Skip to main content

९/११ कारस्थान - काहि शोध

लेखक वडिल यांनी बुधवार, 22/12/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
९ /११ /२००१ हा दिवस ९/११ म्हणुन जगभर प्रसिध्दिस आला. ११ सप्टेंबर ला अमेरीकेतील न्यु यॉर्क शहरातील सर्वात उंच इमारती दोन विमानां चा वापर करुन पाडल्या. ह्या घटने मागे इस्लामी अतिरेकी होते असे जग जाहिर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात ह्या घटने मागचा शोध चालु आहे पण अनेक गोष्टि संशयास्पद वाटत आहेत. वेब वर अनेक संस्थळे काहि पुरावे देवुन ह्या घटने मागिल सत्यता पडताळुन पहात आहेत. काहि नवे पुरावे पुढे येत आहेत ज्यामुळे अमेरीकन सरकार आणि काहि यहुदि ( ज्यु) लोकं , सि आय ए ( अमेरीकी गुप्त हेर संस्था) आदि ९/११ घटने मागे असावेत असे संकेत आहेत. मायकल मोर सारख्या डाररेक्टर ने ९/११ फॅरनहाइट नावाचा बोधपट हि काढला आहे. ९/११ मागे कारस्थान हे कुणा १५ इस्लामी युवकांचे नसुन ते बहुतेक एका मोठया गुप्त यंत्रणेचे असावे असे अनेक पुरावे पुढे येत आहेत. गेल्या दहा वर्षात वयैक्तिक रित्या मला हि हे कारस्थान अमेरीकी सिआय ए मधिल काहि लोकांनी घडवुन आणले आहे असे वाटत आहे. ह्या कारस्थाना चा ठोक असा काहि पुरावा अमेरीकी सरकार देवु शकत नाहिये. १५ इस्लामी जिहादि इतक्या मोठ्या प्रमाणावर काहि करु शकतील असे पुरावे नाहित. गेल्या दहा वर्षात "बीन लादेन" नावाच इसम ह्या मागे आहे असे काहि पुरावे नाहित. "बीन लादेन" असा कोणी आहे का नाहि हि सुध्दा शंका आहे. ज्या इमारती पाडण्यात आल्या त्या केवळ २ तासात दोन विमानांनी पाडण्याची शक्यता कमी आहे. त्या अनेक स्फोट घडवुन २० मिनीटाच्या अंतरात पडल्या असे पुरावे आहेत. ९/११ च्या घटने च्या आधि केवळ १ आठवडा ह्या इमारतींचे विमे उतरवण्यात आले होते आणि ज्या लोकांना ह्याचा फायदा झाला ते सर्व ज्यु किंवा उच्च पदस्त सरकारी गुप्त हेर खात्यातील अधिकारी होते. ९ /११ ला पडलेल्या इमारती ( वर्ल्ड ट्रेड सेन्टर) मधे काम करणारे ४५% उच्च अधिकारी हे ज्यु होते पण ९/११ /२००१ ह्या दिवशी सर्व गैर हजर होते. मेलेल्या २००० लोकांन मधे फक्त १०-१५ ज्यु लोकांचा समावेश आहे. ९/११ घटने सारख्या घटने ची कवायत अमेरीकि गुप्तहेर संघटने ने १९९६ मधे केली होती अशी नोंद आहे. असे अजुन अनेक पुरावे आहेत. ९ /११ मुळे सर्वात फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो जॉर्ज बुश, चेनी आणि त्यांच्या मित्रांचा. शिवाय सर्व जागाकडुन मिळालेली सहानुभुती, अफगाणिस्तान आणि इराक वर हल्ले करण्याचे कारण ! ९/११ चे कारस्थान कोणी रचले हे जरी आत्ता सांगता येत नसेल तरी ते फायद्याचे मात्र जॉर्ज बुश, अमेरीका आणि काहि निवडक ज्यु लोकांचे होते हे खरे ! अमेरीकेचे खरे रुप जगापुढे येत आहे. विकिलिक्स हि ह्याची सुरवात आहे. ( अनेक पुस्तके आणि संस्थळे उपलब्ध आहेत जेथे हे पुरावे उपलब्ध आहेत)

