म्हणजे हा टाईमस्लॉट तुम्ही ३१ सेलेब्रेट करुन झोपल्यानंतर व त्यानंतर पुन्हा उठल्यानंतर सुरु झाला हे गृहीत धरतो, त्यानंतर तो १२ पर्यंत मोजावा ही तुमची अट, राईट्ट ?
माफ करा, ही वेळ गेली काही वर्षे पाहिलीच नाही.
ह्यावेळी कोणीतरी ह्या सुवर्णक्षणांचा फोटो काढुन तो मिपावर द्या रे, साला नायतर आम्ही तर केव्हा बघणार असे सुवर्णक्षण ?

>>> कसा, कोनाचा, कोनत्या कॅमेर्याने काढलेला,केवढा फोटो हवाय? ते स्पेसिफिक सान्गा.
म्हन्जे १ जान च्या मुहुर्तावर कोनी तरी उपलब्ध करुन देइल
बाकी- माझ्या १ल्या कौलाला १ ले मत देउन नारळ फोडलात त्याबद्दल आभारी
>> म्हन्जे उशिरा उठता पर्याय लागु होतो ना?
चुक !
हा पर्याय मला लागु होत नाही, ह्यासाठी उशीरा का होईना पण १२ च्या आधी उठणे अपेक्षित आहे, जे मी करत नाही.
इथे जर 'झोपतो' असा पर्याय असता तर तो मी निवडला असता, असो.
>> कसा, कोनाचा, कोनत्या कॅमेर्याने काढलेला,केवढा फोटो हवाय? ते स्पेसिफिक सान्गा.
ते उद्या बिंदुगामी विचार करुन सांगतो ;)
मी १ जानेवारीला शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करते ,रात्री जागरण झाले असेल तरी ,देवपूजा करण्याचा पण प्रयत्न करते पण ते होतेच असं नाही आणि बरेचसे संकल्प करते जे पहिल्या १० दिवसांनंतर कधी आठवत पण नाही.
मी सुद्धा आमची माती आमची माणसे मधले कबुतरांचे पालन कसे करावे ह्यावर मार्गदर्शन पर कार्यक्रम पहातो. यावेळी कलमी आंब्यांचे १२ प्रकार दाखवणार आहेत. ते देखील पहाणे रोचक ठरेल .
नववर्षाची सुरुवात आंब्यांच्या कलमाने घडावी ह्यापेक्षा सुरेख ते काय ?
चुचु आनि टारझन,
कै च्या कै हा
आमची माती तुमची माणसे कोनत्या चॅनेलवर सकाळी १२ पर्यन्त लागते?(वाटल्यास क्रुषीमन्त्री पवारान्न्ना विचारा)
सान्गा बरे.
लोकान्न्ना शिरियसनेस च नाहीये.
अशी पाखरे येती.. आणिक स्मृती ठेवूनी जाती..
हे गाणे आठवून गेल्या वर्षात एकूण किती 'पाखरे' माझ्या आयुष्यातून 'उडून' गेली त्याची गणना करतो,
अन् मग येत्या वर्षात अजून 'किती' नवी 'पाखरे' येतील ह्याचा अंदाज घेत परत पांघरूण ओढून झोपी जातो..
ऑफीस नसेल तर, भरपूर लोळून उठल्यावर, एक सुंदर डायरी घेऊन येते. या वर्षातील अवीट, सुखद, मैत्रीपूर्ण क्षणांची नोंद ठेवण्याकरता डायरी खूप आवश्यक वाटते मला.
कोर्या करकरीत डायरीच्या कोणत्या पानावर न जाणो कोणती सुंदर अक्षरे आणि सुखद आठवणी उमटणार असतात. : )
यावर्षी तर मी मखमली डायरी आणणार आहे कारण माझे आई-बाबा मला भेट द्यायला या वर्षी येणार आहेत.
झिंटॅक किंवा डिस्र्पिनची किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही गोळ्या घेतो आणि बायकोला शपथ देतो कि चालू वर्षात ज्या ज्या पेयांची गणना लौकिकदृष्ट्या दारू म्हणून होते ती पेये पिणार नाही.
अवांतर : बायकोही जुन्या वळणाची (अगदी सरळ) असल्याने विश्वास ठेवत असते, त्यामुळे समयोचित आणि प्रसंगोचित 'दारुडा" असूनसुध्दा माझा संसार सुखाचा चालला आहे.
हा प्रश्न पडायचे कारण म्हणजे आदला दिवस हा ३१ डिसेंबरचा असतो. आता काही जणांना प्रश्न पडेल की ३१ डिसेंबरचे येवढे वैशिष्ठ्य ते काय?
डिसेंबर ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६५ वा किंवा लीप वर्षात ३६६ वा दिवस असतो. ह्याच दिवशी १९०७ मध्ये हरिवंशराय बच्चन, जेष्ठ हिंदी कवी ह्यांचा जन्म झाला, तर ३१ डिसेंबरला अनेक मृत्यु देखील झाले.
* १९२ - कोमॉडस, रोमन सम्राट.
* ३३५ - संत सिल्व्हेस्टर.
* १६१० - लुडॉल्फ व्हान स्युलेन, जर्मन गणितज्ञ.
* १६५० - दॉर्गोन, चीनी सम्राट.
* १६७९ - जियोव्हानी आल्फोन्सो बोरेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
* १७९९ - ज्यॉँ-फ्रांस्वा मारमोंटेल, फ्रेंच लेखक.
* १८७२ - अलेक्सिस किवी, फिनिश लेखक.
* १८७७ - गुस्ताव कुर्बे, फ्रेंच चित्रकार.
* १८८९ - इयोन क्रेंगा, रोमेनियन लेखक.
* १८९४ - थॉमस जोन्स स्टिल्ट्येस, डच गणितज्ञ.
* १९०५ - अलेक्झांडर पोपोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
* १९३६ - मिगेल दि उनामुनो, स्पॅनिश लेखक.
* १९५२ - हँक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार.
* १९६४ - ओलाफुर थॉर्स, आइसलँडचा पंतप्रधान.
* १९७७ - सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह, कुवैतचा शेख.
* १९८० - मार्शल मॅकलुहान, केनेडियन लेखक.
* १९९३ - झ्वियाद गामसाखुर्दिया, जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
* २००३ - आर्थर आर. फोन हिप्पेल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
* २००४ - जरार्ड देब्रू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ.
ह्या सर्वांचा मृत्युदिन ३१ डिसेंबरच होता. अशा भयानक दिवसाला सामोरे गेल्यानंतर तुम्ही १ जानेवारीला काय करता ? हा प्रश्न उपस्थीत होणारच.
जानेवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १ वा किंवा लीप वर्षात १ वा दिवस असतो. ह्या दिवशी अनेक महत्वाच्या घटना वेगवेगळ्या सालात घडलेल्या आहेत.
# धुम्रपान विरोधी दिन
# ना. भि. परुळेकर यांनी 'सकाळ' हे वृत्तपत्र सुरु केले. (१९३२)
# गव्हर्नमेंट ऑफ़ इंडिया ऍक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली. (१९१९)
# डॉ. शांतीस्वरुप भटनागर स्मृतिदिन. (१९५५)
# ख्रिस्ती वर्षारंभ दिन आहे.
# भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्. एफ्. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५,००० संख्याबळाच्या पेशवे सैन्याचा पराभव केला. (१८१८)
# महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. (१८४८)
# डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय शास्त्रज्ञ. (जन्म १९४३)
सहमत आहे. येणारा प्रत्येक दिवस स्वतःबरोबर रात्र घेऊन येते. रात्र स्वतःबरोबर सकाळ घेऊन येते. दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ एकमेकांच्या विरुद्ध असतात. एकत्र कधीच नसतात. विशिष्ट दिवसांचे विशिष्ट प्रयोजन असते. पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव सर्वत्र वाढत असतांना आणि सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री काय करायचे याच्या योजना बनवत असतांना दुसर्यादिवशी सकाळ कशी घालवणार याचा कौलप्रवर्तकाला पडलेला प्रश्न त्यांच्या प्रगल्भ बुद्धिची साक्ष देत आहे. असा विचार करणारे सदस्यसंख्या जसजशी वाढत जाईल तसतसे मिपा अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल याची मला खात्री आहे.
सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री काय करायचे याच्या योजना बनवत असतांना दुसर्यादिवशी सकाळ कशी घालवणार
>>>> असे काय म्हनता ३१ नन्तर १ जान उजाडनारच आहे ना मग नववर्शाच्या दिवशी काही योजना असेल च ना प्रत्येकाची कोम्बडे झाकले तरी उजाडाय्चे राहील का?
याचा कौलप्रवर्तकाला पडलेला प्रश्न त्यांच्या प्रगल्भ बुद्धिची साक्ष देत आहे.
>>> गुण्ग्राही आहात तुम्ही
असा विचार करणारे सदस्यसंख्या जसजशी वाढत जाईल तसतसे मिपा अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल याची मला खात्री आहे.
>>> तुम्हाला नवीन वर्षाच्या ३१-१२-११ पर्यन्त शुभेच्छा
प्रतिक्रिया
इतर ...
१ जानेवारी - सकाळी ( / दुपारी ?) १२ वाजेपर्यंत
म्हणजे हा टाईमस्लॉट तुम्ही ३१ सेलेब्रेट करुन झोपल्यानंतर व त्यानंतर पुन्हा उठल्यानंतर सुरु झाला हे गृहीत धरतो, त्यानंतर तो १२ पर्यंत मोजावा ही तुमची अट, राईट्ट ?
माफ करा, ही वेळ गेली काही वर्षे पाहिलीच नाही.
ह्यावेळी कोणीतरी ह्या सुवर्णक्षणांचा फोटो काढुन तो मिपावर द्या रे, साला नायतर आम्ही तर केव्हा बघणार असे सुवर्णक्षण ?
असो.
- छोटा डॉन
टाइमस्लॉट बरोबर माफ करा, ही
In reply to इतर ... by छोटा डॉन
टाइमस्लॉट बरोबर
माफ करा, ही वेळ गेली काही वर्षे पाहिलीच नाही.
>>> म्हन्जे उशिरा उठता पर्याय लागु होतो ना?
ह्यावेळी कोणीतरी ह्या सुवर्णक्षणांचा फोटो काढुन तो मिपावर द्या रे, साला नायतर आम्ही तर केव्हा बघणार असे सुवर्णक्षण ?
>>> कसा, कोनाचा, कोनत्या कॅमेर्याने काढलेला,केवढा फोटो हवाय? ते स्पेसिफिक सान्गा.
म्हन्जे १ जान च्या मुहुर्तावर कोनी तरी उपलब्ध करुन देइल
बाकी- माझ्या १ल्या कौलाला १ ले मत देउन नारळ फोडलात त्याबद्दल आभारी
चुक ...
In reply to टाइमस्लॉट बरोबर माफ करा, ही by मुलूखावेगळी
>> म्हन्जे उशिरा उठता पर्याय लागु होतो ना?
चुक !
हा पर्याय मला लागु होत नाही, ह्यासाठी उशीरा का होईना पण १२ च्या आधी उठणे अपेक्षित आहे, जे मी करत नाही.
इथे जर 'झोपतो' असा पर्याय असता तर तो मी निवडला असता, असो.
>> कसा, कोनाचा, कोनत्या कॅमेर्याने काढलेला,केवढा फोटो हवाय? ते स्पेसिफिक सान्गा.
ते उद्या बिंदुगामी विचार करुन सांगतो ;)
- छोटा डॉन
प्रयत्न करते
In reply to चुक ... by छोटा डॉन
मी १ जानेवारीला शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करते ,रात्री जागरण झाले असेल तरी ,देवपूजा करण्याचा पण प्रयत्न करते पण ते होतेच असं नाही आणि बरेचसे संकल्प करते जे पहिल्या १० दिवसांनंतर कधी आठवत पण नाही.
