१२३.४
लेखनप्रकार
फ्लाईंग शिकणं हा माझ्या एरव्हीच्या लाईफपेक्षा भलताच जास्त झापडिंग काळ होता..
त्यात मी जाम मजा केली..जाम लोचे केले आणि जाम झगडा केला..भीतीशी, निराशेशी,अभ्यासाशी, आकाशाशी, हवेशी आणि व्हॉट नॉट..!!
हवेत उडताना एका एरियाताली सर्व विमानं एकाच फ्रिक्वेन्सीवर बोलत असतात..तरट फाटल्यागत आवाजात घोगरं घोगरं बोलून पायलट कोणावर स्टाईल मारतात कोण जाणे..
पण त्यामुळे होतं काय की सर्वांचं बोलणं सगळेच ऐकत असतात..आणि एकजण बोलायला लागला की त्याने माईक सोडेपर्यंत बाकी सगळ्यांची बोलती बंद..
म्हणून अत्यंत मुद्द्याचं तथा थोडक्यातच बोलायचं असतं..
मोठ्या विमानात पायलट आणि को-पायलट एकमेकांशी टी.पी. करतात..
अधून मधून नुसता 'टी' आणि नंतर (टॉयलेट उपलब्ध असल्यामुळे) नुसतं 'pee' ही करून येतात..
प्रवाशांसाठीचे डबेही हादडतात..
पण एकयंत्रयुक्त, वातानुकुलनविरहित, बुरबुरपंखाचलित, स्वच्छतागृहविरहित विमान हाकत दूर दूर चाललेल्या क्रॉस कंट्री करणार्या मजसारख्या एकांड्या शिकाऊ जिवानं कोणाशी बोलायचं? काय ब्रं क्रावं?
(सोलो क्रॉस कंट्रीमधे मी तर बाबा शर्ट काढूनही बसायचो..आहे कोण बघायला..त्या कुक्कुट-खड्ड्यात..एकला उडो रे..)
म्हणून एक ठराविक फ्रिक्वेन्सी आहे..१२३.४ मेगाहर्टझ..त्यावर तुम्ही काय वाट्टेल ते बकू शकता.. खरं तर पायलट टू पायलट संवादासाठी ही फ्रीक्वेन्सी ठेवली आहे. पण ती प्रत्यक्षात पर्सनल कारणांसाठीच वापरतात. ती कोणी मॉनिटर करत नाही. हल्ली ही १२३.४५ झाल्याचं समजलं.
टिकटिक असा माईकचा आवाज केला की आपल्या मित्राला बरोब्बर कळतं की "ये.. भेट साल्या १२३४ वर.."
मग हाणा गप्पा..
या फ्रीक्वेन्सीला नुसतं ट्यून करून बसलं तरी वेळ झुईं करून मस्त उडतो..
यावर ऐकून मला झालेले अनावश्यक साक्षात्कार असे:
काही शिकाऊ लोक एकटे क्रॉस कंट्री करायला घाबरतात.."आपण ढगांत चुकू" अशी त्यांची टर्कीफाईड अवस्था होते..आणि ती भीती वास्तवही असते. फोटो काढण्यात रमलेला माझा रूममेट ढगात चुकून शेवटी त्याला शोधायला गुरुजींना दुसरं विमान घेऊन टेक ऑफ करायला लागला होता. शेवटी दहा चुकीच्या गावखेड्यांवर हिंडून विमानाच्या टाकीत काही थेंब उरलेले असताना कसाबसा परत आला. बर्फाळ ढगांमधून येऊनही घामाने चिंब झाला होता. त्या हबक्याने कोणाशी दिवसभर एक अक्षर बोलला नाही.
मज स्वतःवरही यासम वेळ आली होती पण ते तसले किस्से परत कधीतरी.
तर..सांगत काय होतो.. काही शिकाऊ लोक एकटे क्रॉस कंट्री करायला घाबरतात..
फक्त एखाद्या ठिकाणच्या "वर" जाऊन परत यायचं असेल (बिन लँडिंगची क्रॉस कंट्री)..तर....हे पेद्रू चक्क एअरपोर्ट जवळच्याच एखाद्या नदी, सरोवर वगैरे मोठ्ठ्या खुणेला पकडून त्याच्यावर एकाच जागी घिरट्या घालत बसतात..
तोंडानं आपली पोझिशन दूर दूर जात असल्याचं रिपोर्ट करतात..आणि तास दोन तासांनी बरोब्बर वेळ मोजून घिरट्या थांबवतात आणि येतात परत..हे सर्व कळायचं ते १२३.४ वरच्या संवादांतून.
शिवाय..
....
मोठ्या विमानांचे पायलट एकमेकांच्या बायकापोरांची (आणि एकमेकांच्या हवाई सुंदरींचीही...!!) चौकशी करतात १२३.४ वर..
....
"तू किद्दर हैं बे ? दिखता नई बे तू.. मेरेकू लागता तू आज मेरेकू ठोसनेवाला हैं पिच्छू से.." अशी बावचळलेल्या शिकाऊ पायलटांची भयंकर वाक्यंही असतात १२३.४ वर..
....
मी किशोर कुमारची गाणी, गझला वगैरे गाऊन इतर पायलट लोकांना विरंगुळवायचो ही १२३.४ वर..
....
एक सोन्याच्या खाणीचं ठिकाण होतं, आणि त्याच्यावर ओव्हर-फ्लाय क्रॉस कंट्रीसाठी एका स्टुडंट पायलटची फ्लाईंग टेस्ट घ्यायची होती..एका नवीनच जॉईन झालेल्या फ्लाईट ट्रेनरला ही टेस्टिंगची ड्युटी लागली होती..
त्याच्या हुशार विद्यार्थ्यानं त्याला घुमवत घुमवत एका खड्डे खड्डे असलेल्या भूप्रदेशावर आणलं..खाली धूसर धूसर खोल खड्डे दाखवून सांगितलं की हीच ती सोन्याची खाण..
आणि झाला की पास टेस्ट..
आईचा घो..नंतर तो ट्रेनर शाणा होईपर्यंत हा हुशार विद्यार्थी "लैसन" घेउन पसार झाला असणार..आणि आपल्यापैकी कोणीतरी त्याच्या मागे बसून ज्यूस पीत प्रवासही करत असणार..बोईंग मधून..
....
कोणत्याही एअरलाईनच्या फ्लाईटमध्ये पायलट आणि को-पायलटची नावं सांगतात..
मी ती नावं ऐकेपर्यंत बेचैन असतो..छाती धडधडत असते..
एकेकाळी बरीच (बुरबुर) उड्डाणं करून अल्पकाळ का होईना पण पायलट असलेला आणि प्रायव्हेट का होईना पण पायलट लायसेन्स असलेला आपला नवरा नुसता पॅसेंजर म्हणून इतका का घाबरतो हे माझ्या बायकोस कळत नाही..
जाव दे ..सुखी आहे ती..र्हाव दे!!!
टीप: या त्याच त्या "ढगात चुकलेल्या" सेस्ना १५२ विमानाचा फोटो दाखवायचा होता. पण पर्सनल फोटो डकवणे पटत नाही म्हणून "आजतक"वर जसे रेव्हपार्टीतल्या पोरापोरींची चेहरे "धूसर" करतात तसा स्वतःला केलाय. शिवाय पोट लपवणे हा उद्देश आहेच..!! असो.
टीप: या त्याच त्या "ढगात चुकलेल्या" सेस्ना १५२ विमानाचा फोटो दाखवायचा होता. पण पर्सनल फोटो डकवणे पटत नाही म्हणून "आजतक"वर जसे रेव्हपार्टीतल्या पोरापोरींची चेहरे "धूसर" करतात तसा स्वतःला केलाय. शिवाय पोट लपवणे हा उद्देश आहेच..!! असो.
वाचने
13116
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
हा हा हा मजा आला वाचून
मस्त! गगनविहारींचं (म्हन्जे
In reply to मस्त! गगनविहारींचं (म्हन्जे by नगरीनिरंजन
+ १
In reply to मस्त! गगनविहारींचं (म्हन्जे by नगरीनिरंजन
+२
छान
In reply to छान by रणजित चितळे
तुमचे
छानच लिहिले आहे. मिपा वरचा
छान
मस्त रे गव्या ... मी टु सिटर
In reply to मस्त रे गव्या ... मी टु सिटर by टारझन
मस्त रे गव्या
In reply to मस्त रे गव्या by गवि
आम्ही कोर्स नाही केला बॉ. .
In reply to आम्ही कोर्स नाही केला बॉ. . by टारझन
आम्हीही पाच अकरा आहोत. पण
In reply to आम्ही कोर्स नाही केला बॉ. . by टारझन
६फुट+ आणि डबल रुंदी असणारे
In reply to ६फुट+ आणि डबल रुंदी असणारे by नरेशकुमार
आपल्याला पास देण्यात आलेला
In reply to आपल्याला पास देण्यात आलेला by टारझन
वरील दोन्ही प्रतिसाद नॉट
In reply to मस्त रे गव्या by गवि
लेख छानच झालाय,
एक नंबर!!!
छान लेख
बारामतीला एक फ्लाइंग ट्रेनिंग
In reply to बारामतीला एक फ्लाइंग ट्रेनिंग by विजुभाऊ
होय.. कार्व्हर एव्हिएशन.तो
In reply to बारामतीला एक फ्लाइंग ट्रेनिंग by विजुभाऊ
बारामतीला एक फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल होते
सुरेख लेख..
In reply to सुरेख लेख.. by योगी९००
आठवा aeroflot ५९३ च्या पायलटने गंमत म्हणून....
In reply to सुरेख लेख.. by योगी९००
गैरसमज..
इथे
गगनविहारींचे हे लेख माझा
In reply to गगनविहारींचे हे लेख माझा by रेवती
असेच म्हणतो...
सुंदर लेखन...
लेख आवडला!
मस्त
गगनविहारी, या वेगळ्या विषयावर
मजा आली वाचून.
गवि, उत्सुकता म्हणुन विचारतो
मस्त हो गवि. छान लिहिले आहे,
In reply to मस्त हो गवि. छान लिहिले आहे, by मृत्युन्जय
जबरी
गगनविहारी झक्क अनुभव . लिखाण
In reply to गगनविहारी झक्क अनुभव . लिखाण by विनायक बेलापुरे
कारण ते (पक्षी: सेण्सॉर्ड
पुन्हा वाचताना पण मजा आली