वाचने 15387
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

वडील! (हे सामान्यनाम नाही विशेषण म्हणून वापरतो आम्ही) आणखी एक अमेरिकेचे षड्यंत्र ऐकले होते आम्ही. आपला तो रामसेतू फोडायचा प्लान होता त्यांचा. खरे म्हणजे तिथे थोरियमचे साठे आहेत ते त्यांना चोरायचे होते, बरे झाले ना तो प्रयत्न हाणून पाडला ते. सहज मनात आले की कसे चोरतील ते थोरियम? एक प्रसंग डोळ्यासमोर आला. अमावास्येची रात्र... समुद्रात अमेरिकेच्या एखादी युद्धनौका, चारपाच दुय्यम नौका नि चाळीस पन्नास पडाव. पडाव हळूच भारतीय हद्दीत शिरतात, आपले कोस्ट गार्ड नि नेव्हीचे लोक गाढ झोपलेले... एक दोघे वरिष्ठ - चुकून वडिल लिहिले होते आधी पण गोंधळ नको म्हणून खोडले - अधिकारी त्यांच्या खास बोटीत गुपचूप बसलेले.... तिकडून पडावातून तीन वेळा बॅटरीची उघडझाप होते.... इकडून प्रतिसाद मिळतो... एक पडाव पुढे येतो... त्यातून गोरा अमेरिकन एक डॉलरची अर्धी नोट पुढे करतो.... आपले वरिष्ठ खिशातून दुसरा अर्धा भाग काढून जोडून पाहतात नि अंगठा वर करून सिग्नल देतात... आता उरलेले पडाव पटापट पुढे येतात.. सगळे वीर पटापट समुद्रात उड्या मारतात नि तळाशी जाऊन दणादण खोदकाम सुरू करतात... पडावात भरून थोरियम दुय्यम नौकांमध्ये पोचवले जाते... पहाट होईतो सार्‍या नौका, रामसेतू नि थोरियम सगळेच गायब झालेले असते. अर्थात जाताना त्यांनी सोन्याची बिस्कीटे भरलेली ब्याग वरिष्ठांच्या हवाली केलेली असते. वरिष्ठ खूष... अमेरिका खूष... पाणबुडे खूष... सेतू वहीं बनायेंगे चा नारा देता येईल म्हणून इतरही खूष... एकुण सांगता चांगली होते.

In reply to by रमताराम

वा! तुमच्या कथेवर पिच्चर काढायचाय! रजनीकांतला घेऊन!! विथ अ आयटम साँग फिचरिंग मलाईका अरोरा!! रॉयल्टी काय घेणार, बोला!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

द्या नाममात्र काहीतरी. अहो पण रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे. आणि हो मलाईका त्या फ्रिगेटवर ओबामाबरोबर आयटेम साँग पेश करते आहे असे दाखवा, एकदम नॉवल आयडिया बगा. गाणं कोण लिहून देणार आहे का ते विचारा इथे.

In reply to by रमताराम

रामभाऊ, काय हे? पिडांकाका पिच्चर काढणारेत. त्यांच्याकडं मागून मागून नाममात्र काय मागताय? छ्या... आणि वर त्यांनाच विचारताय की, रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे, असं? तुम्ही समजता काय पिडांकाकांना? ते अशा पाच-पन्नास रजनीकांतना, मलाईकाला खेळवतात. मला वाटलं होतं पिडांकाकांचा पिच्चर म्हटल्यावर तुम्ही चांगल्या सोन्याच्या विटा वगैरे मागाल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मागा सोन्याच्या पाच-दहा विटा. एक माझ्यासाठी ठेवा या सल्ल्याची फी म्हणून.

In reply to by श्रावण मोडक

तुम्ही काय लंकेत बदली होऊन गेलांत काय हो हल्ली? नाय, सोन्याच्या विटा वगैरे बोलतांय म्हणऊन विचारतो!!!!:) नाय म्हणजे, श्रावण मोडक (सध्या मुक्काम कोलंबो) असं!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वाटलं की नाही तुम्हाला मी लंकेत गेलो असं! ;) पण ते "सध्या मुक्काम" वगैरे बेक्कार बसला राव. इतकंही हाणू नका ना... :) बाकी, पुण्यातच आहे. त्यामुळं ही अशी सोन्याची विटा वगैरे भाषा.

In reply to by श्रावण मोडक

काय हे श्रामो. चारचौघात असे म्हणायचेच असते. आता सांगूनच टाकतो. एक थोरियमची वीट देणारे आहेत ते, व्यक्तिगत निरोप धाडला होता त्यांनी. (म्हणजे काय त्या थोरियम मधे त्यांचाही 'कट' असेलच की)

In reply to by रमताराम

थोरांचे देणे ते. थोरियमचीच विट मिळणार तुम्हाला. आणि हे आधीच ठरलंय तुमचं असं दिसतंय. म्हणजे आम्ही सान ते सानच राहणार! :(

पाकिस्तान मध्ये व अरब जगतात ९ /११ चा हल्ला ज्यू लोकांनी घडवला आहे .अशी समजूत तेथील कट्टर पंथीयांनी केली आहे .त्याच धर्तीवर मुंबई हल्ला हे हिंदू व ज्यू लोकांचे कारस्थान आहे असा विखारी प्रचार पाकिस्तानी प्रसार माध्येमे करत आहेत. हेच अरबांच्या गळी उतरू पाहत आहेत .(भारताची आखतात कंपन्या विकत घेण्याची मोहीम पाक्यांच्या जीवावर आली आहे .) तुम्ही अश्या लेखातून त्यांना मदत करत आहात .आज हिरव्या दहश्त्वादाविरूढ जगभरात जनमत बनत आहे ,त्याला आपण हातभार लावायचा कि त्याचा प्रचार करावा ह्याचा विचार वडिलकीच्या नात्याने तुम्ही करावा मिपा वर प्रसिध्द होण्याचे अनेक फंडे येथील दर्दी व जुनी जाणती मंडळी आपणास करतील .तेव्हा आवारा

In reply to by निनाद मुक्काम …

+१. निनादशी १०० टक्के सहमत! राज्यकर्ते, त्यांचे चमचे (दिग्गी) आणि 'प्रथमपुत्र' (First son-राहुल) हानी करताहेत तेवढे पुरे कीं! आपण कशाला भर घालायची?