फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो...
कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना....
सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज...
काही मैत्रिणींचे त्यांच्या लग्नातले जगासमोर मांडलेले 'सुंदर' म्हणावं लागतं असे फोटोज आणि त्याखालच्या त्यांच्याच गल्लीत अर्धं आयुष्य घालवलेल्या त्यांच्या मैत्रिणींच्या कॉमेंट्स 'ओह बेब्स, लुकिंग गुड!' किंवा 'वॉव, वंडरफुल कपल, लव यु गाईज!!' किंवा 'सो क्युट!' वगैरे वगैरे .......
अजून काही मैत्रिणी आणि मित्रही, ज्यांचे आपापल्या नवजात अपत्त्यांबारोबारचे फोटोज.....आणि मग त्याखालच्या बाळाचं कौतुक करणाऱ्या मावश्या 'ओह..माय क्युट बेबी !!!' 'सो SSS स्वीट...'. इत्यादी....काही जणांचे कुठल्यातरी बार मधले किंवा क्लब मधले नाचतांनाचे फोटो....आणि त्याखाली 'वॉव ...यु रॉक !!' वगैरे.........
मायामी , न्यूयॉर्क, लंडन, कॅलिफोर्निया, शिकागो, आयफेल टोवर, टोक्यो, सिंगापूर ह्या ठिकाणांचे सुमारे ५ अब्ज फोटो आणि बहुतांश फोटोज मध्ये दोन्ही हात फैलावून आकाशाकडे बघणारी ती व्यक्ती......
पावडर ने मढवून अत्यंत मोठा खरा दाणा दिसणाऱ्या साखरपुड्याच्या अल्बम मधल्या मुलीला 'खूपच छान दिसत आहेस फोटोत !' अश्या प्रतिक्रिया....काही ठिकाणी हसू येईल इतक्या वैयक्तिक आयुष्यातल्या बाबी ( उदा. 'काल रात्री खाल्लेल्या चोकलेट केक बद्दल माझ्या प्रिय नवऱ्या (हबी डार्लिंग!) , तुला खूप धन्यवाद!' ) .........
काही अजून म्हणजे स्वतःचे किंवा स्वतःशी निगडीत फोटो न लावता कोणीतरी 'अर्जुन रामपाल', 'शाहरुख खान', 'कतरिना कैफ', 'ऐश्वर्या राय' असल्या सुमार लोकांचे किंवा ज्यांचं नाव तोंडानी उच्चारता येणार नाही अश्या फ्रेंच मॉडेल्सचे फोटोज आणि त्या खाली फोटोच्या टायटल मध्ये 'यु आर सो ब्युटीफुल' असा काही मजकूर..!!......
ह्याशिवाय कोणीतरी गल्लीतला किड्यांचे, माश्यांचे, पानांवर पडलेल्या थेंबांचे, किल्ल्यांवरच्या भग्नावशेषांचे (सेपिया कलर मधले), फटाक्यांचे, सुरकुतलेल्या चेहेऱ्यांचे फोटो काढून एका काळ्या चौकटीत बसवून त्याखाली स्वतःचं नाव (उदा. अमित, आनंद वगैरे !....ही नावं खूप कॉमन आहेत म्हणून बरं का !) लावणारा फोटोग्राफर.........शिवाय अजून एक नवीन टूम, पुणेरी पाट्या आणि त्याखाली ९०० वेळा 'हा हा हा !!' वगैरे.......काही अति-धार्मिक लोकही आहेतच! रोज बायबल मधलं एक वचन किंवा रोज एक तमिळ शब्द वगैरे.....अमेरिकेत पाळीव कुत्रीही फेसबुकात समाविष्ट आहेत... कुत्र्यांचे आणि मांजरांचे केविलवाणे फोटो त्यावरची दुनियेची स्तुती-सुमनं. .... .
सचिन आणि गांगुलीचे फोटो आणि त्याखाली त्यांना दिलेलं देवपद, अनुसरून त्यांच्या आरत्या ( 'ऑफ-साईडला आधी साक्षात
देव आणि मग गांगुलीच!', 'जय सचिन देवा.!' )........
असे एक नाही अनेक तर्हेचे ग्रुप्स आहेत.....पण प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी आकृतिबंध अनुसरतोय. सगळेजण लग्नाआधी एकट्याचे फोटो लावणार, दोन-चार गडांवर जाऊन दोन-चारशे फोटोज लावणार नाहीतर लडाखला बाईकवर जाऊन येणार, कॉलेजमधल्या ग्रुपचा फोटो, मग साखरपुड्याचे बटबटीत फोटो, मग प्रत्येकजण आपण किती 'फुलीश रोमांटीक' आहोत हे दाखवणार...आणि लग्नाच्या आधी प्रत्येकाला विरह ( हल्ली त्याला 'जुदाई' म्हणतात!) होणार मग त्याचे फोटो........नंतर लग्नाचे फोटोज ज्यात सगळ्या मुलांनी फेटे घातले असणार, शिवाय हनिमूनचं प्रदर्शन आहेच ! तुमचं कुठल्या व्यक्तीबरोबर काय नातं आहे (प्रेयसी, प्रियकर, एकटा/टी, साखरपुडा झालेला, विवाहित इ.), ते अचूक शब्दांत सांगावं लागणार! मधून मधून आपला नवीन फोटो टाकल्यावर एकमेकांना 'सो चार्मिंग!' म्हणावं लागणार !
