✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लखोबा लोखंडे हरपले!!!

न
निखिल देशपांडे यांनी
गुरुवार, 01/13/2011 - 22:15  ·  लेख
लेख
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाल्याची बातमी आताच टीव्हीवर पाहिली. त्यांची नाटकं प्रत्यक्ष पाहायचा अनुभव नसला तरी दूरचित्रवाणीच्या सौजन्याने 'तो मी नव्हेच' , 'अश्रूंची झाली फुले' ही नाटके पाहल्याचे आठवते.त्यांच्या लखोबा लोखंडे बद्दल म्या पामराने काय बोलावे?? तीच त्यांची ओळख ठरून गेली होती. परवाच त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सरकार कडून मदतीबद्दलची बातमी वाचली तेव्हाच मन चरकले होते. अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली. त्यांच्या नाना भूमिकांबद्दल अधिक माहिती इथेच द्यावी ही विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6961 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

गिरगावकर पंत म्हणजे अभिनयाचे

निनाद मुक्काम …
Tue, 01/18/2011 - 01:14 नवीन
गिरगावकर पंत म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ .त्यांची नाटके प्रत्यक्ष पाहण्याचा योग बालपणी आला होता . त्यांच्याविषयी लहानपणी काही वाचलेले आज अचानक स्मृती पटलावर आले .ह्या निम्मिताने खरडतो . पंतांनी मराठी नाटकाला अभिनयाचीच नव्हे तर निर्मिती मुल्ये व सादरीकरण ह्यांची सुध्दा श्रीमंती दाखवली . तो मी नव्हे साठी फिरता रंगमंच हि त्यांची अभिनव कल्पना भारतात पहिल्यांदा सदर झाली. तो रंग मंच मनी वासून पंत थेट कोल्हापुरात गेले नि कसबी कारागिराला आपली कल्पना सांगितली . त्या अनामिक कारागिराने अवध्य एका रात्री हा रंगमंच उभा केला . आणि एक आठवण म्हणजे अश्रुची झाली फुले मधील विमानतळाचा प्रसंग साधण्यासाठी विमानतळाचा आभास प्रत्यक्ष रंगमंचावर आणतांना त्यांनी कुठेही कसूर केली नाही .कारण स्वताची नाट्य संस्था त्यांनी सातच्या मुलासारखी जपली व पित्याच्या भूमिकेतून नाटकातील निर्मिती नेपथ्य व सादरीकरण येथे स्वत जातीने लक्ष दिले . त्यांच्या अश्रुची झाली फुले ह्या नाटकावर यश चोप्रा ने मशाल बनवला ( जो दिलीप कुमार व अनिल ने गाजवला ) तेव्हा अभिनय सम्राट दिलीप ह्या नाटकाच्या प्रयोगावेळी विंगेत उभे राहून पंतांचे अभिनय पाहायचे विशेतः लाल्या नि प्रोफेसरांचा शेवटचा प्रसंग पुढे दिलीप कुमार ह्यांना लखोबा साकारायचा होता .पण काही काळ विंगेत उभे राहून अभिनयाचे दशावतार पहिला आणि ते थक्क होऊन म्हणाले कि ये मुजसे नही होगा . अजून पावती हवी पंताच्या अभिनयाबद्दल त्यांच्या नाटकात पल्लेदार मराठी शब्दांनी नटलेली गर्भ श्रीमंत मायमराठी कानावर पडायची तेव्हा मन तृप्त व्हायचे . त्यांचे बंधू दाजी पणशीकर संस्कृत चे ह्या शतकातील पहिल्या पाचात असणारे गाढे विद्वान त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे पंतांचे कर्तुत्व अश्या लखोबाला लक्ष लक्ष प्रणाम (बाकी लखोबा हि व्यक्तिरेखा महाराष्टारील खेड्यापाड्यात शहरात एवढी लोकप्रिय झाली होती म्हणून तिचे नाव ठाकरे ह्यांनी वापरले .हे नुसते नाव नसून मराठी नाटकाच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे . आज ठाकरे भुजबळ वाद जवळ जवळ मिटला आहे .व त्याच बरोबर लखोबा नव्या ताकदीने ओक साकारात आहेत . पंताना ह्याहून चांगली श्रद्धंजली काय असेल .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा