✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी चा॑गले जमते.

श
शितल यांनी
गुरुवार, 06/05/2008 - 22:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
91659 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

श
शितल Fri, 06/06/2008 - 00:05 नवीन

...

शरद उपाध्ये धनुवाले आहेत. हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं अरे प्रत्येक गोष्टील अपवाद असतात आता त्या॑ची आणि तुझी रास धनु म्हणुन म्ह॑टले. वाईट वाटुन घेऊ नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
व
विजुभाऊ Fri, 06/06/2008 - 14:51 नवीन

ओळखा पाहु

ओळखा पाहु जर कुंभकर्णाची रास कुंभ होती .....तर..... ***कर्णाची रास कोणती? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
श
शितल Fri, 06/06/2008 - 00:03 नवीन

कन्या.

कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात. पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 06/06/2008 - 00:03 नवीन

अरे हो

ते कपटीपणा हा लोकांमध्ये असतो ते बोल्लो होतो मी. राशीच नाही हा. :) तात्या नक्कीच मिथुन वाला असणार. तस मी वाचलय कुठेतरी. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/06/2008 - 00:06 नवीन

तात्यांची

तात्यांची रास मिथुन आहे हे मी पण वाचलय.. कुठे कोण जाणे.. तेच सांगतिल खर काय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
इ
इनोबा म्हणे Fri, 06/06/2008 - 00:08 नवीन

अरे,

मग आपला मिथून कुठल्या राशीचा असेल रे? :) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
म
मन Fri, 06/06/2008 - 00:07 नवीन

माझी

रास मेष ते मीन यापैकी कुठलीच नसुन "चक्रम" नावाची एक वेगळीच १३वी रास आहे. असं माझे जवळचे दोस्त म्हणतात. त्यामुळं उपाध्ये साहेबांनी सांगितलेले कुठलेच "एखाद्या राशीशी न जुळणे" वगैरे नियम अपुनको लागु नही होते है. सगळ्याच राशी वाले दोस्त आहेत बुवा आपल्याला. बाकी जोक्स अपार्ट माझी रास कन्या . ....... पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्‍याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही. लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे. विश्वास ठेवा अगर नाही; पण हे तंतोतंत मला ही लागु होतयं. माझीही जन्मरास आहे कन्या. आणि कर्क लग्न! आणि पुन्हा तेच कुंडली वर चंद्राचा फारच प्रभाव आहे असं बर्‍याच जणांनी सांगितलयं. आणि त्यात पुन्हा गुरु-चंद्र का गुरु- मंगळ अशी कसलिशी युती आहे म्हणे कुंडलीत(गूढ ज्ञानास कारक.) त्यात जोडीला गूढ ज्ञानवाला नेपच्युन का प्लुटो उच्च्चीचा. (त्यामुळचं माझं व्यवहार ज्ञान मात्र "अगाध" आहे असं तीर्थरुप म्हणत असतात. :-) :-) ) आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 06/06/2008 - 08:26 नवीन

मनोबाची रास

मनोबाची रास तेरावी आहे!!!! शरद उपाध्येंवर ८९-९० च्या आसपास माहिम पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. दृढ श्रद्धा रोपण समिती नावाच्या कुठल्या तरी समितीने हे प्रकरण काढल होतं. महिला व आर्थिक शोषण संदर्भात.त्यावेळी त्यांचे ज्योतिष वर्ग चालू होते. नंतरच्या काळात त्यांचे राशीचक्र हे कार्यक्रम चालु झाले. ज्योतिष वर्गाला नंतर रामराम ठोकला. पन लै भारी मानुस बरका? बराब्बर मान्सांची नाडी पकाडतयं! पब्लिक मेमेरी इज आल्वेज शॉर्ट हे तत्व ११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का? वाचा. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
श
शितल Fri, 06/06/2008 - 00:10 नवीन

तात्या ऐकताय ना ?

