मुक्ती म्हणजे स्त्री-पुरूष यांच्यात लिंगसापेक्ष भेद नसणे या अर्थी समता असणे असे मानून, स्त्रीच स्त्रीची शत्रू यातील वैमनस्यभाव खोडून काढताना कुटुंबातले पॉवर पॉलिटिक्स हे मान्य केले, तर त्या कुटुंबातील संदर्भचौकटीत स्त्रीमुक्तीची गरज संपत तर नाही? कारण असा सत्तासंघर्ष करू शकणारी स्त्री सक्षम आहे, असेही म्हटले जाऊ शकेल. रादर, अनेकदा आदिवासी समाजाची उदाहरणे भोळसटपणे देताना असे दाखले येतातही.
मुळात, 'स्त्रीच स्त्रीची शत्रू' यातील शत्रू हा शब्द रूढ अर्थाने (वैमनस्यभावी) वापरलेला आहे का? की तो एक प्रकारे रुपकाच्या स्वरूपात योजला आहे?
>>सत्तासंघर्ष करू शकणारी स्त्री सक्षम आहे, असेही म्हटले जाऊ शकेल.
ती सत्तासंघर्ष करीत नसून सत्तेला आवडणारे वर्तन करत असल्याचे दर्शवून सत्तेशी जवळीक करण्याचा प्रयत्न करीत आहे.
<<<लग्न करायच्या वेळी "नोकरी करणार का?" या प्रश्नाचे अनेक मुलींनी "तुम्ही म्हणाल तसे" असे उत्तर दिल्याचे आठवते.
हे नेमकं कशासाठी हे समजलेले नाही...कदाचित चांगला कमावणारा वगैरे मुलगा हातचा जाऊ नये म्हणून असेल...
पण जर लग्नाआधीच कोणी असे बंधन घालायला बघत असेल तर लग्नानंतर काय परिस्थिती होईल याचा विचार लोक करत नाहीत....मुलीच्या समाधानासाठी तिने नोकरी केली तर काय हरकत आहे?
पण ...मुलाची आई / वडील वगैरे लोक तसेच मुलीकडचे लोक ते सांगतील तसं करचा दबाव आणत असतात...विशेष करून उच्चशिक्षण नसलेल्या मुलीवर...कारण काय? एकतर मुलीला शिकवायला नाही म्हणायचे आणि वर मग शिक्षण कमी म्हणून वाट्टेल ती तडजोड कर म्हणून सांगायचे...
सगळ्यांना फाट्यावर मारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा....असेही झगडायचे तसेही झगडायचेच...बाहेरचे लोक फक्त गप्पा हाणणार मदत करणार नाहीत...काय उगा कोणालाही महत्त्व द्या.
सगळ्यांना फाट्यावर मारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा....असेही झगडायचे तसेही झगडायचेच...बाहेरचे लोक फक्त गप्पा हाणणार मदत करणार नाहीत...काय उगा कोणालाही महत्त्व द्या.
धन्यवाद, या चर्चेत आपले व्यक्तिगत अनुभव सांगितल्याबद्दल, चर्चा योग्य तर्हेने पुढे नेल्याबद्दल सर्वांचे आभार. एकमेकांच्या या बर्यावाईट अनुभवांमधूनही आपण बरेच काही शिकत असतो, याबद्दल शंकाच नाही.
यशोधरा म्हणते तसा मुक्तता ह्या शब्दावरून माझ्याही मनात काही वर्षे गोंधळ होता. (जन्मतः मुक्त असलेल्या व्यक्तीलाच कसे अजून मुक्त करणार?) पण १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण गुलामीची भावना होऊन ते स्वातंत्र्य मिळवायला वेळ लागलाच. हेच लहान प्रमाणांवर मागासलेल्या जातींचे, समाजांचे आणि त्यातील घटकांचे होत असावे. तेव्हा तुम्ही मुक्ती हा शब्द वापरा, अगर वापरू नका, दुर्बळ घटकांचे सक्षमीकरण ही कल्पना हवे तर म्हणा. अर्थ तोच आहे. समाजापासून (पुरुष, मुले, नातेवाईक, मित्र) मुक्ती, फटकून वागता येणे हा अर्थ नव्हता, असू नये. पण सक्षम होण्याची इच्छा, संधी, आणि त्यासाठी पोषक साधने ही मात्र सर्वांना मिळावी. नगरीनिरंजन म्हणतात ते या दृष्टीने अगदी पटते की "स्त्रीमुक्तीवर चर्चा करणार्या स्त्रियांपैकी एकीलाही आपण मुक्त नसल्याचा न्यूनगंड नसेल तर ती स्त्रियांना बळ देण्याच्या गप्पा न करता कोणत्याही दुर्बळ अन्यायग्रस्ताला बळ देण्याचीच भाषा करेल". मी यात फक्त एवढेच म्हणेन की सुरुवात ही ज्याबद्दल प्रीती आहे, मनापासून चीड आहे, अशा गोष्टींपासून झाली तर ती झेपत असावी/पेलता येत असावी.