चांगल्या मुहुर्तावर नारळ नसला फोडणार.
In reply to टाइमस्लॉट बरोबर माफ करा, ही by मुलूखावेगळी
२८६ वाचने झाली तरी ९ मते पडली आहेत फक्त एव्हढ्या वेळात. :(
नेहमी प्रमाणे उठतो.
आणि कामाला लागतो.
मी 'आमची माती आमची माणसे'
मी 'आमची माती आमची माणसे' पहाते व 'ज्वारीची किड' घालवायला तज्ञांचा सल्ला घेते ;)
=)) =)) =)) =)) =)) क ह र !
In reply to मी 'आमची माती आमची माणसे' by पर्नल नेने मराठे
=)) =)) =)) =)) =))
क ह र ! ! !
--असुर
गुड क्वेशन !! तुर्तास माझ्या
In reply to =)) =)) =)) =)) =)) क ह र ! by असुर
गुड क्वेशन !!
तुर्तास माझ्या करिता हा प्रश्न पुर्णपणे वैयक्तीक असल्याने ऊत्तर देण्याचे टाळत आहे . धागाकर्त्याने ' और जानकारी के लिये " व्यनी करावा.
हा प्रश्न पुर्णपणे वैयक्तीक
In reply to गुड क्वेशन !! तुर्तास माझ्या by सुहास..
हा प्रश्न पुर्णपणे वैयक्तीक असल्याने
>>> मी व्यनी कराय्चे टाळत आहे.
धन्यवाद !
In reply to हा प्रश्न पुर्णपणे वैयक्तीक by मुलूखावेगळी
मी व्यनी कराय्चे टाळत आहे.>>>
धन्यवाद !!
+१
In reply to मी 'आमची माती आमची माणसे' by पर्नल नेने मराठे
मी सुद्धा आमची माती आमची माणसे मधले कबुतरांचे पालन कसे करावे ह्यावर मार्गदर्शन पर कार्यक्रम पहातो. यावेळी कलमी आंब्यांचे १२ प्रकार दाखवणार आहेत. ते देखील पहाणे रोचक ठरेल .
नववर्षाची सुरुवात आंब्यांच्या कलमाने घडावी ह्यापेक्षा सुरेख ते काय ?
-(आंबे प्रेमी) टारझन
चुचु आनि टारझन, कै च्या कै
In reply to +१ by टारझन
चुचु आनि टारझन,
कै च्या कै हा
आमची माती तुमची माणसे कोनत्या चॅनेलवर सकाळी १२ पर्यन्त लागते?(वाटल्यास क्रुषीमन्त्री पवारान्न्ना विचारा)
सान्गा बरे.
लोकान्न्ना शिरियसनेस च नाहीये.
जय जवान जय किसान
ओ काहीपण बोलू नका. ई टिव्ही
In reply to चुचु आनि टारझन, कै च्या कै by मुलूखावेगळी
ओ काहीपण बोलू नका. ई टिव्ही मराठीवर दाखवतात.
काहीपण बोलू नका
In reply to ओ काहीपण बोलू नका. ई टिव्ही by llपुण्याचे पेशवेll
ई टिव्ही मराठीवर दाखवतात. >>>
नाही रे धन्या , ई टिव्ही मराठीवर ' आमची मातीत गेलेली माणस " आणि झि टिव्ही वर " आमची माती आमचीच माणस करतात" असे दोन कार्यक्रम असतात .
सुहास आणि टार्या कौलाची
In reply to काहीपण बोलू नका by सुहास..
सुहास आणि टार्या कौलाची वैधता संपली असल्याने इथे काही मत देता येत नाही. म्हणून इत्यलम.
अरे त्यांचं सगळंच वेगळं आहे
In reply to ओ काहीपण बोलू नका. ई टिव्ही by llपुण्याचे पेशवेll
अरे त्यांचं सगळंच वेगळं आहे बघ .. :) त्या आपल्या मुलुखात पण रहात नाहीत .. तेंव्हा त्यांची शंका कैच्याकै असली तरी खपवुन घ्या :)
-(श्री दत्त प्रेमी) मुलंखासगळी
हो का? मी डब्बा पाहात नाही
In reply to ओ काहीपण बोलू नका. ई टिव्ही by llपुण्याचे पेशवेll
हो का?
मी डब्बा पाहात नाही :(
इ टीव्वी वर का? छान छान च की मग
आहे ना तो प्रोग्राम मन्ग बघा माझी काही हरकत नाही
हुम् ( मनात- आमची माती तुमची मान्से टाका गाडुन
आता २०११ मधे डबा इकत घ्यावा कि काय?)
"चांगले डब्बे कुठे मिळतात ? "
In reply to हो का? मी डब्बा पाहात नाही by मुलूखावेगळी
"चांगले डब्बे कुठे मिळतात ? " म्हणुन एक कौल होउन जाऊद्या मुलुखावेगळ्या काकु !!
टाकु म्हन्तोस का? पन
In reply to "चांगले डब्बे कुठे मिळतात ? " by टारझन
टाकु म्हन्तोस का?
पन सेकन्डहॅन्ड साठी कौल टाकला तर पब्लिक ..................
१ जानेवारी ला तुम्ही सकाळी
१ जानेवारी ला तुम्ही सकाळी तुम्ही काय करता? (वैधता-१२ वाजेपर्यन्त)
शौचमुखमर्जनादी विधी उरकतो....
१ जानेवारीला सकाळी
कैलेन्डर बदलतो.
एकदम प्रॆक्टीकल
In reply to १ जानेवारीला सकाळी by विनायक बेलापुरे
एकदम प्रॆक्टीकल उत्तर दिलतं बुवा तुम्ही!
किती कॅलेन्डरं आहेत तुमची?
In reply to १ जानेवारीला सकाळी by विनायक बेलापुरे
किती कॅलेन्डरं आहेत तुमची?
'पाखरे'....
अशी पाखरे येती.. आणिक स्मृती ठेवूनी जाती..
हे गाणे आठवून गेल्या वर्षात एकूण किती 'पाखरे' माझ्या आयुष्यातून 'उडून' गेली त्याची गणना करतो,
अन् मग येत्या वर्षात अजून 'किती' नवी 'पाखरे' येतील ह्याचा अंदाज घेत परत पांघरूण ओढून झोपी जातो..
_/\_
In reply to 'पाखरे'.... by आशिष सुर्वे
फणश्या... _/\_
आम्ही १ जानेवारीला पहाटे उठून व्हॅनिला आईस्क्रिमवर ब्रँडी घालून ते पेटवून खातो.
(स्वगतः कोण बघायला येणारे? द्यायचं आपलं ठोकून. :P )
टेरीफीक क्वेशन... आय लाईक इट
.
डायरी
ऑफीस नसेल तर, भरपूर लोळून उठल्यावर, एक सुंदर डायरी घेऊन येते. या वर्षातील अवीट, सुखद, मैत्रीपूर्ण क्षणांची नोंद ठेवण्याकरता डायरी खूप आवश्यक वाटते मला.
कोर्या करकरीत डायरीच्या कोणत्या पानावर न जाणो कोणती सुंदर अक्षरे आणि सुखद आठवणी उमटणार असतात. : )
यावर्षी तर मी मखमली डायरी आणणार आहे कारण माझे आई-बाबा मला भेट द्यायला या वर्षी येणार आहेत.
भारत हा जागतिक महासत्ता कशी
भारत हा जागतिक महासत्ता कशी होईल ? भारताला विदेशी नेतृत्वाची गरज आहे का ? ह्या दोन गहन विषयांवर र प्रथम मनन मग चिंतन करणार आहे
आवश्यकतेनुसार ताक,
आवश्यकतेनुसार ताक, पॅरॅसिटामोल, कॉफी वगैरे घेत डुलक्या काढतो.
बरेचजण हेच करतात. पण सांगताना मात्र काहीतरी बरे सांगतात..
शहाळ्याचे पाणी पिणे यावेळी उत्तम असते.
गवि, कॉफी घेता हा ऑप्शन
In reply to आवश्यकतेनुसार ताक, by गवि
गवि,
कॉफी घेता हा ऑप्शन टाकाणार होते पन विसरले
बरेचजण हेच करतात. पण सांगताना मात्र काहीतरी बरे सांगतात..
>> सहम्त
इतरला मत दिले आहे.
झिंटॅक किंवा डिस्र्पिनची किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही गोळ्या घेतो आणि बायकोला शपथ देतो कि चालू वर्षात ज्या ज्या पेयांची गणना लौकिकदृष्ट्या दारू म्हणून होते ती पेये पिणार नाही.
अवांतर : बायकोही जुन्या वळणाची (अगदी सरळ) असल्याने विश्वास ठेवत असते, त्यामुळे समयोचित आणि प्रसंगोचित 'दारुडा" असूनसुध्दा माझा संसार सुखाचा चालला आहे.
बारा वाजून गेले असल्याने सदर
बारा वाजून गेले असल्याने सदर कौलाची वैधता संपली का? म्हणजे आम्ही या कौलावर मत देऊ शकणार नाही का?
१ जान १२ पर्यन्त द्या मते
In reply to बारा वाजून गेले असल्याने सदर by llपुण्याचे पेशवेll
१ जान १२ पर्यन्त द्या मते
१ जानेवारी ला तुम्ही सकाळी
हा प्रश्न पडायचे कारण म्हणजे आदला दिवस हा ३१ डिसेंबरचा असतो. आता काही जणांना प्रश्न पडेल की ३१ डिसेंबरचे येवढे वैशिष्ठ्य ते काय?
डिसेंबर ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६५ वा किंवा लीप वर्षात ३६६ वा दिवस असतो. ह्याच दिवशी १९०७ मध्ये हरिवंशराय बच्चन, जेष्ठ हिंदी कवी ह्यांचा जन्म झाला, तर ३१ डिसेंबरला अनेक मृत्यु देखील झाले.
* १९२ - कोमॉडस, रोमन सम्राट.
* ३३५ - संत सिल्व्हेस्टर.
* १६१० - लुडॉल्फ व्हान स्युलेन, जर्मन गणितज्ञ.
* १६५० - दॉर्गोन, चीनी सम्राट.
* १६७९ - जियोव्हानी आल्फोन्सो बोरेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
* १७९९ - ज्यॉँ-फ्रांस्वा मारमोंटेल, फ्रेंच लेखक.
* १८७२ - अलेक्सिस किवी, फिनिश लेखक.
* १८७७ - गुस्ताव कुर्बे, फ्रेंच चित्रकार.
* १८८९ - इयोन क्रेंगा, रोमेनियन लेखक.
* १८९४ - थॉमस जोन्स स्टिल्ट्येस, डच गणितज्ञ.
* १९०५ - अलेक्झांडर पोपोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
* १९३६ - मिगेल दि उनामुनो, स्पॅनिश लेखक.
* १९५२ - हँक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार.
* १९६४ - ओलाफुर थॉर्स, आइसलँडचा पंतप्रधान.
* १९७७ - सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह, कुवैतचा शेख.
* १९८० - मार्शल मॅकलुहान, केनेडियन लेखक.
* १९९३ - झ्वियाद गामसाखुर्दिया, जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
* २००३ - आर्थर आर. फोन हिप्पेल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
* २००४ - जरार्ड देब्रू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ.
ह्या सर्वांचा मृत्युदिन ३१ डिसेंबरच होता. अशा भयानक दिवसाला सामोरे गेल्यानंतर तुम्ही १ जानेवारीला काय करता ? हा प्रश्न उपस्थीत होणारच.
जानेवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १ वा किंवा लीप वर्षात १ वा दिवस असतो. ह्या दिवशी अनेक महत्वाच्या घटना वेगवेगळ्या सालात घडलेल्या आहेत.