तात्या तुमची रास कोणती हे सर्व मि पा करा॑ना जाणुन घ्यायची लै इच्छा आहे. मिथुन असावी असा अ॑दाज मि पा करा॑नी लावला आहे. तुम्हीच सा॑गा तुमची रास कोणती ते.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/06/2008 - 00:12 नवीन

अंदाज नाही

अंदाज नाही खात्री आहे.. :) चुकलं तर सगळ्याना मिसळ माझ्याकडून.. :) (कोणी जवळ राहात नाही माझ्या, ते बरयं!! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
झ
झकासराव Fri, 06/06/2008 - 00:15 नवीन

(कोणी जवळ

(कोणी जवळ राहात नाही माझ्या, ते बरयं!! )>>>>>>>>>>. पुण्ञात कधीतरी येशीलच की. :) तसहि उत्तर चुकणार नाहिये म्हणा................. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
श
शितल Fri, 06/06/2008 - 00:15 नवीन

मजेत.

मग चालेल, मग देव करो आणि तुझा अ॑दाज चुको.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 06/06/2008 - 01:22 नवीन

मला वाट्टं

तात्यांची रास वृश्चिक असेल....ते बराच वेळ शांत रहातात आणि राग आला तर मात्र सरळ नांगी... बाय द वे शितल मी पण कन्या आणि सॉलिड चंचल...बर्‍याच वेळा खूप कन्फ्युज्ड असते.... पण प्रचंड चिकित्सक आणि शरद उपाध्येंच्या म्हणण्याप्रमाणे साएंटीस्ट पण झाले गं....
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/06/2008 - 02:10 नवीन

अग॑ वरदा,

मिथुन आणि कन्या राशीचे लोक प्रच॑ड बुध्दीमान असतात. (राशी स्वामी बुध आहे ना दोन्ही राशी॑चा ) आणि कन्या राशीचे लोक कायम च॑चल ही असतात हे करू का ते करू आणि दोन्ही दगडावर पाय ठेवुन चालणारे.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 06/06/2008 - 20:10 नवीन

एक्झॅक्टली

कसल्या बुद्धीवान आहोत आपण दोघीही..... चंचल पणा तर ह्या जन्मी नाहीच जाणार माझा...कसली गोंधळलेली असते मी सदानकदा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
श
शितल Fri, 06/06/2008 - 21:27 नवीन

असेच

अग वरदा तुझे ठिक आहे तु सायटि॑स्ट आहेस तुझी हुशारी जग जाहिर पण मी कन्या राशीची असुन मी त्या राशीला अपवाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वरदा Fri, 06/06/2008 - 22:25 नवीन

अज्जिबात नाही

हुशारी म्हणजे अभ्यासातली असं कोन म्हणतं? व्यवहारचातुर्य असू शकतं कलेत हुशारी असू शकते...अगदी मुलांना सांभाळण्यात सुद्धा हुशारी लागतेच्.....तेव्हा तू माझी हुशार मैत्रीण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
ब
बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 02:47 नवीन

