Skip to main content

झट्पट झन्झनित फिश करि...............

लेखक पियुशा यांनी बुधवार, 15/12/2010 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
(बर्याच दिवसापासून विचार करत होते कोणती डिश देऊ ? आमच्या आजीला सर्दी झालिये, मग माशाचा रस्सा वरपायाचा गरम गरम म्हणून मासे बनविन्याचा योग आला आणि मला लिहिन्याचाही.......... ) झटपट तर्रिवाली फिश करी ....... मी चोपड़ा मासा वापरला आहे तुम्हाला जो आवडतो तो स्वच्छ धुवून काटे काढून त्याचे पिस करून घ्या. साहित्य :- मासे पावून किलो , ९-१० लसून पाकळ्या, १/२ -१ इंच आल , कोथिम्बिर , खोबर किसलेल ३-४ मोठे चमचे , 2 मध्यम टमाटर , १ चमचा मीठ, लाल तिखट (आवडीनुसार)तेल ,जीर हिंग ,कडीपत्ता, चुटकीभर हिंग आणि थोड़ी हळद... मसाला :- खोबर ,लसून ,आल , कोथिम्बिर ,१ टमाटर , १ चमचा मीठ, सर्वे साहित्य (न भाजता ) मिक्सी मधे थोड पानी घालून बारीक़ वाटुन घ्या . फोडनी : तेल आवडीनुसार घाला मी ३ मोठे चमचे घातले , त्यात जीर , कडीपत्ता , हिंग घालून तडतडवा , नंतर वाटलेला हिरवा मसाला घाला , १ चिरलेला टोमाटो घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या, झनझनित हव असेल तर थोड जास्ती लाल तिखट घाला ,थोड मीठ घालून पानी घाला ग्रेवी जाशी हावी तेवढी घट्ट / पातळ करून घ्या ,थोडीशी हळद घाला ,आता फिश चे तुकडे ग्रेवित सोडा ,८-१० मिनिट झाकण ठेवा , गरमागरम झनझनित तर्रिवाली फिश करी तैयार आहे ,भात , भाकरी वा चपाती कशाबरोबर ही वरपा.......... (आईची मोलाची मदत ) fish fish fishfish

वाचने 9382
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by पियुशा

फोटो मोबाइल वर काढले आहेत क्लिअरिटी बद्दल आधीच क्षमस्व !
खुलाश्याबद्दल धन्यवाद. तोंड लाळावले. जेवायला कधी बोलावताय ? - षार्कमासा चिंगळ्या पिंगळ्या माश्यांनी नाद करायचा नाय :)

In reply to by पियुशा

आता बोलवुन काय फायदा ? आता ते मासे कोणत्या तलावात पोहत असतील कोणास ठाऊक ... पुण्हा कराल तेंव्हा माश्यांऐवजी कोंबडीचा बेत करा आणी पत्ता देऊन बोलवा :) (तोंडदेखले आमंत्रण नको ) - (खादाड) टारु लाजला तो संपला

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे || जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म || ... चला आणा पाहु ताट पुढ्यात आता.

फारच भन्नाट. खायची तिव्र इच्छा बळावली आहे.

मस्त लाल रंग . त्यावर तरंगणारी तर्री . पेरलेली कोथिंबीर . कांद्याची पात नि सोबत चपाती की [!!] ?? खूप छान नि ग्रेट.!!

युनिव्हर्सल निषेध... आम्ही पट्टीचे शाकाहारी असल्याने तर्रीचा जोरदार निषेध करत आहोत.. - शाकाहारी पिंगू

In reply to by पिंगू

बोंगाली बाबुला विचारा अथव युरोपात विचारा, ते सांगतील मासा शाकाहारी प्रकारातच आहे. (कोणिही XXXXXXXXXXचा क्षीण प्रयत्न वगैरे कॉमेंट्स करू नयेत. मिपाचा भाषेत "फाट्यावर मारण्यात येतील". ) निवासी भारतीय (आणि मत्स्यप्रेमी) .- चिंतामणी

In reply to by पिंगू

हे वाचले आहेत का? ह्या आणि अश्या अनेक पाकृ मिळतील "पाककृती"वर क्लिक केल्यावर.

पाककृती मस्त झणझणीत दिसते आहे! पण "चोपडा" मासा म्हणजे कोणता मासा ते कळलं नाही!!! मला फक्त प्रियांका चोपडा माहिती आहे!!! (ती ही रुचकर असावी!!;)) पण चोपडा मासा? कॉलिंग जागु! कॉलिंग जागु!! कॉलिंग जागु!!! :)

अश्या कालवणाची उणे ५ ते १० तापमानात राहणार्या मला नितांत गरज आहे ती चक्षु मोदन करून भागवावी लागणार तर. मस्त दिसतेय चित्रात