(सख्या चला बागामधी)
लेखनविषय:
काव्यरस
वास्तव बदललं तरी आठवणी पुसल्या जात नाहीत. कांदा उतरला म्हणतात. कवितेची वेळ जरी चुकली तरी वेदना अजून ताज्याच आहेत.
या कांद्याचं मूळ येथे आहे.
सख्या चला बागामधी , पेरु कांदे चला.
चिराल जेव्हा कांदा , आज राती ,
दारे लावुनि घ्यावी आधी.
तेलभरी किटली जी तिजोरीत होती ,
नका करु ती बदकन रिती ,
नाही बाप तुमचा राजा-सेनापति
(काड्या छत्रीला लावती)
लोड होईल मग , महिना अखेरीस मला ,
सख्या चला बागामधी , पेरु कांदे चला.
आणला होता कांदा जेव्हा घरी ,
पूड केली त्येची वाळवुनि,
जसा , लावि कुणी अंगारा भाळावरी ,
तशी करते मी फोडणी,
टाचा घासती , पोरं पडून उत्ताणी
(कांदेनवमीच्या नावानी)
आता राया चला पेरू , शिणगाराचा झरा,
सख्या चला बागामधी , पेरु कांदे चला.
वाचने
1825
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
लय भारी
नाही बाप तुमचा
(विषय दिलेला नाही)
मस्त
मस्त!
जमलंय, मात्र कांदे पेरु चला
खूप आवडली.
कविता एकदम छान .. आवडली