Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शरदिनी on गुरुवार, 01/06/2011 - 17:58
कोपित झेयुस शापित राजा यकृत तुकडे गिधाड खाजा पुराणवांगी ग्रीक नवाजा अडम तडम तडतड बाजा पितळ्यांच्या गायीला फ़्रेंच कल्हई जैताच्या गावात ऊर्जेची उईउई रशियन पतंगाला 'हिरवा' मांज्जा अडम तडम तडतड बाजा ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा एआरडॅनी जयहो राजा अडम तडम तडतड बाजा गोरस पायथा मितीय शक्कल घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा अडम तडम तडतड बाजा भ्रमणधनीवर आजा आजा "देव कोण" ते कंपित फ़ज्जा आस्तिक नास्तिक झगडा लज्जा अडमतडम तडतड बाजा प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी जोहर यळकोट वृद्धी वृद्धी शब्द बापुडे करती मज्जा अडम तडम तडतड बाजा शरदिनी अभ्यंकर, ६ जानेवारी ,पुणे

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 01/06/2011 - 18:00

Permalink

कोलमडून पडलो

कोलमडून पडलो. ऑन डिमांड अशी रचना म्हणजे धन्यच. तुमच्या क्षमतेपुढे दंडवत.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 01/06/2011 - 18:41

In reply to कोलमडून पडलो by श्रावण मोडक

Permalink

+१

>=O०=> शीर साष्टांग दंडवत
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 01/07/2011 - 03:41

In reply to कोलमडून पडलो by श्रावण मोडक

Permalink

हेच म्हणतो

(नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 01/07/2011 - 06:50

In reply to कोलमडून पडलो by श्रावण मोडक

Permalink

+१ शब्दांची टांकसाळ आहे की

+१ शब्दांची टांकसाळ आहे की काय तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 01/06/2011 - 18:04

Permalink

हा हा

एऽऽऽ धत्तड तत्तड!!! (डब्बा एस्प्रेस)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on गुरुवार, 01/06/2011 - 18:09

Permalink

शरिदिनीतैंपुढे नतमस्तक

शरिदिनीतैंपुढे नतमस्तक
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on गुरुवार, 01/06/2011 - 18:10

Permalink

कोपित झेयुस शापित राजा यकृत

कोपित झेयुस शापित राजा यकृत तुकडे गिधाड खाजा पुराणवांगी ग्रीक नवाजा अडम तडम तडतड बाजा एकदम छान नि डौलदार फटका उत्तम बहारदार ब्याटिंग .एकदम फोर्मात . मी जे लिहीन ते ब्रम्हवाक्य .असा बेछूट अहंकार . खबरदार कोणी काही म्हणाल तर. ?? एक तुतारी द्या मज आणुनी .फुंकून टाकीन सगळी गगने[?] दीर्घ जिच्या त्या किंकाळीने वा ..वा .मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 01/06/2011 - 18:16

Permalink

इतके छान शब्द कसे

इतके छान शब्द कसे सापडतात. कित्ती दिवस ल्ह्यायचे म्हणत होतो...अगदी माझ्या मनातले शब्द ल्हिलेस ग. विदग्धतेकडून दग्धतेकडे नेणारे तुमची कविता आता विरक्ततेकडुन ३१ अंशातून आरक्ततेकडे झुकू लागलीय. प्रतिभेला पाझर फुटला की कार्पोरेशनच्या नळातून सुद्धा अमॄत वाहू लागते. हे तुमच्या कवितेच्या शब्दाशब्दातुन जाणवते. दूधभट्टीवर पाणीदार दूध मिळेल म्हणून जावे अन अमृताचा पेला ओठी लागावा तशी काहीशी अर्धस्वप्नवत अवस्था होऊन मन उन्मनी होते. तुमच्या व्यग्रतेतून काकतालीय अथवा वदतोव्याघात न्यायाने कवीता प्रसवली जाते. वेदना विसारून वाचकाना विरहात विहारायाला लावणारी व्यवच्छेदक कविता.. हेच खरे तर तुमच्या कवितेचे यथार्थ वादातीत वचक प्रस्थापीत करणारे व्यक्तीमत्व
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on गुरुवार, 01/06/2011 - 18:42

In reply to इतके छान शब्द कसे by विजुभाऊ

Permalink

तुमचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा

कित्ती दिवस ल्ह्यायचे म्हणत होतो...अगदी माझ्या मनातले शब्द ल्हिलेस ग. प्रतिभेला पाझर फुटला की कार्पोरेशनच्या नळातून सुद्धा अमॄत वाहू लागते. दूधभट्टीवर पाणीदार दूध मिळेल म्हणून जावे अन अमृताचा पेला ओठी लागावा तशी काहीशी अर्धस्वप्नवत अवस्था होऊन मन उन्मनी होते. तुमच्या व्यग्रतेतून काकतालीय अथवा वदतोव्याघात न्यायाने कवीता प्रसवली जाते. वेदना विसारून वाचकाना विरहात विहारायाला लावणारी व्यवच्छेदक कविता.. बाब्बो ! :D ह्सनू हसून लोटपोट !! =)) शरदिनी ताई, तुम्ही म-हा-न आहात !! दंडवत _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Sun, 01/09/2011 - 11:45

In reply to इतके छान शब्द कसे by विजुभाऊ

Permalink

मस्त प्रतिसाद..

कवितातर सुरेखच आणि हा प्रतिसाद तर उत्तमच.. या कवितेमुळे माझ्या आत्माला अनुभुती आणि मनोज्ञ मानसिकतेला महदोत्कट प्रचिती मिळाली..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 01/06/2011 - 18:19

Permalink

अडम तडम तडतड बाजा तडतड

अडम तडम तडतड बाजा तडतड बाजा...
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 01/06/2011 - 18:38

Permalink

बेफाम, अगम्य आणि उर्मट

मनापासून लिहितोय, माफ करा... ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा गालिबला बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमच्या कविता एकूणच काव्य, कविता आणि रचनाकार कवि / कवयित्री यांचा अपमान करणार्‍या असतात, असे तुम्हाला वाटत नाही का? उर्मट वास जात नाही तुमच्या कवितांचा....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 01/06/2011 - 18:42

In reply to बेफाम, अगम्य आणि उर्मट by भडकमकर मास्तर

Permalink

बेलगाम , अश्लाघ्य, खवचट

गालिबला बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे? मी म्हणतो , आमच्या पपू शर्दिनीताईना बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 01/06/2011 - 19:22

In reply to बेफाम, अगम्य आणि उर्मट by भडकमकर मास्तर

Permalink

हाहाहाहा...

हाहाहाहाहा... हे आले शरदिनीला बोल लावायला. कुठं फेडाल ही पापं? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 01/06/2011 - 19:50

In reply to बेफाम, अगम्य आणि उर्मट by भडकमकर मास्तर

Permalink

ऑ

चिंचवडगावच्या गोलंदाजाकडून इतक्या सरपटी चेंडीची आपेक्ष्या नव्हती.. (मणापासूण)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/07/2011 - 21:48

In reply to बेफाम, अगम्य आणि उर्मट by भडकमकर मास्तर

Permalink

वा वा वा मास्तर!!! कोण कुठला

वा वा वा मास्तर!!! कोण कुठला गालिब, आणि कुठे आमच्या शरदिनी बाई.. उगाच का त्रास देताय! शांत बसा की जरा.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 01/06/2011 - 18:47

Permalink

साष्टांग दंडवत

भ्रमणधनीवर आजा आजा "देव कोण" ते कंपित फ़ज्जा आस्तिक नास्तिक झगडा लज्जा अडमतडम तडतड बाजा
--- खी: खी: खी: :), हे आणि फ्रेंच ऊई ऊई भन्नाटच!
प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी जोहर यळकोट वृद्धी वृद्धी शब्द बापुडे करती मज्जा अडम तडम तडतड बाजा
_/\_ शरदिनीतै! यातली 'शब्द बापुडे करती मज्जा' ही ओळ मला आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं :).
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 01/06/2011 - 18:57

In reply to साष्टांग दंडवत by नंदन

Permalink

नंदोबा धर कान. देशील.......

नंदोबा धर कान. देशील....... देशील परत चॅलेंज शरदिनी तैंना ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 01/06/2011 - 18:50

Permalink

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 01/06/2011 - 19:04

Permalink

शरदिनीताईंची कविता म्हणजे

शरदिनीताईंची कविता म्हणजे जीएंच्या कथांच्या काव्यरूप अर्काचा एकच पण वाचल्यानंतर >>> अडम तडम तडतड<<<<< करायला लावणारा प्याला ! जय हो बाबा जालींदरनाथ !!!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 01/06/2011 - 19:03

Permalink

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by अडगळ on गुरुवार, 01/06/2011 - 19:10

Permalink

अवीट गोडीची रचना

एक एक कडवं म्हणजे पुंडलीकाची वीट आहे . प्रत्येकी वर युगे अठ्ठावीस उभं राहायला पाहिजे.तर कुठं अर्थ कळेल. ठ्ठोब्बा रखुमाई.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 01/06/2011 - 19:19