चंद्ररास तूळ, लग्नरास वृश्चिक

माझी चंद्ररास तूळ तर लग्नरास वृश्चिक. चंद्र मनाचा कारक तर लग्न तनूचे (रंगरूप,मेंदू(बुद्धी?)). त्यामुळे होराभूषण धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे -
  1. मेषेसारखे मागचा पुढचा विचार न करता हे लोक धडक देणार नाहीत, कर्केसारखे अती भावनाप्रधान होऊन जगाने मला कसा त्रास दिला हे रडून रडून सांगणार नाहीत आणि आयुष्यात जी परवड वाट्याला आली त्यावर कविता करत बसणार नाहीत, वृश्चिकेसारखे आपल्या जहरी बोलण्यातून उगाच कोणाला दुखवणार नाहीत, सिंहेसारखे आपण कोणीतरी ’ग्रेट’ आहोत आणि जगाने आपल्या पाया पडावं अशा अविर्भावात वावरणार नाहीत, मिथुनेसारखे कधी कधी बालीश आणि अल्लडपणाने वागणार नाहीत, मीनेसारखे इतरांकडून सहजासहजी फसले जाणार नाहीत.
  2. हे लोक जिथे जातील तिथे सामंजस्य, समतोल राखण्याचा प्रयत्न करतील (जे मी येनकेनप्रकारेण आणि शक्य तेव्हढे करतच असतो ;) ).
  3. ही शुक्राची रास आहे. या राशीत जन्मणारे लोक हे सौंदर्यवान आणि कलासक्त असतात.
  4. राशीतत्वामध्ये या राशीकडे वायुतत्व आलेले आहे. वायुतत्वाची माणसे ही बुध्दीवान असतात. संशोधक वृत्ती असते. ३/७/११ म्हणजे मिथुन, तुला आणि कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत. जगातले अनेक संशोधक या तीन राशींवर जन्मलेले आहेत.या व्यक्ती आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, नि:पक्षपाती आचरणाने, विद्वत्तापूर्ण अक्कलहुषारीने, आदर्शवादी स्वभावाने, निर्मळ अंत:स्फूर्तीने जगत असतात. संघर्ष, द्वेष, कपट, अनीती, अप्रामाणिकपणा या गोष्टींना त्यांच्याकडे थारा नसतो. मध्यस्त बनून तडजोड घडवून आणणे हे या लोकांना फार आवडते.
(समतोल)बेसनलाडू आता माझी लग्नरास वृश्चिक. त्यामुळे - स्वभावधर्म मंगळाच्या स्वभावासारखा म्हणजे तापट;पण अंत:करण दयाळू (तूळ प्रभाव?) कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील :) मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! :) (जहरी)बेसनलाडू कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही; पण माझा आजवरचा अनुभव असा की माझे जिवश्चकंठश्च मित्र/आप्तेष्ट - म्हणजे मी ज्यांच्यासाठी काही वाट्टेल ते (!) आणि जे माझ्यासाठी (माझ्या समजुतीप्रमाणे) वाट्टेल ते करू शकतात - तूळ,कुंभ नि मीन राशीचे आहेत. मिथुनेच्या लोकांशी गप्पाटप्पा करायलाही मला (आणि कदाचित माझ्याशी गप्पा मारायला त्यांना) मजा येते. माझी सन् साइन् जेमिनी (मिथुन) असल्याचा किंवा मिथुनेच्या शुक्राचा (शुक्र = तुळेचा स्वामी, तो मिथुनेत) हा परिणाम समजावा काय? :) बाकी राशींचा फारसा अनुभव नाही आला अजून. पाहूया. (सविस्तर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/06/2008 - 02:26 नवीन

वॉ

मस्त सविस्तर राशी लिखाण बेसनलाडु तुमच्चे. कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलवून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! हे तर मी कन्या राशीची आणि कर्क लग्नाची असुन सुध्दा करते.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 02:55 नवीन

मग असे

मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! अधोरेखित स्वभावविशेष व्यवहार्य नाही,हे तुम्हीही जाणत असालच शीतलताई :) मलाही ते कळते, पण जेव्हा वागायची पाळी येता तेव्हा कळत असूनही वळत नाही, असे वाटते :D हाच तूळ-वृश्चिक मिक्सचा परिणाम असावा,असा अंदाज आहे ;) ((अ)व्यवहारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
ख
खरा डॉन Fri, 08/15/2008 - 23:03 नवीन

>>मग असे

>>मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! तात्या, आजकाल मिपावर उपद्रव इतका का वाढला आहे ह्याचे उत्तर मिळाले का? त्या काकाला तू हाकलुन लावलेस पण पुतण्याचे काय? (सावध) खरा डॉन बाकीचे क्लॉन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
र
रामदास Fri, 06/06/2008 - 05:58 नवीन

खास बात.

