मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरवा करेला: लखनौ इष्टाईल

विजुभाऊ · · पाककृती
सामुग्री : कारली ,मीठ तिखट ,धणे पुड बडीशेप( ओली) , दही. कारली सोलून घ्या. सोललेला कीस बाजूला काढून ठेवा ( याची चटणी करू शकता ) सोललेली कारली एका बाजूने काप देवून चिरून त्यातील बिया काढून घ्या. चिरलेली कार्ली मिठाच्या गरम पाण्याने धुवून घ्या. थोडा दाब देवून पाणी काढून टाका आतील बाजूने तिखट मीठ लावून कारली थोडावेळ ( साधारण वीस मिनिटे )तशीच बाजूला ठेवून द्या. बडीशेप ( ओली) न मिळाल्यास साधी बडीशेप पाण्यात अर्धा तास भिजत टाका. पाच चमचे बडीशेप मध्ये एक अर्धा चमचा या प्रमाणात धणेपूड मिसळा. यात चवीसाठी तिखट , ( हवी असल्यास किंचीत साखर ) मीट यांचे मिश्रण करा व ते काप दिलेल्या कारल्यात भरा. मिश्रण सुटून बाहेर येवू नये म्हणून कारली दोर्‍याने बांधा. भरलेली कारली शॅलो फ्राय क्रऊन घ्या. फ्राय करून झाल्यानन्तर दोरे काढून टाका. वाढताना कारल्यासोबत दही अवश्य द्या. bharava karela

वाचने 8533 वाचनखूण प्रतिक्रिया 21

गवि गुरुवार, 01/06/2011 - 12:14
अहो काय झकास पाककृति आहे.. भरलेली कारली हा माझा वीक पॉईंट आहे.. आणि तुमच्या या पाकृमधे बर्‍यापैकी कुरकुरीत किंवा निदान ओलेपणा नसलेली भाजी दिसते आहे.. ही तर माझी अजूनच आवडती. पोळीऐवजी हा प्रकार भातासोबत (आमटीभात किंवा मोअर बेटर प्लेन वरणभातासोबत) जास्त छान वाटेल.

गणपा गुरुवार, 01/06/2011 - 12:56
मस्त हो विजुभाय :) कारल्याचा कडुपणा कमी करणार्‍या डीपफ्राय पेक्षा हा प्रकार बरा वाटतोय. (कारलं जर साखर, गुळ्,कांदा, नारळ टाकुन गोडं करुनच खायच तर मग कारलं घ्याच कशाला या मताचा.)

वाहीदा गुरुवार, 01/06/2011 - 13:02
आमच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे पाकृ पण कृती आवडली. अम्मी ची नजर चूकवून मेहजबीन आप्पी(ताई) कधी कधी त्यात खिमा पण टाकायची अन आम्ही 'खिमा भरलेलाकरेला' कुठला अन 'साधा भरवा करेला' कुठला हेच शोधत बसायचो. गेले ते दिवस :-(

In reply to by वाहीदा

यशोधरा गुरुवार, 01/06/2011 - 13:20
पाकृ मस्त वाटतेय (फोटो दिसत नाहीये) आणि ही वाहीदाने सांगितलेली खिमा भरायची कल्पनाही मस्त आहे.

In reply to by अवलिया

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/06/2011 - 14:00
कारलं खात नाही. पण विजुभाऊ करुन खाऊ घालतील तर कारले सुद्धा खाउ !!
हेच बोल्तो. वाटले तर खाकी चड्डी घालुन पंगतीला बसु.

सहज गुरुवार, 01/06/2011 - 13:55
मस्त डिश विजुभौ! (कारले, शेपू, वांगे प्रेमी) सहज

जिवाणू गुरुवार, 01/06/2011 - 16:58
कारले कडू असल्यामुळे आवडत नाही, पण ह्या रीतीने केल्यास कडुपणा कमी होईल असे वाटते.

स्मिता. गुरुवार, 01/06/2011 - 17:52
पाकृ आवडली. कारले मला फार आवडते. आणि भरले कारले तर विचारायलाच नको. एक शंका; तुम्ही कारले सोलून घ्यायला का सांगितले आहे? त्याने कडूपणा कमी होतो का? आमच्याकडे कारली न सोलताच अशी भाजी करतात.

आजानुकर्ण गुरुवार, 01/06/2011 - 17:56
पाककृती चांगली आहे. मात्र परप्रांतीयांच्या पाककृतीपेक्षा अस्सल मराठमोळ्या पाककृती येथे अपेक्षित आहेत. (मराठी) आजानुकर्ण भरवा आणि करेला हे दोन हिंदी शब्द वाचून डोळे पाणावले (अश्रुपातक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

पक्या Fri, 01/07/2011 - 02:35
काय राव ...काय बोलताय ?अजुन २-३ धागे मागे गेलात तर तंदुर चिकन ही पाकॄ दिसेल. तंदूर आणि चिकन हे पण मराठी शब्द नाहियेत. असेच अजुन पण शोधले की सापडतील. विजूभाऊ मस्त पाकृ.

विजुभाऊ Fri, 01/07/2011 - 10:34
कारल्याच्या कडा सोलून घेतल्या आहेत. त्या कडांची तळून चटणी करतात. मी तळलेली कारली करताना फक्त कडा सोलत नाही अन्यथा कारली नेहमीच सोलून घेतो. प्रयोजन नक्की काय ते मलाही माहीत नाही. पण बहुधा त्या कडांची चटणी करण्यासाठीच सोलत असावेत