क्षण हे गोंधळलेले
थोडे हिरमुसलेले
अंगणात दूरवर
आभाळ कोसळलेले ||
आभाळ कसे कोसळेल .आपल्या मनातले आभाळ आपण स्वच्छ
ठेवलेच पाहिजे . मला असेच खूप वाटते . एखादी घटना आपल्या बाजूने घडते तेव्हा ते छान असते पण आपल्या
बाजूने होत नाही तेव्हातर ते खूपच छान असते ,त्यात देवाचां हात असतो.
एखादी घटना आपल्या बाजूने घडते तेव्हा ते छान असते पण आपल्या
बाजूने होत नाही तेव्हातर ते खूपच छान असते ,त्यात देवाचां हात असतो.
हं असेच असते .. पण ती ही मनाचीच कल्पना असते असे माझे मत .
तरीही असे वाटते.. आभाळ कोसळल्यावर जे उरते ते निरभ्रच असेल कदाचीत ..
आभाळ भरुन आल्यावर पडलेला पाउस आणि नंतर उरलेले स्वच्छ निरभ्र आकाश म्हणजे जनु काय नविन पालवी फुटलेले आपले मनच ..
माणसाचे मन म्हणजे असेच असेल कदाचीत , कोसळलेल्या आभाळाची कात टाकुन निरभ्र आकाशापरि ते पुन्हा स्वछ हेतुने इतस्त बागडत असेल .
थांबतो .. विषयांतर होते आहे म्हणुन .. लेख लिहिला असता या विषयावर तर भरपुर बोलता आले असते .. बघतो नंतर निवांत प्रयत्न करुन
अवांतर :
मराठी शब्दांची काहिशी जादु डिस्कस करताना
आभाळ .. आकाश ...नभ या गोष्टी एक असल्या तरी त्याचा अर्थ वेगळा आहे हे कळाले
जे भरुण येते ते आभाळ
जे निरभ्र असते ते आकाश
जे उंच असते ते नभ
क्षण हे गोंधळलेले थोडे
एखादी घटना आपल्या बाजूने घडते
In reply to क्षण हे गोंधळलेले थोडे by प्रकाश१११
सुरेख आणि सुरेल