मेष- साठ वर्षं अपमान लक्षात ठेवणार. वृषभ-रसास्वाद हेच जीवन मिथुन-वेगवान विचार. पण खोली कमी. कर्क-फार जपून बोलाव लागतं. टचकन पाणी डोळ्यात. सिंह-मोठेपणा द्या. काय वाट्टेल ते मागून घ्या. कन्या-वि. सू.-ही मुलं झोपली आहेत असं वाटलं तरी झोपलेली नसतात. तूळ -बायको असेल ह्या राशीची तर संसाराची नैया पार. वॄश्चीक-कुढणार. विसरणार नाही. धनू-ह्या घडीला माणूस आहे कि जनावर ते तपासा. मकर-व्यवहार निपूण. कुंभ-ज्ञानी ?होय. उपयोग-तुम्हाला माहीत असेल तर करून घ्या. मीन-अनामीक ताणाची रास. सर्व शास्त्रींची माफी मागून वर्णने लिहीतो आहे. खरी आहेत ताडून बघा.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 04/29/2010 - 06:55 नवीन

मस्त!!!!!! ~~~~~~~~~~

मस्त!!!!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 08:16 नवीन

अरेच्च्या!

उत्तर देईन देईन म्हणेस्तोवर विसरूनच गेलो आणि ५० च्या वर प्रतिसाद गेलेदेखील?! :) आत्ता भाग्यश्रीने आठवण करून दिली तेव्हा प्रथमच बघितला हा थ्रेड! असो, भाग्यश्रीची खात्री खरी आहे, माझी रास मिथुनच आहे! :) आमचे रामदासबुवा म्हणतात त्याप्रमाणे वेगवान विचार परंतु खोली कमी! :( चालायचंच! सगळ्यांनी जळ्ळं खोल खोल होऊन कसं चालेल? आमच्यासारखे काही उथळ नकोत का? आणि अहो आमच्यासारखे काही उथळ आहेत म्हणूनच तर तुम्हा खोलीवाल्यांचं जळ्ळं कौतुक! काय रामदासबुवा, खरं की नाय? :) आपला, (बोलण्यात वस्ताद!) मिथुनेचा तात्या!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 10:46 नवीन

आम्ही बी

मिथुन .... इथुन तिथुन मिथुन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सखाराम_गटणे™ Fri, 06/06/2008 - 08:33 नवीन

माझी पण

माझी पण कन्या रास च आहे. ओफिसच्या मिंटींग मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न माझेच. खुप त्रास होतो, प्रश्न विचारले नाहीत तर, सतत उलटी झालया सारखे वाट्ते. आणि कोणताही निर्णय घेण्याआधी इतकी म्हाहीती जमवतो, बाकीचे लोक वैतागुन जातात.
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 06/06/2008 - 08:34 नवीन

तात्यासो

मिथुन ,तूळ,कुंभ या तिन्ही राशी एकाच जातकुळीच्या .विचाराचा वेग याच क्रमात घटत जातो. मिथुनेचे काही गुण.अंकगणित पक्के.आडाखे ,अंदाज ,अचूक असतात. डे ट्रेडींग , सट्टा यात यशस्वी होतात. प्रत्येक क्षण जगतात. अवांतर-मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस?
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 06/06/2008 - 10:51 नवीन

गेसिंग...

>मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस? एक पायरी वर असाल तर तुळ आणि दोन पायर्‍या वर असाल तर कुंभ.. याहून जास्त पायर्‍या वर असाल तर कल्पना नाही बॉ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
सखाराम_गटणे™ Fri, 06/06/2008 - 09:01 नवीन

सतत सर्वे

सतत सर्वे घेणारे राजे यान्ची रास कोणती असावी? मला वाटते, कन्या असावी.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/06/2008 - 10:26 नवीन

येय.. माझे उत्तर बरोबर!!

