नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी
कोणी म्हणेल, "आ गाय मुझे मार" असा हा उद्योग आहे. पण रोज मरे त्याला कोण रडे? मेलेले कोंबडे आगीला भीत नसते. तेव्हा मी प्रथम आगीत उडी घेतो!
१) तोंडात तीळ न भिजणे.
सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही. फोनवर नुसता निरोप कधीच सांगणार नाहीत. एकदा फोन हातात घेतला, की दोन तासांची निच्छिती!
२) उड उड ग चिउ.
कुठल्याही विषयावर बोलतांना, अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे. चिड ह्याची देखील येते, की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात, आणि आपण अतीव गोंधळात पडतो. मग "हे म्हणजे अस्से आहेत" ही टिप्पणी ठरलेलीच.
३) सासरच्या वाटे कुचुकुचु काटे.
ह्याच्या कडची सगळी मंडळी एकजात बेरकी, छळवादी, हेकेखोर, दुष्ट आणि काय काय, तुम्ही रिकाम्या जागा भरा. अर्थात, माहेरचे सगळे सद्गुणाचे पुतळे, हे ओघाने आलेच!
४) विचारावे जनात, लपवावे मनात.
आज मी कोणती साडी नेसू हो? कुठलेही उत्तर ह्यांच्या पसंतीस येणार नाही. एकदा मी पद्धतशीर प्रयोगच करून पाहिला होता.
* "अग ती चंदेरी नेस ना" - "छे ती नको, तशीच साडी, ती अमकी दोन महिन्यांपुर्वी तमक्याकडे घालून आली होती."
* "साडी नको, ड्रेसच घाल" - "तुम्हाला काय, पारंपारीक कार्यक्रमात अशी गेले, तर लोक नावे मला ठेवतील!"
* "तूच ठरव." - "तुम्हाला माझ्यात इंटरेस्टच उरला नाहीये."
५) पडले तरी नाक वर.
आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?
६) वड्याचे तेल वांग्यावर.
कुणी काहीतरी ह्यांच्या मनाविरुद्ध केले असते, आणि निशाणा भलतीकडेच लावतात. पुष्कळदा नवराच ह्यात सापडतो. कधी मुले चुकून हाताशी लागली तर तीही बळी पडतात.
७) काय माझ्या मनात?
ह्यांच्या रागाचे मुख्य कारण काय, ते नेहमी लपवून ठेवणार. भलत्याच बाबतीत आदळाआपट करणार. तुम्ही बरोब्बर ओळखावे अशी अपेक्षा असते. मग तुम्ही तसे प्रयत्न करायला लागलात की जाळ्यात सापडता, आणि ह्या स्वत:ची करमणूक करून घेतात.
८) आरशा सांग कशी दिसते मी?
कितीही वेळा सांगा, तू खूप सुंदर दिसतेस, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दात तुमच्याकडे येईल. तोच प्रकार ही डीश कशी झालीय, किंवा हा ड्रेस कसा दिसतोय इत्यादी बाबतीत. तुम्ही वाचास्पती असलात तरी समाधान करणे कठीणच.
९) एक आणि एक साडेअकरा.
स्त्रियांचे तर्कशास्त्र पूर्णपणे समजू शकणारा कोणी पुरुष दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी जाहिरात दिली तर....?
१०) दुरीतांचे तिमीर जावो.
स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार हवेत, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त समान हवेत अशी धारणा.
तुमच्या मते, तुमच्या डोक्यात सर्वाधीक तिडीक उठवणाऱ्या अशा कोणत्या दहा सवयी बायकांना असतात? हा धागा फ़क्त पुरुषांसाठी नाही. बायकांनी देखील जरूर सांगावे- त्यांच्या मते अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या नवऱ्यांना सर्वाधिक छळण्यात यशस्वी होतात? (खरं तर बायकांकडून ही माहिती मिळाली तर हवीच आहे.)
वाचने
27767
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
खी खी खी!
In reply to बायांची जात लई बेरकी... by योगप्रभू
धमु! मला एक उपाय सुचतोय..
In reply to खी खी खी! by धमाल मुलगा
हे त्या मत्रिणीने ऐकायला
In reply to धमु! मला एक उपाय सुचतोय.. by योगप्रभू
सही जवाब...
In reply to हे त्या मत्रिणीने ऐकायला by अरुण मनोहर
खी खी खी!
In reply to सही जवाब... by योगप्रभू
श्री धमाल मुलगा ; तुमच्या या
In reply to खी खी खी! by धमाल मुलगा
इर्षाद!
In reply to श्री धमाल मुलगा ; तुमच्या या by विजुभाऊ
झक्कास धागा. :)
हा हा हा काय चावटपणा लावलाय?
In reply to झक्कास धागा. :) by धमाल मुलगा
ही ही ही!
In reply to हा हा हा काय चावटपणा लावलाय? by शुचि
जगदंब! जगदंब! धम्या इश्वर
In reply to झक्कास धागा. :) by धमाल मुलगा
ख्या ख्या ख्या!
In reply to जगदंब! जगदंब! धम्या इश्वर by अरुण मनोहर
हा हा हा! लै भारी! ह. भ. प.
In reply to ख्या ख्या ख्या! by धमाल मुलगा
आम्ही आयकले की बायकास्नी
In reply to हा हा हा! लै भारी! ह. भ. प. by नगरीनिरंजन
<दचकल्याची स्मायली>
In reply to आम्ही आयकले की बायकास्नी by अरुण मनोहर
आयला मी आपलं सरळ विचारलं राव,
In reply to <दचकल्याची स्मायली> by धमाल मुलगा
हा हा हा!
In reply to आयला मी आपलं सरळ विचारलं राव, by नगरीनिरंजन
लोकप्रभेत लेख छापुन आणता
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
लावालाव्या...
