नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी
नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी
कोणी म्हणेल, "आ गाय मुझे मार" असा हा उद्योग आहे. पण रोज मरे त्याला कोण रडे? मेलेले कोंबडे आगीला भीत नसते. तेव्हा मी प्रथम आगीत उडी घेतो!
१) तोंडात तीळ न भिजणे.
सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही. फोनवर नुसता निरोप कधीच सांगणार नाहीत. एकदा फोन हातात घेतला, की दोन तासांची निच्छिती!
२) उड उड ग चिउ.
कुठल्याही विषयावर बोलतांना, अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे. चिड ह्याची देखील येते, की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात, आणि आपण अतीव गोंधळात पडतो. मग "हे म्हणजे अस्से आहेत" ही टिप्पणी ठरलेलीच.
३) सासरच्या वाटे कुचुकुचु काटे.
ह्याच्या कडची सगळी मंडळी एकजात बेरकी, छळवादी, हेकेखोर, दुष्ट आणि काय काय, तुम्ही रिकाम्या जागा भरा. अर्थात, माहेरचे सगळे सद्गुणाचे पुतळे, हे ओघाने आलेच!
४) विचारावे जनात, लपवावे मनात.
आज मी कोणती साडी नेसू हो? कुठलेही उत्तर ह्यांच्या पसंतीस येणार नाही. एकदा मी पद्धतशीर प्रयोगच करून पाहिला होता.
* "अग ती चंदेरी नेस ना" - "छे ती नको, तशीच साडी, ती अमकी दोन महिन्यांपुर्वी तमक्याकडे घालून आली होती."
* "साडी नको, ड्रेसच घाल" - "तुम्हाला काय, पारंपारीक कार्यक्रमात अशी गेले, तर लोक नावे मला ठेवतील!"
* "तूच ठरव." - "तुम्हाला माझ्यात इंटरेस्टच उरला नाहीये."
५) पडले तरी नाक वर.
आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?
६) वड्याचे तेल वांग्यावर.
कुणी काहीतरी ह्यांच्या मनाविरुद्ध केले असते, आणि निशाणा भलतीकडेच लावतात. पुष्कळदा नवराच ह्यात सापडतो. कधी मुले चुकून हाताशी लागली तर तीही बळी पडतात.
७) काय माझ्या मनात?
ह्यांच्या रागाचे मुख्य कारण काय, ते नेहमी लपवून ठेवणार. भलत्याच बाबतीत आदळाआपट करणार. तुम्ही बरोब्बर ओळखावे अशी अपेक्षा असते. मग तुम्ही तसे प्रयत्न करायला लागलात की जाळ्यात सापडता, आणि ह्या स्वत:ची करमणूक करून घेतात.
८) आरशा सांग कशी दिसते मी?
कितीही वेळा सांगा, तू खूप सुंदर दिसतेस, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दात तुमच्याकडे येईल. तोच प्रकार ही डीश कशी झालीय, किंवा हा ड्रेस कसा दिसतोय इत्यादी बाबतीत. तुम्ही वाचास्पती असलात तरी समाधान करणे कठीणच.
९) एक आणि एक साडेअकरा.
स्त्रियांचे तर्कशास्त्र पूर्णपणे समजू शकणारा कोणी पुरुष दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी जाहिरात दिली तर....?
१०) दुरीतांचे तिमीर जावो.
स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार हवेत, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त समान हवेत अशी धारणा.
तुमच्या मते, तुमच्या डोक्यात सर्वाधीक तिडीक उठवणाऱ्या अशा कोणत्या दहा सवयी बायकांना असतात? हा धागा फ़क्त पुरुषांसाठी नाही. बायकांनी देखील जरूर सांगावे- त्यांच्या मते अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या नवऱ्यांना सर्वाधिक छळण्यात यशस्वी होतात? (खरं तर बायकांकडून ही माहिती मिळाली तर हवीच आहे.)
प्रतिक्रिया
तसे सांगणे अवघड आहे. मला
हा धागा
अगदी असेच
धन्यवाद. ९८ झालेत.
आता ९९
आणि हे १०० पेढे काढा !!
पेढे.
हे घ्या पेढे!
हे काल विजुभाउंनी आणलेले पेढे आहेत ना?
बरोबर मला एक अॅडिशन करायची
+ २०,०००
हा हा मस्त धागा
राज के पेटारे खोलल्याबद्दल
हा हा हा!!!
शक्यता नाकारता येत नाहि.
असंल काही बाही बकलो कि घरि
रात्री ढाराढुर मोठ्याने घोरत
अगदी! अगदी!
शॉप्पिन्ग
म्.............स्त
ह्म्म्म्म्म
उ . न . क.. ?
उंडा म्हणजे कणकेचा किंवा
अरुणकाका, बिचार्या काकी.
शक्यता नाकारता येत नाहि.
उलटे देखील असू शकते, ही
सहमत आहे.. कुठलीच
हां असू शकते की, पण इथे आमाला
काकी अदृश्य रुपाने मिपावर असु
अच्छा! मग या हो काकी इथे,
काकांचा आयडी हायजॅक करून
>>>पण इथे आमाला काकी दिसत
टोपण नाव - दृश्य स्वरुप वाचन
मग असे म्हणायला हवे
;)
>>>बाकी शंभर प्रतिसादांबद्द्ल
शक्यता नाकारता येत नाहि.
धीर देण्याचे सोडून हा कसला
पुरुषांना धीर देण्याचे काम
नेमक्या कोणाच्या?
ऋषिकेश, अजून सहनशक्ती शिल्लक
५) पडले तरी नाक वर. आधी तर
तुला रे कसला अनुभव?
शत प्रतिशत सहमत. आणि यामुळेच
+१
सहमती बद्द्ल आभारी
१)माहेरी जाताना अथवा येताना
काय बोललात विजुभाऊ! यावरून
शक्यता नाकारता येत नाहि.
म्हणूनच
Pagination