Permalink

आपल्या कविता १-२

आपल्या कविता १-२ कडव्यांपलीकडे (ते ही बराच वेळ विचार करुन ) मला कळत नाहित .. माझी तेव्हडी पोच नाहिये तरीही वाचाव्यासा का वाटतात ते ही कळत नाही.. शेवट पर्यंत वाचुन छान वआटले जास्त कळले नसले तरी बरेच काही वाचल्याचा भास झाला लिहित रहा .. वाचत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 01/06/2011 - 19:26

Permalink

मस्त ग शरदीनी तै

खुप दिवसानी आमची आठवण आली तुला. मस्त कविता लिहली आहेस. आत फक्त एक सांग तु जैतापुर अणुप्रकल्पाच्या बाजुने आहेस कि विरुध्द? म्हणजे कवितेला अर्थ लावायला जरा सोप्पे जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by दैत्य on गुरुवार, 01/06/2011 - 20:05

Permalink

तबल्यावर ठेका धरता येईल !!

शरदिनीतै, कवितेला नाद आहे, आणि मस्तवाल शब्दांमुळे गती आहे ! अप्रतिम!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 01/07/2011 - 07:39

Permalink

छानच गं शरदिनी... परवाचा

छानच गं शरदिनी... परवाचा प्लॅन नक्की ना?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 01/07/2011 - 11:51

In reply to छानच गं शरदिनी... परवाचा by बिपिन कार्यकर्ते

Permalink

प्लॅन

हाहाहाहा... किती दिवसांपासूनचा प्लॅन आहे बिका तुमचा! कालच शरदिनीच्या खरडवहीत एक चक्कर टाकून आलो. तुमच्या खवत शरदिनीच्या उत्तरांची पानं खूप मागं गेली आहेत, त्यामुळं शोधत बसलो नाही. पण हा प्लॅन तेव्हापासूनचा दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 01/07/2011 - 12:32

In reply to छानच गं शरदिनी... परवाचा by बिपिन कार्यकर्ते

Permalink

हा हा

काय शरू.. कशी आहेस.. अशा प्रतिसादांची आठवण झाली.. (स्मरणशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 01/07/2011 - 12:59

In reply to हा हा by केशवसुमार

Permalink

अभ्यंकर

अभ्यंकर. शरदिनी अभ्यंकर. म्हणजेच, शरू अभ्यंकर. ;) शरदिनीने अभ्यंकर कुलवृत्तांत एकदमच जाहीर केला राव. ही बातमी व्हायला हवी होती. आमंत्रण नाही तर नाही, निदान अभिनंदनाचा धागा तरी हवा होता. खरडवहीत शरदिनीचा फटू वगैरे पाहायला मिळाला असता कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 01/07/2011 - 19:56

In reply to छानच गं शरदिनी... परवाचा by बिपिन कार्यकर्ते

Permalink

बिप्स ! तू ठिक आहेस ना ;-)

परवाचा प्लॅन नक्की ना? स्वप्न पडतात का बिप्स तुला हल्ली शरु/ शरदिनी ची ?? मला हे वाचून मोहसिन नक्वी ने लिहिलेली अन गुलाम अली ने गायलेली 'आवारगी' गज़ल आठविली कल शब मुझे बेशक्लसी आवाज ने चॉका दिया मैंने कहा तू कौन है? उसने कहां आवारगी !! ;-) यह दिल, यह पागल दिल मेरा, क्यूं लुट गया ... आवारगी !! (शब : रात्र , बेशक्ल : abstract, without face आवारगी : Vagrancy, an unsettled condition )
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Fri, 01/07/2011 - 08:27

Permalink

पॅण्डोरा बॉक्स....!

प्रथमच शरदिनीताईंच्या कवितेवर प्रतिसाद देत आहे....(यापूर्वीही त्यांच्या भन्नाट कवितांचा, तसेच त्यावर आलेल्या त्यांच्या रसिकांच्या प्रतिसादांचा, इथे आस्वाद घेतला आहेच, त्यामुळे त्यांच्या प्रतिभेविषयी अनभिज्ञ नाही) प्रॉमिथ्यूसने आग चोरणे, झिअसने शाप देणे त्यामुळे गिधाडा [आम्हाला 'गरूडाने' असे सांगितले गेले होते] ने रोज त्याचे यकृत खाणे ही साखळी आजच्या काळातही जशीच्यातशी लागू आहे....त्यामुळे तुम्हीदेखील त्याच उद्देशाने त्या तिघांचे प्रतीक कवितेत वापरले असावे. "पॅण्डोरा बॉक्स" आहे तुमच्या प्रतिभेत. [आता येथे उपलब्ध असलेल्या तुमच्या जुन्या कविताही वाचल्याच पाहिजे, पुन्हा एकदा] इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 01/07/2011 - 13:28

