आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं
पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव..
सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ?
किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी
किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर,
किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर
किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो
कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो
सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल
पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील
दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल,
नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल
उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं काही नितळ आहे,
जरी सरल्या असंख्य रात्री , प्रत्येक दिवस नूतन आहे...
वाचने
2064
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कविता. नवीन वर्षाच्या
साध्या सोप्या रचनेची गम्मत
प्रत्येक ओळ आणि ओळ सुंदर आहे
अप्रतिम सुंदर कविता. फारच
खरोखरच