समारोपादाखल -
अजूनही समानतेजवळ आपण पोचलो नाही, याबद्दल बहुतेकांना संशय नसावा. केवळ हर्षद यांनी या चर्चेत भाग घेतलेल्या व्यक्तींपेक्षा फारच वेगळे विचार मांडले आहेत असे वाटले. त्यांच्याही आजूबाजूच्या निरीक्षणांबद्दल मला संशय घ्यायचा नाही, पण असे नक्की वाटते की त्यातून चुकीचे निष्कर्ष काढले जात आहेत. काही स्त्रियांच्या वर्तनामुळे किंवा काही विवक्षित प्रकारच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे या चळवळीकडे बघण्याचा दॄष्टीकोन डागाळला, तरी त्यासाठी अशा विचारांनाच चुकीचे किंवा झाले तेवढे परिणाम पुरे असे म्हणणे हे योग्य ठरणार नाही. प्रियालीने मांडलेला विचार - स्त्रीने कुठच्याही वाईट परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याची गरज आहे - महत्त्वाचा आहे. पण हे सर्व करीत असताना आपण जो चाकोरीतला विचार करत असतो तो कधीतरी सोडावा लागेल, त्याचीही तयारी ठेवावी लागेल. कुटुंबसंस्थेचाही विचार नव्याने, वेगळा करावा लागेल.
या चर्चेत काहीजण (आणि काही विचार) सहभागी झाले नाहीत याची जाणीव आहे. चर्चा एकाच अंगाने जाते आहे असे काहींना वाटलेही आहे/असावे. अशांनीही आपली मते मांडायला काहीच हरकत नाही/नव्हती.. आता या चर्चेत बरेच प्रतिसाद झाल्याने कोणाला वेगळा काही विचार मांडण्यासाठी नवीन चर्चा सुरू करायची असली तर तीही करावी.
परत एकदा सगळ्या प्रतिसादकांचे आभार.
चित्राताई फारच संयमित संतुलीत लेख.
तुमची जशी परिस्थिती होती तशीच माझ्या आईची होती. ऑर्थोडॉक्स एकत्र कुटुंबातून नन्तर विभक्त झाल्यावर आईने शिक्षणाची इच्छा पूर्ण केली. माझा एक चुलत भाऊ आणि माझी आई हे एकाच वर्षी बी ए ची परीक्षा देत होते. चुलत भाऊ नापास झाला त्याच्या त्या गोष्टीचे घरातल्या सर्वानी चुलत भावाला दुकानात काम असते म्हणून अभ्यास करता आला नाही हे समर्थन दिले माझ्या आईला काय फक्त घरकामच करायचे होते असे म्हणायचे.
माझ्या वडीलानी जमेल तसे आईला प्रोत्साहन दिले.
माझ्या पत्नीला मी लग्नानन्तर पोस्ट ग्रॅज्युएट कर म्हणून बरेचदा सांगून पाहिले. तुझा शिक्षणाचा उपयोग कर. पण ती देखील ऑर्थोडॉक्स गुजराती कुटुंबात वाढलेली आहे. तीला स्त्रीने घर संभाळले पाहिजे हे बाळकडू पाजण्यात आलेले आहे. ती स्वतःच त्या कोषातून बाहेर येण्यास तयार नाही. पण माझे नातेवाईक , मित्र वगैरे कोणी घरी आले तर ती त्यांचे आदराअतिथ्य खूप आनन्दाने करते.
घरकाम करणे हे कमीपणाचे नाही पण स्वतःच्या हुशारीचा उपयोग न करणे हे योग्य नव्हे.
कोणीतरी वर मुलीने केलेल्या जोड आडनावाच्या सहीचे उदाहरण दिले आहे. त्या मुलीने स्वतःची सही बदलायची नाही असे ठरवले असते तर तीचा नवरा फार कुरकुरण्याव्यतीरीक्त फारसे काही करु शकला नसता. पण तीने ठाम नाही संगितले असते तर फारसे काही बिघडले नसते. तिच्या नावाचा निर्णय नवर्याला करायला तीनेच परवानगी दिली. आणि स्वतः जोपासलेल्या प्रतिमेला तडा दिला.
मुली लग्नानन्तर त्यांचे नाव बदलण्यास का परवानगी देतात? तसे करून त्या स्वतःची ओळख स्वतःच पुसून टाकतात.
याबात कस्तुरबा गांधींचे उदाहरण फार बोलके आहे. मिस्टर गांधीनी त्याना मांसाहार करावयास सांगितला त्यानी त्यास ठाम नकार दिली. मिस्टर गांधी फारसे काही करू शकले नाहीत.
हे एक साधे उदाहरण.
म.गांधी नी त्यावरून एक शिकवण घेतली
तुमच्या परवानगीशिवाय तुमचा आत्मसन्मान कोणीच हिरावून घेउ शकत नाही.
