आमच्या बालपणी आम्ही एकमेकांना दंडाच्या बेडक्या दाखवित शक्तिप्रदर्शन करीत फिरायचो. ज्याची दंडुकळी उंटाच्या पाठीसारखी टम्म फुगणार तोच खरा शक्तिमान!
आमच्या वरल्या आळीची पोरं 'तालिमगीर' होती. छाती पुढे काढून, बाह्या दुमडून किँवा बनियनवर फिरायची. त्यांचा तो दणकट देह पाहून आम्हांलाही व्यायामाची खुमखुमी यायची. मग पहाटे उठून नदीकाठच्या गवतात डबडं लपवायचं, अन् रस्त्याने धावत सुटायचं. ही आमची पद्धत. हिवाळ्याची चाहूल लागली की आम्हांला व्यायामाचा किडा चावायचाच.
व्हायचं काय की पहिल्याच दिवशी दोन चार मैल पळून आल्याने दुसरा दिवस अंथरुणातच उगवायचा. पोटऱ्या सुजून यायच्या, फटपट बोलू लागायच्या. पुन्हा व्यायाम बंद. दरवेळी हाच 'वर्षक्रम' चालू राहिल्याने आम्ही मैदान मारणारे पैलवान झालो नसलो, घरातली कामे करणारे 'बैलवान' मात्र झालो!
मूळ म्हणजे आम्हांला योग्य मार्गदर्शनाची साथ न मिळाल्याने आमचे हात बायकीच राहिले..
पुढे कॉलेजला गेल्यावर रबड्या नावाचा सौष्ठवपटू मित्र म्हणून लाभला. पुन्हा आमच्या मनातल्या बेँडकुळ्या डराँव डराँव करू लागल्यावर आम्ही त्याच्यासोबत 'जिम' नामे गुहेत प्रवेश केला. तेथली यंत्रे आम्ही फिरवणं शक्यच नव्हतं, तसा प्रयत्न केल्यास तेच आम्हांस फिरवित. नेटाने दोन महिने रबड्याचं तटतटतं अंग पाहून सोसेल तशी मेहनत केली. तेव्हा कोठे आमच्या बेडकांची पिलावळ दिसू लागली. ते पाहून काही मित्र विचारायचे- ' जोरावर जोर काढतोयेस की रे, पोरगी पटवायचा विचार आहे की काय?' परंतु तसं काही नव्हतं. पोरी काय नुसत्या बॉडीवरच भाळतात? त्यांना सर्वांगिण गोडीची आस असते. असो.
एकूण काय तर त्या जिममध्ये वेट लिफ्टींग करणारे आम्ही एकमेव काडी पैलवान असू. ते सर्वांगावरचे गोळे उडवणं आम्हांला काही जमलं नाही. आमचा पिंड त्यासाठी नव्हताच, शब्दांची खिँड लढवण्यासाठी होता, हे ज्यावेळी एक मैत्रिण आमची कविता वाचून गोग्गोड हसत जवळ आली तेव्हा कळले! त्या आमच्या कवितेचं शीर्षक होतं- तुझे डोळे.
कोठे ते तिचे टपोरे डोळे अन् कोठे आमच्या दंडाचे सपाट गोळे! केवढा विरोधाभास होता.
एवढं आठवायचं कारण म्हणजे आमच्या परिसरात एक जिम मोठा गाजावाजा करीत सुरु झालीय. तेथे हा-हू करणारी पोरं कधी येऊन आम्हांला विचारतात, 'मेगामासने मास वाढेल काहो?' किँवा 'बॉडीप्लसचा साईड इफेक्ट नाही ना?' किँवा 'मी अमूक तमूक खान सारखा 'बॉडीवान' होऊ शकेल का?'
आता आम्ही त्यातले लेखीवाचितज्ञ असलो तरी प्रँक्टिकली अज्ञ आहोत. त्यांना सांगावसं वाटतं की, 'हा मसल्सचा दिखाऊपणा कशासाठी? तसेही तुम्ही फिट आहात. बनियन-पँटी आणखी फिट्ट करण्याचा अट्टाहास का म्हणून? असे तट्ट शिरांचे गलेलठ्ठ मांसल गोळे घाम गाळून कमावताच कशाला? त्यापेक्षा पुरेसा आरोग्यदायी व्यायाम करुन उरलेली तुमची एनर्जी इतर विधायक कामांसाठी उपयोगात आणता येणार नाही का? शरीर सौष्ठवत्व आयुष्यभर पुरणार की शरीराची तंदुरुस्ती? प्रोटीनेटेड खाद्य कंपन्यांची माल खपवण्याची ही छुपी जाहिरातबाजी नाही कशावरुन? आज तुम्ही बॉडी बिल्डीँग करीत बसाल, म्हातारपणाच्या तरतुदीचं काय? अरे बाबांना खान बांधवांनी अंडी खावून खावून बॉडी कमावली ती प्रदर्शनासाठी, पैसे कमावण्यासाठी. तुम्ही मात्र त्यांच्या सिक्स पँक अँब्ज वर लट्टू होऊन आपल्या खिशाला खट्टू करताहात. या मसल्स दिखाऊ संस्कृतीला अल्पायुष्य असतं, आपली योगा संस्कृतीच चिरतरुण आहे, शाश्वत आधारावर बेतलेली आहे, अनेकांनी त्यायोगे समृद्ध जिंदगी गुजारली आहे. याउलट त्या बॉडीबिल्डींगचे साईड इफेक्टच जास्ती. उतारवयात तेच मसल्स असे काही ठणकू लागतात की आई बाप आठवतील. सांधेदुखी मागे लागते. हा व्यायाम प्रकार हट्टाला पेटून करण्याच्या पठडीतला असल्याने त्याचे शरीरावर दूरगामी परिणाम नक्कीच होतांना दिसतात.'
