मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झट्पट झन्झनित फिश करि...............

पियुशा · · पाककृती
(बर्याच दिवसापासून विचार करत होते कोणती डिश देऊ ? आमच्या आजीला सर्दी झालिये, मग माशाचा रस्सा वरपायाचा गरम गरम म्हणून मासे बनविन्याचा योग आला आणि मला लिहिन्याचाही.......... ) झटपट तर्रिवाली फिश करी ....... मी चोपड़ा मासा वापरला आहे तुम्हाला जो आवडतो तो स्वच्छ धुवून काटे काढून त्याचे पिस करून घ्या. साहित्य :- मासे पावून किलो , ९-१० लसून पाकळ्या, १/२ -१ इंच आल , कोथिम्बिर , खोबर किसलेल ३-४ मोठे चमचे , 2 मध्यम टमाटर , १ चमचा मीठ, लाल तिखट (आवडीनुसार)तेल ,जीर हिंग ,कडीपत्ता, चुटकीभर हिंग आणि थोड़ी हळद... मसाला :- खोबर ,लसून ,आल , कोथिम्बिर ,१ टमाटर , १ चमचा मीठ, सर्वे साहित्य (न भाजता ) मिक्सी मधे थोड पानी घालून बारीक़ वाटुन घ्या . फोडनी : तेल आवडीनुसार घाला मी ३ मोठे चमचे घातले , त्यात जीर , कडीपत्ता , हिंग घालून तडतडवा , नंतर वाटलेला हिरवा मसाला घाला , १ चिरलेला टोमाटो घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या, झनझनित हव असेल तर थोड जास्ती लाल तिखट घाला ,थोड मीठ घालून पानी घाला ग्रेवी जाशी हावी तेवढी घट्ट / पातळ करून घ्या ,थोडीशी हळद घाला ,आता फिश चे तुकडे ग्रेवित सोडा ,८-१० मिनिट झाकण ठेवा , गरमागरम झनझनित तर्रिवाली फिश करी तैयार आहे ,भात , भाकरी वा चपाती कशाबरोबर ही वरपा.......... (आईची मोलाची मदत ) fish fish fishfish

वाचने 9361 वाचनखूण प्रतिक्रिया 22

In reply to by पियुशा

टारझन Wed, 12/15/2010 - 11:29
फोटो मोबाइल वर काढले आहेत क्लिअरिटी बद्दल आधीच क्षमस्व !
खुलाश्याबद्दल धन्यवाद. तोंड लाळावले. जेवायला कधी बोलावताय ? - षार्कमासा चिंगळ्या पिंगळ्या माश्यांनी नाद करायचा नाय :)

In reply to by पियुशा

टारझन Wed, 12/15/2010 - 12:02
आता बोलवुन काय फायदा ? आता ते मासे कोणत्या तलावात पोहत असतील कोणास ठाऊक ... पुण्हा कराल तेंव्हा माश्यांऐवजी कोंबडीचा बेत करा आणी पत्ता देऊन बोलवा :) (तोंडदेखले आमंत्रण नको ) - (खादाड) टारु लाजला तो संपला

गणपा Wed, 12/15/2010 - 13:14
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे || जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म || ... चला आणा पाहु ताट पुढ्यात आता.

In reply to by पिंगू

चिंतामणी Wed, 12/15/2010 - 23:57
बोंगाली बाबुला विचारा अथव युरोपात विचारा, ते सांगतील मासा शाकाहारी प्रकारातच आहे. (कोणिही XXXXXXXXXXचा क्षीण प्रयत्न वगैरे कॉमेंट्स करू नयेत. मिपाचा भाषेत "फाट्यावर मारण्यात येतील". ) निवासी भारतीय (आणि मत्स्यप्रेमी) .- चिंतामणी

In reply to by पिंगू

चिंतामणी गुरुवार, 12/16/2010 - 00:13
हे वाचले आहेत का? ह्या आणि अश्या अनेक पाकृ मिळतील "पाककृती"वर क्लिक केल्यावर.

पिवळा डांबिस गुरुवार, 12/16/2010 - 00:24
पाककृती मस्त झणझणीत दिसते आहे! पण "चोपडा" मासा म्हणजे कोणता मासा ते कळलं नाही!!! मला फक्त प्रियांका चोपडा माहिती आहे!!! (ती ही रुचकर असावी!!;)) पण चोपडा मासा? कॉलिंग जागु! कॉलिंग जागु!! कॉलिंग जागु!!! :)

अश्या कालवणाची उणे ५ ते १० तापमानात राहणार्या मला नितांत गरज आहे ती चक्षु मोदन करून भागवावी लागणार तर. मस्त दिसतेय चित्रात