मिसळपार्टी 'मला' द्यावी लागणार नाही म्हणून बरं वाटलं.. पण एकत्र जमायची संधी हुकली हे वाईट! असो.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 06/06/2008 - 10:32 नवीन

माझी रास

माझी रास ओळखा!!!!!!!!!!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/06/2008 - 21:35 नवीन

असेच

ॠचा तुझी रास तुळ का ग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
अ
अजय जोशी Fri, 06/06/2008 - 11:30 नवीन

'मिसळपाव'ची रास कोणती?

मला आपला सहजच पडलेला प्रश्न. जरूर भेटा. (दु.१ ते ४ सोडून) (आपला पुणेरी) अ. अ. जोशी
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 06/06/2008 - 13:49 नवीन

चन्द्र रास आणि लग्न रास

माझी चन्द्र रास कर्क आहे आणि लग्न रास (ascendant) कन्या आहे. साधारणपणे चन्द्र राशिवरुन मनाचा ठाव घेता येतो, पण स्वभाव विशेष, अथवा behaviora characteristics लग्न राशिवरुनच कळ्तात.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 06/06/2008 - 14:52 नवीन

मनात कायम श॑का

कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात. पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक. बापरे माझ्या हीचे वडील कन्या राशीचे आहेत्.(त्यांच्या मनात अजुन शन्का असावी असे वाटते मला) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 06/06/2008 - 22:31 नवीन

कन्येचे पुरुष

हाताशी पैसे राखून असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सखाराम_गटणे™ Fri, 06/06/2008 - 22:39 नवीन

राशीचक्र

राशीचक्र डाउन लोड http://www.bwtorrents.com/showthread.php?t=131090
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/06/2008 - 22:51 नवीन

असेच म्हणते.

मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे. पण मी म्हणते विषय हा होता की तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी पटते पण जो तो आपली रासच फक्त सा॑गु लागला बाकी चे गुडा॑ळुन टाकले का ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/07/2008 - 09:23 नवीन

>>> मला

>>> मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे. मलाही :S :<
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 06/07/2008 - 09:46 नवीन

खरे ज्योतिषी असाल तर!

जाहीर आव्हान!! माझी रास ओळखून दाखवा!! -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/07/2008 - 10:04 नवीन

मेष किंवा

मेष किंवा वृश्चिक का हो काका?
  • Log in or register to post comments
र
रिमझिम Sat, 06/07/2008 - 11:12 नवीन

माझी रास

माझी रास मिथुन ,पण मी कधी कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 06/07/2008 - 18:02 नवीन

सिह॑

हो, मला ही वाटते डा॑बिसकाका॑ची रास सिह॑ असावी .
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sat, 06/07/2008 - 20:20 नवीन

है भिडू लोक्स.........

मी अस्सल...पक्का....अगदी अर्क असा वृश्चिक.... एखाद्यावर जीव टाकला तर साला स्वतःच्या हाताने स्वतःची गर्दन त्याच्यासाठी उतरवून देणार्...पण जर एखादा तिरक्या चालीनं वाकड्यात शिरला तर मग मात्र त्याची गर्दन स्वतःच्या हातानं उतरवून गावाच्या वेशीवर टांगायला कमी नाही करणार! अतिशयोक्तीचा भाग सोडून देऊ आपण, पण आहे हे असं आहे. पण माझी 'सन-साईन' 'जेमिनी' आहे :) म्हणजे मिथून की हो....इथुन तिथून मिथून :)) (आता कळलं आमच्या प्रतिसादांतल्या उथळपणाचं कारण?) त्यामुळे वृश्चिकेची नांगी बर्‍याचदा मिथुनेच्या घोळात दडून जाते. ह्याउप्पर आणखी काय बोलावे? वृश्चिकेचा हलकटपणा, क्रुरता, केलेले वार लक्षात ठेऊन त्याचा सूड घेण्याची वृत्ती.. मिथुनेचा खेळकरपणा, सहज मैत्री करण्याची कला, फार वेळ लांबट तोंड करुन बसता न येता सतत दाताड वेंगाडून हसत राहणे, चकाट्या पिटणे...इ.इ. सगळे प्रकार ह्या एकाच चिमुकल्या देहात तुम्हाला आढळून येतील :)
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Sat, 06/07/2008 - 23:33 नवीन

आम्हि सिंह...