>>त्या मुलीने स्वतःची सही बदलायची नाही असे ठरवले असते तर तीचा नवरा फार कुरकुरण्याव्यतीरीक्त फारसे काही करु शकला नसता.
थोडीफार कुरबूर हि सभ्य सुसंकृत घरात होत असावी. पण अशी कितीतरी घरे असतील, आहेत (सुशिक्षितांची ही) जिथे विरोध केला की त्या स्त्रीविरुध्द बळाचा वापर होतो. काही उदाहरणे तर जवळच्या माहितीतील आहेत. अशावेळी स्त्रीलाच पडते घ्यावे लागते. निमूटपणे मारहाण सहन करणे हे अयोग्यच आहे पण पोलिसात तक्रार करणे , घटस्फोट मागणे, माहेरी निघून जाणे हे ही प्रत्येक वेळी त्या स्त्रीला करणे शक्य होत नाही. ..विशेषतः मुलांची जबाबदारी अंगावर असताना.
घरातले वातावरण चांगले रहावे , मुलांसमोर तमाशा नको , म्हणून नवर्यांचे राग सहन करणार्या स्त्रिया पाहिल्या आहेत.
अशावेळी आर्थिक स्वातंत्र्य ही स्त्री मुक्तिची पहिली पायरी ठरावी. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या पायावर उभे रहाणे.
सर्व सामन्य पुरूष जशी या बाबतीत तडजोड करीत नाहीत (जसे की आजारी आईवडीलांची काळजी घ्यायची म्हणून पुरषाने नोकरी सोडली) तशीच स्त्रीने देखील करु नये. तसे झाले तरच इतर समस्यां सोडवण्याचे मार्ग आपोआप खुले होतील. किंबहूना तशी व्यवस्था समाजात आपोआप निर्माण होईल.. जसे की डे केअर सेंटर वगैरे.
चित्राताई , लेख छानच झाला आहे.
एकांगी लेख. सोयीस्कर अपवादांचा उल्लेख केला गेला आहे. तसे उलटे अपवादही देता येतील.
आदिजोशी यांनी म्हटल्याप्रमाणे "टिपीकल" नवरा हवा असतो पण टिपीकल बायको व्हायची तयारी नसते.
तसेच काहींचा स्त्रियांना फक्त काही हॉटेलामध्ये एकटे गेले असता न्याहाळण्यात येते असा गैरसमज झाला आहे. मूळात लोकांनी बघावे यासाठीच फॅशन, नट्टापट्टा, ब्युटीपार्लरच्या वार्या केल्या जातात तेव्हा अशी तक्रार करणेच गैर आहे.
जर ते खरोखरच इतके नावडते असेल तर आजपर्यंत आलेल्या एकाही लेखातील/ प्रतिसादातील तशा उल्लेखाचा/ कॄत्यांचा कधीही निषेध का नाही केला?
"टिपीकल" नवरा हवा असतो पण टिपीकल बायको व्हायची तयारी नसते.
टिपीकल बायको होण्याची तयारी नसते असं म्हणण्यापेक्षा तसं होणं शक्यं नसतं असं म्हणणं जास्त संयुक्तीक ठरेल.
आजकालच्या नवर्यांनाच टिपीकल बायको नको असते.. म्हणजे बायकोने घरातली सर्व कर्तव्य करावीतच ( सासू सासर्यांची , पतीची सेवा, मुलांचे संगोपन, नातेवाईक, पाहूणे इ. इ. ) पण त्या बरोबर समाजात त्याच्या बरोबरीने सगळीकडे जायला हवे, एखादी कला असेल तर उत्तमच, आणि अर्थार्जनही करावे .. पण तरीही महत्वाच्या सर्व निर्णयांचे सर्वाधिकार पतिकडेच द्यावेत अशा अपेक्षा असतात... त्या पूर्ण न झाल्यास संघर्ष होतो आणि बहूतेक वेळा स्त्रीलाच दोष दिला जातो.
तसेच काहींचा स्त्रियांना फक्त काही हॉटेलामध्ये एकटे गेले असता न्याहाळण्यात येते असा गैरसमज झाला आहे.
हा गैरसमज नाही .. आणि मुद्दा कोणी कोणाला न्याहळते हा नसून, आजकालच्या सो कॉल्ड मॉडर्न समाजात सुद्धा एकट्या स्त्रीला समाजात वावरताना अनेक बंधने येतात, हा आहे
प्रतिक्रिया
पॉवर पॉलिटिक्स
संघर्ष
<<<लग्न करायच्या वेळी "नोकरी
दाद!
समारोप
हम्म
चित्राताई फारच संयमित संतुलीत
>>त्या मुलीने स्वतःची सही
संतुलीत लेख व त्यावर झालेली
एकांगी लेख. सोयीस्कर
"टिपीकल" नवरा हवा असतो पण