✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतातील मंदिरे - १

श
शरद यांनी
Tue, 01/04/2011 - 12:29  ·  लेख
लेख
  • भारतातील मंदिरे -२
  • भारतातील मंदिरे-३
  • भारतातील मंदिरे-४ ... गिरिशिल्पे
  • भारतातील मंदिरे-५ एकपाषाणी मंदिरे
  • भारतातील मंदिरे-६ नागर व द्राविड शैली

Book traversal links for भारतातील मंदिरे - १

  • भारतातील मंदिरे -२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11258 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

वा ! सुरेख लेखमाला सुरवात

अवलिया
Tue, 01/04/2011 - 13:01 नवीन
वा ! सुरेख लेखमाला सुरवात झाली आहे यात शंका नाही. मंदीरे आणि त्याच्या आजुबाजुचा परिसर नेहमीच मोहवणारा असतो. हे मी शहरातल्या दोन बाय चारच्या मंदीरांबद्दल बोलत नाही. शेकडो वर्षांच्या परंपरा, रुढी असलेली, अनेक आख्यायिकांचा आधार असलेली मंदीरे हा भारतीय संस्कृतीचा अमुल्य ठेवा आहे. शरद यांच्या या लेखमालेतुन आणि त्याला येणार्‍या प्रतिसादातुन बहुमुल्य अशी माहिती वाचायला मिळेल यात शंका नाही. स्तुत्य लेखमाला !!
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Tue, 01/04/2011 - 13:05 नवीन
खूपच सुरेख लेखमाला. हेमाडपंथी मंदिरे, शिलाहार भोज -झंझ राजाच्या कारकिर्दीत बांधल्या गेलेल्या मंदिरांबद्दल पुढे अधिक वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

श्री. शरद, एक छान विषय सुरु

५० फक्त
Tue, 01/04/2011 - 13:06 नवीन
श्री. शरद, एक छान विषय सुरु केल्याबद्दल अतिशय धन्यवाद. माझ्या संग्रहात काही फोटो आहेत. ते पिकासावर लावुन आपल्याला लिंक देईन, उपयोगी पडल्यास त्यांचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान मिळेल. हर्षद.
  • Log in or register to post comments

व्वा वा!

भाऊ पाटील
Tue, 01/04/2011 - 13:10 नवीन
छान मेजवानी मिळेल असं दिसतय! पुढच्या भागांच्या प्रति़क्षेत.
  • Log in or register to post comments

श्री. व सौ. कुंटे ... ह्यांचा अभ्यास ...

sagarparadkar
Tue, 01/04/2011 - 13:11 नवीन
छान लेख .... माझ्या माहितीत कुंटे आडनावाचे अतिशय अभ्यासू आणि व्यासंगी आज्जी-आजोबा आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर बराच प्रवास करून अनेक दुर्मिळ मंदीरांचे फोटो व त्यांचा इतिहास गोळा केलेला आहे. त्यांनी 'बालगंधर्व' ला त्यांच्या त्या संग्रहाचे प्रदर्शन देखील भरवले होते. आता त्यांच्याशी बरेच वर्षात संपर्क नाही, पण थोडीफार शोधाशोध केल्यास त्यांचा पत्ता मिळू शकेल ... आपला लेख वाचून त्यांची आठवण झाली. (योगायोगाने ते कुंटे आपणच असल्यास आपाणांस हार्दीक शुभेच्छा)
  • Log in or register to post comments

हे बघा भारताबाहेरील प्राचीन

विजुभाऊ
Tue, 01/04/2011 - 15:27 नवीन
हे बघा भारताबाहेरील प्राचीन मंदीर. आंग्कोर वात चे हे मंदीर. Image removed. . Image removed. . आणि हे पहा या एकसंध नसलेल्या दगडातून घडवलेल्या मूर्ती Image removed. कंबोदीयातील हे विष्णुचे मंदीर सूर्यावरम या राजाने बांधलेय
  • Log in or register to post comments

हि लेखमाला देखील सुंदर होणार

परिकथेतील राजकुमार
Tue, 01/04/2011 - 13:37 नवीन
हि लेखमाला देखील सुंदर होणार हे निश्चीत. काका लेखना बरोबरच फोटोपण देता येतील का ? त्यामुळे शैली समजायला सोपे जाईल असे वाटते. अवांतर :- विजुभौ कॅमेर्‍याचे शटर बंद करुन काढलेत का हो हे फोटु ?
  • Log in or register to post comments

हा लेख छानच !!! पुभाप्र !!

सूड
Tue, 01/04/2011 - 14:06 नवीन
हा लेख छानच !!! पुभाप्र !!
  • Log in or register to post comments

अरेच्चा त्या फोटोची लिंक

विजुभाऊ
Tue, 01/04/2011 - 14:37 नवीन
अरेच्चा त्या फोटोची लिंक ब्राउजरमध्ये चिकटवली तर दिस्ताहेत की ते फोटो ओके हे बघ Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख लेखमाला असेल असे वाटत

यशोधरा
Tue, 01/04/2011 - 14:42 नवीन
सुरेख लेखमाला असेल असे वाटत आहे. वाचणार. :) विजूभाऊ, फोटो दिसत नाहीत. केवळ ग्रे रंगाचे चौकोन दिसत आहेत :(
  • Log in or register to post comments

विजूभाऊ, फोटो दिसत नाहीत. केवळ ग्रे रंगाचे चौकोन दिसत आहेत.

नन्दादीप
Tue, 01/04/2011 - 14:53 नवीन
हेच म्हणतो,,,,,
  • Log in or register to post comments

झक्कास!

धमाल मुलगा
Tue, 01/04/2011 - 16:18 नवीन
शरदरावांचा लेख म्हणजे आमच्यासारख्यांसाठी पर्वणीच. :) ह्या लेखात गमभन गिरवून तयार झालो आहोत. आता अंकलिपीची वाट पाहतोय. :) शरदराव, मंदिरांच्या स्थापत्यपध्दतीमध्ये शैव, वैष्णव, शाक्त, अघोर, नाथ इत्यादींच्या पंथांप्रमाणे फरक असतात का हा प्रश्न खूप दिवस मनात घोळतोय. हर्षदरावांनी दिलेल्या लिंकमध्ये भुलेश्वरच्या मंदिराचे फोटो आहेत ते मंदीर सर्वसाधारण भक्तीमार्गियांचे मंदिर नव्हते अशी ऐकिव माहिती आहे. ह्या/अशा मंदिरांसंदर्भातही काही माहिती सांगू शकाल काय? (हे विषय पुढच्या भागांमध्ये येऊ घातले असल्यास इथे प्रकाश न टाकल्यास हरकत नाही. :) )
  • Log in or register to post comments

चांगली लेखमाला

सर्वसाक्षी
Tue, 01/04/2011 - 21:04 नवीन
ही माहितीपूर्ण लेखमाला वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

जमल्यास पूर्वीच्या चर्चेचा दुवा द्यावा

धनंजय
Tue, 01/04/2011 - 23:16 नवीन
शरद यांनी लेखमाला पुन्हा देऊन उजळणी केली आहे, हे चांगले. मात्र त्यांना अशी विनंती आहे : त्यांनी मागे जिथे लेखमाला दिली होती, त्याचा दुवा देऊन वाचकांची सोय करावी. तेथील प्रतिसादकांनी (आणि श्री. शरद यांच्या प्रतिसादांतही) अधिक माहिती दिली होती, आणि कठिण मुद्द्यांबाबत स्पष्टीकरणेही दिली होती. या सर्वांचा फायदा येथील वाचकांना व्हावा, अशी मदत करावी.
  • Log in or register to post comments

पूर्व संदर्भ

शरद
Wed, 01/05/2011 - 07:55 नवीन
पूर्व संदर्भ ही लेखमाला पूर्वी उपक्रमवर प्रसिद्ध झाली आहे. (दि. २३-४ ते ५-६ - ०९). त्या वेळीं वाचकवर्गही भरपूर होता व अनेक मान्यवरांनी (सर्वश्री धनंजय, विसूभाऊ, चित्रा इत्यादी) त्यात स्वत:ची सुरेख व माहितीपूर्ण भर घातली होती. अशा केवळ माहिती देण्याकरिता लिहलेल्या मालिकेत वाचकांनी भाग घेतला तर माहितीत भर पडल्याने लेख जास्त वाचनीय होतो. या वेळीं ( त्या वेळच्या प्रतिसादांच्या मदतीने) लेख जास्त सुसंघटीत (cohesive) करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या आवडीचे फोटो अवष्य़ पाठवा व विचारलेल्या प्रश्नांना माहीत असतील तर उत्तरेही द्या.जेवढे जास्त वाचक यात सहभाग घेतील तेवढा सगळ्यांचा आनंद वाढणार आहे. लिंक कशी देतात ते मला कळत नाही, कोणी दिली तर हरकत नाही पण माझे असे वैयक्तिक मत आहे की नववाचकांनी एकदम सगळे लेख एका वेळीं वाचण्याऐवजी ते सावकाश प्रसिद्ध होत जातील तसतसे वाचण्यात जास्त मजा येईल. कॉफी घुटके घुटके घेत पिण्यातच आनंद आहे; ती काय घटाघटा प्यावयाची असते ? (कोणी रसिक कॉफी ऐवजी बीअर म्हणाला तरी चालेल, हा आपला माझा एक अंदाज ! ). शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

वर श्री. धनंजय म्हणाले असेच

ऋषिकेश
Fri, 01/07/2011 - 10:30 नवीन
वर श्री. धनंजय म्हणाले असेच म्हणणार होतो. त्यावर हा खुलासा वाचला.. माहिती एकत्र करून नव्याने बांधलेल्या लेखमालेला शुभेच्छा! (आधीची लेखमाला वाचली असल्याने) अपेक्षा खूप आहेत त्या तुम्ही पूर्ण कराअल याची खात्री आहे. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

माहितीपूर्ण

विकास
Wed, 01/05/2011 - 00:48 नवीन
माहीतीपूर्ण लेखमालीका होणार हे निश्चित! तिगवा मंदीरांच्या संदर्भात उत्सुकतेने गुगलले तर खालील चित्र मिळाले: Image removed. त्यात बाहेरच उजव्या बाजूस पाहीले तर बुद्धासारखे काहीतरी कोरलेले आढळले, मात्र त्याचा संदर्भ काय असू शकेल ते समजले नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर उपक्रम..

प्रशु
Wed, 01/05/2011 - 01:12 नवीन
सुंदर उपक्रम.. पुढल्या लेखाची वाट बघतोय. जमल्यास ह्या विषयावर असलेली पुस्तके आणि छायाचित्रांची यादी द्यावी धन्यवाद..
  • Log in or register to post comments

कृपया गोंदेश्वरच्या मंदिराबाबतही लिहा.

जयंत कुलकर्णी
Wed, 01/05/2011 - 06:18 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

माहीतीपूर्ण लेख

सहज
Wed, 01/05/2011 - 08:11 नवीन
संग्राह्य लेख!
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर. लेख छान.

मृत्युन्जय
Wed, 01/05/2011 - 10:16 नवीन
खुपच सुंदर. लेख छान. प्रतिक्रियाही उत्तम.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

पाषाणभेद
Wed, 01/05/2011 - 10:22 नवीन
उत्तम लेख
  • Log in or register to post comments

बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 01/06/2011 - 13:25 नवीन
बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी किमान ४००-५०० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या. वैदिक आणि अवैदिक या दोन्ही उपासना खूप जुन्या आहेत... उगाच हिंदुनी बौद्धांनंतर मंदिरे आणि मूर्त्या उभारल्या असे कशाला म्हणायचे? रामाने समुद्र ओलांडण्यापूर्वी रामेश्वरला शिवलिंग स्थापून त्याची पूजा केली होती.. म्हणजे त्या काळात शिवलिंग आणि शिवलिंग्मंदिर असणार. श्रीकृष्णानेही गुजरात्जवळ समुद्र ओलांडून द्वारका बेटावर जाताना सोमनाथाची ( म्हणजे शिवलिंगाचीच ) पूजा केली होती.. ( आता आम्हीही समुद्र ओलाम्डणार असल्याने आम्हीही एक शिवलिंग पूजणार आहोत. :) ) वैदिक देवांच्या मूर्ती नसतात, वैदिक धर्म जुना आहे. पण मूर्ती पूजणारा शैव आणि इतर हिंदु पद्धतीही तितकीच जुनी आहे..
  • Log in or register to post comments

तसेच असावे

चित्रा
गुरुवार, 01/06/2011 - 19:12 नवीन
>> हिंदुनी बौद्धांनंतर मंदिरे आणि मूर्त्या उभारल्या असे कशाला म्हणायचे? तसेच असावे. मूर्तीपूजा ही वैदिक धर्मात नाही. सध्याची हिंदू मूर्तीपूजा ही बौद्धांच्या काळानंतरच आली आहे. अर्थात बौद्धांच्याही आधी मातृदेवतांची पूजा आणि कुळाच्या नैसर्गिक दैवतांची पूजा ही होतच असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

मूर्तीपूजा वेदात नव्हती. पण

JAGOMOHANPYARE
Fri, 01/07/2011 - 09:57 नवीन
मूर्तीपूजा वेदात नव्हती. पण वैदिकांच्याबरोबरच त्या काळात जो अवैदिक स्मूह होता , त्यातील बरेच लोक शिव, स्कंद, गणपती आणि विविध स्त्री रुप देवी यांचे पूजन करत होते. त्यांच्या मूर्ती होत्या आणि देवळेही होती... हिंदु धर्मातील स्कंद हाच देव बौद्धानी वज्रपाणी या रुपात उचलला. त्याच्याच नावावरुन वज्रयान हा संप्रदाय तयार झाला. हाच स्कंद दक्षिणेत मुरुगन नावाने ओळखला जातो आणि महाराश्ट्रात कार्तिकेय या नावाने गणपतीचा भाऊ म्हणून आपण याला ओळखतो. http://en.wikipedia.org/wiki/Skanda_(Buddhism) , सारांश, मूर्तीरुप देवपूजा ही बौद्धांच्या आधीपासून आहे. लेखातच म्हटलेले आहे की पुराणांनी मूर्तीरुप देवता दिल्या. आणि त्यानंतर असेही म्हणायचे की बौद्ध धर्मानंतर मूर्तीपूजा आली. म्हणजे मग पुराणे बौद्धांच्या नंतर आली की काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

थोडे प्रश्न

चित्रा
गुरुवार, 01/06/2011 - 23:08 नवीन
शरद यांच्या देवळांवरील लेखांमुळे जरा कुतुहल चाळवलेले आहे. मला एक प्रश्न होता तो असा की - देवळांवर प्राणी, फुले पाने असे काही कोरलेले नेहमीच आढळते. पण कुठचीही अवजारे, शस्त्रे अशी देवळावर कोरलेली पाहिली आहेत का? तसेच प्राणी जसे हमखास दिसतात तसे पक्षी कोरलेले दिसतात का?
  • Log in or register to post comments

कालानुक्रम

शरद
Fri, 01/07/2011 - 13:08 नवीन
श्री. जागोमोहनप्यारे :मी म्हटले आहे कीं सर्वात पुरातन मंदिर पहावयाचे असेल तर तिसर्‍या शतकापर्यंत यावे लागेल. त्या पूर्वी देवळे होती; तसे उल्लेख आहेत, पण ती देवळे लाकडी/वीटांची असावीत; ती आज पहावयास मिळत नाहीत.इ.स.पूर्व स्तूप, विहार पहावयास मिळतात. लेखमाला आहे मंदिरांवर. मूर्तिपूजेवर नाही. तो विषय निराळा. आपण त्यावर लेखमाला लिहलीत तर मीही माझ्याकडील मजेदार माहिती देईन.( उदा. बौद्धांची तारा ही देवता गणपतीवर नाचत आहे अशी मूर्तीही पहावयास मिळते!) पुराणे अर्थातच बुद्धानंतर ६००-७०० वर्षांनंतरची आहेत. श्री. चित्रा : शिल्पांत पक्षी (गरुड, हंस, गंडभेरुंड इत्यादी) आहेत. शस्त्रे योद्ध्यांच्या हातात आहेत. अवजारे नसावित कारण फार शोभादायक नाहीत म्हणून, हा माझा अंदाज. आज नजरेसमोर नाहीत पण आता लक्षात ठेवीन व दिसली तर कळवीन. शरद
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चित्रा
Sat, 01/08/2011 - 01:44 नवीन
>>शिल्पांत पक्षी (गरुड, हंस, गंडभेरुंड इत्यादी) आहेत. पण पोपट, साळुंक्या, मोर असे फारसे दिसत नाहीत असे वाटते. निदान महाराष्ट्रातील साध्यासुध्या देवळांमध्ये विशेष पाहिलेले नाहीत असे वाटते. >>अवजारे नसावित कारण फार शोभादायक नाहीत म्हणून, हा माझा अंदाज. मलाही असेच वाटते, किंवा कदाचित मंदिरांवर काय असावे याचे नियम असतील. >>आज नजरेसमोर नाहीत पण आता लक्षात ठेवीन व दिसली तर कळवीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

आपण त्यावर लेखमाला लिहलीत तर

JAGOMOHANPYARE
Fri, 01/07/2011 - 16:37 नवीन
आपण त्यावर लेखमाला लिहलीत तर मीही माझ्याकडील मजेदार माहिती देईन.( उदा. बौद्धांची तारा ही देवता गणपतीवर नाचत आहे अशी मूर्तीही पहावयास मिळते!) पुन्हा तेच ! आता हिंदुंच्या मूर्ती या जर बौद्धांच्यानंतर आल्या, तर या ताराबाईला टाळक्यावर नाचायला गणपती कुठून सापडला ???? :) आणि मुळातच बौद्ध धर्मात देव असणं हाच मोठा विनोद आहे... बुद्धानी देव नाकारलेला असून बौद्ध धर्म हा एक नास्तिक धर्म आहे.. ( नास्तिक दोन्ही अर्थाने- वेदानाही मानत नाहीत आणि देवानाही मानत नाहीत. ) त्यांच्या अनुयायानी हे असे देव तयार केले. पुराणे अर्थातच बुद्धानंतर ६००-७०० वर्षांनंतरची आहेत. तुम्हाला कोपरापासून दंडवत ! सन ७८६ पूर्वी जग आस्तित्वातच नव्हते असेही म्हणणारे लोक आहेत!! त्यांच्यापुढे तुमचे 'हे ' संशोधन काहीच नाही !! :) बुद्धानंतर ६०० वर्षानी हिंदु मूर्ती आल्या असे म्हणताय, मग इ स पूर्वी जी लाकडाची आणि विटांची देवळं होती असे तुम्ही म्हणताय, त्या देवळात कोण बसत होतं??? :) बौद्ध धर्मात जे लोक गेले ते त्या काळातले पूर्वीचे हिंदुच तर होते.. म्हणजे बुद्धापूर्वी वास्तु आणि स्थापत्यचे ज्ञान लोकाना नव्हते आणि अचानक बौद्ध धर्मात गेल्यावर या लोकाना वास्तु आणि स्थापत्य ज्ञानाचा दृष्टांत झाला की काय? :) .. हिंदु धर्म बाकी धर्माना अर्वाचीन कसा हे सिद्ध करायची आजकाल चढाओढच लागलेली आहे.. ! :)
  • Log in or register to post comments

नाही

चित्रा
Sat, 01/08/2011 - 02:24 नवीन
बौद्ध धर्मात जे लोक गेले ते त्या काळातले पूर्वीचे हिंदुच तर होते.. म्हणजे बुद्धापूर्वी वास्तु आणि स्थापत्यचे ज्ञान लोकाना नव्हते आणि अचानक बौद्ध धर्मात गेल्यावर या लोकाना वास्तु आणि स्थापत्य ज्ञानाचा दृष्टांत झाला की काय? हिंदु धर्म बाकी धर्माना अर्वाचीन कसा हे सिद्ध करायची आजकाल चढाओढच लागलेली आहे.. ! असे नसावे. जैन, बौद्ध आणि वैदिक अशा तीन ढोबळ पद्धती धरल्या, तर हे सर्व एकमेकांकडून काही ना काही विचार/आचार घेऊनच तयार झाले असावेत. बौद्ध धर्मात गेल्यावर स्थापत्याचा दृष्टांत झाला नाही, तर अशोकाच्या आणि त्याच्यानंतरच्या काळात बौद्ध मठांना जे दान दिले गेले, त्यातून मठांकडे पैशाचा ओघ वाढला आणि स्तूप बांधता आले. जैनांचीही देवळे नंतरच झाली. गुप्तकाळात व्यापार-उदीमही वाढला असावा, त्यामुळे हिंदू देवतांची देवळे बांधली गेली असावी. याउलट तत्कालीन बौद्ध जैन किंवा हिंदू असा कुठचाही शिक्का नसलेली घरे/राजवाडे यांचे अवशेष फारसे दिसत नाहीत, कारण त्यांच्याकडे हे खूपकाळ टिकणारे बांधकाम साहित्य (दगड) नसावेत/तेवढे उत्खननही शक्य नसावे. विटामातीची घरे, किंवा लाकडी/गवताची घरे नष्ट झाली असतील. जे दगडात कोरले होते ते तसेच राहिले. पण बौद्धांआधी नागरी स्थापत्य नव्हते असे समजण्याचे कारण नाही. कुठच्याही काळातील लोकांची राहणी कशी होती याबद्दल आपल्याला भित्तीचित्रांमधून, शिल्पांमधून काही ना काही समजतच असते. हे बघा किंवा हे बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

वा वा! लेखमाला अतिशय सुरेख

प्राजु
Fri, 01/07/2011 - 23:58 नवीन
वा वा! लेखमाला अतिशय सुरेख होणार यात शंका नाही. वाट पाहतेय .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा