Skip to main content

भज्जी पार्टी

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/01/2011 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नव्हती तशी, हवा थंडगार होती सुर्याने कापसाची रजाई ओढली होती हवेच्या झुळूका गुदगुल्या करून जाती ग्लासांनी भज्यांची ऑर्डर सोडली होती नाकाने इकडेतिकडे पाहीले थोडे हुंगून पिणारे केव्हाचेच गेले होते रंगून पेय ओरडले भजी! आणि तेही गुंगून कमरेवर हात, झाऱ्याने ऐकले लांबून बाहेर हवा थंड, आत पेटले होते बंड झारा विचार करी, काय करावा दंड सगळे टुन्न झालेले जमवलेले पुंड नाकांनाही सुटला, भज्यांसाठी कंड भ...ज्जी-भ...ज्जी उंचावले गेले पेले यजमान टल्ली, तरी ओळखे सारे मेले आली ज्वाला बाहेर, काही होरपळले झारा मारा चुकवित पळाले उरलेले भज्यांचा वास नाकांमधेच विरला डोक्यावर उपडा यजमानाचा पेला दुलई झटकली सुर्याने, पळणारे थांबले मस्त पहिल्या धारेचा पाउस पिऊ लागले
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1827
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया