Skip to main content

तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी चा॑गले जमते.

लेखक शितल यांनी गुरुवार, 05/06/2008 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझे ज्या लोका॑शी छान मैत्री होते त्या लोका॑ची रास मी आवश्य नोद॑वते. माझी रास कन्या माझ्या नवर्‍याची ही कन्या पण एकाच राशीचे असुन आम्ही अत्य॑त वेगळ्या मता॑चे आहोत आणि माझ्या नवर्‍याच्या मते अशाच जोडप्याचा स॑सार छान होतो. पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्‍याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही. लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे. माझ्या मित्र मैत्रिणी धनु, सि॑ह, आणि तुळ ह्या राशीच्या लोका॑शी माझे छान जमते. मेष राशीशी अजिबात जमत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 91859
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by बेसनलाडू

>>मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! तात्या, आजकाल मिपावर उपद्रव इतका का वाढला आहे ह्याचे उत्तर मिळाले का? त्या काकाला तू हाकलुन लावलेस पण पुतण्याचे काय? (सावध) खरा डॉन बाकीचे क्लॉन...

मेष- साठ वर्षं अपमान लक्षात ठेवणार. वृषभ-रसास्वाद हेच जीवन मिथुन-वेगवान विचार. पण खोली कमी. कर्क-फार जपून बोलाव लागतं. टचकन पाणी डोळ्यात. सिंह-मोठेपणा द्या. काय वाट्टेल ते मागून घ्या. कन्या-वि. सू.-ही मुलं झोपली आहेत असं वाटलं तरी झोपलेली नसतात. तूळ -बायको असेल ह्या राशीची तर संसाराची नैया पार. वॄश्चीक-कुढणार. विसरणार नाही. धनू-ह्या घडीला माणूस आहे कि जनावर ते तपासा. मकर-व्यवहार निपूण. कुंभ-ज्ञानी ?होय. उपयोग-तुम्हाला माहीत असेल तर करून घ्या. मीन-अनामीक ताणाची रास. सर्व शास्त्रींची माफी मागून वर्णने लिहीतो आहे. खरी आहेत ताडून बघा.

In reply to by रामदास

मस्त!!!!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

उत्तर देईन देईन म्हणेस्तोवर विसरूनच गेलो आणि ५० च्या वर प्रतिसाद गेलेदेखील?! :) आत्ता भाग्यश्रीने आठवण करून दिली तेव्हा प्रथमच बघितला हा थ्रेड! असो, भाग्यश्रीची खात्री खरी आहे, माझी रास मिथुनच आहे! :) आमचे रामदासबुवा म्हणतात त्याप्रमाणे वेगवान विचार परंतु खोली कमी! :( चालायचंच! सगळ्यांनी जळ्ळं खोल खोल होऊन कसं चालेल? आमच्यासारखे काही उथळ नकोत का? आणि अहो आमच्यासारखे काही उथळ आहेत म्हणूनच तर तुम्हा खोलीवाल्यांचं जळ्ळं कौतुक! काय रामदासबुवा, खरं की नाय? :) आपला, (बोलण्यात वस्ताद!) मिथुनेचा तात्या!

माझी पण कन्या रास च आहे. ओफिसच्या मिंटींग मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न माझेच. खुप त्रास होतो, प्रश्न विचारले नाहीत तर, सतत उलटी झालया सारखे वाट्ते. आणि कोणताही निर्णय घेण्याआधी इतकी म्हाहीती जमवतो, बाकीचे लोक वैतागुन जातात.

मिथुन ,तूळ,कुंभ या तिन्ही राशी एकाच जातकुळीच्या .विचाराचा वेग याच क्रमात घटत जातो. मिथुनेचे काही गुण.अंकगणित पक्के.आडाखे ,अंदाज ,अचूक असतात. डे ट्रेडींग , सट्टा यात यशस्वी होतात. प्रत्येक क्षण जगतात. अवांतर-मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस?

In reply to by रामदास

>मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस? एक पायरी वर असाल तर तुळ आणि दोन पायर्‍या वर असाल तर कुंभ.. याहून जास्त पायर्‍या वर असाल तर कल्पना नाही बॉ !

सतत सर्वे घेणारे राजे यान्ची रास कोणती असावी? मला वाटते, कन्या असावी.

मिसळपार्टी 'मला' द्यावी लागणार नाही म्हणून बरं वाटलं.. पण एकत्र जमायची संधी हुकली हे वाईट! असो.. http://bhagyashreee.blogspot.com/

माझी चन्द्र रास कर्क आहे आणि लग्न रास (ascendant) कन्या आहे. साधारणपणे चन्द्र राशिवरुन मनाचा ठाव घेता येतो, पण स्वभाव विशेष, अथवा behaviora characteristics लग्न राशिवरुनच कळ्तात.

कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात. पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक. बापरे माझ्या हीचे वडील कन्या राशीचे आहेत्.(त्यांच्या मनात अजुन शन्का असावी असे वाटते मला) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे. पण मी म्हणते विषय हा होता की तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी पटते पण जो तो आपली रासच फक्त सा॑गु लागला बाकी चे गुडा॑ळुन टाकले का ?

>>> मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे. मलाही :S :

माझी रास मिथुन ,पण मी कधी कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही.

