Skip to main content

अभिनंदन !!!

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 25/12/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तरी त्यांचे मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17529
प्रतिक्रिया 117

प्रतिक्रिया

कुंदनसेठ अभिनंदन !!!! आपलं भविष्य १००% खर ठरलय. तवा आपल्याल एक पेश्शल पार्टी लागु. ;) अवांतर : तद् माताय, पब्लीक अभिनंदनाच्या धाग्यावर पण हुज्जत घालतय. अरे नाय पटत तर मग जाना संपादकमंडळा कडे तक्रात घेउन. इथे निषेध कशाला? तुम्ही नाही ओळखत एखाद्याला तर नका देउ शुभेच्छा.

अभिनंदन कुंदन साहेब. ( पत्रिका वगैरे पाहिजे असल्यास अवश्य संपर्क करा ) :) अमोल केळकर

बाळ, आई, बाबा आणि आत्याबैंचेसुद्धा!!!

अभिनंदन कुन्दनराव,पुत्रप्राप्तीबद्द्ल. ह्या मिपानेच मला परत उभे रहायला मदत केली आहे . हा एक परीवारच आहे असे मानतो आम्ही. त्यामुळेच परीवारातल्या ज्युनीयरच्या आगमनाचे आम्ही एकदा नाही तर त्रिवार अभिनंदन करणारच.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

भाग्यश्री, अतिशय वाईट घटना. पण या घटनेने मला माझ्या जालिय मित्रांचे स्थान माझ्या आयुष्यात किती महत्वाचे आणि जवळचे आहे हे परत एकदा जाणवून दिले. अभिनयची बातमी कळली तेव्हा ज्यांच्याकडून कळली (तेही इथलेच) त्यांच्या आवाजावरून मला त्यांची अवस्था जाणवत होती. मला बातमी ऐकताच डोळ्यासमोर अंधारी आली, आतडं पिळवटून दु:ख म्हणजे काय हे मला सख्खा भाऊ नसतानाही भावाच्या निधनाची बातमी ऐकल्यावर कळले. मी माझ्या सगळ्या मित्रांना लगेच फोन करून त्यांचा आवाज ऐकला. ५ मिनिटं बोललो. का? कोण कुठला अभिनय? कधी भेटही नाही. तुझीही नाही. नुकतंच त्याला जीटॉकमधे अ‍ॅड केले होते. आता तो दिवा कधीच हिरवा होणार नाही म्हणून हळहळलो. का एवढी आपुलकी? कोण जाणे! तू म्हणतेस तसेच, आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी नाते भक्कम झालेले आहे. संकटप्रसंगी ही माणसे धावून येतात हे केवळ याच प्रसंगी नाही तर प्रसन्नच्या आईच्या आजारपणात, राजेच्या अपघातानंतर अशा किती तरी प्रसंगी बघितले आहे. स्वातीताईचे वडिल वारले तेव्हाही आपण सगळ्यांनी तिच्याशी संपर्क साधला तेव्हा तिला त्या दु:खातून बाहेर येणे किंचित का होईना सोपे झाले. म्हणूनच मग असे सुखदु:ख शेअर करणारे धागे महत्वाचे ठरतात.

In reply to by नरेशकुमार

आपण मला व्यनि करा. मी सवडीने उत्तर देईन. तूर्तास या धाग्यावर हे नको. प्रसंग काय, आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला काहीही तक्रार असली तरी इतर मार्ग उपलब्ध आहेत. एका मुलाच्या जन्माच्या अभिनंदनपर धाग्यावर थोडे तारतम्य बाळगावे. सूज्ञ असाल अशी आशा.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी सुद्धा असंच म्हणेन , माझ्या निरस.. आयुष्यात मिपामुळे अनेक नवीन मित्र, मैत्रिणी मिळाल्या. अनेकांनी मला, धीर दिला... अचानक 'personality makeover ' का काय म्हणतात तसं झालं दोन तीन बरे लेख लिहिले गेले... त्यावर प्रोत्साहनपर प्रतिक्रिया सुद्धा मिळाल्या.. आता परत कधी निराश वाटलं, हापिसात ब्वास जाम ओरडला, किंवा अजून काय कंटाळवाणं घडलं कि मस्त मिपावर येऊन धुमाकूळ घालतो.... सगळा थकवा, श्रम निघून जातात... आता कुठे आयुष्य जगायला शिकलोय... मिपा आणि मिपाकरांना धन्यवाद.....