# धुम्रपान विरोधी दिन
# ना. भि. परुळेकर यांनी 'सकाळ' हे वृत्तपत्र सुरु केले. (१९३२)
# गव्हर्नमेंट ऑफ़ इंडिया ऍक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली. (१९१९)
# डॉ. शांतीस्वरुप भटनागर स्मृतिदिन. (१९५५)
# ख्रिस्ती वर्षारंभ दिन आहे.
# भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्. एफ्. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५,००० संख्याबळाच्या पेशवे सैन्याचा पराभव केला. (१८१८)
# महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. (१८४८)
# डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय शास्त्रज्ञ. (जन्म १९४३)
# नाना पाटेकर, अभिनेते, दिग्दर्शक. (जन्म १९५१)
# समाजवादीनेत्या- कुसुमताई पटवर्धन स्मृतिदिन (२००५)
# वैज्ञानिक सत्येंदनाथबोस जन्मदिन (१८९४)
# रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण (१९४९)
# सम्राट अशोक या भव्य जंबोजेट विमानाला अपघात (१९७८)
# पुण्याच्या कृषि महाविद्यालयाचा शुभारंभ (१९०८)
तर ह्या अशा रोमांच घटना घडवलेल्या दिवसात मी सकाळी उठुन रात्रीच्या उरलेल्या दारुचे दोन थेंब प्राशन करुन जगनियंत्याचे आभार मानतो.
परामॅट्रिक्स ?
In reply to १ जानेवारी ला तुम्ही सकाळी by परिकथेतील राजकुमार
परामॅट्रिक्स ?
अहाहा अहाहा काय अभ्यास शाळेत
In reply to १ जानेवारी ला तुम्ही सकाळी by परिकथेतील राजकुमार
अहाहा अहाहा
काय अभ्यास
शाळेत तुम्ही गुरुजीन्चे लइ फेवरेट असाल ना?
सहमत आहे. येणारा प्रत्येक
In reply to १ जानेवारी ला तुम्ही सकाळी by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. येणारा प्रत्येक दिवस स्वतःबरोबर रात्र घेऊन येते. रात्र स्वतःबरोबर सकाळ घेऊन येते. दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ एकमेकांच्या विरुद्ध असतात. एकत्र कधीच नसतात. विशिष्ट दिवसांचे विशिष्ट प्रयोजन असते. पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव सर्वत्र वाढत असतांना आणि सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री काय करायचे याच्या योजना बनवत असतांना दुसर्यादिवशी सकाळ कशी घालवणार याचा कौलप्रवर्तकाला पडलेला प्रश्न त्यांच्या प्रगल्भ बुद्धिची साक्ष देत आहे. असा विचार करणारे सदस्यसंख्या जसजशी वाढत जाईल तसतसे मिपा अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल याची मला खात्री आहे.
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा !!
सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री
In reply to सहमत आहे. येणारा प्रत्येक by अवलिया
सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री काय करायचे याच्या योजना बनवत असतांना दुसर्यादिवशी सकाळ कशी घालवणार
>>>> असे काय म्हनता ३१ नन्तर १ जान उजाडनारच आहे ना मग नववर्शाच्या दिवशी काही योजना असेल च ना प्रत्येकाची कोम्बडे झाकले तरी उजाडाय्चे राहील का?
याचा कौलप्रवर्तकाला पडलेला प्रश्न त्यांच्या प्रगल्भ बुद्धिची साक्ष देत आहे.
>>> गुण्ग्राही आहात तुम्ही
असा विचार करणारे सदस्यसंख्या जसजशी वाढत जाईल तसतसे मिपा अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल याची मला खात्री आहे.
>>> तुम्हाला नवीन वर्षाच्या ३१-१२-११ पर्यन्त शुभेच्छा
काय पण कौतुक चाल्लय
In reply to सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री by मुलूखावेगळी
काय पण कौतुक चाल्लय एकमेकांचे..हुह्ह
सकाळची आन्हिकं आणि इतर उपक्रम
सकाळची आन्हिकं आणि इतर उपक्रम उरकतो हे उत्तर कोणीच कसे दिले नाही याचे आश्चर्य वाटते. नववर्षारंभी आंतर्बाह्य शुद्धी महत्वाची आहे अगदी.