मी अस्सल...पक्का....अगदी अर्क असा वृश्चिक.... एखाद्यावर जीव टाकला तर साला स्वतःच्या हाताने स्वतःची गर्दन त्याच्यासाठी उतरवून देणार्...पण जर एखादा तिरक्या चालीनं वाकड्यात शिरला तर मग मात्र त्याची गर्दन स्वतःच्या हातानं उतरवून गावाच्या वेशीवर टांगायला कमी नाही करणार! अतिशयोक्तीचा भाग सोडून देऊ आपण, पण आहे हे असं आहे. पण माझी 'सन-साईन' 'जेमिनी' आहे :) म्हणजे मिथून की हो....इथुन तिथून मिथून :)) (आता कळलं आमच्या प्रतिसादांतल्या उथळपणाचं कारण?) त्यामुळे वृश्चिकेची नांगी बर्‍याचदा मिथुनेच्या घोळात दडून जाते. ह्याउप्पर आणखी काय बोलावे? वृश्चिकेचा हलकटपणा, क्रुरता, केलेले वार लक्षात ठेऊन त्याचा सूड घेण्याची वृत्ती.. मिथुनेचा खेळकरपणा, सहज मैत्री करण्याची कला, फार वेळ लांबट तोंड करुन बसता न येता सतत दाताड वेंगाडून हसत राहणे, चकाट्या पिटणे...इ.इ. सगळे प्रकार ह्या एकाच चिमुकल्या देहात तुम्हाला आढळून येतील :)

आम्हि सिंह आणि आमचे कन्या राशिशि फार चांगले जमते... तशि सिंह रास शब्दांचि कोटि करुन इनोद करणारि... आमचि आई सिंह (रास ) " हेड & शोल्डरनि खांदे पण धुतात का?" आपला मयुर

सि॑ह राशीचे माणसे आयुष्य छान जगतात. पण ते फक्त स्वतःच दुसर्‍याला त्या पासुन त्रास होतो ते, ते गृही त धरत नाहीत. हो कन्या राशीचे सि॑ह राशीशी चा॑गले जमते, पण नवरा बायको जर एकाची सिह॑ आणि एकाची कन्या असेल तर ते एकमेका॑ना मागे ओढ्तात. आपल्या राशी पासुन सहावी रास असलेल्या व्यक्ती शी लग्न करत नाहीत म्हणजे त्या॑चे जमत नाही.

सि॑ह राशीचे माणसे आयुष्य छान जगतात. पण ते फक्त स्वतःच दुसर्‍याला त्या पासुन त्रास होतो ते, ते गृही त धरत नाहीत. त्रास??? क्रुपया जरा स्पष्ट सांगाल का?? (स्वःता मध्ये सुधारणा करण्यासाठि) आपला मयुर

म्हणजे कसे ते पहा मयुर साहेब, सि॑ह राशीची लोक मस्त रूबाबात राहतात, छान मस्त पैसा खर्च करतात फक्त स्वतःच्या दिसण्यावर आणि आवडी निवडी बाबत ते कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत, कितीही महाग असली तरी आवडे खातर ती घेणारच, आणि देण्या घेण्यात ही हात आवरता नाही सगळे कसे दिव्य भव्य असते. त्यामुळे दुसरा झाकुन जातो नाही का? बाकी मी म्हणेल तीच पुर्व दिशा असे,पण प्रेमाने सा॑गाल तर जीव ही देतील.

सि॑ह राशीची लोक मस्त रूबाबात राहतात, छान मस्त पैसा खर्च करतात फक्त स्वतःच्या दिसण्यावर कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत हे मान्य आणि आवडी निवडी बाबत ते कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत ९०% करतो कितीही महाग असली तरी आवडे खातर ती घेणारच, आणि देण्या घेण्यात ही हात आवरता नाही मि बहुतेक अपवाद आहे, फुकट ते पौष्टिमाननारा मि...देत नाय घेत पण नाय... आपला वसुल च आहे आपला मयुर

माझी चंद्र रास = वृषभ लग्न रास = मीन सूर्य राशी (पाश्चात्य) = मीन प्रथम स्थानी (लग्नी) मीनेचा शुक्र (गुरुच्या राशीत शुक्र) तृतीय स्थानी वृषभ राशीत गुरु-चंद्र युती (शुक्राच्या राशीत गुरु) माझे प्रश्नः (१) प्रथम स्थानी (लग्नी) मीनेचा शुक्र असल्यास काय होते? ते चांगले की वाईट? (२) माझ्यावर शुक्राचा की गुरुचा जास्त प्रभाव आहे? ---निमिष सोनार, पुणे

मला रास भविष्य कळ्त नाहि..माझी रास ॠषभ आहे..मला माझ्झा राशि बद्दल कुणी माहिती कळवा

माझी चंद्र रास कर्क. मी रडले नाही अशी एकही जागा नाहीये जळी स्थळी काष्ठी पाषाणी रडून झालय . लग्न मिथुन .... पुस्तक वाचनाचा अतोनात नाद. उथळपणा सुद्धा बराच :D सूर्य रास धनू की मकर ते एक देवालाच माहीत. - २२ डिसेंबर मला आवडणार्‍या लोकांमध्ये मंगळ ग्रहाचं प्राबल्य खूप असतं - वृश्चिक अथवा मेष - लढाऊ लोकं मला पटकन आवडतात. माझा मंगळ खूप छान आहे. वृश्चिकेचा. त्याला तोडीस तोड व्यक्ती आवडतात. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

माझी जन्म नावावरुन येनारी रास चालू नावावरुन येनारी रास बोली नावावरुन येनारी रास मिपा नावावरुन येनारी रास या सर्व वेगवेगळ्या आहेत.

२००८ ते २०१०!!!!!! अजूनही माझी रास कोणती हे कोणीही मिपाकर अचूक सांगू शकलेला नाही!!!! (आणि यातच माझे यश सामावलेले आहे! जय हिंद!!) :)

मस्त थ्रेड. सगळा वाचला. मकर बद्दल काही सापडेल म्हणुन पाहिले पण विशेष काही सापडले नाही. मला वाटते मकर राशीचे लोक जास्त नेट वर वावरत नाहीत वाटते.