भारतातील मंदिरे - १
भारतातील मंदिरे
(भारतातील मंदिरांचा इतिहास,त्यांच्या उभारणीमधील वेगवेगळ्या शैली, त्यांतील उपशैली, निरनिराळ्या प्रांतातील देवळांत आढळणारे फ़रक, तसेच वैयक्तिक देवळातील वैशिष्टे, नेमके काय पहाण्यास विसरू नये यांची तोंडओळख करून देणारी लेखमाला. इथे आपणास काही पारिभाषिक शब्दांची सूचीही पहाता येईल. तिचा उपयोग आपणाला इतर तांत्रिक लेख वाचतानाही होईल. विषयाचा आवाका फ़ार मोठा असल्याने जास्त माहिती देणे शक्य नाही. दिग्दर्शन एवढाच माफ़क उद्देश.)
इतिहास.
आपण लहानपणी देवळात जातो. मोठेपणी जातोच असे नाही.पण देवळांबद्दलचे एक आकर्षण मनात घर करून रहातेच. ही भावना सर्व भारतीयांच्या मनात शेकडो वर्षे घर करून राहिली आहे.त्यामुळे क्षेत्रांमध्ये सोडाच पण पुण्यासारख्या शहरातही शेकडो देवळे आढळतात. हिंदू धर्मात अनेक देव असल्याने त्यात भर पडते. वर्षानुवर्षे कलाकारांनी अपार कष्ट करून जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यामुळे देवळे भक्तांचीच नव्हे तर पर्यटकांचीही आकर्षणे ठरली आहेत. तर अशी ही देवळे बांधावयास सुरवात तरी केंव्हा झाली ? किंवा असे विचारले की सर्वात पुरातन देऊळ पहावयाचे असेल तर ते कोणत्या शतकातील असेल ? माझी खात्री आहे बहुतेकांचा अंदाज चुकीचा असेल. बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी किमान ४००-५०० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.
पुराणांनी जेव्हा शंकर, विष्णु असे "सगुण" देव "हिंदू" धर्माला दिले तेंव्हा देवळे बांधावयाची सोय झाली. पहिल्यांदा मूर्ती आली व नंतर तीचे घर.आधीच्या वाङ्मयात उल्लेख असले तरी दगड विटांची टिकावू देवळे उभारावयाची वेळ तिसऱ्या शतकातच आली. शंख-चक्र-गदा-पद्मधारी मूर्तीची पूजाअर्चा करावयाची तर गाभारा पाहिजे, चार लोकांना बसावयाला मंडप पाहिजे, प्रदक्षणा मार्ग पाहिजे. बस, सुरवातीच्या देवळात एवढीच सोय होती. मध्य प्रदेशातील तिगवा "कंकाली मंदिर" सर्वात जून्या देवळातील एक. गाभारा बाहेरून पावणेचार मि.लांब-रूंद, आतल्या बाजूने अडीच मि.चौरस.समोरचा मुखमंडप पावणेचार मि.लांब व पावणेदोन मि. रुंद आहे. चार स्तंभ, त्यावर पूर्ण कलश व सिंहाच्या मूर्ती. सपाट छप्पर.द्वाराभोवती गंगा- यमुनेच्या मूर्ती. पूजेला आवश्यक तेवढ्याच भागांचा समावेश. पण सुरवात जरी अशी साधी-सुधी असली तरी पुढील प्रगती भराभर झाली.याचे कारण परत अगदी साधे. बौद्ध-जैन स्थापत्यकलेमुळे कलाकार कलेत आणि तांत्रिक बाबतीत परिपूर्ण होते. काय करावयाचे सांगा. कसे करावयाचे आम्ही बघू. बुद्ध हवा? बुद्ध घ्या. शंकर हवा? शंकर घ्या; तितकाच सुंदर. काय बांधावयाचे, कसे बांधावयाचे ते ठरवण्यास एक दोन शतके लागली. हा काळ चाचपणीचा (trial and error) होता. निरनिराळ्य़ा शैलींचा उगम या काळातीलच. आज पाहावयास मिळणारे सर्वात जुने देऊळ, तिगवा, मध्यप्रदेश.
सुरवातीलाच मी काही पारिभाषिक शब्दांची सूची देतो आहे. त्याची गरज भासेलच असे नाही. पण माहिती असेल तर नागर-द्रविड शैलींमधील बारकावे समजावून घेणे सोपे जाईल.
अर्धमंडप: मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरचा लहान आकाराचा, तीन बाजूंनी उघडा असलेला मंडप.
अर्धस्तंभ: भिंतीत गुंतवल्यामुळे ज्यांचा अर्धाच भाग दृष्टीस पडतो असा खांब.
आमलक: शिखराच्या माथ्यावर येणारे, रायआवळ्यासारख्या खाचा असलेले दगडी चक्र.
उत्क्षिप्त: भिंतीचे पुढे सरकलेले ( फ़ेकलेले म्हणजे क्षिप्त ) काही भाग यांना रथ असे म्हणतात.यांना विसंवादी, मागे सरकलेले, उठाव .देणारे भाग म्हणजे उत्क्षिप्त.
उद्गम: भिंतीवर सजावटीसाठी वापरण्यात येणारे त्रिकोणी रूपक .
अंतराळ: देवळाचा गाभारा आणि मंडप यांच्या मधोमध येणारे दालन. आरंभी याच्यावर छप्पर नसे. पीठ : जोते
उपपीठ :पीठावर येणारे, कमी उंचीचे जोते किंवा चौथरा.
कपोत: सज्जा किंवा पागोळी .
कोष्ठ: कोनाडा
गजपृष्ठ: चापाकार वास्तूचे छप्पर.
जंधा: देवालयाच्या भिंतीचा मधला भाग.हा सहसा सपाट असून यावर मूर्तिकाम केलेले आढळते.
तरंगहस्त: bracket.
प्रणाल: पन्हाळ.
भद्र: कोणत्याही इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर बांधण्यात येणारा उघडा मंडप.
भूमी: मजला.
मंडप: आयताकार दालन. विशेषत: गाभाऱ्य़ासमोरील.
रथ: गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर असणारे उभे पट्टे. हे एकापुढे एक सरकतात. या रथांच्या संख्येवरून विधानाला त्रिरथ, पंचरथ अशी नावे देतात.
वितान: छत.
विमान: गाभारा व शिखर यांना मिळून दिलेले नाव.
वेदिका: कठडा.
व्याल: सिंह, वाघ, हत्ती अशा निरनिराळ्या प्राण्यांचे अवयव जोडून केलेला प्राणी.शरीर मुख्यत्वे सिंहाचे असते.
शाला: आयताकार विधानाची इमारत.
शिखर: छप्पर. यात कळसाचाही समावेश होतो.
शुकनास: "अंतराळ" य़ा भागावर येणारे गोलाकर छप्पर. याच्या लहान बाजूंपैकी एक शिखराला चिकटलेली असते तर दुसरीत कोनाडा करून देवमूर्ती बसवतात.
हस्त: क्षिप्त भाग. Bracket सारखा बाहेर आलेला भाग
काही इन्ग्रजी शब्दही बघू.
Apsidal : चापकार विधानाची वास्तू.
Arc : कमान
Barrel vaulted roof : गजपृष्टाकार छप्पर.
Brace: कर्ण
Bracket : हस्त
Capital : स्तंबशीर्ष, मथळा
Ceiling : छत, वितान
Column : खांब
Facade : गृहमुख
Frieze : शिल्पपट्ट
Medallion: तबक
Monolithic : एकपाषाणी
Motif : रूपक
Pilaster : अर्धस्तंभ
Plan : पदविन्यास,विधान
Recess : प्रतिक्षेप
Relief : उठाव
बुद्ध-जैन स्थापत्यकलेचा देवळांवरचा परिणाम
बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेचच त्याच्या अवशेषावर (उदा. दात ) इमारत बांधावयास सुरवात झाली. तसेच विहार, चैत्य यांचीही उभारणी सुरू झाली. हा काळ सुमारे इ.स.पूर्व ४०० च्या आधी. बौद्ध धर्माचा ओसर इ.स. ३०० ते ४०० धरला तर जवळजवळ ७०० वर्षे ही बांधकामे चालू होती. या काळात चाचपणी होत असणारच.हिंदू देवळांची लाकडी किंवा कच्च्या विटांची बांधकामे आधीपासून चालू असली पाहिजेतच कारण वाङ्मयात तसे उल्लेख मिळतात. कबूल. पण दगडांची देवळे तिसऱ्या शतका नंतरचीच मिळतात. त्या काळच्या स्थपती समोर विहार, चैत होते आणि देवळे बांधताना तो त्यांचा उपयोग करणारच. आधाराबाबत म्हणाल तर बौद्ध कलेचा देवळांच्या बांधणी वरचा परिणाम यावर स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.. सुरवातीला म्हटल्याप्रमाणॆ विषयाचा आवाका मोठा असल्याने सगळ्याच गोष्टींबद्दल लिहणॆ अवघड आहे. क्षमस्व.
आता एक विनंती. लेखातील संदर्भाकरिता लागणारी चित्रे मी देईनच. पण आपणही आपल्याकडचे फोटो डकवलेत तर सगळ्यांच्या आनंदात भरेच पडेल.
शरद
- भारतातील मंदिरे -२
- भारतातील मंदिरे-३
- भारतातील मंदिरे-४ ... गिरिशिल्पे
- भारतातील मंदिरे-५ एकपाषाणी मंदिरे
- भारतातील मंदिरे-६ नागर व द्राविड शैली
Book traversal links for भारतातील मंदिरे - १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा ! सुरेख लेखमाला सुरवात
+१
श्री. शरद, एक छान विषय सुरु
व्वा वा!
श्री. व सौ. कुंटे ... ह्यांचा अभ्यास ...
हे बघा भारताबाहेरील प्राचीन
हि लेखमाला देखील सुंदर होणार
हा लेख छानच !!! पुभाप्र !!
अरेच्चा त्या फोटोची लिंक
सुरेख लेखमाला असेल असे वाटत
विजूभाऊ, फोटो दिसत नाहीत. केवळ ग्रे रंगाचे चौकोन दिसत आहेत.
झक्कास!
चांगली लेखमाला
जमल्यास पूर्वीच्या चर्चेचा दुवा द्यावा
पूर्व संदर्भ
वर श्री. धनंजय म्हणाले असेच
माहितीपूर्ण
सुंदर उपक्रम..
कृपया गोंदेश्वरच्या मंदिराबाबतही लिहा.
माहीतीपूर्ण लेख
खुपच सुंदर. लेख छान.
उत्तम लेख
बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी
तसेच असावे
मूर्तीपूजा वेदात नव्हती. पण
थोडे प्रश्न
कालानुक्रम
धन्यवाद
आपण त्यावर लेखमाला लिहलीत तर
नाही
वा वा! लेखमाला अतिशय सुरेख