मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरवा करेला: लखनौ इष्टाईल

विजुभाऊ · · पाककृती
सामुग्री : कारली ,मीठ तिखट ,धणे पुड बडीशेप( ओली) , दही. कारली सोलून घ्या. सोललेला कीस बाजूला काढून ठेवा ( याची चटणी करू शकता ) सोललेली कारली एका बाजूने काप देवून चिरून त्यातील बिया काढून घ्या. चिरलेली कार्ली मिठाच्या गरम पाण्याने धुवून घ्या. थोडा दाब देवून पाणी काढून टाका आतील बाजूने तिखट मीठ लावून कारली थोडावेळ ( साधारण वीस मिनिटे )तशीच बाजूला ठेवून द्या. बडीशेप ( ओली) न मिळाल्यास साधी बडीशेप पाण्यात अर्धा तास भिजत टाका. पाच चमचे बडीशेप मध्ये एक अर्धा चमचा या प्रमाणात धणेपूड मिसळा. यात चवीसाठी तिखट , ( हवी असल्यास किंचीत साखर ) मीट यांचे मिश्रण करा व ते काप दिलेल्या कारल्यात भरा. मिश्रण सुटून बाहेर येवू नये म्हणून कारली दोर्‍याने बांधा. भरलेली कारली शॅलो फ्राय क्रऊन घ्या. फ्राय करून झाल्यानन्तर दोरे काढून टाका. वाढताना कारल्यासोबत दही अवश्य द्या. Image removed.

वाचन 8533 प्रतिक्रिया 21