मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

१ जानेवारी ला तुम्ही सकाळी तुम्ही काय करता? (वैधता-१२ वाजेपर्यन्त)

मुलूखावेगळी · · कौल

वाचने 1592 वाचनखूण प्रतिक्रिया 41

छोटा डॉन 29/12/2010 - 18:26
१ जानेवारी - सकाळी ( / दुपारी ?) १२ वाजेपर्यंत म्हणजे हा टाईमस्लॉट तुम्ही ३१ सेलेब्रेट करुन झोपल्यानंतर व त्यानंतर पुन्हा उठल्यानंतर सुरु झाला हे गृहीत धरतो, त्यानंतर तो १२ पर्यंत मोजावा ही तुमची अट, राईट्ट ? माफ करा, ही वेळ गेली काही वर्षे पाहिलीच नाही. ह्यावेळी कोणीतरी ह्या सुवर्णक्षणांचा फोटो काढुन तो मिपावर द्या रे, साला नायतर आम्ही तर केव्हा बघणार असे सुवर्णक्षण ? असो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मुलूखावेगळी 29/12/2010 - 19:26
टाइमस्लॉट बरोबर माफ करा, ही वेळ गेली काही वर्षे पाहिलीच नाही. >>> म्हन्जे उशिरा उठता पर्याय लागु होतो ना? ह्यावेळी कोणीतरी ह्या सुवर्णक्षणांचा फोटो काढुन तो मिपावर द्या रे, साला नायतर आम्ही तर केव्हा बघणार असे सुवर्णक्षण ? >>> कसा, कोनाचा, कोनत्या कॅमेर्याने काढलेला,केवढा फोटो हवाय? ते स्पेसिफिक सान्गा. म्हन्जे १ जान च्या मुहुर्तावर कोनी तरी उपलब्ध करुन देइल बाकी- माझ्या १ल्या कौलाला १ ले मत देउन नारळ फोडलात त्याबद्दल आभारी

In reply to by मुलूखावेगळी

छोटा डॉन 29/12/2010 - 19:45
>> म्हन्जे उशिरा उठता पर्याय लागु होतो ना? चुक ! हा पर्याय मला लागु होत नाही, ह्यासाठी उशीरा का होईना पण १२ च्या आधी उठणे अपेक्षित आहे, जे मी करत नाही. इथे जर 'झोपतो' असा पर्याय असता तर तो मी निवडला असता, असो. >> कसा, कोनाचा, कोनत्या कॅमेर्याने काढलेला,केवढा फोटो हवाय? ते स्पेसिफिक सान्गा. ते उद्या बिंदुगामी विचार करुन सांगतो ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

कच्ची कैरी 29/12/2010 - 21:22
मी १ जानेवारीला शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करते ,रात्री जागरण झाले असेल तरी ,देवपूजा करण्याचा पण प्रयत्न करते पण ते होतेच असं नाही आणि बरेचसे संकल्प करते जे पहिल्या १० दिवसांनंतर कधी आठवत पण नाही.

In reply to by असुर

सुहास.. 29/12/2010 - 19:31
गुड क्वेशन !! तुर्तास माझ्या करिता हा प्रश्न पुर्णपणे वैयक्तीक असल्याने ऊत्तर देण्याचे टाळत आहे . धागाकर्त्याने ' और जानकारी के लिये " व्यनी करावा.

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन 29/12/2010 - 19:19
मी सुद्धा आमची माती आमची माणसे मधले कबुतरांचे पालन कसे करावे ह्यावर मार्गदर्शन पर कार्यक्रम पहातो. यावेळी कलमी आंब्यांचे १२ प्रकार दाखवणार आहेत. ते देखील पहाणे रोचक ठरेल . नववर्षाची सुरुवात आंब्यांच्या कलमाने घडावी ह्यापेक्षा सुरेख ते काय ? -(आंबे प्रेमी) टारझन

In reply to by टारझन

मुलूखावेगळी 30/12/2010 - 09:54
चुचु आनि टारझन, कै च्या कै हा आमची माती तुमची माणसे कोनत्या चॅनेलवर सकाळी १२ पर्यन्त लागते?(वाटल्यास क्रुषीमन्त्री पवारान्न्ना विचारा) सान्गा बरे. लोकान्न्ना शिरियसनेस च नाहीये. जय जवान जय किसान

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुहास.. 30/12/2010 - 12:02
ई टिव्ही मराठीवर दाखवतात. >>> नाही रे धन्या , ई टिव्ही मराठीवर ' आमची मातीत गेलेली माणस " आणि झि टिव्ही वर " आमची माती आमचीच माणस करतात" असे दोन कार्यक्रम असतात .

