमिनी
भन्नाट आहे
गवि, धन्यवाद, खुप छान लिहिलं
गाडीतून गळण्यासारखंच.. हवेत
अहो, गवि. सहज एक शंका. टेक ऑफ
फ़्युएलचं वजन फार जास्त
श्री. गवि. शंका समाधानाबद्दल
प्रभावी
+१
+२
अतिशय सुंदर अनुभव लिहिले
रेझिग्नेटरी पायलट्स म्हण्जे
ओ गवि, तुम्ही हे राम नका
तुम्ही माझा विमानप्रवास बंद
@ रेवती, खरंय अगदी खरंय हे
वा!! समर्पक उदाहरण दिलत.
माहितीपूर्ण
अॅज युजूयल...
धन्यवाद गवि. मस्तं लिखाण केले
छान
+१
फोबिया
या विषयावर वेगळं लिहावं
विमानप्रवासाचे पायलटच्या
झकास!
लेख मस्तच आहे....मला
वा गवि वा १!! मजा आ गया भाई
आईच्यान खतरनाक लेख. धन्य ते
;)
मस्त!
जिगिषुबल वैमानिक कोण होता...?
हो. तोच तो.
धन्यवाद.
हो. तोच तो. >> त्याच्याबद्दल
थँक्स..
वा! भरपूर लेख वाचलेत तुमचे!!
वा! भरपूर लेख वाचलेत तुमचे!!
मी ऐकलेलं की ....
गवि काय भन्नाट लिहिले आहे हो