श्री. कुंदन यांचे पुत्ररत्नप्राप्तीनिमित्त हार्दिक अभिनंदन. बाळाला अनेक आशीर्वाद.

कुन्द्या... भो* ... च्यायला WIP स्टेटस कधी बोलला नाहीस!!! नेहमी चॅटवर एकतर ३% नाही तर अजून काही तरी फालतू बोलत बसतोस. असो.... जोरदार हाबिणंदण... एसेमेस मिळाला तेव्हा कॉल करू नाही शकलो. आत्ता उशिर झाला आहे. :) उद्या कॉल कर सवडीने. चुचे, आता तरी त्याला छळत जाऊ नकोस. ;)

आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. 'सगळ्यांचे' ऐवजि 'केवळ गटातल्या लोकांचे' असे हवे होते.

बाळा...तुझे या सुंदर जगात आम्ही सारे मिपाकर ,मामा, माम्या ,काका ,काकु आज्जी आज्जोबा तुझे स्वागत करीत आहोत....आपण सारे मिळुन खुप मज्जा करु..

कुंदन, फोन नंबर कळव रे! तुमचं दोघांचं अभिनंदन. बाळाची तब्येत उत्तम असावी यासाठी शुभेच्छा.

In reply to by नरेशकुमार

कोण तुम्ही? आणि काय बरळता आहात? आणि किती वेळ या अनोळखी असण्याच्या तक्रारीनंतर आता फोन नंबर का मागत आहात? तुम्ही कोण आहात, काय आहात, डुप्लिकेट आयडी आहात का ओरिजिनल आहात याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. पण आमच्या सर्व सूज्ञ मिपाकरांच्या मिपावर येऊन असला तारतम्यरहित दंगा घालू नका अशी सर्व सूज्ञ मिपाकरांतर्फे तुमच्याकडे विनंती, मागणी, चेतावनी, धमकी सगळं काही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. नरेशकुमार, आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार, आपले अजून काही आयडी कळलेले आहेत. धक्कादायक माहिती. आपण कृपया आता शांत रहावे हे आपल्या येथिल वास्तव्यासाठी उत्तम राहिल. कळावे.

श्री. नरेशकुमार,.. आनंदाचा दिवस आहे त्यांच्या जीवनातला...सहभागी होवु.. उगीच वादावादी चे गालबोट नको

अभिनंदन करणार्‍यांचे अभिनंदन. असेच अभिनंदन तुम्हाला अ‍ॅड्वाण्स मधे.

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन,

कुंदनसेठ, अभिनंद्नन. पार्टी झाली पाहिजे हं....! -दिलीप बिरुटे

कुंदन, पुत्रप्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन! बाळाला अनेक शुभाशीर्वाद!!

श्री. व सौ. कुंदन यांचे हार्दिक अभिनंदन. (मी त्यांना प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी मिपा परिवारातील १ सदस्य या नात्याने). श्री. नरेशकुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...

श्री. आणि सौ. कुंदन ह्यांचे मनापासुन अभिनंदन... बाळास अनेकानेक आशिर्वाद आणि शुभेच्छा...

पर्णल नेने मराठे उर्फ चुचु यांच्या धाग्याने शतक केल्याबद्दल. त्यांनी ए.चंद्रशेखर यांची गोलंदाजीची धार काढुन टाकली. याशतकी वाटचालीत स्वतःच्या १२ फटक्यांबरोबर त्यांना परा, बिका आणि अवलिया (प्रत्येकी ८), नरेश (७) यांची महत्वाची साथ लाभली. त्याबरोबर विजुभौ, लालसा, विक्षीप्त अदिती इत्यांदीचीसुध्दा मदत झाली. ;)

कुंदूभाव, तुझे आणि वैनीचे खूप खूप अभिनंदन! आणि तुझ्या गोडुल्या लेकीचेही :) ताई झाली ना आता? रुबाब असेल! :D बाळाचे फोटो माझ्या इमेलला धाडशीलच :)

सर्व मि पा करांना मनःपुर्वक धन्यवाद !!! बाकी या निमित्ताने बर्‍याच नवीन ओळखी झाल्या. चुचुआत्याने माझ्या वतीने पेढे दिलेच आहेत, त्याबद्दल चुचुलाही धन्यवाद !!!

कुंदन यांचे अभिनंदन. (चुचुआत्यांचे विनोद मात्र बेसुमार असतात. अत्याचार असतात. )