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टारझन 30/12/2010 - 12:06
अरे त्यांचं सगळंच वेगळं आहे बघ .. :) त्या आपल्या मुलुखात पण रहात नाहीत .. तेंव्हा त्यांची शंका कैच्याकै असली तरी खपवुन घ्या :) -(श्री दत्त प्रेमी) मुलंखासगळी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मुलूखावेगळी 30/12/2010 - 13:09
हो का? मी डब्बा पाहात नाही :( इ टीव्वी वर का? छान छान च की मग आहे ना तो प्रोग्राम मन्ग बघा माझी काही हरकत नाही हुम् ( मनात- आमची माती तुमची मान्से टाका गाडुन आता २०११ मधे डबा इकत घ्यावा कि काय?)

आशिष सुर्वे 29/12/2010 - 21:47
अशी पाखरे येती.. आणिक स्मृती ठेवूनी जाती.. हे गाणे आठवून गेल्या वर्षात एकूण किती 'पाखरे' माझ्या आयुष्यातून 'उडून' गेली त्याची गणना करतो, अन् मग येत्या वर्षात अजून 'किती' नवी 'पाखरे' येतील ह्याचा अंदाज घेत परत पांघरूण ओढून झोपी जातो..

In reply to by आशिष सुर्वे

धमाल मुलगा 29/12/2010 - 21:50
फणश्या... _/\_ आम्ही १ जानेवारीला पहाटे उठून व्हॅनिला आईस्क्रिमवर ब्रँडी घालून ते पेटवून खातो. (स्वगतः कोण बघायला येणारे? द्यायचं आपलं ठोकून. :P )

शुचि 30/12/2010 - 00:25
ऑफीस नसेल तर, भरपूर लोळून उठल्यावर, एक सुंदर डायरी घेऊन येते. या वर्षातील अवीट, सुखद, मैत्रीपूर्ण क्षणांची नोंद ठेवण्याकरता डायरी खूप आवश्यक वाटते मला. कोर्‍या करकरीत डायरीच्या कोणत्या पानावर न जाणो कोणती सुंदर अक्षरे आणि सुखद आठवणी उमटणार असतात. : ) यावर्षी तर मी मखमली डायरी आणणार आहे कारण माझे आई-बाबा मला भेट द्यायला या वर्षी येणार आहेत.

निनाद मुक्काम … 30/12/2010 - 00:31
भारत हा जागतिक महासत्ता कशी होईल ? भारताला विदेशी नेतृत्वाची गरज आहे का ? ह्या दोन गहन विषयांवर र प्रथम मनन मग चिंतन करणार आहे

गवि 30/12/2010 - 10:32
आवश्यकतेनुसार ताक, पॅरॅसिटामोल, कॉफी वगैरे घेत डुलक्या काढतो. बरेचजण हेच करतात. पण सांगताना मात्र काहीतरी बरे सांगतात.. शहाळ्याचे पाणी पिणे यावेळी उत्तम असते.

In reply to by गवि

मुलूखावेगळी 30/12/2010 - 10:46
गवि, कॉफी घेता हा ऑप्शन टाकाणार होते पन विसरले बरेचजण हेच करतात. पण सांगताना मात्र काहीतरी बरे सांगतात.. >> सहम्त

नाना बेरके 30/12/2010 - 12:01
झिंटॅक किंवा डिस्र्पिनची किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही गोळ्या घेतो आणि बायकोला शपथ देतो कि चालू वर्षात ज्या ज्या पेयांची गणना लौकिकदृष्ट्या दारू म्हणून होते ती पेये पिणार नाही. अवांतर : बायकोही जुन्या वळणाची (अगदी सरळ) असल्याने विश्वास ठेवत असते, त्यामुळे समयोचित आणि प्रसंगोचित 'दारुडा" असूनसुध्दा माझा संसार सुखाचा चालला आहे.