In reply to पॅण्डोरा बॉक्स....! by इन्द्र्राज पवार

Permalink

या ओवररेटेड कवयित्रीच्या चुका

या ओवररेटेड कवयित्रीच्या चुका कोणीतरी दाखवतंय ते एक बरंय ग्रीक पुराणाबद्दल कोणीतरी बोलले बरं झालं... गिधाड झाले गरुडाचे नशीब यकृताचे स्वादुपिंड नाही केले
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 01/07/2011 - 08:51

Permalink

धमाल कविता!

हा हा हा.. शरदीनी 'तै' धमाल कविता!!!! श्रा मो म्हणतात तसा कोलमडून पडलो :) मानलं तुम्हाला!!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/07/2011 - 12:02

Permalink

बिली जोएलच्या "वी डिडन्ट

बिली जोएलच्या "वी डिडन्ट स्टार्ट द फायर" ची आठवण झाली.. :) Harry Truman, Doris Day, Red China, Johnnie Ray South Pacific, Walter Winchell, Joe DiMaggio Joe McCarthy, Richard Nixon, Studebaker, television North Korea, South Korea, Marilyn Monroe Rosenbergs, H-bomb, Sugar Ray, Panmunjom Brando, "The King and I" and "The Catcher in the Rye" Eisenhower, vaccine, England's got a new queen Marciano, Liberace, Santayana goodbye आणि त्यातच पुढे.. Birth control, Ho Chi Minh, Richard Nixon back again Moonshot, Woodstock, Watergate, punk rock Begin, Reagan, Palestine, terror on the airline Ayatollah's in Iran, Russians in Afghanistan "Wheel of Fortune", Sally Ride, heavy metal, suicide Foreign debts, homeless vets, AIDS, crack, Bernie Goetz Hypodermics on the shores, China's under martial law Rock and roller cola wars, I can't take it anymore
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Fri, 01/07/2011 - 12:06

Permalink

अडम तडम तडतड बाजा

मस्तच मजा आली वाचून अमोल केळकर
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 01/07/2011 - 18:12

Permalink

मास्तर

शरु तै ना मास्तर का म्हणतात ते आज कळाले.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 01/07/2011 - 20:36

Permalink

पूर्वीची लयबद्धता कळत नाही

पूर्वी शरदिनी यांच्या कवितेतली लयबद्धता मला सहज कळून येत असे. आताशाच्या कवितांमध्ये शब्दांवरील आघातांची काटेकोर कळून येत नाही. माझी मराठी बोलीभाषा घेतली, तर त्यातली आघातांची लय शरदिनी यांच्या बोलण्यातल्या लयीपेक्षा वेगळी असावी असे वाटते. त्यामुळे कविता वाचण्यात पूर्वी जो काय आस्वाद मिळत असे, तोही मिळत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 01/09/2011 - 02:22

Permalink

लेडी गागा ला लाजवलेत तूम्ही एका फट्क्यात

आहात कूठे ?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on Sun, 01/09/2011 - 07:23

Permalink

गोरस पायथा मितीय शक्कल घडवा

गोरस पायथा मितीय शक्कल घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा अडम तडम तडतड बाजा एकूणच छान !
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Tue, 01/11/2011 - 19:10

Permalink

अडम तडम तडतड बाजा कसलेच

अडम तडम तडतड बाजा कसलेच संदर्भ माहीत नसल्याने कविता समजली नाही. पण बाज आणि लय एवढी आवडली की कविता कळल्यासारखी वाटली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Tue, 01/11/2011 - 20:22

In reply to अडम तडम तडतड बाजा कसलेच by गंगाधर मुटे

Permalink

हे हे हे

पण बाज आणि लय एवढी आवडली की कविता कळल्यासारखी वाटली आम्हाला ही नेहमी हेच वाटते कविता कळली ... कळली असे म्हणेपर्यंत शेवटी काहीच कळत नाही तिच तर मज्जा आहे शरदिनीताईंच्या कवितेची ;-) आपण सगळे बसतो अकलेचे तारे तोडत , पण त्या कुठे कुठल्या ही कवितेचं रसग्रहण करतात?
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Tue, 01/11/2011 - 22:59

Permalink

छान... संदर्भ कळले नाहीत पण

छान... संदर्भ कळले नाहीत पण तरीही छान!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 9291 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com