Skip to main content

यौवनाची बाग

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 05/06/2008 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या जीवनाची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या यौवनाची नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3587
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सही लिहलय रे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे मस्तचं त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे हे जिवनाचा पाहिजे ना.? युवक चेतन

"पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" ची आठवण आली. गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली छानच. रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे या दोन वाक्यांचा तर मी फॅन आहे. :) पुण्याचे पेशवे

त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे हे मस्तच! पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आवडली... अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? :W

प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली वा! छान आहे...

अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? रिटायरमेंट प्लॅन आहे हो हा :) कविता छान आहे. आवडली. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे आवडल. फार दूरवरचा विचार केलाय पुष्कराजे!

नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली हे विशेष आवडले. चतुरंग