परिकथेतील राजकुमार 30/12/2010 - 12:21
१ जानेवारी ला तुम्ही सकाळी तुम्ही काय करता?
हा प्रश्न पडायचे कारण म्हणजे आदला दिवस हा ३१ डिसेंबरचा असतो. आता काही जणांना प्रश्न पडेल की ३१ डिसेंबरचे येवढे वैशिष्ठ्य ते काय? डिसेंबर ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६५ वा किंवा लीप वर्षात ३६६ वा दिवस असतो. ह्याच दिवशी १९०७ मध्ये हरिवंशराय बच्चन, जेष्ठ हिंदी कवी ह्यांचा जन्म झाला, तर ३१ डिसेंबरला अनेक मृत्यु देखील झाले. * १९२ - कोमॉडस, रोमन सम्राट. * ३३५ - संत सिल्व्हेस्टर. * १६१० - लुडॉल्फ व्हान स्युलेन, जर्मन गणितज्ञ. * १६५० - दॉर्गोन, चीनी सम्राट. * १६७९ - जियोव्हानी आल्फोन्सो बोरेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ. * १७९९ - ज्यॉँ-फ्रांस्वा मारमोंटेल, फ्रेंच लेखक. * १८७२ - अलेक्सिस किवी, फिनिश लेखक. * १८७७ - गुस्ताव कुर्बे, फ्रेंच चित्रकार. * १८८९ - इयोन क्रेंगा, रोमेनियन लेखक. * १८९४ - थॉमस जोन्स स्टिल्ट्येस, डच गणितज्ञ. * १९०५ - अलेक्झांडर पोपोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ. * १९३६ - मिगेल दि उनामुनो, स्पॅनिश लेखक. * १९५२ - हँक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार. * १९६४ - ओलाफुर थॉर्स, आइसलँडचा पंतप्रधान. * १९७७ - सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह, कुवैतचा शेख. * १९८० - मार्शल मॅकलुहान, केनेडियन लेखक. * १९९३ - झ्वियाद गामसाखुर्दिया, जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष. * २००३ - आर्थर आर. फोन हिप्पेल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. * २००४ - जरार्ड देब्रू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ. ह्या सर्वांचा मृत्युदिन ३१ डिसेंबरच होता. अशा भयानक दिवसाला सामोरे गेल्यानंतर तुम्ही १ जानेवारीला काय करता ? हा प्रश्न उपस्थीत होणारच. जानेवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १ वा किंवा लीप वर्षात १ वा दिवस असतो. ह्या दिवशी अनेक महत्वाच्या घटना वेगवेगळ्या सालात घडलेल्या आहेत. # धुम्रपान विरोधी दिन # ना. भि. परुळेकर यांनी 'सकाळ' हे वृत्तपत्र सुरु केले. (१९३२) # गव्हर्नमेंट ऑफ़ इंडिया ऍक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली. (१९१९) # डॉ. शांतीस्वरुप भटनागर स्मृतिदिन. (१९५५) # ख्रिस्ती वर्षारंभ दिन आहे. # भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्‌. ए‍फ्‌. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्‍या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५,००० संख्याबळाच्या पेशवे सैन्याचा पराभव केला. (१८१८) # महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. (१८४८) # डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय शास्त्रज्ञ. (जन्म १९४३) # नाना पाटेकर, अभिनेते, दिग्दर्शक. (जन्म १९५१) # समाजवादीनेत्या- कुसुमताई पटवर्धन स्मृतिदिन (२००५) # वैज्ञानिक सत्येंदनाथबोस जन्मदिन (१८९४) # रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण (१९४९) # सम्राट अशोक या भव्य जंबोजेट विमानाला अपघात (१९७८) # पुण्याच्या कृषि महाविद्यालयाचा शुभारंभ (१९०८) तर ह्या अशा रोमांच घटना घडवलेल्या दिवसात मी सकाळी उठुन रात्रीच्या उरलेल्या दारुचे दोन थेंब प्राशन करुन जगनियंत्याचे आभार मानतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 30/12/2010 - 13:16
सहमत आहे. येणारा प्रत्येक दिवस स्वतःबरोबर रात्र घेऊन येते. रात्र स्वतःबरोबर सकाळ घेऊन येते. दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ एकमेकांच्या विरुद्ध असतात. एकत्र कधीच नसतात. विशिष्ट दिवसांचे विशिष्ट प्रयोजन असते. पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव सर्वत्र वाढत असतांना आणि सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री काय करायचे याच्या योजना बनवत असतांना दुसर्‍यादिवशी सकाळ कशी घालवणार याचा कौलप्रवर्तकाला पडलेला प्रश्न त्यांच्या प्रगल्भ बुद्धिची साक्ष देत आहे. असा विचार करणारे सदस्यसंख्या जसजशी वाढत जाईल तसतसे मिपा अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल याची मला खात्री आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा !!

In reply to by अवलिया

मुलूखावेगळी 30/12/2010 - 13:37
सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री काय करायचे याच्या योजना बनवत असतांना दुसर्‍यादिवशी सकाळ कशी घालवणार >>>> असे काय म्हनता ३१ नन्तर १ जान उजाडनारच आहे ना मग नववर्शाच्या दिवशी काही योजना असेल च ना प्रत्येकाची कोम्बडे झाकले तरी उजाडाय्चे राहील का? याचा कौलप्रवर्तकाला पडलेला प्रश्न त्यांच्या प्रगल्भ बुद्धिची साक्ष देत आहे. >>> गुण्ग्राही आहात तुम्ही असा विचार करणारे सदस्यसंख्या जसजशी वाढत जाईल तसतसे मिपा अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल याची मला खात्री आहे. >>> तुम्हाला नवीन वर्षाच्या ३१-१२-११ पर्यन्त शुभेच्छा

मृत्युन्जय 03/01/2011 - 13:24
सकाळची आन्हिकं आणि इतर उपक्रम उरकतो हे उत्तर कोणीच कसे दिले नाही याचे आश्चर्य वाटते. नववर्षारंभी आंतर्बाह्य शुद्धी महत्वाची आहे अगदी.