परंतु जाहिरातबाजीला भुललेल्या त्या पोरांना हे पटलंच नाही. त्यातल्या एकदोघांनी याहूँ करीत लेफ्ट चेस्ट पोझ घेतली व आम्हांकडे तुच्छ नजर टाकून त्या कंपूने जिमकडे मार्चपास केले!
( "चौफेर" मधून)
याद्या
8435
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक. गोटीदार आणि गोळीबाज
कोल्ह्याला द्राक्षे आंबट........
In reply to रोचक. गोटीदार आणि गोळीबाज by नगरीनिरंजन
:)
एका पोरीला "तुझे गोळे" म्हणुन
In reply to :) by टारझन
लाई झाक!
मस्त लेखन
छान लिहिले आहे .. पटले
बॉडिप्लस नक्की काय
In reply to छान लिहिले आहे .. पटले by गणेशा
नक्की माहित नाहि .. फक्त
In reply to बॉडिप्लस नक्की काय by स्पा
जरी त्यात फक्त प्रोटीन्स असले
In reply to बॉडिप्लस नक्की काय by स्पा
बापरे भयानक आहे
In reply to जरी त्यात फक्त प्रोटीन्स असले by नगरीनिरंजन
जाडी कमी करणे किंवा मसल्स
In reply to बापरे भयानक आहे by स्पा
सहमत. एका हॉस्पीटलमध्ये एक
In reply to जाडी कमी करणे किंवा मसल्स by शिल्पा ब
सहमत
In reply to सहमत. एका हॉस्पीटलमध्ये एक by सूड
हा...हा...हा...
In reply to सहमत by टारझन
भावना पोचल्या टारुभाऊ !!
In reply to सहमत by टारझन
खरे तर कुठलाही चांगला पर्सनल
तेव्हा जिम वाईट योगा छान असे
In reply to खरे तर कुठलाही चांगला पर्सनल by स्वाती२
टारूशी सहमत
In reply to तेव्हा जिम वाईट योगा छान असे by टारझन
येस्स ! क्रियाटिन
In reply to टारूशी सहमत by आजानुकर्ण
तुझा बकासुरी आहार आहे बाबा
In reply to येस्स ! क्रियाटिन by टारझन
आपण पाँड्स पावडर सोडून कधिच
In reply to येस्स ! क्रियाटिन by टारझन
अय्या , कित्ती कित्ती हुश्शार
In reply to आपण पाँड्स पावडर सोडून कधिच by विंजिनेर
आमच्याच जिममधला ट्रेनर
In reply to खरे तर कुठलाही चांगला पर्सनल by स्वाती२
सप्लिमेंटची गरज
In reply to आमच्याच जिममधला ट्रेनर by सूड
चिमटे छान काढलेत. लेखन
कोण आहे तो / ती ? समोर आणा
In reply to चिमटे छान काढलेत. लेखन by रेवती
टार्या तु मनावर घेउ नकोस, ते
In reply to कोण आहे तो / ती ? समोर आणा by टारझन
टार्या तु मनावर घेउ नकोस, मी
In reply to टार्या तु मनावर घेउ नकोस, ते by नरेशकुमार
गमतीदार
+१
In reply to गमतीदार by धनंजय
खुसखुशीत लेखन , आवडले. आमच्या
http://news.bbc.co.uk/2/hi/62
In reply to खुसखुशीत लेखन , आवडले. आमच्या by पक्या
रोज आठ ग्लास. उगाच भरपूर पाणी
In reply to खुसखुशीत लेखन , आवडले. आमच्या by पक्या
बी.ए.एम्.स डॉ. हे पाणी लागेल
In reply to खुसखुशीत लेखन , आवडले. आमच्या by पक्या
खपवण्याची ही छुपी जाहिरातबाजी
अरे .. ते माणसांचे डॉक्टर
In reply to खपवण्याची ही छुपी जाहिरातबाजी by Pain
हाहाहा! हा तिसरा पर्याय नाही
In reply to अरे .. ते माणसांचे डॉक्टर by टारझन
सर्वसामान्य लोकांना
मसल्स दिखाऊ संस्कृती
जल्ला 'जनातल्या मनात' कसला
+१