ह्या फोटोजवर लिहावं इतकं कमी तर व्हीडीओ चं जग तर त्याहीपेक्षा कमालीचं मजेदार आहे ! शिवाय लोकांचे एकमेकांना मेसेजेस आणि त्यातून घडणारा विनोद हा पराकोटीला जाईल एवढा आहे ! प्रश्न असा आहे, 'का?'...... काय लपवण्यासाठी ही सगळी मास्क्स (मुखवटे) लावावी?.......का सगळ्यांनी इतरांसारखं बनावं? अशी कोणती भीती आहे ज्यामुळे आपण बाहेर फेकले जाऊ ?
आपण का एवढं खोटं बोलतोय? का उगाच दुसऱ्याबद्दल काळजी असल्याचं दाखवतोय? का इतरांचं अनुकरण करतोय? उगाच सगळ्या फोटोजना 'लाईक' करून, सगळ्यांशी गुडी-गुडी बोलण्याचा आव आणून, अमेरिकेतल्या कंपन्यांच्या फुकट जाहिराती करून, 'पॉलीटिकली करेक्ट' बोलून, आपल्या घरीच असणाऱ्या आई-बाबांना फेसबुक वर खातं काढायला लावून आपण काय मिळवतो आहे? भरपूर बुद्धिमत्ता असणारे आपण स्वतःला अश्या सामान्यतेत का ढकलत आहोत? कोणत्या वेबसाईट वर प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला जग बदलून टाकणारी कल्पना सुचणार आहे ?
प्रिय मिपाकर/वाचकहो, छोटी छोटी निरीक्षणं मांडावी आणि विनोदी लिहावं म्हणून बसलो होतो आणि ठरवलं होतं की कुठलाही शब्द खोडायचा नाही, पण शेवटी थोडं गंभीर झालंच! तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्यायचं आहे....
धन्यवाद!
-दैत्य
वाचने
9241
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान विचार (अवांतर : पण
ओक्के. पण प्रामाणिकपणे
?
प्रामाणिकपणे सांगायचे तर
In reply to ? by स्पा
बाप रे
लेख आवडला !
डावं उजवं असायचंच रे
छान!
In reply to डावं उजवं असायचंच रे by गणपा
गणपा वा स्वातीताईप्रमाणेच
In reply to छान! by स्वाती दिनेश
+१
In reply to गणपा वा स्वातीताईप्रमाणेच by यशोधरा
क्या बोला रे मित्रा !
In reply to डावं उजवं असायचंच रे by गणपा
छान लिहीलंत. मला वाटतं ही
'फेसबुक' वर आहेस का?
हेहेहे .. तुनळीवर एक "फेसबूक
फक्त फोटू?
एकतर्फी
असं कधीच वाटलं न्हवत की
हा हा हा.
दैत्या, छान !
:):):)
In reply to दैत्या, छान ! by मितान
पुन्हा तेच.. त्या खेळात
In reply to :):):) by आत्मशून्य
मितानतै
In reply to पुन्हा तेच.. त्या खेळात by मितान
का एवढा त्रागा करुन र्हायले
In reply to मितानतै by आत्मशून्य
+१
In reply to का एवढा त्रागा करुन र्हायले by गणपा
गणपा भाउ,
In reply to का एवढा त्रागा करुन र्हायले by गणपा
चे.पू. वर अथवा इतर ठीकाणी
In reply to :):):) by आत्मशून्य
शेवटच्या काही ओळींपर्यंत लेख
रोचक
In reply to शेवटच्या काही ओळींपर्यंत लेख by शरदिनी
हे फेसबुक काय आहे?
तुम्हाला माहित नाही? मग
In reply to हे फेसबुक काय आहे? by अवलिया
हे फेसबुक काय आहे? काय रे
In reply to हे फेसबुक काय आहे? by अवलिया
>>>काय रे नाना उगाच आपल्याला
In reply to हे फेसबुक काय आहे? काय रे by परिकथेतील राजकुमार
च्यामारी ! माहित नाही ते
In reply to >>>काय रे नाना उगाच आपल्याला by अवलिया
मिपावर १०००० + सदस्य आहेत.
In reply to च्यामारी ! माहित नाही ते by परिकथेतील राजकुमार
१०००० + सदस्य ???
In reply to मिपावर १०००० + सदस्य आहेत. by अवलिया
नानासाहेब, डु-आयडींना
In reply to १०००० + सदस्य ??? by असुर
अरे वा आलात आपण परत
In reply to नानासाहेब, डु-आयडींना by नरेशकुमार
?
विषय छान पण
>>आपण खरच फक्त जे आपले खरे
In reply to विषय छान पण by खादाड अमिता
अगदी खरं आहे मेहेंदळे. कधीच
In reply to >>आपण खरच फक्त जे आपले खरे by विश्वनाथ मेहेंदळे
आपले कौतुक कुणी करावे आपले
धन्यवाद न.नि .!
सगळेजण लग्नाआधी एकट्याचे फोटो
मला तर आधी हे फेसबुक काय आहे
फेसबुक हे वापरण्यावर आहे!
या विडियोची आठवण झाली....
दैत्या... लेख आवडला. बरेचसे
कृत्रीम
धन्यवाद मित्रांनो !
लेख आवडला
लेख आवडला