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
असुद्या!
In reply to लावालाव्या... by अरुण मनोहर
>>करावं. नायतर मग ह्या लेखात
In reply to असुद्या! by धमाल मुलगा
हौ!
In reply to >>करावं. नायतर मग ह्या लेखात by अरुण मनोहर
'नर्मदेऽ हर हर' पुस्तकाच्या
In reply to ख्या ख्या ख्या! by धमाल मुलगा
बायकोला जागेवर आनन्याचे
In reply to झक्कास धागा. :) by धमाल मुलगा
आमची कापी नोंदवायची आहे.
In reply to बायकोला जागेवर आनन्याचे by नरेशकुमार
आप्ल्याला एक कापि
In reply to आमची कापी नोंदवायची आहे. by अरुण मनोहर
रॉयल्टी...
In reply to आमची कापी नोंदवायची आहे. by अरुण मनोहर
धमुराव, तुम्हिह्च सान्गा काय
In reply to रॉयल्टी... by धमाल मुलगा
>>बायकोला जागेवर आनन्याचे
In reply to धमुराव, तुम्हिह्च सान्गा काय by नरेशकुमार
'दुर्बलांचा लढा' हे कसं एकदम
In reply to >>बायकोला जागेवर आनन्याचे by धमाल मुलगा
द माँक हूज वाईफ सोल्ड हिज
In reply to >>बायकोला जागेवर आनन्याचे by धमाल मुलगा
अप्रतिम
In reply to झक्कास धागा. :) by धमाल मुलगा
हे हे
तुमचि, खोटे बोलन्याचि शक्यता
In reply to हे हे by पैसा
हो हे मात्र खरे! बायका सगळी
In reply to हे हे by पैसा
मग?
In reply to हो हे मात्र खरे! बायका सगळी by अरुण मनोहर
मी आणि आई ठरवुन बाबांना त्रास
In reply to मग? by पैसा
>>>>>> बायका सगळी गुपीते किती
In reply to हो हे मात्र खरे! बायका सगळी by अरुण मनोहर
-
In reply to >>>>>> बायका सगळी गुपीते किती by जाई अस्सल कोल्हापुरी
वक्रोक्तीबद्दल !!
ह्या विषयावर मी अगोदर एक
आणी
सुट्टीच्या दिवशी जरा घर
In reply to आणी by उल्हास
१. कुथल्याही फाल्तु विशयाव्र
पहिल्या पाना वरुन वाहुन जाउ नये म्हणुन
आ गा गा गा गा......
आमच्या थेथील केस
हा विषय
+१ चौकट राजा
In reply to हा विषय by चौकटराजा
१> चार दिवस नवर्याचे, (सासर्याचे जुने आहे, नवर्याचे लेटेस्ट!) २> नव'वरु', (नवीन लग्न झालेल्या पतीची कथा) ३> कुल 'वरु', (पतीजात रुढीने जगणार्या पतींची गाथा) ४> सांभाळ रे, ('मरशील नाहीतर' हे सबटायटल!) ५> आल्या घरी तु निट रहा, (पुरुषाला उद्देशून ;) ) ६> बे-ताल, (धर पाय न्हायतर सोस हाल) ७> हा भास हा! (नव मुलीं पाहण्याचा) ८> ह्या गोजिरवाण्या गुत्त्यात, (रमणीय क्षण) ८> दोन चपट्या दोघे आपण, (रमणीय क्षण पार्ट-२) ९> एकाच या जन्मी टळू, (भांडणकल्लोळ/ वास्तवदर्शी मालिका) १०> पिंजरा (फॉर मेन) ११> सासरा पण कधी जावई होता. (नवीन मराठी आवृत्ती) १२> एका लग्नाची तिसरी बायको (डॉक्टरसाहेब स्पेशल सुखांत सिरिअल)=> (न स्थिरावलेला सुखी पुरुष!) १३> पुढच पाऊल (मागे जाताना) १४> बांध बायकोचे (पतीमर्यादा) १५> मुक्तीबंधन (एक केविलवाणा ध्यास) १६> होम मिनिस्टर (पती स्पेशल= सुत्रधार होम मिनिस्टर 'राखी सावंत') (सुचना:- राखी सावंत चालणार नसेल तर तसे आमच्या चॅनलला व्यनी करुन कळवा. आंम्ही तात्काळ तिच्या जागी नवीन स्वस्तातली होम मिनिस्टर निवडू! ;) )
सध्या एक चित्रपट काढायचाही विचार आहे. त्याचे नाव "कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे. तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी! (लोहे को लोहाच काटता है म्हणून चॅनेलचा मुहुर्त आमावस्येलाच ठेवण्यात आला आहे. सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. घरुन पोट भरुन जेऊन या येथे जेवणाची अपेक्षा करु नका.)
लै जिक्रीरीच काम ! पस्तावशाल !
In reply to +१ चौकट राजा by अन्नू
आसंच आमालाबी वाटंतयं म्हणून
In reply to लै जिक्रीरीच काम ! पस्तावशाल ! by चौकटराजा
सगळ्यात
धन्यवाद
ह्ये म्हणजे उंदराला मांजर
In reply to धन्यवाद by किचेन
लपु नका.अस लपुन चालणार नहि.
In reply to ह्ये म्हणजे उंदराला मांजर by अन्नू
दिवसां...
In reply to लपु नका.अस लपुन चालणार नहि. by किचेन
चांगली गोष्ट आहे.या ना त्या
In reply to दिवसां... by अन्नू
काही तरी
In reply to लपु नका.अस लपुन चालणार नहि. by किचेन
प्रेषक शुचि Fri, 24/12/2010 - 10:03
अरुण राव ५०% विचार करा
अरुण राव ५०% विचार करा