आम्हि सिंह आणि आमचे कन्या राशिशि फार चांगले जमते... तशि सिंह रास शब्दांचि कोटि करुन इनोद करणारि... आमचि आई सिंह (रास ) " हेड & शोल्डरनि खांदे पण धुतात का?" आपला मयुर
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 06/08/2008 - 00:01 नवीन

असेच

सि॑ह राशीचे माणसे आयुष्य छान जगतात. पण ते फक्त स्वतःच दुसर्‍याला त्या पासुन त्रास होतो ते, ते गृही त धरत नाहीत. हो कन्या राशीचे सि॑ह राशीशी चा॑गले जमते, पण नवरा बायको जर एकाची सिह॑ आणि एकाची कन्या असेल तर ते एकमेका॑ना मागे ओढ्तात. आपल्या राशी पासुन सहावी रास असलेल्या व्यक्ती शी लग्न करत नाहीत म्हणजे त्या॑चे जमत नाही.
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Sun, 06/08/2008 - 00:58 नवीन

सि॑ह

सि॑ह राशीचे माणसे आयुष्य छान जगतात. पण ते फक्त स्वतःच दुसर्‍याला त्या पासुन त्रास होतो ते, ते गृही त धरत नाहीत. त्रास??? क्रुपया जरा स्पष्ट सांगाल का?? (स्वःता मध्ये सुधारणा करण्यासाठि) आपला मयुर
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 06/08/2008 - 01:12 नवीन

बरोबर की नाही ते सा॑गा.

म्हणजे कसे ते पहा मयुर साहेब, सि॑ह राशीची लोक मस्त रूबाबात राहतात, छान मस्त पैसा खर्च करतात फक्त स्वतःच्या दिसण्यावर आणि आवडी निवडी बाबत ते कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत, कितीही महाग असली तरी आवडे खातर ती घेणारच, आणि देण्या घेण्यात ही हात आवरता नाही सगळे कसे दिव्य भव्य असते. त्यामुळे दुसरा झाकुन जातो नाही का? बाकी मी म्हणेल तीच पुर्व दिशा असे,पण प्रेमाने सा॑गाल तर जीव ही देतील.
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Sun, 06/08/2008 - 01:41 नवीन

सि॑ह

सि॑ह राशीची लोक मस्त रूबाबात राहतात, छान मस्त पैसा खर्च करतात फक्त स्वतःच्या दिसण्यावर कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत हे मान्य आणि आवडी निवडी बाबत ते कोणतीही ऍडजेस्टमे॑ट करत नाहीत ९०% करतो कितीही महाग असली तरी आवडे खातर ती घेणारच, आणि देण्या घेण्यात ही हात आवरता नाही मि बहुतेक अपवाद आहे, फुकट ते पौष्टिमाननारा मि...देत नाय घेत पण नाय... आपला वसुल च आहे आपला मयुर
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार गुरुवार, 08/14/2008 - 20:05 नवीन

गुरू-शुक्र आणि मीन-वृषभ

माझी चंद्र रास = वृषभ लग्न रास = मीन सूर्य राशी (पाश्चात्य) = मीन प्रथम स्थानी (लग्नी) मीनेचा शुक्र (गुरुच्या राशीत शुक्र) तृतीय स्थानी वृषभ राशीत गुरु-चंद्र युती (शुक्राच्या राशीत गुरु) माझे प्रश्नः (१) प्रथम स्थानी (लग्नी) मीनेचा शुक्र असल्यास काय होते? ते चांगले की वाईट? (२) माझ्यावर शुक्राचा की गुरुचा जास्त प्रभाव आहे? ---निमिष सोनार, पुणे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा