Skip to main content

प्रत्येक दिवस नूतन आहे...

लेखक ज्ञानराम यांनी शुक्रवार, 31/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव.. सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ? किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर, किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल, नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं काही नितळ आहे, जरी सरल्या असंख्य रात्री , प्रत्येक दिवस नूतन आहे...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2064
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अप्रतिम अशी कविता. फार्फार आवडली.